छत्रपती श्रीशिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारे अनेक गडकिल्ले शेकडो वर्षांनीसुद्धा ताठ मानेने अभेद्यपणे उभे आहेत.
शिवरायांनी गडकिल्ले तुम्हाला सिगरेट ओढायला जिंकले का?गड-किल्ल्यांच्या बाबतीत नेहमी एक गोष्ट समोर येते,ती म्हणजे गड- किल्ल्यांवर होणारा व्यसनी लोकांचा धिंगाणा
वाढती व्यसनाधीनता आणि सामाजिक बेजबाबदारपणा यामुळे अनेक गडकिल्ले असुरक्षिततेच्या जाळ्यात अडकले आहेत. कधी दारूचे अड्डे तर कधी गर्दुल्यांचे अड्डे तर कधी सिगरेट, हुक्का पिणे.गड-किल्ले हा केवळ सामाजिक किंवा सांस्कृतिक विषय नाहीये.
तर शिवरायांच्या, शंभूराजेंच्या,मावळ्यांच्या, आणि हिंदवी स्वराज्यासाठी रक्त सांडलेल्यांचे प्रतिक आहे.राज्याच्या सुवर्ण इतिहासाचे साक्षीदार आहेत.नरवीर तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी,शिवा काशीद अश्या असंख्य मावळ्यांच्या साथीने शिवरायांनी ३५० हुन अधिक गडकिल्ले जिंकले
स्वराज्य म्हणजे सुखी रयत, स्वराज्य म्हणजे देव-देश-धर्म आणि हे स्वराज्य अबाधित राखायचे काम केले ते गडकिल्ल्यांनी.
शिवरायांच्या यशात एक एक किल्ल्याचा मोलाचा वाटा आहे.परंतु आजची गड-किल्ल्यांची सद्यपरिस्थिती जर शिवरायांनी पाहिली तर त्यांचे डोळे पानवतील आणि ते नक्कीच म्हणतील..
माझ्या मावळ्यांचे रक्त वाया गेले.गडकिल्ल्यांवर गेल्या काही काळात दारूपार्ट्या करून धिंगाणा घालण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.त्यांनाआळा घालण्यासाठी आता गडकिल्ल्यांवरदारू पिऊन गैरवर्तन करणाऱ्यांना सहा महिन्यांचा सश्रम तुरुंगवास तसेच १० हजार रुपयांपर्यंतचा दंड करण्यात आला आहे
मात्र आता तरुणाईमध्ये वाढलेला चंगळवाद, मादक पदार्थांच्या सेवनाची विकृत संस्कृती समाजाला घातक ठरत आहे.पर्यटनस्थळांवर आढळणाऱ्या दारूच्या बाटल्यांचा खच, प्लास्टिकचे ग्लास, बाटल्या यांचे ढीग यामुळे ऐतिहासिक वारसा आणि वास्तूंचे विद्रुपीकरण होऊ लागले आहे.
या क्लेशदायक प्रकारांमुळे निसर्गप्रेमी पर्यटक या परिसरापासून दुरावत चालला आहे.गड-किल्ले , लेण्या आणि धार्मिक स्थळे आपली स्फूर्तिस्थळे आहेत. वारशाचे पावित्र्य राखणे , हे प्रशासनासह प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मात्र , प्रत्येक जण आपले कर्तव्य विसरत चालेला आहे.
पर्यटन , विविध उपक्रमांच्या गोंडस नावाखाली ही स्थळे व्यसन करणाऱ्याचे अड्डे बनत चालले आहेत.अशा विकृतीला सरकार , पोलीस प्रशासन , भारतीय पुरातत्व विभागइतकेच आणि स्थानिक नागरिक ही जबाबदार आहेत.या विकृत संस्कृतीला हद्दपार करण्यासाठी प्रत्येक घटकाने आपले योगदान दिले पाहिजे.
ज्या देशाची प्रतिके नष्ट होतात त्या देशाचा इतिहास आणि पराक्रम पुसला जातो. जर आपल्या हिंदवी स्वराज्याचे पौरुषत्व जिवंत ठेवायचे असेल तर शिवरायांचा हा वारसा जपणे हे आपले पहिले कर्तव्य आहे.शिवरायांनी हिंदवी स्वराज्य केवळ स्थापन केलंच नाहीतर त्यांनी ते सांभाळलं ही आपली जबाबदारी आहे.
या टकुर फिरलेल्यांची माथी जाग्यावर आणायचे काम कुणी करत असेल तर धारातीर्थ गडकोट मोहीम.आपल्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठीच गुरुजींनी मोहीम हा मार्ग सांगितला आहे.कसे मरावे आणि कसे जगावे यासाठीच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित धारातीर्थ मोहीम हा एकमेव उपाय आहे.
गडकिल्ल्यांवर ज्यावेळी असे प्रकार घडतात त्यावेळी व्यसन करणारा गुन्हेगार असतोच पण त्याला साथ देणारा त्याचे समर्थन करणारा
आणि पाहून दुर्लक्ष करणारा आणि त्याला समज न देता तिथून पळ काढून नंतर बदनामी करणारा हे सगळे गुन्हेगार आहेतच -संकेत फडके १/३/२० #सह्याद्री#प्रतापगड#महाराष्ट्र
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
#पोलिसांमधला_माणूस
काल माटुंगा (दादर) येथे बंदोबस्त करत असताना एक १४ वर्षाचा मुलगा आला आणि विचारलं ,"साहेब चहा घेणार का ?" कारोना सारख्या महामारीचा विचार करून आधी वाटल हा कोण ? कसा आहे चहा ? कसा बनवला असेल ? म्हणून त्याला नाही सांगितले.
