नुकतीच नाणेघाटला जाऊन आले होते.त्यासंदर्भात #मर्यादित वाचन केलं होतं.त्यातून हे कळालं की, हा नाणेघाट म्हणजे घाटांचा राजा.हा इसवीसनपूर्व काळात बांधला गेलाय.हे वाचूनच रोमांच उभे राहिले. काय ते कसब? अभियांत्रिकीमधला चमत्कारच.
सातवाहन सम्राज्ञी गौतमीपुत्र 1)
सातकर्णीची पत्नी नागणिका हिचा नाणेघाटातल्या लेणीतला तो प्रख्यात शिलालेख. पहिल्यांदा गेले तेव्हा वेड्यासारखी धावत गेले होते त्या भित्तीकडे. त्या पाषाणातल्या अक्षराईत हरवून गेले होते.मला न समजणाऱ्या ब्राम्ही भाषेतली ती अक्षरं पण विलक्षण प्रेमानं,कदाचित इतिहासाच्या फारसं न 2)
जपता आलेल्या वेडामूळे माझे हात त्या अक्षरांवरनं फिरत होते.नागणिका इथेच असेल का? माझ्या आसपास?माझी ही ओढ बघत असेल का?तिला छान वाटत असेल का आपला शिलालेख असा चिरंजीवी झालेला पाहून? तिचा चुडाभरला अमानवी हात माझ्यासोबतच तीही त्या अक्षरांवरनं फिरवत असेल का? धुक्यासारख्या तरल
3)
रूपात नागणिका इथे वावरत असेल का?
काळाच्या कराल जबड्यात गुडूप झालेल्या माझ्याच पुर्वजांची ती खूण पाहतांना कुठल्या अनाकलनीय ओढीनं डोळे पाणावले होते.परत परत इथे यायचं ठरवून त्यावेळी मी परतले होते.ही परतभेटीची मनिषा इतक्या लवकर पूर्ण होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं.अक्षरमानव
4)
परिवाराच्या जुन्नर शाखेची वर्षासहल नाणेघाटला जाण्याचं ठरलं तेव्हा मनातल्या मनात मी नागणिकेलाच धन्यवाद दिले.सम्राज्ञीच ती.तिला काय अशक्य?
ही सहल प्लान झाली तेव्हा परत एकदा ही इतिहासाची उर्जादायी लहर अंतर्बाह्य सळसळत गेली.२सप्टेंबरची आतुरतेनं वाट पहात होते.नाणेघाटबद्दल अजून
5)
काही वाचायला मिळतं का ते शोधत होते.गुगलकृपेनं त्या वाचनातून एक एक चकीत करणारी माहीती समोर येत होती.
*मौर्य राजानंतर आलेल्या सातवाहन राजांनी व्यापार सोयीचा व्हावा म्हणून हा मार्ग खोदला.अतिशय वैभवशाली अशा ह्या साम्राज्याचा विस्तारमहाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरही होता.
6)
सातवाहन हा महाराष्ट्रातला पहिला ज्ञात राजवंश मानला जातो.सुमारे चार शतके हे साम्राज्य सलग पण शांतीपूर्ण राज्य करत होते.ह्या काळात त्यांचे तीस अतिशय पराक्रमी असे राजे होऊन गेले.सातवाहन काळ हा महाराष्ट्राचा सुवर्णकाळ मानला जातो.महाराष्ट्रात पहिली राजसत्ता सुमारे बावीसशे
7)
वर्षांपूर्वी स्थापन केली. त्यांची राजधानीची व प्रमुख नगरे होती जुन्नर, नाशिक, प्रतिष्ठान व तेर ही. त्या नगरांचे संबंध देशाच्या इतर भागांबरोबर व कोकण किनारपट्टीच्या सोपारा, ठाणे, कल्याण, चौल, मांदाड इत्यादी बंदरांमधून ग्रीस, रोम, इजिप्त, आफ्रिकेचा पूर्वकिनारा, इराणी व अरबी
8)
आखातातील प्रदेश यांच्याशी होते. तारवे, विविध प्रकारचा माल आणत व घेऊन जात. आल्यागेलेल्या मालाचे संकलन व वितरण कोकणातून घाटमाथ्यावर व नंतर महाराष्ट्राच्या अन्य भागांतून होई. त्यामुळे सह्याद्रीत लहानमोठे घाट दोन हजार वर्षांपूर्वीच अस्तित्वात आले. ते कोकण व घाटमाथा यांना जोडत.
