डॉ . अल्बर्ट एलिस .
अमेरिकेतील नामांकित मानसोपचारतज्ञ . यांना मानसशास्त्रज्ञ सुद्धा म्हणता येईल . विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती (rational emotive behaviour thearapy ) हा त्यांचा मनाच्या जगातील सर्वात महत्वाचा शोध . अनेकांना मानसिक स्थैर्य मिळवून देणाऱ्या या पद्धतीचा शोध
1)
खरंतर त्यांनी स्वतःला स्थिरता मिळवून देण्यासाठी लावला होता . या शोधाची सुरुवात त्यांनी लहानपणीच केली होती . भावनेच्या आहारी न जाता , तर्कसंगत बुद्धी वापरून केलेला विचार मनाला स्थिर करतो हा त्यांचा अनुभव त्यांनी जगाला पटवून दिला . त्यासाठी अनेक उदाहरणे आणि दाखले दिले .
2)
आणि आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांच्या कार्याची दखल घेणे सर्व जगाला भाग पडले . त्यांनी मांडलेले काही सिद्धांत सोप्या भाषेत पुढीलप्रमाणे आहेत .

१) माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांवर त्याच्या प्रतिक्रिया आणि कृती अवलंबून नसतात , तर त्या घटनांकडे तो कोणत्या दृष्टीकोनातून बघतो
3)
आणि त्या घटनाक्रमाचा अर्थ कसा लावतो यावर अवलंबून असतात . त्यामुळे जर तुम्ही नकारात्मक घटनेकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले आणि वाईट घटनेचा वाईटच अर्थ लावणे थांबवले तर मनावरचा अनाठायी ताण कमी होतो .

२) माणसाला वाटणारी भीती ही कोणत्याही गोष्टीची नसून ती त्याच्याच मनात
4)
दडलेल्या भीती या संकल्पनेची असते . ज्या गोष्टीची भीती वाटते ती गोष्ट प्रत्यक्षात भीतीदायक नसते , परंतु आपण ती करायला गेल्यास नक्कीच काहीतरी भीतीदायक घडणार असे आपल्याला वाटत असते . पण ती गोष्ट केल्यानंतर लक्षात येते कि असे काही घडलेच नाही . म्हणजेच भीती हि काल्पनिक असते .
5)
३)निराशा येणे ही मनाची स्थिती खरी नसून ती स्वतःविषयीच्या अवाजवी अपेक्षांमुळे तुम्ही स्वतःच निर्माण करता . जगातली दुसरी कोणतीही व्यक्ती `तुम्हाला निराश करू शकत नाही . तुम्ही स्वतःच तसे वाटून घेता.यश आणि अपयश या दोनच पारड्यांमध्ये स्वतःचे आयुष्य तोलू नका . तुमचे यश हे
6)
दुसऱ्या कुणासाठीतरी अपयश असू शकते . तसेच तुमचे अपयश हे कुणाचेतरी यश असू शकते . त्यामुळे कधीच स्वतःची तुलना दुसर्यांशी करू नका .

४) जग काय म्हणेल हा विचार खोटा आहे . प्रत्यक्षात कुणालाही काहीही बोलायला वेळ नसतो . आणि जर कुणी काही बोलत असेलच तर ते मनापर्यंत झिरपू
7)
द्यायचे कि कानांवरूनच परतवायचे हे तुमच्यावर अवलंबून आहे . कोणी काहीही बोलले तरी जर तुमचा तुमच्या कृतीवर विश्वास असेल तर तुम्ही कायम आनंदी राहू शकता .

५) अमुक एका व्यक्तीशिवाय आपण जगूच शकत नाही असे वाटणे हे उत्तुंग प्रेम नाही तर स्वतःला कस्पटासमान लेखणे आहे . स्वतःचे
8)
अस्तित्व , आपले कुटुंबातील स्थान , समाजातील स्थान यांची जर पक्की जाणीव असेल तर तुमचे कोणावाचून काहीही अडत नाही . दुसर्यांवर प्रेम जरूर करा पण त्या आधी स्वतःवर प्रेम करा .