पण नंतर समजले नाही मनात काय विचार आला..
त्याला बोलवून घेतले सहज विचारलं, "बाळा नाव काय तुझं?" "सागर माने" असं नाव सांगून त्याने नकळत अंगावर असलेल्या वर्दी कडे बघितले. त्याला विचारले, "बाळा चहा का विकतोस?" तर त्याने सांगितले "२९ मार्च ला वडील वारले, त्यांचं चहा च कॅन्टीन होतं, आता पर्यंत जितकं कमवल होत तितकं सगळ संपलं
घरात आई आणि मी, आई आजारी असते त्या मुळे मीच चहा बनवून विकतो आणि रोज २०० रुपये मिळवतो, कारण आता शाळा चालू झाल्या तर वह्या पुस्तक घ्यायला पैसे नाहीत, घर भाड द्याच आहे. "अस बोलून तो गप्प बसला.त्याला विचारलं, "तुला पुढे शिकायचं आहे का?" तर पटकन बोलला, "तुमच्या सारखं पोलीस होयच आहे."
ट्रेकिंग करणे जितकं वाटत तितकं सोपं नाही.येण्या जाण्याची सोय बघणं.सगळ्यात अवघड म्हणजे पहाटेच्या साखर झोपेतून जागे होऊन सह्याद्रीची वाट धरण.आडवे उभे डोंगर चढण येड्या गबळ्यांच काम नाही.चालताना लागणार दम ,येणारा घाम हे सगळं सहन करावं लागतं.इथं सगळ्याची तयारी ठेवावी लागते.
उन्हासाठी सनब्लॉक, टोपी, गॉगल असेल , पावसासाठी वाऱ्यासाठी जॅकेट आणि थंडी साठी कानटोपी, थर्मल्स, स्वेटर...याच्यासाठी हे आणि त्याच्यासाठी ते..तरीही जोरात पाऊस यायच्या आत त्यात उबदार गोष्टींचा बंदोबस्त असून.थंडी वाजणार नाहीच तळपत्या उन्हानं सनबर्न होणार नाहीच याची काही खात्री नाही.
आपल्याला काय पाहिजे ते आपण करायचं निसर्गाला काय पाहिजे ते तो करून घेतो.ऊन, वारा, पाऊस, थंडी सह्याद्री प्रत्येक वेळी तुमची परीक्षा पाहत असतो.तिथे गेल्यावर कोण गरीब अन कोण श्रीमंत हा भेदभाव राहत नाही. छोट्याश्या सॅक मध्ये सगळं माववावं लागतं.
गडावर हनुमानाची मूर्ती का असते?
वायूप्रमाणेच हनुमानाची गती, तेज व त्वरा आहेत. तो पर्वतप्राय प्रचंड रूप धारण करू शकतो; यथेष्ट रूप धारण करण्याचा त्याचा हा गुण तर खास यक्षवंशीय गुण आहे. नंतरच्या काळात हा पूर्वीचा यक्ष- हनुमान रामकथेशी जोडल्यामुळे आदर्श रामभक्त म्हणून जनमानसात रूढ
झाला. हनुमान शेंदूरलिप्त, रक्तवर्ण, भुतांचा स्वामी, रोगांपासून वाचविणारा, संततिदायक असल्याने गावात याचे स्थान पाण्याजवळ, पिंपळाखाली पारावर किंवा वेशीजवळ आढळते.छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेल्या प्रत्येक किल्ल्यावर कमीत कमी ५० तर जास्तीत जास्त २००० चे सैन्य असे.
हे सैन्य ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता अष्टौप्रहर डोळ्यात तेल घालून पहारा देत असे. रात्री-अपरात्री गडावर वावरणाऱ्या या मावळ्यांना तथाकथित भुताखेतांपासून संरक्षणासाठी हनुमंताचा मोठा आधार वाटायचा. गावोगावच्या वेशींचे रक्षण करणारा हा देव आपले गडावरही रक्षण करेल
"गोंदया आला रे "
२२ जून १८९७ साली पुण्याच्या गणेशखिंडीत आरोळी घुमली! गोंदया आला रे...
आणि पुण्यावर अत्याचार करणाऱ्या रँडचा वध !!!
प्रसंग १ : रात्रीच्या वेळी एक बग्गी जातेय. फक्त घोड्यांच्या टापंचा आवाज, मागे एक तरुण धावतोय. योग्य ठिकाणी तो आवाज देतो.
"अण्णा गोंद्या" शेजारच्या झाडीतून एक तरुण बाहेर येतो व बग्गीवर चढून गोळीबार करतो.
प्रसंग २ : धावत एक तरुण घरात घुसतो. लोकमान्यांना कार्यक्रमातून बाहेर बोलावतो आणि सांगतो की " खिंडीतला गणपती नवसाला पावला"
प्रसंग ३ : एका तरुणाला फाशी द्यायला नेत आहेत. चालता चालता तो एका कोठडीपाशी थांबतो व म्हणतो "येतो मी" आतून आवाज येतो "4 दिवसांनी भेटूच" कारण ४ दिवसांनी त्याला फाशी होणार असते. चापेकर बंधू हे आद्यक्रांतिकारी होते. १९व्या शतका अखेरीस पुण्यात प्लेगने थैमान घातले.