9)
कोकणातील ठाण्याचा भाग थळ, बोर, माळशेज व नाणे या घाटांमुळे घाटमाथ्याला जोडलेला होता. त्यांपैकी नाणेघाट हा सर्वात प्राचीन व सोयीस्कर. म्हणून त्यास घाटांचा राजा म्हटले जाते. तो घाट मुरबाडच्या पूर्वेस तीस किलोमीटर, कल्याणपासून चौसष्ट किलोमीटर व जुन्नरपासून सुमारे तेहतीस
10)
किलोमीटर अंतरावर आहे. मुरबाडवरून निघाल्यावर सह्याद्रीच्या तळाशी वैशाखरे व पुलुसोनाळे ही गावे येतात.वैशाखरे गावाची व्युत्पत्ती गझेटियरमध्ये वैश्यगृह (व्यापारी गृह) अशी दिलेली आहे. ते गाव व्यापाऱ्यांचा, लमाणांचा, बौद्धभिक्षूंचा व इतरेजनांचाही घाट चढण्याआधीचा पडाव असावा.
11)
घाट चढल्यावर घाटघर लागते. घाटाची चढण प्रधान पाड्यापासून वैशाखऱ्याजवळ सुरू होते. ती घनदाट वनस्पतींच्या भागातून सुमारे साडेचार किलोमीटर अंतर कापून घाटघरजवळ शिंगरू पठारावर येऊन संपते. चढणीच्या शेवटच्या टप्प्यात एकशेतीस फूट लांबीची प्रस्तर घळ असून तिला 'घाटाची नळी' असे
12)
म्हटले जाते. तो सबंध प्रस्तर खोदून त्यातून वाट काढण्यात आली आहे. ते अभियांत्रिकीतील त्या वेळचे अवघड आव्हान असावे. सातवाहनांनी तो घाट वैशाखरेपासून घाटघर व पुढे जुन्नरपर्यंत कातळ फोडून, त्यात पायर्यांची सोय करून बांधलेला होता. त्या पायर्यांचे अवशेष पाहण्यास मिळतात.
13)
घाटात अनेक सोयी पुरवण्यात आल्याचे दिसून येते. शिंगरू पठार व पुलुसो नाळ्याजवळ गणेशथाळ येथे दगडात रांजण खोदलेले आहेत. स्थानिक लोक त्या रांजणांना 'जकातीचे रांजण' असे म्हणतात. लमाण व्यापार्यांकडून घाटाचा वापर केल्याबद्दलचे शुल्क किंवा कर रांजणात टाकण्यात येत असावा. घाटघर व
14)
आजुबाजूचे रांजण हे नेहमीप्रमाणे उभट गोलाकार आहेत. मात्र गणेशथाळजवळील रांजण आकाराने चौकोनी आहे. ते सर्व रांजण #जकातीसाठी वापरण्यात येत असतील असे वाटत नाही. ती व्यवस्था पांथस्थांना पिण्याचे #पाणी मिळावे म्हणूनही असेल. घाटघरजवळ छोटे तलावही खोदलेले आहेत. त्याचाच अर्थ प्रवासी,
15)
लमाणांचे तांडे व त्यांच्या जनावरांसाठी पाणीपुरवठा करण्याचीही सोय असावी.
काही रांजणांवरील कोरीव लेख महत्त्वपूर्ण माहिती देतात. शिंगरू पठारावरील रांजण दोन तोंडांचा असून त्यावर प्राकृत भाषेत ‘हा रांजण कामवन येथील व्यापारी दामघोष याने वशिष्ठपुत्र सातकर्णी याच्या राज्यकालाच्या
16)
तेराव्या वर्षांत कोरला’ असे म्हटले आहे. तेथेच, थोड्या बाजूला तलावाच्या कडेला दगडात कोरलेले बाक आहे. तो तलाव सोपारा येथील व्यापारी गोविंददास याने खोदला अशी माहिती त्या बाकावर मिळते.
