राजकारण व चित्रपट, नेहमीच हातात हात घालून चालतात. आता बच्चनसाहेबांचंच उदाहरण घ्या. इंदिराजी, राजीवजींपासून सुरु करुन ते सध्या मोदींवर स्थिरावले आहेत. जसे राजकारणी सत्तालोलूप असतात; तशीच ही कलाकार मंडळी देखील सत्तेच्या वळचणीला राहून आपलं चांगभलं करण्याच्या प्रयत्नात असतात.
+👇
"सोनू सूद तो झाँकी हैं और भी कई बाकी हैं|" सोनू सूद मातोश्रीवर गेल्यानंतर तो पावनपवित्र होईल/झालाही असेल. मग तुम्ही-आम्ही त्याला का दूषणं देतोय? एव्हाना त्याच्या प्रसिद्धीचा डिंडीम सर्वदूर पोहोचलाय. आज त्यातील खरेखोटेपणा पडताळला जाईल आणि कालौघात हे सगळं विस्मृतीत गेलेलं असेल.
+👇
लोकांची स्मरणशक्ती अल्पजीवी असते. त्याचाच फायदा राजकारण व सिनेक्षेत्रात घेतला जातो. अक्षयकुमार हा आदित्य ठाकरेंचा जिवलग मित्र आहे. मुंबई महानगरपालिकेने मरीन ड्राईव्हवर पोर्टेबल जिमबार बसविले होते. त्याचं उद्घाटन अक्षयने केलं होतं आणि त्यावर व्यायामही करुन दाखविला होता.
+👇
अर्थात पुढे ते जिमबार लोकाग्रहास्तव काढून टाकावे लागले. मुं.म.पा.च्या अंधेरी क्रीडासंकुलात अक्षयकुमार प्रायोजित विनामूल्य व पैसे भरुन असे दोन्ही प्रकारचे मार्शल आर्टसचे वर्ग भरतात. कोणामुळे? तर आदित्य ठाकरेंच्या मैत्रीमिश्रित आर्शिवादामुळे! अशी संधी एखाद्या होतकरुला मिळेल?
+👇
अक्षयकुमार भाजपचं सर्वोच्च नेतृत्त्व व सेनेचे युवराज या दोघांबरोबरचे संबंध व्यवस्थित जपतो. विलासराव देशमुखांचं मुख्यमंत्रीपद २६/११ च्या हल्ल्यातील ताजमहल हाॅटेलला भेटी दरम्यान सोबत रितेश व रामगोपाल वर्माला घेतल्याने गेलं होतं. रितेश आवर्जून मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो.
+👇
मोदी फिल्मी कलाकारांसोबत बातचीत करतात आणि लागोलाग या हसर्या ताऱ्यांबरोबरची त्यांची छायाचित्र सर्वत्र झळकू लागतात. सिनेकलाकारांच्या होळी, दिवाळी, इफ्तारी, ख्रिसमस, न्यू इयर इ. पार्ट्या राजकारण्यांशिवाय पूर्ण होत नाहीत आणि राजकीय लोकांचे इव्हेंट सिनेकलाकारांशिवाय अपूर्ण असतात.
+👇
मग आपण सामान्य लोक इतकं रणकंदन का माजवतो? राजकारण असो वा सिनेक्षेत्र, फार कमी लोकांची वैचारिक बैठक ठाम असते. बाकी उरलेले हवेचा रोख जिकडे, तिकडे उडत जातात. म्हणूनच रामविलास पासवानचा मुलगा सिनेमात काम करतो आणि सनी देओल व तत्सम बरीच पडीक कलाकार मंडळी राजकारणात येतात.
+👇
सोनू सूद प्रकरण ताजं आहे, तोवर चघळलं जाणार. मग हळूच कुठल्या तरी पक्षाकडून त्याचं राजकीय पटलावर आगमन होईल. सोशल माध्यमातून मग कोणी कौतुक करतील तर कोणी शिव्या घालतील. शेवटी काय, आपण मात्र आहो तिथेच असू. टीका करा वा कौतुक, तारतम्य ठेवा. कुठल्याही लाटेत ओंडका बनून वाहत जाऊ नका.
