२०१६ च्या नोटबंदीपासून लोक जे रांगेत उभे आहेत, त्या रांगेचं दुष्टचक्र काही केल्या संपतच नाहीए. आता तर आपापल्या आप्त स्वकीयांच्या मृतदेहांचे टोकन घेऊन लोक रांगेत तिष्ठत उभे आहेत. न जाणो, तिथे लागणारा वेळ पाहता, एखादा चहावाला स्टाॅल लावून त्या ठिकाणी आपला धंदाही सुरु करेल.
+👇
१
कोरोना काळात मुलांच्या शिक्षणाचे बारा वाजलेत. स्पर्धा परीक्षा रखडल्यात. होतकरू मुलांची सरकारी नोकरीतील वयं उलटून चाललीत. अनेक सरकारी उपक्रमांचं खाजगीकरण झाल्याने किंवा होऊ घातल्याने, मुदती आधीच निवृत्तीचं प्रमाण वाढलंय. यातल्या अनेकांची मुलं उच्चशिक्षण घेत आहेत.
+👇
२
यातील काही मुलांचे घरात फक्त वडिलंच सरकारी नोकरीत असतील, तर मग त्यांचं शिक्षण व नोकरी अधांतरी लटकत राहणार. खाजगी नोकरदारांना तर या कोरोना महामारीने पार भुईसपाट करुन टाकलंय. यातील कोणाच्या नोकर्या गेल्यात, तर कोणाची अर्ध्या पगारावरच बोळवण केली जातेय.
+👇
३
समाजातील सगळ्या आघाड्यांवर एक सुप्तशी अशांतता आहे. जणू धगधगता ज्वालामुखी! कधी फुटून त्यातून अंगार सर्वत्र पसरेल आणि त्याचा वणवा होईल, सांगता यायचं नाही. आज IPL सुरु होणार आहे, त्यामुळे काही काळ हे ज्वलंत तुषार थंडावतील.
+👇
४
IPL नावाच्या अफूच्या नशेत सगळे चूर होतील आणि पुन्हा एकदा जैसे थे! त्यात परत महामहिमांची आज्ञा आहे, की लसीकरणाला "उत्सवी" स्वरुप द्यावं अशी! मग काय त्यांच्या आदेशाची वाजतगाजत तामिली व्हायला हवी. बेभान होऊन टाळ्या, थाळ्या पिटण्याचा अनुभव आहेच आमच्या गाठीशी!
+👇
५
हातात पैसा असो-नसो, "उत्सव" टाळ्या व थाळ्या पिटल्याबिगर थांबायचं नाय गड्या, थांबायचं नाय!
+👇
६
तेल कितीही महाग होऊ देत, पण "उत्सव" उजळून निघाला पाहिजे. तेव्हा थांबायचं नाय गड्या, थांबायचं नाय!
भुकेने पोटात खड्डा पडू देत. खिशातील कर्पदिकही संपू देत. कफल्लक होऊ पण "उत्सव" साजरा करताना थांबायचं नाय गड्या, थांबायचं नाय!
+👇
७
चला तर मग, कुटुंबासोबत weekend lockdown ची मज्जा घेऊ. IPL च्या धुंदीत लीन होऊ. लस मिळाली तर ठीकच! नाही मिळाली तर लसीशिवाय जगू. शेजारी देशांना जगवू. दान करुन मान व पुण्य एकत्र मिळवू आणि स्वकीयांना सुळावर लटकवू. मग थांबून कसं चालेल.
+👇
८
तवा अजाबात "दे धक्का"बुक्की न करता जोषात बोलायचं.....
थांबायचं नाय गड्या, थांबायचं नाय!
९
समाप्त 🙏
--- दुर्गा
०९.०४.२०२१
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
विषयः अर्धसैनिक दल (Paramilitary Forces) आणि चकमकी
पुलवामा असो, दंतेवाडा, बस्तर वा सुखमा याठिकाणी चकमकीत धारातिर्थी पडतात ते फक्त अर्धसैनिक दलाचे जवान! मग देशभरात एक प्रचंड दुःखाची लाट येते आणि हा हा म्हणता ओसरते. मग पुढील घटना घडेपर्यंत सगळीकडे शांतता!
