खरं सांगू? काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत जाऊन असंगाशी संग केल्याने शिवसेनेवर जाम चिडलो होतो. पहिल्याच वार्ताहर परिषदेत सेक्युलर प्रश्नावरून उडालेली भंबेरी, क्षीण केलेले हिंदुत्व, त्यात कोरोनाशी लढाईत हरलेले महाराष्ट्र सरकार, सोनू सूद प्रकरण, पालघर हिंदू संतांची हत्या,
अनंत करमुसे मारहाण प्रकरण, मरकजवरून महाराष्ट्रात आलेल्यां विरोधात दिरंगाई-चालढकल या मुळे ही चीड वाढली होती. ती त्यांच्या या पुढील चांगल्या वागण्याने कदाचित निवळलीही असती. आणि बाळासाहेब ठाकरेंचा चाहता व शिवसेनेचा पारंपरिक मतदार या नात्याने माझे चिडणे स्वाभाविकही होते. पण आता..
पण आता कंगना राणावतवर शिवसेनेने ज्या सूडबुद्धीने कारवाई केलीये त्यामुळे शिवसेना मनातून पार उतरलीये.. साफ उतरलीये.. आदरणीय बाळासाहेबांमुळे एक मराठी, एक हिंदू म्हणून शिवसेनेबद्दल जी काही सुप्त आपुलकी होती ती आता पार पार उतरून गेलीये.
मी पहिल्या परिच्छेदात शिवसेनेवर चिडण्याची जी कारणे दिलीयेत त्यापैकी एकही कारण राजकीय नाहीये बरं. सर्व कारणे देव, देश, धर्माशी निगडित आहेत. मी काही शिवसेनेला राजकीय शत्रू मानत नाही. की मी भाजपाईही नाही, की मी कंगना राणावतचा समर्थकही नाही. मी तिचा फॅनही नाही.
मी आत्तापर्यंत तिचे दोनच चित्रपट पाहिलेयत एक 'मणिकर्णीका' आणि दुसरा "पंगा". हा तर ह्याच लॉक डाऊन मध्ये पाहिलाय. या पलीकडे माझी तिची ओळखही नाही. पण आज कंगना राणावतच्या कार्यालयावर जे हाथोडे ठाकरेंच्या BMC ने चालवले त्या मुळे अवघ्या महाराष्ट्राची मान मात्र नक्कीच खाली गेलीये.
खरे तर सुशांत सिंहचा मृत्यू की हत्या या प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका स्त्रीवर सूडबुद्धीने केलेली ही कारवाई महाराष्ट्राचा खरा अपमान आहे. आपल्या राज्यात आपण सत्तेत असताना एखाद्या अभिनेत्याचा संशयास्पद मृत्यू झाल्यावर त्याची सखोल चौकशी करून-
त्याला योग्य तो न्याय देण्याची भूमिका हिंदुहृदयसम्राट आदरणीय बाळासाहेबांच्या शिवसेनेसारख्या पक्षाची असायला हवी होती. पण असंगाशी संग केल्याने महाराष्ट्रात न्याय मिळत नाही ही गोष्ट या ठाकरे सरकारने सिद्ध करून दाखवली आणि हे प्रकरण हाताळण्यात राज्याचे मुख्यमंत्री म्हणून-
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र सपशेल अपयशी ठरलेले आहेत.. मुख्यमंत्री झाल्यापासून प्रत्येक गोष्टीत ते अपयशीच ठरले आहेत. आजचीच गोष्ट बघा ना साधं मराठा आरक्षणही टिकवता आलं नाही त्यांना.

आता संपल्यात जमा आहे सारं. किंबहुना संपलंच आहे सारं..!!
आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा पारंपरिक मतदार म्हणून, छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्य महाराष्ट्राचा नागरिक म्हणून, संत ज्ञानेश्वरांच्या "माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके।" एक मराठी भाषिक म्हणून मी आज ह्या सरकारचा तीव्र शब्दात निषेध करतो..!!
आणि हिंदुहृदयसम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची मनापासून क्षमा मागून शपथ घेतो की, यापुढे मी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला कधीच मतदान करणार नाही. अगदी भविष्यात भाजपशी युती केली तरी नाही..