😊🙏
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
गोदी पत्रकारांना कोरोनाग्रस्तांसाठी मदत मागताना युथ काँग्रेसचे अध्यक्ष आठवतात. त्या अमुक एक व्यक्तीला तातडीने मदत देखील मिळते. काल निवडणूक निकालानंतर हेच लबाड टोळकं काँग्रेसला ऑक्सिजनची गरज आहे म्हणून हसत होतं. आज पुन्हा हात पसरायला मोकळे!
+👇
२. कृतघ्नपणा
भाजप भिवानीकडून काँग्रेसच्या दिपेंदर हुड्डांकडे ऑक्सिजनची मागणी केली जाते. मागणी पूर्ण झाल्यावर भाजप भिवानीकडून आभाराचं ट्विट सुध्दा केलं जातं. नंतर काही वेळातच मागणीपासून आभारापर्यंतची सर्व ट्विट डिलिट करण्याचा कृतघ्नपणा करण्यात येतो.
+👇
३. फुसका बार
फिलीपीन्स, न्यूझिलंडच्या वकिलातीतून युथ काँग्रेसकडे ऑक्सिजन सिलिंडरची मागणी केली जाते. ती पूर्ण होताच, समोरुन युथ काँग्रेस अध्यक्ष व राहुल गांधींचे आभार मानले जातात. थोडक्यात, जगातील सगळ्यात मोठा पक्ष म्हणवून घेणारे सत्ताधीश याक्षणी फुसका बार ठरलेत.
२०१६ च्या नोटबंदीपासून लोक जे रांगेत उभे आहेत, त्या रांगेचं दुष्टचक्र काही केल्या संपतच नाहीए. आता तर आपापल्या आप्त स्वकीयांच्या मृतदेहांचे टोकन घेऊन लोक रांगेत तिष्ठत उभे आहेत. न जाणो, तिथे लागणारा वेळ पाहता, एखादा चहावाला स्टाॅल लावून त्या ठिकाणी आपला धंदाही सुरु करेल.
+👇
१
कोरोना काळात मुलांच्या शिक्षणाचे बारा वाजलेत. स्पर्धा परीक्षा रखडल्यात. होतकरू मुलांची सरकारी नोकरीतील वयं उलटून चाललीत. अनेक सरकारी उपक्रमांचं खाजगीकरण झाल्याने किंवा होऊ घातल्याने, मुदती आधीच निवृत्तीचं प्रमाण वाढलंय. यातल्या अनेकांची मुलं उच्चशिक्षण घेत आहेत.
+👇
२
यातील काही मुलांचे घरात फक्त वडिलंच सरकारी नोकरीत असतील, तर मग त्यांचं शिक्षण व नोकरी अधांतरी लटकत राहणार. खाजगी नोकरदारांना तर या कोरोना महामारीने पार भुईसपाट करुन टाकलंय. यातील कोणाच्या नोकर्या गेल्यात, तर कोणाची अर्ध्या पगारावरच बोळवण केली जातेय.
+👇
३
विषयः अर्धसैनिक दल (Paramilitary Forces) आणि चकमकी
पुलवामा असो, दंतेवाडा, बस्तर वा सुखमा याठिकाणी चकमकीत धारातिर्थी पडतात ते फक्त अर्धसैनिक दलाचे जवान! मग देशभरात एक प्रचंड दुःखाची लाट येते आणि हा हा म्हणता ओसरते. मग पुढील घटना घडेपर्यंत सगळीकडे शांतता!
१
+👇
अर्धसैनिक दलात अत्यंत तुटपुंजं वेतन असतं. म्हणून सामान्यतः यात भरती होणारे तरुण हे शेतकरी, कष्टकरी समाजातील असतात. अर्धसैनिक दल म्हणजे लष्कर नव्हे. त्यामुळे एखाद्या लष्करी सैनिकाला मिळणारा पगार आणि एका अर्धसैनिक दलातील जवानाचं वेतन यात जमीनआस्मानाचं अंतर असतं.
२
+👇
अर्धसैनिक दलातील जवानांचं प्रशिक्षण व कामगिरी, लष्करी जवानांच्या तोडीस तोड असते. तरीही अर्धसैनिक दलातील जवान पगाराची ठराविक रक्कम वगळता इतर भत्ते, सुविधा,निवृत्ती वेतन या लाभांपासून कायमच वंचित असतात/आहेत.
