संघाच्या तृतीय वर्ष शिबिराच्या वेळेसचा किस्सा आहे .. आवर्जून वाचा..
एका स्वयंसेवकाच्या आयुष्यात तृतीय वर्षाचे किती महत्व असते ते संघ माहीत असणाऱ्यांना वेगळे सांगायची गरज नाही. कट्टर स्वयंसेवकाची, प्रसंगी घरावर तुळशीपत्र ठेवून देशकार्यासाठी जीवन वेचायची, वृत्ती एव्हाना तयार +
झालेली असते. कोणाही तृतीय वर्ष शिक्षित स्वयंसेवकाकडे पाहिल्यास संघाची प्रतिकृती दिसल्यास नवल नाही.
तर.. तृतीय वर्ष शिबीर सुरु होते.. त्यादरम्यान, दोन स्वयंसेवकांमध्ये भांडण सुरु झालं.. खरंतर स्वयंसेवकांमध्ये भांडण हा प्रकार तसा संघाला नवीन.. सुरुवातीला हे भांडण किरकोळ असेल +
म्हणून दुर्लक्ष केलं गेलं. पण नंतर हे भांडण जरा जास्तच वाढलं, तेंव्हा एका ज्येष्ठ स्वयंसेवकाला पाठवण्यात आलं..
ते दोघे स्वयंसेवक केरळ मधील कोणूर मधले होते.. त्यांच्यात वाद चालला होता कि, "ह्या शिबिरानंतर त्यांच्या शाखेचा कोण मुख्यशिक्षक होणार" म्हणून.. दोघांनाही त्यात +
प्रचंड रस होता.. आणि त्याच पदामध्ये, दुसर्या कोणत्याही पदामध्ये नाही... तडजोड कोणालाच मान्य नव्हती.. आणि दोघांचा एकमेकांना प्रचंड विरोध होता. प्रसंगी मारामारीसुद्धा झाली होती.
दोघांच्याही बाजू ऐकून काय तो सोक्षमोक्ष लावायचा ठरलं..
एकाला घरचे लग्नासाठी मुलगी बघत होते. +
दुसऱ्याचे म्हणणे होते, एक तर पहिला एकुलता एक आणि कमवता.. घरची पूर्ण जबाबदारी त्याच्यावर.. ही जास्तीची जबाबदारी त्याला पेलवणार नाही..
दुसऱ्याचे लग्न झालेले.. परिस्थिती जरा उत्तम.. पदरात दोन मुले.. पहिल्याचे म्हणणे असे, कि दुसरा आधीच बर्याच जबाबदाऱ्या सांभाळतोय.. घरात दोन लहान +
मुले.. म्हातारे आईबाबा.. त्याने घरात जास्त लक्ष द्यावे.. मुख्य शिक्षकाची जबाबदारी जास्त महत्वाची नाही..
एकंदरीत असे हे जटील प्रकरण होते.
त्या वृद्ध स्वयंसेवकाला प्रश्न पडला कि, तसं तर दोघांचेही बरोबर, पण दोघांचाही बचाव सुद्धा बरोबर.. त्याचबरोबर दोघे त्या पदाबद्दल तेवढेच +
आग्रही.. मार्ग काही सापडत नव्हता..
त्यापेक्षा सध्या जो कोणी मुख्य शिक्षकाची जबाबदारी सांभाळतोय त्यालाच ती जबाबदारी देणे जास्त योग्य होईल, म्हणून त्यांनी विचारले कि, सध्याचा त्या शाखेचा मुख्यशिक्षक कोण आहे?
त्यावर मिळालेले उत्तर वाचणाऱ्याच्या अंगावर काटा निर्माण केल्याशिवाय +
राहणार नाही..
उत्तर असं मिळालं कि, ...
"... त्या शाखेच्या मुख्यशिक्षकाचा आठ - दहा दिवसांपूर्वी कम्युनिस्टांनी निर्घृण खून केला होता.. आणि ह्यापुढे 'जो कोणी त्या शाखेचा मुख्यशिक्षक होईल त्याचेसुद्धा असेच हाल केले जातील', अशी पत्रके वाटली होती.. +
आणि त्या भांडणार्या स्वयंसेवकांना एकमेकांचे प्राण वाचवायचे होते...
आणि ती जागासुद्धा रिक्त सोडायची नव्हती.. "
हे खरे होते त्यांच्या भांडणाचे कारण...
कोणूर हा कम्युनिस्टांचा बालेकिल्ला..