घाट संपण्याआधी वर जाताना उजव्या बाजूला सुमारे एकोणतीस फूट चौरसाकार असलेले सातवाहनकालीन
17)
लेणे आहे. त्या लेण्याच्या दोन्ही बाजूंच्या भिंतींवर सातवाहन राणी नयनिका हिचा प्रसिद्ध शिलालेख कोरलेला आहे. तो दक्षिण व पश्चिम भारतातील सर्वात प्राचीन लेख ( इसवी सनपूर्व पहिले शतक). त्यात सातवाहन राजघराण्याची व धार्मिक स्थितीची माहिती मिळते. लेण्याच्या एका भिंतीवर सातवाहन
18)
राजपरिवारातील व्यक्तींची खंडित शिल्पे आढळतात.नाणेघाट दुरवस्थेत असला तरी त्याची पद्धतशीर आखणी व रचना करण्यात आली असावी हे तेथील अवशेषांवरून स्पष्ट होते. तो सातवाहन नरेशांनी निर्माण केला असावा. स्थानिक आख्यायिकेप्रमाणे ते काम अभियांत्रिकी क्षेत्रात निपुण असलेल्या नाना
19)
व गुणा या दोन तज्ज्ञांकडे देण्यात आले होते. त्यांपैकी जो प्रथम घाट बांधेल त्याचे नाव घाटास द्यावे असे ठरले. दोघांनीही त्यांचे कौशल्य पणाला लावले, घाट बांधणीस सुरुवात झाली. कोकणाकडे तोंड असलेल्या सह्याद्रीच्या उभ्या कड्याला त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे 'नानाचा
20)
अंगठा' असे म्हणतात. घाटाच्या निर्मितीस त्या ठिकाणाहून सुरुवात झाली असावी. अंगठ्याच्या दक्षिण भागाकडील काम गुणाला तर उत्तरेकडील भागाचे काम नानाला देण्यात आले. नानाला दिलेला मार्ग गुणापेक्षा अवघड असला तरी त्याने तो वर्ष संपण्याआधी पूर्ण केला. साहजिकच, नानाचे नाव त्या घाटाला
21)
पडले. दोन घाट बाजूबाजूलाच बांधण्याचे सातवाहनांचे काही प्रयोजन असावे. त्या काळातील वाहतुक आणि लष्करी हालचाली यांसाठी एकमेकांस समांतर घाट असणे आवश्यक ठरले असावे. सातवाहनांचे शक क्षत्रपांबरोबर संघर्ष सतत सुरू असत. सातवाहनांनी घाटाच्या सुरक्षिततेसाठी उपाय केलेले असावेत हे
22)
निकटच्या किल्ल्यांवरून लक्षात येते. जुन्नरपासून सोळा किलोमीटरवर चावंडचा किल्ला, बारा किलोमीटरवर हडसरचा किल्ला व त्यापुढे बहिरव व जीवधन हे किल्ले आहेत. त्याचाच अर्थ त्या व्यापारी मार्गांना संरक्षण मजबूत तटबंदीच्या माध्यमातून देण्याची गरज भासली असावी.
महत्त्वपूर्ण माहिती
23)
सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी टॉलेमी या भू - इतिहास विशेषज्ञाने दिली आहे. तो 'नागुना' किंवा 'नानागुना' नदी असा घाटाचा स्पष्ट उल्लेख करतो. टॉलेमी भारतात आला नव्हता. त्याने इतर प्रवाशांनी दिलेल्या माहितीवरून नाणेघाटाचे वर्णन केले आहे. त्यामुळे तो डोंगरी भाग आहे की ती वाहती
24)
नदी आहे असा संभ्रम त्याच्यासमोर पडला व त्याने नाणेघाट ही व्यापारउदिमाची नदी आहे असा समज करून घेतला. नाणेघाटाचा वापर शिलाहार, यादव व मराठी आमदानीतही होई. मुंबई - पुणे व मुंबई - नाशिक हे हमरस्ते ब्रिटिशांच्या काळात बांधले गेल्यामुळे नाणेघाटाचे महत्त्व आपोआप कमी झाले.
