मनुस्मृती दहन केल्यानंतर तत्कालीन काही ब्राह्मण्यग्रस्त वृत्तपत्रांनी टीकात्मक लेखन केले. त्यावर बाबासाहेबांनी बहिष्कृत भारत पत्रातून त्यांचा समाचार घेतला. वाचा !
- आनंद गायकवाड
आमच्या मित्रांचा दुसरा असा एक आक्षेप आहे की मनुस्मृती ही जुन्या काळी अंमलांत असलेल्या 1)
नियमांची एक जंत्री आहे. त्या जंत्रीतील नियम आज कोणास लागू नाहीत. मग असले जुने बाड जाळण्यात काय अर्थ आहे ? मनुस्मृती हे एक जुने बाड आहे असे आमच्या मित्राप्रमाणे आम्हासही म्हणता आले असते तर आम्हास मोठाच आनंद झाला असता. परंतु दुर्दैवाने आम्हांस तसे म्हणता येत नाही. आणि आमची
2)
खात्री आहे की, भावी स्वराज्याचा चंद्रोदय केव्हा होतो हे पाहण्याकरिता, आमच्या मित्रांचे डोळे आकाशाकडे लागले नसते तर आपल्या पायाखाली काय जळते आहे हे त्यांना निरखून पाहताच आले असते. मनुस्मृती हे एक जुने बाड आहे, ते राहिले तरी काही हरकत नाही असा युक्तिवाद करण्याऱ्या गृहस्थांना
3)
नुकतीच प्रसिद्ध झालेली बळहायी लोकांवरील जुलमाच्या कहाणीकडे त्यांनी लक्ष द्यावे अशी आमची आग्रहाची सूचना आहे. मध्य हिंदुस्थानात काही दिवसांपासून बळहायी नावाच्या अस्पृश्य जातीत सुधारणेचे वारे शिरले आहे. व त्याप्रमाणे या बळहायी जातीतील स्त्रीपुरूषांनी आपले जुने
4)
व हीनपणादर्शक रिवाज व चालीरीती, तसेच पेहराव सोडून देऊन वरिष्ठ वर्गाच्या हिंदूंची जशी वागणूक आहे तशी वागणूक आपणही ठेवण्याबद्दलचे ठराव केले. व ते अंमलातही आणले. परंतु सुधारणा करण्यास निघालेल्या या बिचाऱ्या बळहायी लोकांचे ठराव अमलात येतात तोच दरेक गावच्या स्पृश्य
5)
हिंदूंनी आपापल्या गावच्या बळहायी लोकांस अशी नोटीस दिली की, तुम्हास जर आमच्या गावात नांदावयाचे असेल तर तुम्ही खालील अटी पाळल्या पाहिजेत.
१. बळहायी पुरुषाने भरजरी पागोटे डोक्यास बांधू नये.
२. बळहायी पुरुषांनी रंगीत किनारीची अगर रुईफूल किनारीची धोतरे नेसता कामा नये.
6)
३. बळहायी लोकांनी गावात कोणाही स्पृश्य माणसाच्या घरी मयत झाल्यास त्या मयताची खबर त्याच्या नातेवाईकांस मग तो नातेवाईक कितीही दूर राहात असो त्याला पोहोचविलीच पाहिजे.
४. स्पृश्य हिंदूंच्या लग्नामध्ये व वरातीमध्ये बळहायी लोकांनी वाजंत्री वाजविण्याचे काम केलेच पाहिजे.
7)
५. बळहायी स्त्रियांनी चांदीचे अगर सोन्याचे दागिने घालता कामा नये, तसेच त्यांनी ऊंच प्रतीची अगर उंच मोलाची झबली अगर चोळ्या घालू नयेत.
६. बळहायी स्त्रियांनी सुविणीचे काम केलेले पाहिजे.