आज केरळात संघाचे संघटन जबरदस्त झाले आहे..
अश्या कित्येक ज्ञात अज्ञात +
स्वयंसेवकांच्या बलिदानाने संघ शक्तिशाली होतोय...
आजच संघाच्या निवासी शिबिरातील एका बौद्धिकात ही माहिती मिळाली.. ऐकताना झालेलो सुन्न अजून तसाच आहे.. देशकार्यासाठी मरण पत्करायला आतुर झालेली उच्चशिक्षित आणि उच्च संस्कारांनी प्रेरित अशी लोकं नक्की कोणत्या मातीची असतात? +
बास्स.. अजून काही लिहीत नाही.. अजून काही लिहिण्याची गरज आहे?
----------------
पराकोटीच्या त्यागातच स्तिमित करून टाकणाऱ्या उत्कर्षाची बीजे असतात.
आज मुंबईच्या पोलीस कमिशनरांनी खास पत्रकार परिषद घेऊन तीन चॅनेल्स पैसे देऊन टीआरपी वाढवून घेत असल्याचा आरोप केला..
ती तीन चॅनेल्स म्हणजे फक्त मराठी, बॉक्स सिनेमा आणि अर्थात रिपब्लिकसुद्धा..
बाकीच्या दोन चॅनेल्सचं नाव कधी ऐकण्यातपण नव्हतं. +
रिपब्लिकनं चालवलेले ट्रेंड सोशल मीडियावर कसे काय एवढे जोरात चालतात आणि युट्युबवरसुद्धा एवढा जबर प्रतिसाद मग कसा मिळतो ह्याचीही चौकशी व्हावी ह्या मताचा मी आहे
रिपब्लिकनं जर तसं काही केलं असेल तर त्यांचं लायसन रद्द व्हावं..
अफरातफरीच्या संशयाने जेंव्हा धाडी पडल्या तेंव्हा अभिव्यक्तीच्या नावे बांगड्या फोडणारे आता शांत बसतील किंवा पार्ट्या झोडतील कारण रिपब्लिक त्यांच्या कंपूतला नाही..
बाकी ह्या पत्रकार परिषदेमागे कोणाचे डोके असेल हे मी वेगळे सांगायला नकोच.. +
उत्तर प्रदेश मध्ये, ज्या नराधमांनी पाशवी बलात्कार करून, पीडित तरुणीला जीवे मारण्यात आलं, त्याबद्दल तुम्हाला एकट्यालाच नाही सर्वांनाच दुःख आहे.
ही राजकारण करण्याची वेळ नाही.
पण, तुम्ही फिल्म सिटी न बनवता माता बहिणी सुरक्षित असल्या पाहिजेत अश्या उपाय योजना करा, असा उपदेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिले आहत.
साहेब दुःख व्यक्त राजकारण न करता देखील आपल्याला व्यक्त होता आलं असतं, पण नाही, आपणाला राजकीय टिपण्णी महत्वाची वाटली +
आणि तुम्ही ती केली.
असो, सर आपल्याला माहिती असेल, नसेल याबद्दल मला माहिती नाही. पण, मागील ६-७ महिन्यात आपल्या राज्यात घडलेल्या घटना तुमच्या निदर्शनास आणून देत आहे.
कोरोनाच्या संकटकाळातही महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत अशा घटना घडल्या आहेत, +
'२०१४ च्या विधानसभेच्यावेळी शिवसेनेची भाषा आणि त्याचा रागरंग, अपरिहार्यतेतून झालेली/केलेली युती' ह्या सर्व गोष्टी विसरून २०१७ च्या मुंबई मनपाच्या निवडणूकीत निसटत्या बहुमताने का होईना पण सेनेनं महापौरपद राखलं, तेंव्हा विरोधी पक्षनेतेपद +
भाजपाने नाकारलं होतं. का? तर राज्यात युती असताना मनपात कसं विरोधात कसं बसायचं? विरोधी पक्षनेतेपद कसं स्विकारायचं? मग ते विरोधी पक्षनेतेपद गेलं काँग्रेसकडं. हा असला विचार ही बाबरसेना युतीत असताना कधीच करत नव्हती. सतत खिशातल्या राजीनाम्याचे कवित्व रोज नवा आकार घेत होतं. +
किंबहुना सत्तेत असताना विरोधाचं शेण कसं खायचं ह्याचा अध्याय महाराष्ट्र रोज अनुभवत होता, ह्याच सेनेकडून.
