#थ्रेड 👇
"एका जागेचा खेळ आणि विधानसभेतील आगामी धोक्याचा केलेला बंदोबस्त.."
उत्तर प्रदेशातील राज्यसभेच्या दहा जागांची निवडणूक होतीये..
तशी पहाल तर एकतर्फी..
भाजपाचे उत्तरप्रदेशात ३१२ आमदार.. राज्यसभेच्या एका जागेसाठी ३७ मते गरजेची. ८ जागा नक्कीच येतील. +
अजून काही जोड तोड केली तर नववी येणं पण अवघड नाही पण भाजपाने इथे वेगळा डाव टाकलाय..
समाजवादी पार्टीकडे ५४ आमदार म्हणजे त्यांची एक जागा नक्की..
बसपाकडे १९ आमदार म्हणजे जवळपास त्यांना १८ मते गरजेची..
खरी मेख इथेच..
नववा उमेदवार देण्याऐवजी भाजपा ८ वरच शांत बसली आणि एका जागेसाठी+
सपा-बसपा मध्ये काडी लावली..
ही काडी महत्वाची आहे..
पक्षीय बलाबल पाहता त्या एका जागेसाठी सपा आणि बसपा एकमेकांत भांडत बसणे २०२२ च्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी गरजेचं आहे. कारण उत्तरप्रदेशातील पोटनिवडणुकीत कैरोना सारख्या जागा केवळ सर्व विरोधक एकवटले म्हणून +
भाजपाला हराव्या लागल्या आहेत. विरोधकांची एकजूट भाजपाला महागात पडू शकते.. ही टाळण्यासाठी ते एकमेकांत भांडत बसणे भाजपाला हवे असणे अगदी स्वाभाविक..
आणि उत्तरप्रदेशात अगदी तसंच होत आहे..
त्या एका जागेसाठी बसपा सपाला अजिबात सहकार्य करणार नाही आणि त्या "दुसऱ्या" उमेदवाराला +
पाडण्यासाठी वेळेस भाजपालासुद्धा सहकार्य करण्याची "अपेक्षित" भूमिका मायावतींनी घेतलीये..
हाथरस प्रकरणामुळे काँग्रेस उत्तरप्रदेशात जबरदस्त उघडी पडलीये, तर एकमेकांत लढत बसून सपा आणि बसपा भाजपाला वाट मोकळी करून देतील, अशी आशा करण्यात सध्या तरी काही गैर वाटत नाही..
बाकी +
"योगीजींनी टाकला दाणा... झुंज लागली, पॉपकॉर्न आणा" अशीच अवस्था राज्यसभेच्या निमित्ताने उत्तरप्रदेशात पाहायला मिळेल हे मात्र नक्की..
पाहुयात..
- चेतन दीक्षित
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
बाळासाहेबांच्या आणि शिवसेनेच्या नावानं बोलताना उठसुठ महाराष्ट्राच्या अस्मितेची लेबलं लावणारे एक गोष्ट नेहमी विसरतात कि संबंध महाराष्ट्राने शिवसेनेला कधीही स्वीकारलेले नाहीये. कोणाची धाव कुठपर्यंत हे मराठी जनता जाणते..
बाळासाहेबांच्या सभेला गर्दी तूफान व्हायची पण त्याचे मतात परिवर्तन झाले नाही कारण मराठी जनतेला कुठे टाळ्या वाजवायच्या आणि कुठे मत द्यायचं हे कळतं.
काँग्रेस-राकाँला भक्कम पर्याय हा केवळ भाजपाचं देऊ शकला वा शकतोय.. गेल्या दोन विधानसभेत हे स्पष्ट सिद्ध झाले आहे. उगाच धसका घेऊन ऐंशी+
वर्षाचा माणूस राज्यभर फिरत नव्हता.. एवढं करूनपण जनतेने नाकारलेच आणि हे स्वतः त्यांनी मान्य केलेच होते.. असो.
शिवसेनेच्या राजकीय इतिहासाकडे लक्ष दिलं तर शेम्बड्या पोराला पण कळेल कि भाजपासारखा पक्ष सोबत होता म्हणून शिवसेना वाढली.. तत्वज्ञान नं झोडता आकड्यांकडे पहा.. +
१. मी बागुलबुवा नाही.. (मी तर घाबरट)
२. मी आपल्या हितासाठी संवाद साधत असतो.. (कि करमणुकीसाठी?)
३. कोरोना हा पाहुणा आहे. (शत्रू कि पाहुणा?)
५. आदित्यने मेट्रोसाठी अहोरात्र मेहनत घेतली.. (आदित्यने मेहनत घेतली.. कुणी नाही पाहिली) +
६. खोटी झाडं मी लावू नाही शकत. (खोटी सहानुभूती देऊ शकतो)
७. कोकणात आपण नुकसानभरपाई दिली, विदर्भात देतो आहोत. (लोकांनीच घेतली नसेल..)
