उद्धवजी…...केवळ १० मिनिटे देऊ शकाल?
देशातील तीन राज्यांत #कोविड19 पासून लढण्यात अधिकृतपणे आयुर्वेदाची मदत घेण्यास सुरुवात झाली आहे. सदर राज्यांत शासनाद्वारे वेगवेगळ्या पातळीवर हे काम सुरू झाले आहे; ही अत्यंत समाधानाची बाब.
ज्यांना याबाबत काही हातभार लावायचा नसेल त्यांनी 'इथे पोस्ट करून काय होणार?' इथपासून ते 'मुख्यमंत्री लक्ष नाही घालणार' इथपर्यंतच्या कोणत्याही नकारात्मक कमेंट करू नका. काही सकारात्मक बोलावसं वाटलं नाही तर मौन बाळगा.
जे वैद्य वा वैद्येतर माझ्या मताशी सहमत असतील त्यांनी आपल्याला शक्य होईल तितके शेयर करा. समाज, राज्य, देश आणि शास्त्र यांच्या सेवेची याहून मोठी संधी कदाचित कधीच येणार नाही. आपापल्या परीने सेतू बांधण्यात हातभार लावा!