हे सारं असताना सुद्धा केवळ सद्गुणविकृतीपायी हातचं विरोधीपक्षनेतेपद भाजपनं घालवलं..
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाचे डोळे उघडले आणि झालेल्या दगाबाजीचा बदला घेण्यासाठी +
मित्रांनो, हा लेख म्हणजे शिळ्या कढीला पुन्हा आणलेला ऊत नाही तर एका निर्णयाचा समाजावर किती खोलवर परिणाम होऊ शकतो हे पुन्हा अधोरेखित करणारी घटना घडलीये, त्या अनुषंगाने जुन्या एका निर्णयाचा नव्याने विचार करण्याची गरज व्यक्त करत आहे.. +
काही महत्वाची माहिती चीनला पुरवण्याच्या गंभीर गुन्ह्याखाली राजीव शर्मा नावाच्या पत्रकाराला ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट च्या अंतर्गत अटक करण्यात आलीये. ह्या पत्रकाराने युनायटेड न्यूज ऑफ इंडिया, द ट्रिब्यून, सकाळ टाइम्स, चीनच्या ग्लोबल टाइम्स ह्या अश्या पोर्टलसाठी काम केलंय. +
ह्या माणसाकडे काही देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने अतिमहत्वाची अशी कागदपत्रे मिळाली आहेत. मुळात ह्या व्यक्तीचा लिखाणाचा कलसुद्धा साधारण अश्याच बाबीमध्ये होता.
तर...
२०१६ मध्ये चीनच्या गुप्तचर यंत्रणेकडून ह्या राजीवशी संपर्क साधण्यात आला. +
६० पानांचे विशेषाधिकाराच्या हननासंबंधी पत्र मिळूनसुद्धा अर्णब त्याच्या कालच्या चर्चेत दिशा सालीयनच्या मृत्यूसंदर्भात खुलेआम "बेबीपेंग्विनला अटक करा", हे जेंव्हा म्हणतो तेंव्हा ते म्हणणं इतकं वरवरचं असतं? काल तर अगदी फॉरेन्सिक एक्सपर्टला सुद्धा बोलावलं गेलं होतं. शंकेला वाव नाही?+
हे काय कमी होतं? की टाईम्स नाऊनं ठाकरेंनी जाहीर केलेल्या संपत्तीमधील विसंगतीच्यासंदर्भात विशेष वृत्त चालवलं. उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेल्या संपत्तीतला काही भाग जो आदित्यच्या संदर्भातला होता तो आदित्यने जाहीर केलेल्या संपत्तीत एकतर नाहीच किंवा त्यात बरीच विसंगती आहे. +
म्हणून निवडणूक आयोगाने इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला संबंधित अहवाल, चौकशी करून, दोन आठवड्यात सादर करण्यास सांगितले आहे. जर ही लपवालपवी सिद्ध झाली तर सर्वांच्या हातापाया पडून मिळवलेली आमदारकी जाण्याची शक्यता आहे.. +
नरेंद्र दामोदरदास मोदी हे अश्या वृत्तीचं नाव आहे जी अनपेक्षितपणे उसळी मारते आणि भल्याभल्यांना नामोहरम करते, नरेंद्र दामोदरदास मोदी हे अश्या पराकोटीच्या सहनशीलतेचे नाव आहे जी दशकाच्या सतत छळानंतरसुद्धा कधीही त्रागा करत नाही तर दुसऱ्याला त्रागा करायला भाग पाडते,+
नरेंद्र दामोदरदास मोदी हे अश्या स्वयंसेवकाचं नाव आहे ज्याला एकनाथजी रानड्यांसारख्या संघातील विभूतींच्या सहवासात पैलू पडले गेले, नरेंद्र दामोदरदास मोदी हे अश्या परिमाणाचं नाव आहे जे तुम्हाला प्रस्थापितांच्या माजासमोर खंबीर उभे टाकण्याचे सामर्थ्य देते, +
नरेंद्र दामोदरदास मोदी हे अश्या परिणामाचे नाव आहे जो तुम्हाला सततच्या ध्यासामुळे मिळतो, नरेंद्र दामोदरदास मोदी हे अश्या व्यक्तीचे नाव आहे त्याच्यामागे जनता बहुमताने आणि एकदिलाने उभी राहते..
पक्षाच्या जाहिरनाम्यातली आश्वासने पूर्ण करायची असतात, योगाला आंतरराष्ट्रीय पातळीवर +