25)
मुंबईहून कोकण व गोवा या दिशेने जाणारे रस्ते सह्याद्री पर्वतरांगेतील विविध घाटांतून गेलेले आढळतात. नाणे घाट हे प्राचीन वाहतुकीचे उत्तम उदाहरण आहे.
मौर्य राजा नंतर सत्तेत आलेल्या सातवाहन राजांनी हा घाट खोदला. या घाटात सातवाहनांनी एक लेणे तयार करत त्यामध्ये त्यांच्या
26)
कुलाची गाथाही कोरून ठेवलेली आढळते. येथे असलेल्या लेखात सातवाहन सम्राज्ञी नागणिके विषयी माहिती मिळते. या लेखांमध्ये महाराष्ट्राच्या आद्य राज्यकुल, त्यांचा पराक्रम, दानधर्माबद्दल माहिती आहे. इसवी सन पूर्व पहिल्या शतकात भारताच्या मोठया भूप्रदेशावर राज्य करणारा सातवाहन
27)
हे पहिले राजे. हा राजवंश सुमारेचार शतके सलगतेने राज्य करत होता. या काळात त्यांचे तीस पराक्रमी राजे होऊन गेले. या सातवाहनांच्या राजवटीत महाराष्ट्र इतर प्रदेशात सुवर्णकाळ होता असे मानले जाते. प्रतिष्ठान (पैठण), जीर्णनगर (जुन्नर), तगर (तेर), नेवासे, नाशिक अशी भरभराटीला
28)
आलेली शहरे या राजवटीत उदयास आली. अशा या सातवाहनांच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी ‘नाणेघाट’ हा प्रमुख मार्ग होता.
येथील एका लेखात सातवाहनांच्या पराक्रमाशिवाय त्यांनी इथे केलेले यज्ञ, दानधर्माचे उल्लेख आहेत. सातवाहन राजांनी दोनदा अश्वमेध यज्ञ केला असे दिसून येते. याशिवाय
29)
वाजपेय यज्ञ, राजसूय यज्ञ असे तब्बल २२ यज्ञ इथे पार पडल्याची माहिती हे लेख देतात. हजारो गाई, शेकडो हत्ती, घोडे, खेडी, धान्य, वस्त्र-अलंकार आणि तत्कालीन सातवाहनांची कार्षांपण या नाण्यांचा मोठा दानधर्म केल्याचाही यात उल्लेख येतो.
येथील गुहांमध्ये ब्राम्ही भाषेतील लेख
30)
आढळतात. गुहांमध्ये सातवाहनांचे वंशजांचे पुतळे आहेत. त्यांचे सध्या पायांचे भाग आहेत.
घाटाच्या तळाशी वैशाखखेडे गाव आहे. असे मानले जाते की ते "वैश्यखेडे"चा अपभ्रंश आहे. हे गाव व्यापारी व त्यांचे नोकरांच्या सुविधांसाठी इमारती होत्या.
घाटात जकातीसाठी रांजण आहेत. हा टोल
31)
संस्कृती सर्वांत जुना पुरावा आढळतो.सुपारक अर्थात सोपारा आणि कल्याण ही प्राचीन काळी पश्चिम किनाऱ्यावरची दोन अत्यंत महत्त्वाची व्यापारी केंद्रे होती. केवळ देशांतर्गतच नव्हे, तर परदेशातील व्यापाराला सुद्धा येथून मोठी चालना मिळत असे. विशेषत: रोमहून आयात होणारा माल सोपाऱ्याला
32)
उतरवला जाऊन तेथून कल्याण, नाणेघाट, जुन्नर, नेवासा मार्गे पैठणकडे नेला जात असे. तसेच निर्यातीच्या वस्तूंची वाहतूक देखील याच मार्गावरून उलट दिशेने होत असे*
सातवाहन हे मूळ घराणे आंध्रातले होते .त्यांचा उल्लेख मत्स्य पुराण व वायू पुराणात देखील आला आहे.महाभारतात त्यांचा
33)