।। जय हिंदुराष्ट्र ।।

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Ramesh Raktade

Ramesh Raktade Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @r_raktade

11 Sep
राजकरणातला जोकर..

बहुधा इतर पक्ष, राजकारणी, जनता ह्यांना ह्याच प्रकारे ओळखत असेल. आपले बोलणे, कविता याबद्दल नेहमी विनोदाचे भाग बनले. तरी मनाला कधीच लावून घेतले नाही. यांच्याच आंबेडकरी समाजातून टीका झाली, त्यांनी होऊ दिली. कधी काँग्रेस सोबत असणारे, नंतर मोदी सोबत गेले. Image
आंबेडकरी जनता नाराज झाली जी स्वतःच्या शेकडो पक्षात विखुरली आहे. ह्यांनी जे आहे ते सत्य बोलले. ज्याची सत्ता मजबूत, त्याच्यासोबत मी उभा. त्याला मान्य करायला मागे पुढे बघितले नाही. बाबासाहेब ने तयार केलेल्या RPI ला अनेक फाटे फुटले, त्यात एक फाटा आठवले यांनी सांभाळला.
पण एकहाती कुठलंही सत्ता येण्याची आपली कुवत नाही हे ते जाणतात. फालतू स्वप्न आपल्या समर्थकांना दाखवले नाही. सत्तेत असू तरच समाज घडवू शकू ह्यावर ते ठाम राहतात.
इतर पक्ष आणि नेते जेव्हा स्वतःला पोलिटिकली करेक्ट ठेवण्यात लक्ष देतात,
Read 6 tweets
4 Sep
कंगना रनावत काहीही चुकीचं बोलली नाही. तिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली आहे पाकिस्तानशी नाही. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य हिस्सा आहे आणि मुंबई देखील. मात्र असे असतानाही POK वर जसा पाकिस्तानने कब्जा केला आहे तसा मुंबईवर सुद्धा-

#ISupportKanganaRanaut
पाकिस्तानातील अंडरवर्ल्ड आणि ड्रग्ज माफियांनी कब्जा केला आहे. मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर सोबत केली ते अगदी योग्यच केले कंगनाने.

कंगनाने केलेल्या ह्या विधानामुळे समस्त महाराष्ट्राचा अपमान झाला वगैरे फालतुच्या गोष्टी संपादकांनी आणि गृहमंत्र्यांनी आता अजिबात बोलू नये.
कारण इथे तुम्ही लोक उघड उघड ड्रग्ज माफियांना आणी गुन्हेगारांना संरक्षण देऊन सामान्य माणसाचा गळा घोटत आहात. गुन्हेगारांना पकडायचे सोडून मुंबई पोलिस त्यांना वाचवण्यात गुंतलेली आहे. गुन्हेगारांना टिव्हीवर आणून त्यांना सभ्य दाखवले जात आहे.
Read 5 tweets
18 Aug
आमिर खान तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीला भेटला. तुर्कस्थानचे राष्ट्राध्यक्ष त्यांच्या जहाल इस्लामी धोरणांसाठी आणि भारत विरोधी भूमिकेसाठी उघडपणे ओळखले जातात. तरीही आमिर खान सारखा प्रभावशाली माणूस त्यांच्या पत्नीला भेटतो, या बैठकी मागचे कारण काय असू शकते? Image
एर्दोगान, तुर्कीचे अध्यक्ष, कलम ३७० रद्दबातल करणे, म्हणजे मानवी हक्कांची पायमल्ली असे म्हणून भारताविरुद्ध उघडपणे उभे आहेत पण ते स्वतः कुर्दांवर सतत हल्ले करून मानवी हक्कांचे उल्लंघन करीत आहेत. त्यामुळे त्यांचे ढोंग स्पष्टपणे दिसून येते...
हागिया सोपिया चर्चचे मशिदीत रूपांतर केले त्यांच्या अलीकडच्या स्टंट मुळे भारतातील मुझलीम्स मध्ये त्यांची लोकप्रियता वाढली आहे. आणि आता त्यांना आपली मशीद परत मिळेल अशी ओली स्वप्ने पडत आहेत, जे असे कधीच होणार नाही.
Read 8 tweets
11 Aug
दहीहंडीत ७ थर का?