७. स्पृश्य लोक देतील ते मोल घेऊन, सांगतील ते काम करण्यास बळहायी लोकांनी तयार असले पाहिजे
8)
काही ठिकाणी वरील नियम एका करारपत्रकांत घालून, सह्या करा नाही तर गावांतून जा,असा बळहायी लोकांस पेंच टाकला आहे. व त्याप्रमाणे काही स्वाभिमानी बळहायी लोकांनी आपल्या माणुसकीवर तिलांजली देण्याऐवजी हजारो वर्षे जेथे ते व त्यांचे पूर्वज राहिले ते गाव सोडून त्यांनी
9)
देवास वगैरे जवळपासच्या संस्थानात व ब्रिटिश हद्दीत जाऊन राहिले आहेत. जसा मध्य हिंदुस्थानात बळहायी लोकांवर प्रसंग गुदरला आहे तसाच प्रसंग या इलाख्यातील कुलाबा व रत्नागिरी जिल्ह्यातील महार लोकांवर गुदरला आहे. मागे एकदा भालाकाराने मोठ्या तोऱ्याने सांगितले की, बौद्ध लोकांनी
10)
यज्ञांत होणाऱ्या हिंसेचा आधार घेऊन , ब्राह्मणांवर हत्यार चालविले, पण ब्राह्मणांनी एका झटक्यास मद्य व मांस पूर्णपणे सोडून देऊन, बौद्ध लोकांवर मात केली. अशा लिखाणाने हा घमेंडनंदन असे भासवू इच्छितो की,याच्या बापजाद्याच्या अंगात जो करारीपणा आहे तो करारीपणा अस्पृश्यांच्या
11)
अंगात नाही. असली फुशारकी मारणाऱ्यांस आम्ही असे सुचवितो की, त्यांनी कुलाबा व रत्नागिरी जिल्ह्यांत दौरा काढून अस्पृश्य लोकांच्या आंगीही किती करारीपणा बाणला आहे याची त्यांनी खात्री करून घ्यावी.
दौऱ्याअंती कळून येईल की, मार्च १९२७ पावेतो जे लोक मेलेली जनावरे ओढून नेण्याचा आग्रह
12)
धरीत होते व त्यांचे मांस खाणे आपला धर्म आहे म्हणून मानीत होते त्याच लोकांनी आता मांसाला न शिवण्याचा निश्चय केला आहे. इतकेच नव्हे तर मेलेल्या जनावराला ते शिवत देखील नाही. तसेच आज इतके दिवस वतनाच्या हक्कापैकी, एक हक्क म्हणून , गावांतून भाकर मागण्याचा जो पुरातन प्रघात होता तो
13)
अजिबात बंद करण्यात आला आहे.ब्राह्मणांनी मद्य मांस सोडले त्यात त्यांना स्वार्थ साधावयाचा होता म्हणून सोडले, कारण बुद्ध भिक्षूंची जागा प्राप्त करून घेण्यासाठी, मद्य मांस वर्ज्य केल्याशिवाय त्यांना गत्यंतर नव्हते. कुलाबा जिल्ह्यातील अस्पृश्य लोकांच्या करारीपणा स्वार्थ
14)
साधण्यासाठी नाही तो स्वार्थावर पाणी सोडण्यासाठी आहे. हे बापाच्या नावावर विकणाऱ्या भालाकाराने ध्यानात घ्यावे हे बरे. परंतु या सुधारणाप्रिय महार लोकांवरही बळहायी लोकांप्रमाणेच प्रसंग गुदरला आहे ! जेथे जेथे महार लोकांची वस्ती छोटी आहे व इतर स्पृश्य लोकांची वस्ती मोठी आहे.