उल्लेख औंड्र असा आला आहे. औंड्र ह्या नावावरूनच आजही मावळाला आंदरमावळ असे म्हटले जाते.सातवाहनांची पहिली राजधानी ह्या परिसरात असल्याने हा शब्द औंड्र/आंध्र शब्दाचा अपभ्रंश असावा असा अंदाज आपण करू शकतो.ह्या माहितीत मौल्यवान भर टाकली ती शिरीषकाकांनी( Shirish Bhor) .हा सर्वात
34)
जुना टोलनाका किती प्रचंड वापरात होता ह्याची साक्ष त्यांच्या माहितीतून पटते. भोकपड्या पैसा किंवा काषार्पण नाणी तिथल्या दगडी रांजणात जकात म्हणून भरली जात.आणि हा मोठाच्या मोठा दगडी रांजण चक्क दर तीन तासांनी रिकामा करावा लागे.ही माहिती ऐकल्यावर वर दिलेली सर्व माहिती जणू सजीव
35)
झाली.थकलेभागले व्यापारी घाटाच्या रस्त्यानं आपापला विक्रीसाठी आणलेला माल घोड्यांवर,बैलांवर लादून घाटातल्या दगडी पायऱ्या चढत होते.काहीजण तिथल्या दगडी लेणीमध्ये विसाव्यासाठी थांबले होते.कुणी कुणी आपल्यासोबत आलेल्या नविन दुरदेशीच्या नातलगांना तिथल्या शिलालेखावरनं आपल्या
36)
सम्राटाची महती सांगत होते.आपले आजोबा /काका ह्या घाटाच्या बांधकामात नानासाहेबांच्या आणि गुणासाहेबांच्या हाताखाली होते हे गर्वानं सांगत होते.
अक्षरमानव परिवाराचा प्रत्येक ह्या अवस्थेतून गेला असेल अशी मला खात्री आहे.शरीरमनाची एक वेगळीच अवस्था झाली होती. जणू माझ्या
37)
आस्तित्त्वाचा अणुरेणू विघटून त्या इतिहासाला उराउरी भेटणार होता.त्या अंधाऱ्या लेणीत वावरतांना वाटलं.नागणिकेचे पैंजण इथेच आपल्या स्वारीसोबत गौरवलेखाची पाहणी करण्यासाठी आल्यावर रूणझूणले असतील. तिथल्या दगडी कातळांकडे पाहताना वाटत होतं किती वैभव ह्यांनी पाहिलं असेल.माझ्याही
38)
नकळत ह्या भिंतींचा मी कानोसा घेतला तर इथले आनंदाचे,दुःखाचे नाद मला ऐकू येतील का?जुन्या, पराक्रमी राजांचे आत्मे काळाच्या ओघात लयाला गेलेल्या आपल्या प्रबळ साम्राज्याचा सुवर्णकाळ आठवून उसासे टाकत असतील का?
ह्या शूर पुर्वजांचं रक्त माझ्याही धमन्यांत खेळतं आहे.ह्या दगडी
39)
अक्षरांना,दगडातच अंतर्धान पावलेल्या राजांच्या मुर्त्यांच्या दगडी पावलांना हात लावला तर अंगी शहारा येतो आहे...तिथली धूळ मस्तकी लावून रडावसं वाटतंय...अशी काहीशी ती अवस्था. त्या लेण्याच्या बाहेर पडल्यानंतर बाहेर असणाऱ्या निसर्गाच्या नित्यनूतन लीलांनी आस्ते आस्ते मन जरा
40)
थाऱ्यावर आलं.
आपल्या अक्षरमानव परिवारासोबत चालतांना हे अवचित शिरलेलं एकटेपण समोरून सरसर नाहीशा झालेल्या धुक्यागत विरून गेलं.
तिथल्या डोंगरदऱ्यांवर दम छाटेपर्यंत मनसोक्त बागडून आम्ही सर्व परतीच्या प्रवासाला निघालो.मनातल्या मनात ह्या अविस्मरणीय अनुभवासाठी
41)
अक्षरमानवचे मनःपूर्वक धन्यवाद मानत, अक्षरांतून हे देणं फेडायचं ठरवलं..पण एका सम्राज्ञीचंच देणं ते.मी किती काय फेडणार?
ही जाणीव होते आणि मी फक्त म्हणत रहाते.
"इतिहासपुरूषा!!
दंडवत!
दंडवत!!"
