गोदी पत्रकारांना कोरोनाग्रस्तांसाठी मदत मागताना युथ काँग्रेसचे अध्यक्ष आठवतात. त्या अमुक एक व्यक्तीला तातडीने मदत देखील मिळते. काल निवडणूक निकालानंतर हेच लबाड टोळकं काँग्रेसला ऑक्सिजनची गरज आहे म्हणून हसत होतं. आज पुन्हा हात पसरायला मोकळे!
+👇
२. कृतघ्नपणा
भाजप भिवानीकडून काँग्रेसच्या दिपेंदर हुड्डांकडे ऑक्सिजनची मागणी केली जाते. मागणी पूर्ण झाल्यावर भाजप भिवानीकडून आभाराचं ट्विट सुध्दा केलं जातं. नंतर काही वेळातच मागणीपासून आभारापर्यंतची सर्व ट्विट डिलिट करण्याचा कृतघ्नपणा करण्यात येतो.
+👇
३. फुसका बार
फिलीपीन्स, न्यूझिलंडच्या वकिलातीतून युथ काँग्रेसकडे ऑक्सिजन सिलिंडरची मागणी केली जाते. ती पूर्ण होताच, समोरुन युथ काँग्रेस अध्यक्ष व राहुल गांधींचे आभार मानले जातात. थोडक्यात, जगातील सगळ्यात मोठा पक्ष म्हणवून घेणारे सत्ताधीश याक्षणी फुसका बार ठरलेत.
+👇
४. विकृती
"काँग्रेसची विधवा", "पन्नास करोडची गर्लफ्रेंड" खपून गेलं. त्यावेळी कुठल्या प्रकारची विकृती जन्माला येतेय, याची चुणूक मिळाली होती. परंतु यावेळी "दीदी ओ दीदी" असा रोडसाईड रोमिओसारखा किळसवाणा छचोरपणा लोकांना आवडला नाही आणि योग्य "खेला" झाला.
+👇
५. कचरापेटी
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक वेळेस विरोधी पक्षातील कचरा घाऊक मध्ये उचलला गेला होता, तेच भाजपने प.बंगालात केलं. जहाज बुडतंय असं दिसताच, हा कचरा पाण्यावर येऊन तरंगायला लागलाय. त्या कचर्याचं आता कुठल्या काठावर जाऊन साचू असं झालंय. एकंदरीत भाजपची कचरापेटी झालीय.
+👇
६. इशारा
वैद्यक शास्त्रातील तज्ज्ञांनी कोरोनाची दुसरी लाट येणार म्हणून केंद्र सरकारला ढळढळीत इशारा दिला होता. सर्व सूचनांकडे सोयिस्करपणे दुर्लक्ष करुन निवडणूक आयोगाने निवडणुका रेटून नेल्या. सर्व पक्षीयांनी गर्दी जमवली. यात सत्ताधारी आघाडीवर होते. परिणाम देश भोगतोय.
+👇
७. ताशेरे
मद्रास उच्च न्यायालयाने एकाचवेळी निवडणूक आयोग व सत्ताधार्यांवर कठोर ताशेरे ओढले आहेत. अगदी थेट यांचा उल्लेख "हत्यारे" असा करण्यात आलाय. साहजिकच यांची भंबेरी उडणं ओघाने आलंच म्हणून सर्वोच्च न्यायालयाला साद घालण्यात आली आहे. पाहू काय होतं?
+👇
८. नशा
सत्तेची नशा व त्यात चूर सत्ताधार्यांनी देशाचं अग्निकुंड केलंय. सततच्या दहनाने स्मशानातील झाडंही करपलीत. शवं जाळायला फुटपाथ देखील अपुरे पडू लागलेत. लोक तीळ तीळ मरताहेत आणि आधुनिक निरो गुरुद्वारात डोकं टेकवायला जातोय. अशाने देव तरी कसा बरं प्रसन्न होईल? तो कोपणारच.
+👇
९. सेव्ह द ट्विट गँग
मागील दोन दिवसांत सेव्ह द ट्विट गँगने वात आणला होता. काय त्या मोठमोठ्या बाता आणि काय ती आकड्यांची उधळण! सगळा धुरळा नुसता! बड़ी बड़ी बातें और वडापाव खाते. सगळे एकाचवेळी काळं तोंड करुन निघून गेलेत.
