My Authors
Read all threads
🚨 #Update

एखाद्या गृहनिर्माण सोसायटीमध्ये कोरोना बाधित रूग्ण सापडल्यास आणि त्यांना सौम्य लक्षणे असतील तर अशा रुग्णांसाठी गृहनिर्माण संस्थांमधील क्लब हाऊस किंवा मल्टीपर्पज हॉल हे आता कोव्हीड केअर सेंटर म्हणून घोषित करण्याचा निर्णय मा. आयुक्त श्री. विजय सिंघल यांनी घेतला आहे.
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिस्तरीय वैद्यकीय आस्थापना निर्माण करण्यासाठी राज्य शासनाचे आदेश आहेत. या निर्णयामुळे ज्या रुग्णांना खरोखरच रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे त्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. रुग्णालय उपलब्ध व्हावे म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
हे परिपत्रक प्राप्त झाल्यापासून पुढील ३ दिवसात गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष किंवा सचिव यांनी महापालिकेच्या coronacelltmc@gmail.com या मेल आयडीवर कोव्हीड केअर सेंटरची नोंदणी केल्यावर सदर क्लब हाऊसमध्ये संबंधित सोसायटीमधील कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या सदस्यांना अलगीकरण करता येणार.
या निर्णयानुसार सदस्यांना त्यांच्या सोसायटी बाहेरील नातेवाईकांना सोसायटीच्या क्वॉरन्टाइन सेंटरमध्ये आणता येणार नाही, सोसायटीच्या क्वॉरन्टाइन सेंटरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त सदस्यांची मागणी निर्माण झाल्यास प्रथम आलेल्या सदस्याला क्वॉरन्टाइन करणे हे नियमानुसार असेल.
या सेंटरमध्ये अलगीकरण केलेल्या सदस्यांना कुटुंबाकडून भोजन आदी पुरविण्यात येईल, आवश्यक असल्यास सेफ्टी कीटचा (मास्क) वापर करावा. कुटुंबातील सदस्यांनी क्वॉरन्टाइन सेंटरमध्ये ठराविक अंतरावर खाद्यपदार्थ ठेवून क्वॉरन्टाइन झालेल्या सदस्याने सदरच्या बाबी तेथून स्वत: घेऊन जाणे आवश्यक आहे
रुग्णास खाद्य पदार्थ देतांना नॉन रियुजेबल साहित्याचा वापर करणे बंधनकारक असणार आहे, संबधित क्वॉरन्टाइन सेंटरची साफसफाई रुग्णांना स्वत: करावी लागले किंवा पीपीई कीट परिधान केलेल्या प्रशिक्षित कर्मचाऱ्याकडून अशी साफसफाई करुन घेता येईल.
क्वॉरन्टाईन सेंटरमधून निघणारा कचरा हा बायो मेडिकल वेस्टला देणे बंधनकारक राहिल, सबंधित सोसायटीमध्ये वास्तव्यास असलेले डॉक्टर्स अशा रुग्णांची देखभाल करतील, तथापी सोसायटीमध्ये वास्तव्याला डॉक्टर्स नसल्यास महापालिकेकडून वैद्यकीय अधिकारी प्राप्त करुन घेणे सोसायटीला बंधनकारक राहिल.
सोसायटीमध्ये क्लारंटाईन करण्यात आलेल्या रूग्णांची देखरेख करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या डॉक्टर्सचे मानधन देण्याची जबाबदारी संबधित रुग्ण/त्याच्या कुटुंबाची/सोसायटीची असेल. क्लब हाऊसमध्ये जम्बो ऑक्सीजन सिलेंडर व ऑक्सीजन पुरविणारी मास्क ठेवणे संबधित सोसायटीला बंधनकारक असणार आहे.
जम्बो ऑक्सीजन सिलेंडर प्राप्त करुन घेण्यासाठी तांत्रिक साहाय्य सोसायटीमधील उपलब्ध डॉक्टर्स यांनी द्यायचे आहे. किंवा जर ते उपलब्ध नसेल तर आणि तांत्रिक साहाय्य आवश्यक असल्यास ते ठाणे महापालिकेकडून उपलब्ध करुन दिले जाणार आहे.
या सर्व अटी व शर्ती मान्य असल्याबाबत व कोव्हीड केअर सेंटर सुरु करण्याबाबतची लेखी सहमतीचे पत्र संबंधित गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष किंवा सचिव यांनी परिपत्रक प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून ३ दिवसाच्या आत ठाणे महापालिकेला लेखा कळवावे असेही महापालिकेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Enjoying this thread?

Keep Current with Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!