मनुष्यशरीर स्थित कुंडलिनी शक्ती मध्ये जे चक्र आहेत ते सात चक्र आहेत. दहिहंडीत रचले जाणारे थर सुद्धा सात असतात (किंवा सातच असावेत). (हल्ली आठ थरांच्या, नऊ थरांच्या ज्या हंड्या रचल्या जातात त्या विक्रम नोंदवण्यासाठी रचल्या जातात)

#कृष्णजन्माष्टमी
हे सात थर कुंडलिनीशी संबंधित आहेत.. ते स्तर..

१) मूलाधार चक्र
२) स्वाधिष्ठान चक्र
३) मणिपूर चक्र
४) अनाहत चक्र
५) विशुद्ध चक्र
६) आज्ञा चक्र
७) सहस्रार चक्र असे आहेत.
मनुष्याने कुंडलिनीचे हे सात थर जागृत करून अर्थात दहिहंडीत रचलेले सात थर वर चढून जाऊन परमहंस पदाची प्राप्ती अर्थात मोक्षाची प्राप्ती अर्थातच हंडी फोडून हंडीतले जे माखन-लोणी आहे ते प्राप्त करायचे असते.

एक प्रकारे विचार केला तर दहीहंडी ही योग क्रिया आहे.
Read 6 tweets
8 Aug
"काय करायचेय श्रीराम मंदिर??"

असा प्रश्न विचारणाऱ्यांनो त्या बाबरला विचारा ना "त्याने का टार्गेट केले श्रीराममंदिर? इस्लामिक आक्रमणकर्त्यांनी आमची देवालये का टार्गेट केली?" विचारा.. स्वतःच्या अंतर्मनाला विचारा. ह्या देशाच्या इतिहासाला हा प्रश्न विचारा.. !!! हिंदूंची देवालये का?
अयोध्या मुक्त झाली. आता मथुरा-काशी सुद्धा अशीच मुक्त करायचीय. हिंदूंचा धार्मिक हक्क जो संविधानाने दिलाय.संविधान पाळता ना?

अफझुल्याने जेव्हा छत्रपती शिवरायांचा खात्मा करण्यासाठी दरबारात विडा उचलला तेव्हा स्वराज्यावर चालून येताना त्याने महाराष्ट्राचे कुलदैवत तुळजापूरवर घाव घातले.
जर महाराज नसते तर आज तिथेही मस्जिदच दिसली असती.. अशीच चोरलेली, लुटलेली, उध्वस्त केलेली आमची देवालये आम्हाला पुन्हा मिळवण्याचा, ती पुन्हा ताब्यात घेऊन त्याचा जीर्णोद्धार करण्याचा आमचा हक्क कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.. हे महाराजांनीच आम्हाला दाखवून दिलंय..
Read 4 tweets
6 Aug
स्तोत्र मंत्रांची गरज का आहे?

एरवी शास्त्र वगैरे न मानणारी तरुण पिढी pc वर अँटीव्हायरस आवर्जून टाकतातच कारण ती तांत्रिक गरज आहे. मग मानवी मेंदू तर त्या तुलनेत प्रचंड मोठा आहे. तो ही अनेक ठिकाणी कनेक्ट होतो हार्मफुल साईट्स अर्थात जागा जसे की स्मशान, नकारात्मक व्यक्तीचा संपर्क.
आपल्यामध्ये व्हायरस येऊ नये (दोष येऊ नये आपले तेजोवलय दुषित होऊ नये) म्हणून आपण कोणता अँटीव्हायरस टाकतो?
उत्तर समोरच होते...

आपण म्हणणारे स्तोत्र मंत्रजप हे आपले अँटीव्हायरस. मंत्रांचा अर्थ समजला काय व न समजला काय.. कॉम्प्युटरचे अँटी व्हायरस प्रोग्रामिंग तरी कुठे समजते आपल्याला?
पण ज्याला समजते, त्याने सांगितले की आपण मुकाट ऐकतो व चालवतो... समजो अथवा न समजो, ते काम तर व्यवस्थित होते.

मंत्र स्तोत्रांचे वेगळे काय आहे? सकाळ संध्याकाळ आपले आवर्तन स्कॅन करत राहायचे... व्हायरस आपोआप जातात...
Read 6 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!