नियमित बलोपासना करण्याची शिकवण दिली.
'कोण पुसे अशक्ताला | रोगीसे बराडी दिसे |
कळा नाही कांती नाही | युक्ती बुद्धी दुरावली ||' +
'सदा सर्वदा देव सन्निध आहे। कृपाळूपणे अल्प धारीष्ट पाहे॥ सुखानंद आनंद कैवल्यदानी। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी।।'
'मना रे जनीं मौनमुद्रा धरावी। कथा आदरे राघवाची करावी॥ नसें राम ते धाम सोडूनि द्यावे। सुखालागिं आरण्य सेवीत जावे ।।'
मूर्खलक्षणे सांगितली!
'आदरेंविण बोलणें । न पुसतां साअक्ष देणें ।
निंद्य वस्तु आंगिकारणें । तो येक मूर्ख ॥'
'बुडाली सर्व ही पापे
हिंदुस्थान बळावले
अभक्तांचा क्षयो झाला, आनंदवनभुवनी'
'बहुत लोक मेळवावे| एक विचारे भरावे।
कष्ट करोनि घसरावे। म्लेच्छावरी।
आहे तितुके जतन करावे| पुढे आणिक मेळवावे।
महाराष्ट्र राज्यचि करावे। जिकडे तिकडे ।।'
'शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप ॥
शिवरायांचा आठवावा साक्षेप । भूमंडळीं ॥१६॥
शिवरायांचे कैसें चालणें । शिवरायांचें कैसें बोलणे॥
शिवरायांचे सलगी देणें । कैसे असें ॥१७॥
राज्यसाधनाची लगबग । कैसी असे ॥१८॥
त्याहूनि करावे विशेष । तरीच म्हणावे पुरुष ॥
या उपरी विशेष । काय लिहावें ॥१९॥'
सगळ्यात महत्वाचे म्हणजे वासनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय न घेण्याचा मोलाचा सल्ला दिला!
'मना सांग पा रावणा काय झाले
अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले
म्हणोनि कुडी वासना सांडी वेगी
बळे लागला काळ हा पाठीलागी'
जय जय रघुवीर समर्थ।