15)
तेथे तेथे महार लोकांना तुम्ही मेलेल्या जनावरांचे मांस खाल्लेच पाहिजे, गावात भाकरी मागितलीच पाहिजे, सर्वांना जोहार घातलाच पाहिजे. अशी सक्ती करण्यात येत आहे. आमच्या स्वराज्य पत्राच्या संपादकास आम्ही असे विचारतो की, वरील उदाहरणे काय दर्शवितात ते हेच की, मनुस्मृती ही
16)
जुनी जंत्री नसून चालू वहिवाटीत आहे. मनुस्मृतीत सांगितले आहे की, शूद्र लोकांनी अमंगल राहावे, भिक्षा मागावी, धनसंचय करू नये , व मेलेली जनावरे न्यावीत. स्पृश्य लोक जे आज अस्पृश्य लोकांना आपली सुधारणा करू देत नाहीत त्यांचे कारण असे की, त्यांनी जर सुधारणा केली तर मनूने
17)
घालून दिलेल्या पायऱ्या राहू शकत नाहीत. तसे जर नसते तर सुधारणाप्रिय अस्पृश्य लोकांवर असा जुलूम कां करण्यात येतो ? अस्पृश्य लोक स्वच्छतेने राहिले, भाकरी मागण्यासारखे हीनपण त्यांनी सोडले, मृत मांसाहाराचे त्यांनी उच्चाटन केले तर त्यात स्पृश्य वर्गाचे काय नुकसान होण्यासारखे
18)
आहे ? काहीच नाही. केवळ अस्पृश्य लोकांनी पायरी सोडू नये म्हणून हा सारा जुलूम चालला आहे. यावरून कोणाही हिंदूमात्रास तेव्हाच कळेल की, स्पृश्य लोक अस्पृश्य लोकांस सुधारणा करू देत नाहीत. ते मनुस्मृतीचे नियम पाळीत आहेत. दुसरे काही करीत नाहीत. असे असताना मनुस्मृती ही जुनी जंत्री
19)
आहे हे म्हणणे केवढे धाडसाचे आहे याचा आमच्या मित्रांनी विचार करावा.
(५) --- ज्यांना आमचा हा युक्तिवाद पटत नाही त्यांना आम्ही असे विचारतो की मनुस्मृती हे जर जुने बाड आहे तर ते जाळल्याने तुमचे काय बिघडले ? वाण्याच्या घरी पुड्या बांधण्यासाठी पडलेली रद्दी जर कोणी जाळली तर
20)
त्याबद्दल कोणाचाच जळफळाट होत नाही. मग मनुस्मृती ही एक रद्दी पोथी आहे असे म्हणणाऱ्या लोकांनी तिची होळी केल्याबद्दल एवढे आकाशपाताळ एक करण्यात यावे हे आश्चर्यकारक नव्हे काय ? ज्या अर्थी या लोकांचा असा जळफळाट झाला आहे त्या अर्थी ती पोथी रद्दी नाही, तिला लोकं मानतात ही गोष्ट
21)
सिद्ध आहे. मग जी पोथी लोकांस मान्य आहे व जी आम्हास मान्य नाही अशा पोथीची आम्ही कां होळी करू नये ? यावर आमचे मित्र असे म्हणतात की, मनुस्मृती जाळून काय साधणार आहे. समाजात रूढ झालेल्या जातिविषयक व स्पृश्यास्पृश्य विषयक कल्पना तेणे करून काही नष्ट होणार नाहीत. उलट काही स्पृश्य
22)
लोकांची सहानुभूती मात्र गमावण्याचा संभव आहे. यावर आमचे उत्तर असे की, असहकारितेच्या चळवळीत म. गांधींनी स्वदेशी कपडा जाळून काय साधले ? खानमालिनी विवाहाच्या प्रकरणात ज्ञानप्रकाशाची होळी करणाऱ्या लोकांनी काय साधले ? राजकीय सुधारणांची चौकशी करण्याकरिता येणाऱ्या सायमन कमिशनवर
23)
बहिष्कार घालून काय साधणार आहे ? मिस मेयोने लिहिलेला मदर इंडिया पुस्तकाचा नुकताच न्यूयॉर्क शहरी ज्यांनी होम केला त्यांना काय मिळवायचे होते ? परदेशी कपडा जाळून, ज्ञानप्रकाशाची किंवा मिस मेयोच्या पुस्तकाची होळी करून किंवा सायमन कमिशनवर बहिष्कार घालून जी गोष्ट साधावयाची