42).🔚
डॉ . अल्बर्ट एलिस .
अमेरिकेतील नामांकित मानसोपचारतज्ञ . यांना मानसशास्त्रज्ञ सुद्धा म्हणता येईल . विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती (rational emotive behaviour thearapy ) हा त्यांचा मनाच्या जगातील सर्वात महत्वाचा शोध . अनेकांना मानसिक स्थैर्य मिळवून देणाऱ्या या पद्धतीचा शोध 1)
खरंतर त्यांनी स्वतःला स्थिरता मिळवून देण्यासाठी लावला होता . या शोधाची सुरुवात त्यांनी लहानपणीच केली होती . भावनेच्या आहारी न जाता , तर्कसंगत बुद्धी वापरून केलेला विचार मनाला स्थिर करतो हा त्यांचा अनुभव त्यांनी जगाला पटवून दिला . त्यासाठी अनेक उदाहरणे आणि दाखले दिले .
2)
आणि आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांच्या कार्याची दखल घेणे सर्व जगाला भाग पडले . त्यांनी मांडलेले काही सिद्धांत सोप्या भाषेत पुढीलप्रमाणे आहेत .
१) माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांवर त्याच्या प्रतिक्रिया आणि कृती अवलंबून नसतात , तर त्या घटनांकडे तो कोणत्या दृष्टीकोनातून बघतो
3)
इथल्याच (पनवेल स्टॅंडजवळ) एका छोटेखानी हाॅटेलवाल्याने बाबासाहेबांना पाणी नाकारले त्यावेळी अस्वस्थ झालेले, गरीब मजूर असलेले सोनबा येलवे बाबासाहेबांसाठी पाणी आणायला गेले.
पाणी आणले, तोपर्यंत बाबासाहेब पुढील प्रवासाला निघूनही गेले होते. 1)
बाबासाहेब परत याच मार्गाने येतील तेव्हा त्यांना पाणी मिळायला हवे आणि ते मी देईन या इच्छाशक्तीने ते दरदिवशी पाणी घेऊन येत. परंतु बाबासाहेब परत त्या मार्गाने आले नाहीत.
...आणि वाट पाहून अखेर, इथेच सोनबा येलवेंचा मृत्यू झाला.
2)
त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पनवेल महानगरपालिकेने ही पाणपोई बांधली आहे. येणार्या-जाणार्यांना पाणी मिळावे या उदात्त हेतूने.
उशीरा का होईना, बाबासाहेबांच्या प्रेमाखातर त्याग करणारी व्यक्तिमत्त्वं उजेडात येत आहेत.
3)
मनुस्मृती दहन केल्यानंतर तत्कालीन काही ब्राह्मण्यग्रस्त वृत्तपत्रांनी टीकात्मक लेखन केले. त्यावर बाबासाहेबांनी बहिष्कृत भारत पत्रातून त्यांचा समाचार घेतला. वाचा !
- आनंद गायकवाड
आमच्या मित्रांचा दुसरा असा एक आक्षेप आहे की मनुस्मृती ही जुन्या काळी अंमलांत असलेल्या 1)
नियमांची एक जंत्री आहे. त्या जंत्रीतील नियम आज कोणास लागू नाहीत. मग असले जुने बाड जाळण्यात काय अर्थ आहे ? मनुस्मृती हे एक जुने बाड आहे असे आमच्या मित्राप्रमाणे आम्हासही म्हणता आले असते तर आम्हास मोठाच आनंद झाला असता. परंतु दुर्दैवाने आम्हांस तसे म्हणता येत नाही. आणि आमची
2)
खात्री आहे की, भावी स्वराज्याचा चंद्रोदय केव्हा होतो हे पाहण्याकरिता, आमच्या मित्रांचे डोळे आकाशाकडे लागले नसते तर आपल्या पायाखाली काय जळते आहे हे त्यांना निरखून पाहताच आले असते. मनुस्मृती हे एक जुने बाड आहे, ते राहिले तरी काही हरकत नाही असा युक्तिवाद करण्याऱ्या गृहस्थांना
3)
जमालगढी सध्याच्या पाकिस्तानातील खबैर पक्ख्तुन्ख्वामधील मरदानच्या कटलांग मरदान मिर्गापासून १३ किमी अंतरावर हे शहर आहे. जमालगढी येथे प्राचीन स्तूप व विहारांचे अवशेष सापडले आहेत.