६) स्वतःला स्वीकारा . तुम्ही जसे आहात तसे . आपल्या अपयशाकडे फक्त त्या घटनेपुरतेच पहा . संपूर्ण

9)
आयुष्याचे अपयश म्हणून पाहू नका . कारण आयुष्य अजून संपलेले नाही . दुसर्यांच्या चुका तर तुम्ही नेहमीच माफ करता . कधीकधी स्वतःच्या चुका सुद्धा माफ करा . जर तुम्ही स्वतःला स्वीकारलेत तरच जग स्वीकारेल .

७) नैतिक आणि अनैतिक या संकल्पना व्यक्तीसापेक्ष बदलतात . त्यामुळे स्वतः

10)
मूल्यमापन करून स्वतःच्या नैतिकतेच्या चौकटी आखा . दुसर्यांच्या चौकटीत स्वतःला बसवण्याचा प्रयत्न करू नाका .

८ ) शारीरिक व्याधींशी सामना करताना बर्याचदा मानसिक संतुलन सांभाळणे कठीण जाते . अशा वेळी शरीर आणि मन या दोन्ही गोष्टींकडे स्वतंत्रपणे पाहायला शिका . कोणतेही दुखणे

11)
माझ्या शरीराला इजा पोहोचवू शकते परंतु मनाला नाही हा विचार मनात करा . मानसिक संतुलन आजारातून लवकर बाहेर पडण्यासाठी महत्वाचे असते .

९) दुसऱ्या व्यक्तीच्या विचारांवर आणि घडणाऱ्या घटनांवर तुमचा ताबा असू शकत नाही . माणूस आपल्याला हवे तसे जगाने बदलावे म्हणून जीवाचा आटापिटा

12)
करत राहतो . परंतु प्रत्यक्षात ज्या गोष्टींवर तुमचा ताबाच नाही त्या गोष्टी तुम्ही बदलू शकत नाही . तुम्ही फक्त स्वतःला बदलू शकता . वाईट घटना घडल्याच का असा विचार करत बसणे फायद्याचे नसते . तर यानंतर पुढे काय करायचे याचा तर्कसंगत बुद्धीने विचार करणे गरजेचे असते . तसंच

13)
अमुक एक व्यक्ती अशी का वागली ? याचा फार विचार न करता तुम्ही कसे वागायचे हे ठरवा .

१०) कोणताही मनुष्य स्वतःचे त्रासदायक विचार आमुलाग्र बदलवू शकतो . फक्त बदलण्याची गरज आहे ही जाणीव स्वतःला होणे आवश्यक आहे . हि प्रक्रिया कठीण आणि वेळखाऊ आहे . कारण विचारांच्या बदलांना तुमचे

14)
स्वतःचेच विचार आड येत असतात . एक एक नकारात्मक विचार दूर करून त्याजागी सकारात्मक विचाराची रोपण करावी लागते . परंतु एकदा मनातली अडगळ दूर केल्यावर ती पुन्हा तुमच्याकडे परतत नाही .

११) वैयक्तिक मालकी हक्क हा फक्त भौतिक गोष्टींना लागू होतो . मानसिक नाही . तुम्ही

15)
व्यक्तीवर हक्क सांगता म्हणजे फक्त त्याच्या शरीरावर हक्क सनग्त. त्याच्या मनावर आणि भावनांवर तुम्ही हक्क सांगू शकत नाही . प्रत्येक व्यक्ती हि भावनिकदृष्ट्या स्वतंत्र असते .

हे नियम कालाबाधित आहेत . म्हणूनच या थोर मानसोपचार तज्ञाला आदराने प्रणाम !
16)

#Ranjana_Wase यांच्या वॉलहून

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with @Jollyboy

@Jollyboy Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Jollybo71936649

7 Nov
नाणेघाट

नुकतीच नाणेघाटला जाऊन आले होते.त्यासंदर्भात #मर्यादित वाचन केलं होतं.त्यातून हे कळालं की, हा नाणेघाट म्हणजे घाटांचा राजा.हा इसवीसनपूर्व काळात बांधला गेलाय.हे वाचूनच रोमांच उभे राहिले. काय ते कसब? अभियांत्रिकीमधला चमत्कारच.