24)
होती तीच गोष्ट आम्हास मनुस्मृती जाळून साधावयाची आहे. होळी करणे हा एक निषेध दर्शविणाऱ्या अनेक प्रकारांपैकी एक प्रकार आहे व तो प्रकार काही रानटीपणाचा आहे असेही म्हणता यावयाचे नाही. तो शिष्टसंमत झाला आहे याबद्दल कोणासही ना म्हणता येणार नाही. निषेध दर्शविण्याचा मुख्य हेतू
25)
म्हणजे ज्याच्या विरुद्ध आपण निषेध प्रदर्शित करितो त्याला लाज वाटावयास लावून व त्यांच्यात विचार जागृती करून त्यांच्या वर्तणुकीत योग्य तो फेरबदल करून आणावयाचा असा असतो. मनुस्मृती जाळून जो निषेध आम्ही व्यक्त केला त्यांत ब्राह्मण्याचा म्हणजे हिंदूसमाजातील उच्च नीच भावनेचा
26)
इनकार व्यक्त करण्याचा आमचा हेतू होता. आमचा इनकार ध्यानात घेऊन ब्राह्मण्यग्रस्त लोक आपल्या वर्तणुकीत फेरबदल करतील अशी आमची आशा आहे. व त्या आशेनेच हे सर्व कार्य केलेले आहे. आता आमचे मित्र जी शंका घेतात की मनुस्मृती जाळल्याने ब्राह्मण्य नष्ट होणार नाही, ती शंका जर
27)
दुर्देवाने खरी ठरली तर ब्राह्मण्य विध्वंसनासाठी ब्राह्मण्यग्रस्त लोकांना जाळणे किंवा हिंदूधर्माचा त्याग करणे या दोहोंपैकी कोणती तरी एक गोष्ट करावी लागेल. स्पृश्य लोकांची सहानुभूती मात्र गमावण्याचा आक्षेप तर अगदी खुळा आहे असे आम्ही समजतो. मनुस्मृती मस्तकावर धारण करून
28)
अस्पृश्य लोकांना आम्ही तुमचा उद्धार करतो असे म्हणणे म्हणजे भस्मासुराने एका हातात शंकराने दिलेला खडा घेऊन दुसरा हात मस्तकावर ठेवून तुझे कल्याण करतो असे म्हणण्यासारखे आहे असे आम्हास वाटते. मनुस्मृतीचा एका बाजूने अभिमान धरणे व दुसऱ्या बाजूने अस्पृश्योद्धार करू
29)
म्हणणे या दोन गोष्टी इतक्या परस्पर विरोधी आहेत की एकाच तोंडाने या दोन्ही गोष्टींचा उच्चार करणाऱ्या लोकांच्या प्रामाणिकपणाची आम्हास जबरदस्त शंका येते. आणि म्हणूनच अशा लोकांच्या सहानुभूतीची आम्ही विशेष दरकार करीत नाही. यावरून आम्हास काही मूर्ख लोक असे दूषण देतात की,
30)
आम्ही साऱ्याच स्पृश्यलोकांवर एकजात तुटून पडत आहोत. व तेणेकरून अस्पृश्यता निवारणाचे कार्य दुष्कर करीत आहोत. पण हा त्यांचा गैरसमज आहे.तशी जर आमची भावना असती तर आमचे मित्र रा. देवराव नाईक, मोर्शीचे मुंडले व अमृतकर , यांना आम्ही शिरसावंद्य मानले नसते. किंवा अस्पृश्येतर
31)
लोकांना सत्याग्रहात भाग घेऊ दिला नसता. आम्हाला स्पृश्य लोकांची सहानुभूती मिळेल तितकी थोडीच आहे. मात्र खरे सहानुभूतचे कोण हे कसाला लावून पाहिल्याखेरीज नुसती सहानुभूतीची साखर पेरणाऱ्या लोकांना आम्ही आपले मित्र म्हणण्याचा बावळटपणा करीत नाही, अगर त्यांना भिऊन आमचा निषेध
32)
व्यक्त करण्यास आम्ही मागे घेत नाही. यात आमची चूक होत आहे असे कोणी म्हणेल असे आम्हास वाटत नाही.
33).🔚
___डॉ. भीमराव रामजी आंबेडकर
बहिष्कृत भारत ३ फेब्रुवारी १९२८
डॉ . अल्बर्ट एलिस .