जमालगढी येथील स्तूप व विहार १/५ शतकातील भरभराटीचे बौद्ध ठिकाण होते. 1)
जमालगढीचे स्थानीय नाव "जमालगढी कंदारत" किंवा "काफिरो कोटे" असे आहे. जमालगढीच्या भग्नावशेषांचा प्रथम शोध ब्रिटीश पुरात्ववेत्ता व गाढे अभ्यासक अलेक्झांडर कॅनिंगहॅम यांनी इसवी सन १८४८ मध्ये लावला.
कर्नल ल्युम्स्डेन यांनी जमालगढी येथे उत्खनन केले होते पण तेव्हा तेथे विशेष 2)
काही सापडले नाही. नंतर इसवी सन १८७१ मध्ये लेफ्टनंट क्राॅमटन यांनी पुन्हा येथे उत्खनन केले व अनेक बौद्धशिल्पे सापडली आहेत.
चित्र क्रमांक एक जमालगढी, मरदान, पाकिस्तान बौद्ध नगरीचे भग्नावशेष.
चित्र क्रमांक दोन १/३ शतकातील राणी महामायेचे स्वप्न शिल्प जमालगढी, मरदान,
3)
आम के पेड़ के नीचे ब्राह्मण तुलसीदास रामचरित्रमानस लिख रहे थे. अचानक पेड़ से आम तुलसीदास के सर पर गिरा. तुलसीदास बहुत खुश हुआ, उसने आम को ईश्वर का दिया हुआ उपहार समझकर खा लिया !
मुग़ल राज में गाय कट रही थी, मुग़ल समोसे में गाय का मांस भर भर कर खा रहे थे. 1)
लेकिन तुलसीदास को कोई आपत्ति नही थी, वह मग्न होकर आनंदित होकर, लगा लिखने "ढोल गंवार पशु नारी सकल ताड़ना के अधिकारी" !
किसान का बेटा इसाक न्यूटन सेब के पेड़ के नीचे विज्ञान की पढ़ाई कर रहा था. अचानक से एक सेब न्यूटन के सर पर गिर गया. न्यूटन ने सेब उठाया उसे ध्यान से
2)
देखने लगे मानो कभी सेब देखा ही नही. लेकिन न्यूटन सेब नही देख रहे थे वह सोच रहे आखिर सेब नीचे क्यों गिरा ?
सेब ऊपर क्यों नही गया... नीचे ही क्यों आया ?. ऊपर चांद है वह क्यों नही गिरता. धरती में जरूर कोई फ़ोर्स है. ताक़त है जो चीजों को अपनी ओर आकर्षित करती है !
3)
'मुझे मेरे गोत्र "गौतम" से सम्बोधित मत करो I मै अब अरहन्त हूँ, सम्यक सम्बुद्ध हूं I'
- तथागत बुद्ध
सम्बोधि प्राप्ती के पश्चात जब तथागत बुद्ध ने पीडित मानवता के कष्टों का विचार किया, उनका दिल करुणा से ओत प्रोत हो गया I उन्हों ने निश्चय किया कि जिन अनादी सत्तों 1)
का उन्हों ने आविष्कार किया है, वे सभी मानवों तक उन सत्यों को पहुचायंगे I.
इस निश्चय को लेकर तथागत ने वाराणसी की ओर प्रस्थान करने का संकल्प किया I वाराणसी सदियोंसे धार्मिक चिंतन और धार्मिक जीवन बिताने वालों का मिलन-स्थान माना जाता रहा है I रास्ते में उनकी मुलाखत उन के
2)
पुर्व परिचित एक नग्न जैन मुनि 'उपक' से हुई I तथागत की तेजस्विता और शान्त मुद्रा से प्रभावित होकर उपक ने प्रश्न किया- 'वह तुम्हारा कौन सा गुरु है, जिसके कारण तुम ने गृह त्याग किया है?'
तथागत का उत्तर था- 'मेरा कोई गुरु नहीं है I मेरे समान कोई नहीं है I मै सम्यक
3)