सातवाहन सम्राज्ञी गौतमीपुत्र
1)
सातकर्णीची पत्नी नागणिका हिचा नाणेघाटातल्या लेणीतला तो प्रख्यात शिलालेख. पहिल्यांदा गेले तेव्हा वेड्यासारखी धावत गेले होते त्या भित्तीकडे. त्या पाषाणातल्या अक्षराईत हरवून गेले होते.मला न समजणाऱ्या ब्राम्ही भाषेतली ती अक्षरं पण विलक्षण प्रेमानं,कदाचित इतिहासाच्या फारसं न
2)
जपता आलेल्या वेडामूळे माझे हात त्या अक्षरांवरनं फिरत होते.नागणिका इथेच असेल का? माझ्या आसपास?माझी ही ओढ बघत असेल का?तिला छान वाटत असेल का आपला शिलालेख असा चिरंजीवी झालेला पाहून? तिचा चुडाभरला अमानवी हात माझ्यासोबतच तीही त्या अक्षरांवरनं फिरवत असेल का? धुक्यासारख्या तरल
3)
Read 42 tweets
7 Nov
सोनबा येलवे पाणपोई, पनवेल

इथल्याच (पनवेल स्टॅंडजवळ) एका छोटेखानी हाॅटेलवाल्याने बाबासाहेबांना पाणी नाकारले त्यावेळी अस्वस्थ झालेले, गरीब मजूर असलेले सोनबा येलवे बाबासाहेबांसाठी पाणी आणायला गेले.

पाणी आणले, तोपर्यंत बाबासाहेब पुढील प्रवासाला निघूनही गेले होते.
1)
बाबासाहेब परत याच मार्गाने येतील तेव्हा त्यांना पाणी मिळायला हवे आणि ते मी देईन या इच्छाशक्तीने ते दरदिवशी पाणी घेऊन येत. परंतु बाबासाहेब परत त्या मार्गाने आले नाहीत.

...आणि वाट पाहून अखेर, इथेच सोनबा येलवेंचा मृत्यू झाला.
2)
त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पनवेल महानगरपालिकेने ही पाणपोई बांधली आहे. येणार्‍या-जाणार्‍यांना पाणी मिळावे या उदात्त हेतूने.

उशीरा का होईना, बाबासाहेबांच्या प्रेमाखातर त्याग करणारी व्यक्तिमत्त्वं उजेडात येत आहेत.
3)
Read 4 tweets
7 Nov
मनुस्मृती दहन केल्यानंतर तत्कालीन काही ब्राह्मण्यग्रस्त वृत्तपत्रांनी टीकात्मक लेखन केले. त्यावर बाबासाहेबांनी बहिष्कृत भारत पत्रातून त्यांचा समाचार घेतला. वाचा !
- आनंद गायकवाड

आमच्या मित्रांचा दुसरा असा एक आक्षेप आहे की मनुस्मृती ही जुन्या काळी अंमलांत असलेल्या
1)
नियमांची एक जंत्री आहे. त्या जंत्रीतील नियम आज कोणास लागू नाहीत. मग असले जुने बाड जाळण्यात काय अर्थ आहे ? मनुस्मृती हे एक जुने बाड आहे असे आमच्या मित्राप्रमाणे आम्हासही म्हणता आले असते तर आम्हास मोठाच आनंद झाला असता. परंतु दुर्दैवाने आम्हांस तसे म्हणता येत नाही. आणि आमची
2)
खात्री आहे की, भावी स्वराज्याचा चंद्रोदय केव्हा होतो हे पाहण्याकरिता, आमच्या मित्रांचे डोळे आकाशाकडे लागले नसते तर आपल्या पायाखाली काय जळते आहे हे त्यांना निरखून पाहताच आले असते. मनुस्मृती हे एक जुने बाड आहे, ते राहिले तरी काही हरकत नाही असा युक्तिवाद करण्याऱ्या गृहस्थांना
3)
Read 33 tweets
6 Nov
#जमालगढी_स्तूप_व_विहार

जमालगढी सध्याच्या पाकिस्तानातील खबैर पक्ख्तुन्ख्वामधील मरदानच्या कटलांग मरदान मिर्गापासून १३ किमी अंतरावर हे शहर आहे. जमालगढी येथे प्राचीन स्तूप व विहारांचे अवशेष सापडले आहेत.