१
+👇
अर्धसैनिक दलात अत्यंत तुटपुंजं वेतन असतं. म्हणून सामान्यतः यात भरती होणारे तरुण हे शेतकरी, कष्टकरी समाजातील असतात. अर्धसैनिक दल म्हणजे लष्कर नव्हे. त्यामुळे एखाद्या लष्करी सैनिकाला मिळणारा पगार आणि एका अर्धसैनिक दलातील जवानाचं वेतन यात जमीनआस्मानाचं अंतर असतं.
२
+👇
अर्धसैनिक दलातील जवानांचं प्रशिक्षण व कामगिरी, लष्करी जवानांच्या तोडीस तोड असते. तरीही अर्धसैनिक दलातील जवान पगाराची ठराविक रक्कम वगळता इतर भत्ते, सुविधा,निवृत्ती वेतन या लाभांपासून कायमच वंचित असतात/आहेत.
३
+👇
लोकसभेच्या वेळी राज ठाकरे "लाव रे तो व्हिडिओ" माध्यमातून सगळ्यांच्या गळ्यातील ताईत बनले होते. तेव्हा कोणी विचार तरी केला होता का, की पुढे जाऊन शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस मिळून सत्ता स्थापन करतील. त्याकाळात राज व साहेबांच्या मैत्रीची पारायणं केली जात.
+👇
१
त्यावेळी राष्ट्रवादी व काँग्रेसच्या समर्थकांनी राज ठाकरेंना डोक्यावर घेऊन नाचायचं तेवढं बाकी ठेवलं होतं. पुढे राज ठाकरे भाजपच्या बाजूला झुकले, तर त्याचा एवढा गवगवा, इतका रागराग का केला गेला वा अजूनही केला जातोय. राज ठाकरेंना आपलं राजकारण करु द्यात की👍 अडचण काय आहे.
+👇
२
राज ठाकरेंच्या राजकारणाचं पुढे काय होईल, न होईल, हे त्यांचं ते बघतील की, तुम्ही का उगं अंगाची लाही लाही करुन घेत आहात. तसंही बाहेर निसर्ग आग ओकतोय, तेवढं पुरेसं नाही का? तुमचे नेते जर खरोखरीच पावरबाज असतील, तर फिकर नाॅट! तुम्हाला इतकं तणतणायची काही गरज नाही. बरोबर ना?
+👇
३
शासनातील भ्रष्टाचार हे हिमनगाच्या टोकासारखे असतात. किंचीतश्या टोकाच्या दर्शनाने जनता हक्काबक्का होते, असा गरीब बापड्या राजकारण्यांचा समज असतो. लोणचं जसं मुरतं, तसा भ्रष्टाचार खोलपर्यंत मुरलेला आहे, हे चलाख जनता चांगलंच जाणते.
+👇
१/१४
आता या गोष्टी पासून कोणी अनभिज्ञ असेल, तर समजा त्याचे दुधाचे दात अजूनही पडलेले नाहीत. लोक एकतर खरंच दुधखुळे असतील किंवा राजकारण्यांनी लोकांबद्दल तसा समज करुन घेतला असावा. कालचा अख्खा दिवस, वेगवेगळ्या राजकारण्यांनी भ्रष्टाचारावर चर्वितचर्वण करण्यात घालवला.
+👇
२/१४
अबब! काय ते खंडणीचे आकडे आणि त्या पैशांच्या राशी कोणासमोर ओतल्या जाणार म्हणून गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुफान गदारोळ! म्हणजे असलं अब्रमण्यम राजकीय इतिहासात पहिल्यांदाच घडतंय की काय? असं वाटण्याजोगी स्थिती! थोडक्यात, ऐतिहासिक घटनाच जणू!