अमेरिकेतील नामांकित मानसोपचारतज्ञ . यांना मानसशास्त्रज्ञ सुद्धा म्हणता येईल . विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती (rational emotive behaviour thearapy ) हा त्यांचा मनाच्या जगातील सर्वात महत्वाचा शोध . अनेकांना मानसिक स्थैर्य मिळवून देणाऱ्या या पद्धतीचा शोध 1)
खरंतर त्यांनी स्वतःला स्थिरता मिळवून देण्यासाठी लावला होता . या शोधाची सुरुवात त्यांनी लहानपणीच केली होती . भावनेच्या आहारी न जाता , तर्कसंगत बुद्धी वापरून केलेला विचार मनाला स्थिर करतो हा त्यांचा अनुभव त्यांनी जगाला पटवून दिला . त्यासाठी अनेक उदाहरणे आणि दाखले दिले .
2)
आणि आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांच्या कार्याची दखल घेणे सर्व जगाला भाग पडले . त्यांनी मांडलेले काही सिद्धांत सोप्या भाषेत पुढीलप्रमाणे आहेत .
१) माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांवर त्याच्या प्रतिक्रिया आणि कृती अवलंबून नसतात , तर त्या घटनांकडे तो कोणत्या दृष्टीकोनातून बघतो
3)
नुकतीच नाणेघाटला जाऊन आले होते.त्यासंदर्भात #मर्यादित वाचन केलं होतं.त्यातून हे कळालं की, हा नाणेघाट म्हणजे घाटांचा राजा.हा इसवीसनपूर्व काळात बांधला गेलाय.हे वाचूनच रोमांच उभे राहिले. काय ते कसब? अभियांत्रिकीमधला चमत्कारच.
सातवाहन सम्राज्ञी गौतमीपुत्र 1)
सातकर्णीची पत्नी नागणिका हिचा नाणेघाटातल्या लेणीतला तो प्रख्यात शिलालेख. पहिल्यांदा गेले तेव्हा वेड्यासारखी धावत गेले होते त्या भित्तीकडे. त्या पाषाणातल्या अक्षराईत हरवून गेले होते.मला न समजणाऱ्या ब्राम्ही भाषेतली ती अक्षरं पण विलक्षण प्रेमानं,कदाचित इतिहासाच्या फारसं न 2)
जपता आलेल्या वेडामूळे माझे हात त्या अक्षरांवरनं फिरत होते.नागणिका इथेच असेल का? माझ्या आसपास?माझी ही ओढ बघत असेल का?तिला छान वाटत असेल का आपला शिलालेख असा चिरंजीवी झालेला पाहून? तिचा चुडाभरला अमानवी हात माझ्यासोबतच तीही त्या अक्षरांवरनं फिरवत असेल का? धुक्यासारख्या तरल
3)
इथल्याच (पनवेल स्टॅंडजवळ) एका छोटेखानी हाॅटेलवाल्याने बाबासाहेबांना पाणी नाकारले त्यावेळी अस्वस्थ झालेले, गरीब मजूर असलेले सोनबा येलवे बाबासाहेबांसाठी पाणी आणायला गेले.
पाणी आणले, तोपर्यंत बाबासाहेब पुढील प्रवासाला निघूनही गेले होते. 1)
बाबासाहेब परत याच मार्गाने येतील तेव्हा त्यांना पाणी मिळायला हवे आणि ते मी देईन या इच्छाशक्तीने ते दरदिवशी पाणी घेऊन येत. परंतु बाबासाहेब परत त्या मार्गाने आले नाहीत.
...आणि वाट पाहून अखेर, इथेच सोनबा येलवेंचा मृत्यू झाला.
2)
त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पनवेल महानगरपालिकेने ही पाणपोई बांधली आहे. येणार्या-जाणार्यांना पाणी मिळावे या उदात्त हेतूने.
उशीरा का होईना, बाबासाहेबांच्या प्रेमाखातर त्याग करणारी व्यक्तिमत्त्वं उजेडात येत आहेत.
3)
जमालगढी सध्याच्या पाकिस्तानातील खबैर पक्ख्तुन्ख्वामधील मरदानच्या कटलांग मरदान मिर्गापासून १३ किमी अंतरावर हे शहर आहे. जमालगढी येथे प्राचीन स्तूप व विहारांचे अवशेष सापडले आहेत.