८. कापूस येतोय येऊ द्या..(निःशब्द)
९. दोन कोटी दोन लाख थाळ्या.. (टाळ्या)
१०. पाहुण्याला दिली ओसरी.. पाहुणा हातपाय पसरी.. (आरोग्य लाजलं) +
११. तुम्ही कोणी घाबरू नका.. (तो ठेका मी घेतलाय)
१२. दीडशे वर्षाच्या इंग्रजांना आपण घालवू शकलो. कोरोनाला नाही घालवू शकणार? (पुन्हा एकदा निःशब्द)
१३. मास्क हा आपला ब्लॅक बेल्ट. (राज ठाकरे ब्लॅकबेल्ट धारक नाहीत तर..ओके नोटेड.. थँक्स) +
आज मुंबईच्या पोलीस कमिशनरांनी खास पत्रकार परिषद घेऊन तीन चॅनेल्स पैसे देऊन टीआरपी वाढवून घेत असल्याचा आरोप केला..
ती तीन चॅनेल्स म्हणजे फक्त मराठी, बॉक्स सिनेमा आणि अर्थात रिपब्लिकसुद्धा..
बाकीच्या दोन चॅनेल्सचं नाव कधी ऐकण्यातपण नव्हतं. +
रिपब्लिकनं चालवलेले ट्रेंड सोशल मीडियावर कसे काय एवढे जोरात चालतात आणि युट्युबवरसुद्धा एवढा जबर प्रतिसाद मग कसा मिळतो ह्याचीही चौकशी व्हावी ह्या मताचा मी आहे
रिपब्लिकनं जर तसं काही केलं असेल तर त्यांचं लायसन रद्द व्हावं..
अफरातफरीच्या संशयाने जेंव्हा धाडी पडल्या तेंव्हा अभिव्यक्तीच्या नावे बांगड्या फोडणारे आता शांत बसतील किंवा पार्ट्या झोडतील कारण रिपब्लिक त्यांच्या कंपूतला नाही..
बाकी ह्या पत्रकार परिषदेमागे कोणाचे डोके असेल हे मी वेगळे सांगायला नकोच.. +
संघाच्या तृतीय वर्ष शिबिराच्या वेळेसचा किस्सा आहे .. आवर्जून वाचा..
एका स्वयंसेवकाच्या आयुष्यात तृतीय वर्षाचे किती महत्व असते ते संघ माहीत असणाऱ्यांना वेगळे सांगायची गरज नाही. कट्टर स्वयंसेवकाची, प्रसंगी घरावर तुळशीपत्र ठेवून देशकार्यासाठी जीवन वेचायची, वृत्ती एव्हाना तयार +
झालेली असते. कोणाही तृतीय वर्ष शिक्षित स्वयंसेवकाकडे पाहिल्यास संघाची प्रतिकृती दिसल्यास नवल नाही.
तर.. तृतीय वर्ष शिबीर सुरु होते.. त्यादरम्यान, दोन स्वयंसेवकांमध्ये भांडण सुरु झालं.. खरंतर स्वयंसेवकांमध्ये भांडण हा प्रकार तसा संघाला नवीन.. सुरुवातीला हे भांडण किरकोळ असेल +
म्हणून दुर्लक्ष केलं गेलं. पण नंतर हे भांडण जरा जास्तच वाढलं, तेंव्हा एका ज्येष्ठ स्वयंसेवकाला पाठवण्यात आलं..
ते दोघे स्वयंसेवक केरळ मधील कोणूर मधले होते.. त्यांच्यात वाद चालला होता कि, "ह्या शिबिरानंतर त्यांच्या शाखेचा कोण मुख्यशिक्षक होणार" म्हणून.. दोघांनाही त्यात +
उत्तर प्रदेश मध्ये, ज्या नराधमांनी पाशवी बलात्कार करून, पीडित तरुणीला जीवे मारण्यात आलं, त्याबद्दल तुम्हाला एकट्यालाच नाही सर्वांनाच दुःख आहे.
ही राजकारण करण्याची वेळ नाही.
पण, तुम्ही फिल्म सिटी न बनवता माता बहिणी सुरक्षित असल्या पाहिजेत अश्या उपाय योजना करा, असा उपदेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिले आहत.
साहेब दुःख व्यक्त राजकारण न करता देखील आपल्याला व्यक्त होता आलं असतं, पण नाही, आपणाला राजकीय टिपण्णी महत्वाची वाटली +
आणि तुम्ही ती केली.
असो, सर आपल्याला माहिती असेल, नसेल याबद्दल मला माहिती नाही. पण, मागील ६-७ महिन्यात आपल्या राज्यात घडलेल्या घटना तुमच्या निदर्शनास आणून देत आहे.
कोरोनाच्या संकटकाळातही महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत अशा घटना घडल्या आहेत, +