शेतकरी आंदोलनाला दोन महिने होतील. या दोन महिन्यांत शेतकर्यांचा संयम कौतुकास्पद! सरकार, गोदी मिडीया, भाजप आयटी सेल, व्हाॅटस् अप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून शेतकरी आंदोलनाविरोधात सगळ्या प्रकारची गरळ ओकून झाली.
१/१९
+👇
अशा परिस्थितीतही शेतकरी आपल्या निर्णयाबाबत ठाम राहिले. सरकारच्या साम, दाम, दंड, भेदाविरोधात उभं राहणं, कधीच सोपं नव्हतं. म्हणूनच शेतकर्यांचं विशेष अभिनंदन!शेतकरी आंदोलन...
Divert & Rule,
Divide & Rule,
Defame & Rule
असं तीन प्रकारे तोडण्याचा यत्न झाला.
२/१९
+👇
Divert & Rule : सरकारमधील नेते व प्रवक्ते यांनी शेतकर्यांना पाकिस्तानी, खलिस्तानी, चायनीज एजंट, तुकडे तुकडे गँग, अर्बन नक्सल या आणि अशा अनेक उपाध्या देऊन आंदोलन बदनाम करण्याचं कुंभांड रचलं गेलं. परंतु शेतकरी याला पुरुन उरले आणि आंदोलन अधिक तेजाने तळपू लागलं.
३/१९
+👇
कालपासून धारावीतील कोरोना नियंत्रण, संघ स्वयंसेवकांचं काम, WHO कडून शाब्बासकी, असं बरंच काही वाचनात आलं. त्यावरुन बरेच वादंगही होत आहेत. अशावेळी भाईंदर पश्चिमेकडील धारावी आठवली. ही धारावी म्हणजे "धारावी देवी"चं स्थान!
+👇
इथे देवीला कोंबड्या, बकरे इ.चा नैवेद्य चढविला जातो. अर्थात बळी दिला जातो. या धारावीला लागूनच डोंगरी आहे. इथे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा, केशवसृष्टी, रामरतन विद्यामंदिर, असं बरंच काही आहे. या शहराची महानगरपालिका (MBMC) व महापौर भाजपचा आहे.
+👇
तेव्हा कालपासून गाजत असलेलं "धारावी" हे ठिकाण बहुतेक इथलं असू शकतं.😄 नामसार्धम्यामुळे असं झालं असावं. नीट खात्री करुन घ्यावी. उगीच कोरोना काळात श्रेयवादाच्या लढाईवरुन वादंग नको.😉😝 तर सांगायची गोष्ट अशी, की भाईंदर शहरात कोरोनाने अक्षरशः थैमान घातलं आहे.
+👇
जुन्या मुंबईतील कामगारबहुल भाग आणि आत्ताच्या मुंबईचा एक श्रीमंत भाग म्हणजे लालबाग! बस, रेल्वे, मोनोरेल मार्गे पश्चिमेकडे कुलाब्यापासून दहिसर व पूर्वेकडे मुलुंडपर्यंत जोडला गेलेला हा विभाग म्हणजे गणेशोत्सवाची पंढरीच जणू!
+👇
अनेक नामांकित गणेशोत्सव मंडळांची इथे मांदियाळी! पैकी गणेश गल्ली, लालबागचा राजा व चिंचपोकळी (चिंतामणी) ही तीन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं सगळ्यात जास्त प्रसिद्ध! यातही पुन्हा लालबागचा राजा हा मानबिंदू! लालबागमध्ये पारशी लोकांची "हिल्ला टाॅवर" व अग्यारी देखील तितकीच ख्यातनाम!
+👇
थोडक्यात सांगायचं, तर लालबाग बहुभाषिक सुध्दा आहे. अशा या लालबागमध्ये शिवसेनेच्या उदयापूर्वी काॅम्रेड कृष्णा देसाई व त्यांच्या कम्युनिस्ट पार्टीची निरंकुश सत्ता होती. सेनेच्या उदयानंतर कृष्णा देसाईंची हत्या झाली आणि ही संधी समजून, बाळासाहेबांनी याठिकाणी मराठीची तुतारी फुंकली.