जमालगढी येथील स्तूप व विहार १/५ शतकातील भरभराटीचे बौद्ध ठिकाण होते. 1)
जमालगढीचे स्थानीय नाव "जमालगढी कंदारत" किंवा "काफिरो कोटे" असे आहे. जमालगढीच्या भग्नावशेषांचा प्रथम शोध ब्रिटीश पुरात्ववेत्ता व गाढे अभ्यासक अलेक्झांडर कॅनिंगहॅम यांनी इसवी सन १८४८ मध्ये लावला.
कर्नल ल्युम्स्डेन यांनी जमालगढी येथे उत्खनन केले होते पण तेव्हा तेथे विशेष 2)
काही सापडले नाही. नंतर इसवी सन १८७१ मध्ये लेफ्टनंट क्राॅमटन यांनी पुन्हा येथे उत्खनन केले व अनेक बौद्धशिल्पे सापडली आहेत.
चित्र क्रमांक एक जमालगढी, मरदान, पाकिस्तान बौद्ध नगरीचे भग्नावशेष.
चित्र क्रमांक दोन १/३ शतकातील राणी महामायेचे स्वप्न शिल्प जमालगढी, मरदान,
3)
आम के पेड़ के नीचे ब्राह्मण तुलसीदास रामचरित्रमानस लिख रहे थे. अचानक पेड़ से आम तुलसीदास के सर पर गिरा. तुलसीदास बहुत खुश हुआ, उसने आम को ईश्वर का दिया हुआ उपहार समझकर खा लिया !
मुग़ल राज में गाय कट रही थी, मुग़ल समोसे में गाय का मांस भर भर कर खा रहे थे. 1)
लेकिन तुलसीदास को कोई आपत्ति नही थी, वह मग्न होकर आनंदित होकर, लगा लिखने "ढोल गंवार पशु नारी सकल ताड़ना के अधिकारी" !
किसान का बेटा इसाक न्यूटन सेब के पेड़ के नीचे विज्ञान की पढ़ाई कर रहा था. अचानक से एक सेब न्यूटन के सर पर गिर गया. न्यूटन ने सेब उठाया उसे ध्यान से
2)
देखने लगे मानो कभी सेब देखा ही नही. लेकिन न्यूटन सेब नही देख रहे थे वह सोच रहे आखिर सेब नीचे क्यों गिरा ?
सेब ऊपर क्यों नही गया... नीचे ही क्यों आया ?. ऊपर चांद है वह क्यों नही गिरता. धरती में जरूर कोई फ़ोर्स है. ताक़त है जो चीजों को अपनी ओर आकर्षित करती है !
3)
'मुझे मेरे गोत्र "गौतम" से सम्बोधित मत करो I मै अब अरहन्त हूँ, सम्यक सम्बुद्ध हूं I'
- तथागत बुद्ध
सम्बोधि प्राप्ती के पश्चात जब तथागत बुद्ध ने पीडित मानवता के कष्टों का विचार किया, उनका दिल करुणा से ओत प्रोत हो गया I उन्हों ने निश्चय किया कि जिन अनादी सत्तों 1)
का उन्हों ने आविष्कार किया है, वे सभी मानवों तक उन सत्यों को पहुचायंगे I.
इस निश्चय को लेकर तथागत ने वाराणसी की ओर प्रस्थान करने का संकल्प किया I वाराणसी सदियोंसे धार्मिक चिंतन और धार्मिक जीवन बिताने वालों का मिलन-स्थान माना जाता रहा है I रास्ते में उनकी मुलाखत उन के
2)
पुर्व परिचित एक नग्न जैन मुनि 'उपक' से हुई I तथागत की तेजस्विता और शान्त मुद्रा से प्रभावित होकर उपक ने प्रश्न किया- 'वह तुम्हारा कौन सा गुरु है, जिसके कारण तुम ने गृह त्याग किया है?'
तथागत का उत्तर था- 'मेरा कोई गुरु नहीं है I मेरे समान कोई नहीं है I मै सम्यक
3)