३
+👇
लोकसभेच्या वेळी राज ठाकरे "लाव रे तो व्हिडिओ" माध्यमातून सगळ्यांच्या गळ्यातील ताईत बनले होते. तेव्हा कोणी विचार तरी केला होता का, की पुढे जाऊन शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस मिळून सत्ता स्थापन करतील. त्याकाळात राज व साहेबांच्या मैत्रीची पारायणं केली जात.
+👇
१
त्यावेळी राष्ट्रवादी व काँग्रेसच्या समर्थकांनी राज ठाकरेंना डोक्यावर घेऊन नाचायचं तेवढं बाकी ठेवलं होतं. पुढे राज ठाकरे भाजपच्या बाजूला झुकले, तर त्याचा एवढा गवगवा, इतका रागराग का केला गेला वा अजूनही केला जातोय. राज ठाकरेंना आपलं राजकारण करु द्यात की👍 अडचण काय आहे.
+👇
२
राज ठाकरेंच्या राजकारणाचं पुढे काय होईल, न होईल, हे त्यांचं ते बघतील की, तुम्ही का उगं अंगाची लाही लाही करुन घेत आहात. तसंही बाहेर निसर्ग आग ओकतोय, तेवढं पुरेसं नाही का? तुमचे नेते जर खरोखरीच पावरबाज असतील, तर फिकर नाॅट! तुम्हाला इतकं तणतणायची काही गरज नाही. बरोबर ना?
+👇
३
शासनातील भ्रष्टाचार हे हिमनगाच्या टोकासारखे असतात. किंचीतश्या टोकाच्या दर्शनाने जनता हक्काबक्का होते, असा गरीब बापड्या राजकारण्यांचा समज असतो. लोणचं जसं मुरतं, तसा भ्रष्टाचार खोलपर्यंत मुरलेला आहे, हे चलाख जनता चांगलंच जाणते.
+👇
१/१४
आता या गोष्टी पासून कोणी अनभिज्ञ असेल, तर समजा त्याचे दुधाचे दात अजूनही पडलेले नाहीत. लोक एकतर खरंच दुधखुळे असतील किंवा राजकारण्यांनी लोकांबद्दल तसा समज करुन घेतला असावा. कालचा अख्खा दिवस, वेगवेगळ्या राजकारण्यांनी भ्रष्टाचारावर चर्वितचर्वण करण्यात घालवला.
+👇
२/१४
अबब! काय ते खंडणीचे आकडे आणि त्या पैशांच्या राशी कोणासमोर ओतल्या जाणार म्हणून गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुफान गदारोळ! म्हणजे असलं अब्रमण्यम राजकीय इतिहासात पहिल्यांदाच घडतंय की काय? असं वाटण्याजोगी स्थिती! थोडक्यात, ऐतिहासिक घटनाच जणू!
शेतकरी आंदोलनाला दोन महिने होतील. या दोन महिन्यांत शेतकर्यांचा संयम कौतुकास्पद! सरकार, गोदी मिडीया, भाजप आयटी सेल, व्हाॅटस् अप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून शेतकरी आंदोलनाविरोधात सगळ्या प्रकारची गरळ ओकून झाली.
१/१९
+👇
अशा परिस्थितीतही शेतकरी आपल्या निर्णयाबाबत ठाम राहिले. सरकारच्या साम, दाम, दंड, भेदाविरोधात उभं राहणं, कधीच सोपं नव्हतं. म्हणूनच शेतकर्यांचं विशेष अभिनंदन!शेतकरी आंदोलन...
Divert & Rule,
Divide & Rule,
Defame & Rule
असं तीन प्रकारे तोडण्याचा यत्न झाला.
२/१९
+👇
Divert & Rule : सरकारमधील नेते व प्रवक्ते यांनी शेतकर्यांना पाकिस्तानी, खलिस्तानी, चायनीज एजंट, तुकडे तुकडे गँग, अर्बन नक्सल या आणि अशा अनेक उपाध्या देऊन आंदोलन बदनाम करण्याचं कुंभांड रचलं गेलं. परंतु शेतकरी याला पुरुन उरले आणि आंदोलन अधिक तेजाने तळपू लागलं.
३/१९
+👇