+👇
१०. शेवट
सांगण्यासारखं, बोलण्यासारखं, लिहीण्यासारखं खूप आहे. पण सध्या इतकं बस्स आहे. फॅसिस्ट विचारसरणी हरल्याचा आनंद आहे. ही विषवल्ली ज्या दिवशी मुळापासून उपटून फेकली जाईल, तो देशासाठी पुर्नस्वातंत्र्याचा आनंद देऊन जाईल. शेवट गोड तर सगळं छान!
समाप्त 🙏
--- दुर्गा
०३.०५.२०२१
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
२०१६ च्या नोटबंदीपासून लोक जे रांगेत उभे आहेत, त्या रांगेचं दुष्टचक्र काही केल्या संपतच नाहीए. आता तर आपापल्या आप्त स्वकीयांच्या मृतदेहांचे टोकन घेऊन लोक रांगेत तिष्ठत उभे आहेत. न जाणो, तिथे लागणारा वेळ पाहता, एखादा चहावाला स्टाॅल लावून त्या ठिकाणी आपला धंदाही सुरु करेल.
+👇
१
कोरोना काळात मुलांच्या शिक्षणाचे बारा वाजलेत. स्पर्धा परीक्षा रखडल्यात. होतकरू मुलांची सरकारी नोकरीतील वयं उलटून चाललीत. अनेक सरकारी उपक्रमांचं खाजगीकरण झाल्याने किंवा होऊ घातल्याने, मुदती आधीच निवृत्तीचं प्रमाण वाढलंय. यातल्या अनेकांची मुलं उच्चशिक्षण घेत आहेत.
+👇
२
यातील काही मुलांचे घरात फक्त वडिलंच सरकारी नोकरीत असतील, तर मग त्यांचं शिक्षण व नोकरी अधांतरी लटकत राहणार. खाजगी नोकरदारांना तर या कोरोना महामारीने पार भुईसपाट करुन टाकलंय. यातील कोणाच्या नोकर्या गेल्यात, तर कोणाची अर्ध्या पगारावरच बोळवण केली जातेय.
+👇
३
विषयः अर्धसैनिक दल (Paramilitary Forces) आणि चकमकी
पुलवामा असो, दंतेवाडा, बस्तर वा सुखमा याठिकाणी चकमकीत धारातिर्थी पडतात ते फक्त अर्धसैनिक दलाचे जवान! मग देशभरात एक प्रचंड दुःखाची लाट येते आणि हा हा म्हणता ओसरते. मग पुढील घटना घडेपर्यंत सगळीकडे शांतता!
१
+👇
अर्धसैनिक दलात अत्यंत तुटपुंजं वेतन असतं. म्हणून सामान्यतः यात भरती होणारे तरुण हे शेतकरी, कष्टकरी समाजातील असतात. अर्धसैनिक दल म्हणजे लष्कर नव्हे. त्यामुळे एखाद्या लष्करी सैनिकाला मिळणारा पगार आणि एका अर्धसैनिक दलातील जवानाचं वेतन यात जमीनआस्मानाचं अंतर असतं.
२
+👇
अर्धसैनिक दलातील जवानांचं प्रशिक्षण व कामगिरी, लष्करी जवानांच्या तोडीस तोड असते. तरीही अर्धसैनिक दलातील जवान पगाराची ठराविक रक्कम वगळता इतर भत्ते, सुविधा,निवृत्ती वेतन या लाभांपासून कायमच वंचित असतात/आहेत.
३
+👇
लोकसभेच्या वेळी राज ठाकरे "लाव रे तो व्हिडिओ" माध्यमातून सगळ्यांच्या गळ्यातील ताईत बनले होते. तेव्हा कोणी विचार तरी केला होता का, की पुढे जाऊन शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस मिळून सत्ता स्थापन करतील. त्याकाळात राज व साहेबांच्या मैत्रीची पारायणं केली जात.
+👇
१
त्यावेळी राष्ट्रवादी व काँग्रेसच्या समर्थकांनी राज ठाकरेंना डोक्यावर घेऊन नाचायचं तेवढं बाकी ठेवलं होतं. पुढे राज ठाकरे भाजपच्या बाजूला झुकले, तर त्याचा एवढा गवगवा, इतका रागराग का केला गेला वा अजूनही केला जातोय. राज ठाकरेंना आपलं राजकारण करु द्यात की👍 अडचण काय आहे.