जमालगढी येथील स्तूप व विहार १/५ शतकातील भरभराटीचे बौद्ध ठिकाण होते.
1)
जमालगढीचे स्थानीय नाव "जमालगढी कंदारत" किंवा "काफिरो कोटे" असे आहे. जमालगढीच्या भग्नावशेषांचा प्रथम शोध ब्रिटीश पुरात्ववेत्ता व गाढे अभ्यासक अलेक्झांडर कॅनिंगहॅम यांनी इसवी सन १८४८ मध्ये लावला.

कर्नल ल्युम्स्डेन यांनी जमालगढी येथे उत्खनन केले होते पण तेव्हा तेथे विशेष
2)
काही सापडले नाही. नंतर इसवी सन १८७१ मध्ये लेफ्टनंट क्राॅमटन यांनी पुन्हा येथे उत्खनन केले व अनेक बौद्धशिल्पे सापडली आहेत.

चित्र क्रमांक एक जमालगढी, मरदान, पाकिस्तान बौद्ध नगरीचे भग्नावशेष.

चित्र क्रमांक दोन १/३ शतकातील राणी महामायेचे स्वप्न शिल्प जमालगढी, मरदान,
3)
Read 5 tweets
5 Nov
आम के पेड़ के नीचे ब्राह्मण तुलसीदास रामचरित्रमानस लिख रहे थे. अचानक पेड़ से आम तुलसीदास के सर पर गिरा. तुलसीदास बहुत खुश हुआ, उसने आम को ईश्वर का दिया हुआ उपहार समझकर खा लिया !

मुग़ल राज में गाय कट रही थी, मुग़ल समोसे में गाय का मांस भर भर कर खा रहे थे.
1) Image
लेकिन तुलसीदास को कोई आपत्ति नही थी, वह मग्न होकर आनंदित होकर, लगा लिखने "ढोल गंवार पशु नारी सकल ताड़ना के अधिकारी" !

किसान का बेटा इसाक न्यूटन सेब के पेड़ के नीचे विज्ञान की पढ़ाई कर रहा था. अचानक से एक सेब न्यूटन के सर पर गिर गया. न्यूटन ने सेब उठाया उसे ध्यान से
2)
देखने लगे मानो कभी सेब देखा ही नही. लेकिन न्यूटन सेब नही देख रहे थे वह सोच रहे आखिर सेब नीचे क्यों गिरा ?

सेब ऊपर क्यों नही गया... नीचे ही क्यों आया ?. ऊपर चांद है वह क्यों नही गिरता. धरती में जरूर कोई फ़ोर्स है. ताक़त है जो चीजों को अपनी ओर आकर्षित करती है !
3)
Read 7 tweets
5 Nov
'मुझे मेरे गोत्र "गौतम" से सम्बोधित मत करो I मै अब अरहन्त हूँ, सम्यक सम्बुद्ध हूं I'
- तथागत बुद्ध

सम्बोधि प्राप्ती के पश्चात जब तथागत बुद्ध ने पीडित मानवता के कष्टों का विचार किया, उनका दिल करुणा से ओत प्रोत हो गया I उन्हों ने निश्चय किया कि जिन अनादी सत्तों
1) Image
का उन्हों ने आविष्कार किया है, वे सभी मानवों तक उन सत्यों को पहुचायंगे I.
इस निश्चय को लेकर तथागत ने वाराणसी की ओर प्रस्थान करने का संकल्प किया I वाराणसी सदियोंसे धार्मिक चिंतन और धार्मिक जीवन बिताने वालों का मिलन-स्थान माना जाता रहा है I रास्ते में उनकी मुलाखत उन के
2)
पुर्व परिचित एक नग्न जैन मुनि 'उपक' से हुई I तथागत की तेजस्विता और शान्त मुद्रा से प्रभावित होकर उपक ने प्रश्न किया- 'वह तुम्हारा कौन सा गुरु है, जिसके कारण तुम ने गृह त्याग किया है?'
तथागत का उत्तर था- 'मेरा कोई गुरु नहीं है I मेरे समान कोई नहीं है I मै सम्यक
3)
Read 8 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!