+👇
२
राज ठाकरेंच्या राजकारणाचं पुढे काय होईल, न होईल, हे त्यांचं ते बघतील की, तुम्ही का उगं अंगाची लाही लाही करुन घेत आहात. तसंही बाहेर निसर्ग आग ओकतोय, तेवढं पुरेसं नाही का? तुमचे नेते जर खरोखरीच पावरबाज असतील, तर फिकर नाॅट! तुम्हाला इतकं तणतणायची काही गरज नाही. बरोबर ना?
+👇
३
शासनातील भ्रष्टाचार हे हिमनगाच्या टोकासारखे असतात. किंचीतश्या टोकाच्या दर्शनाने जनता हक्काबक्का होते, असा गरीब बापड्या राजकारण्यांचा समज असतो. लोणचं जसं मुरतं, तसा भ्रष्टाचार खोलपर्यंत मुरलेला आहे, हे चलाख जनता चांगलंच जाणते.
+👇
१/१४
आता या गोष्टी पासून कोणी अनभिज्ञ असेल, तर समजा त्याचे दुधाचे दात अजूनही पडलेले नाहीत. लोक एकतर खरंच दुधखुळे असतील किंवा राजकारण्यांनी लोकांबद्दल तसा समज करुन घेतला असावा. कालचा अख्खा दिवस, वेगवेगळ्या राजकारण्यांनी भ्रष्टाचारावर चर्वितचर्वण करण्यात घालवला.
+👇
२/१४
अबब! काय ते खंडणीचे आकडे आणि त्या पैशांच्या राशी कोणासमोर ओतल्या जाणार म्हणून गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुफान गदारोळ! म्हणजे असलं अब्रमण्यम राजकीय इतिहासात पहिल्यांदाच घडतंय की काय? असं वाटण्याजोगी स्थिती! थोडक्यात, ऐतिहासिक घटनाच जणू!
शेतकरी आंदोलनाला दोन महिने होतील. या दोन महिन्यांत शेतकर्यांचा संयम कौतुकास्पद! सरकार, गोदी मिडीया, भाजप आयटी सेल, व्हाॅटस् अप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून शेतकरी आंदोलनाविरोधात सगळ्या प्रकारची गरळ ओकून झाली.
१/१९
+👇
अशा परिस्थितीतही शेतकरी आपल्या निर्णयाबाबत ठाम राहिले. सरकारच्या साम, दाम, दंड, भेदाविरोधात उभं राहणं, कधीच सोपं नव्हतं. म्हणूनच शेतकर्यांचं विशेष अभिनंदन!शेतकरी आंदोलन...
Divert & Rule,
Divide & Rule,
Defame & Rule
असं तीन प्रकारे तोडण्याचा यत्न झाला.
२/१९
+👇
Divert & Rule : सरकारमधील नेते व प्रवक्ते यांनी शेतकर्यांना पाकिस्तानी, खलिस्तानी, चायनीज एजंट, तुकडे तुकडे गँग, अर्बन नक्सल या आणि अशा अनेक उपाध्या देऊन आंदोलन बदनाम करण्याचं कुंभांड रचलं गेलं. परंतु शेतकरी याला पुरुन उरले आणि आंदोलन अधिक तेजाने तळपू लागलं.
३/१९
+👇
कालपासून धारावीतील कोरोना नियंत्रण, संघ स्वयंसेवकांचं काम, WHO कडून शाब्बासकी, असं बरंच काही वाचनात आलं. त्यावरुन बरेच वादंगही होत आहेत. अशावेळी भाईंदर पश्चिमेकडील धारावी आठवली. ही धारावी म्हणजे "धारावी देवी"चं स्थान!
+👇
इथे देवीला कोंबड्या, बकरे इ.चा नैवेद्य चढविला जातो. अर्थात बळी दिला जातो. या धारावीला लागूनच डोंगरी आहे. इथे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा, केशवसृष्टी, रामरतन विद्यामंदिर, असं बरंच काही आहे. या शहराची महानगरपालिका (MBMC) व महापौर भाजपचा आहे.
+👇
तेव्हा कालपासून गाजत असलेलं "धारावी" हे ठिकाण बहुतेक इथलं असू शकतं.😄 नामसार्धम्यामुळे असं झालं असावं. नीट खात्री करुन घ्यावी. उगीच कोरोना काळात श्रेयवादाच्या लढाईवरुन वादंग नको.😉😝 तर सांगायची गोष्ट अशी, की भाईंदर शहरात कोरोनाने अक्षरशः थैमान घातलं आहे.
+👇