#महात्मा_जोतीराव_फुले
भाग १
"महाराष्ट्रात एकोणिसाव्या शतकात समाजसुधारणेच्या संदर्भात ज्या काही चळवळी झाल्या आणि ज्यांच्या पुढाकाराने झाल्या त्यामध्ये महात्मा जोतीराव फुले यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल व त्यांना मानाचा मुजरा करावा लागेल." प्रसिद्ध शिक्षणतज्ञ विठ्ठलराव घाटे👇
यांचे हे वाक्य खूप काही सांगून जाते. त्या काळात संपूर्ण समाज वर्णव्यवस्थेच्या कुलंगड्यात अडकून पडलेला होता, सनातन्यांच्या कर्मकांडाला ऊत आला होता आणि ख्रिस्ती मिशनऱ्यांनी हळूहळू पाय पसरायला सुरवात केलेली होती. त्याच काळात बहुजन समाज अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ठ चालीरीती, रूढी,👇
परंपरा यांच्या कर्दमात खितपत होता. दुःख व दारिद्रय त्यांची पाठ सोडायला तयार नव्हते; अशावेळी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे जोतीरावांनी ओळखले. राजकीय गुलामगिरीपेक्षाही सामाजिक व मानसिक गुलामगिरी ही भयानक असते; त्यामुळे शोषितांच्या वाट्याला जनावरासारखे जगणे येते, शोषकांचे हिंस्त्र👇
श्वापदात रूपांतर होते याची दूरदृष्टीच्या जोतिरावांना जाणीव झाली. त्यातून शाळा सुरु करण्याचा विचार त्यांच्या मनात उचल खावू लागला. पुरुषवर्गापेक्षाही स्त्री वर्गाला शिक्षणाची अधिक गरज आहे, केवळ शिक्षणच त्यांची सामाजिक दास्यातून सुटका करू शकेल, त्यामुळे संपूर्ण कुटुंबाचा 👇
उद्धार होईल; घरदार ज्ञानाने व मनाने उजळून निघेल. याच विचाराने १८४८ साली वयाच्या २१ व्या वर्षी जोतीरावांनी पुण्यातील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरु केली. फुल्यांचे हे कार्य अत्यंत धाडसाचे आणि क्रांतिकारक होते. या शाळेत शिक्षिका मिळणे दुरापास्त झाले; 👇
तेव्हा जोतीरावांनी त्यांच्या पत्नीला सावित्रीबाईंना स्वतः शिकवले. मिसेस मिचोल यांच्या मार्गदर्शनातून प्रशिक्षित शिक्षिका बनवले. त्यानंतर सावित्रीबाई मुलींना शिकवण्याचे काम करू लागल्या. हे काम करताना फुले दांपत्याला खूप यातना व अवहेलना सहन कराव्या लागल्या. 👇
तरीही समाजसुधारणेच्या व्रतापासून हे दांपत्य तसूभरही ढाळले नाही. १८४८ ते १८५२ या काळात सावित्रीबाईंच्या सहकार्याने जोतीरावांनी एकूण १८ शाळा सुरु केल्या. आणि यशस्वीपणे चालविल्या. या शाळांना मुंबई इलाख्याचे विद्याधिकारी सर अर्स्कीन पेरी यांनी भेट दिली, शाळांची तपासणी करून 👇
उत्तम अभिप्राय दिला आणि फुल्यांच्या या कार्याची सरकारकडे शिफारस केली. इंग्रज सरकारने या कार्याची दखल घेतली. १६ नोव्हेंबर १८५२ रोजी पुण्यातील विश्रामबाग वाड्यात एका समारंभात मेजर कँडी यांच्या हस्ते शालजोडी देऊन जोतिरावांचा सरकारच्या वतीने सत्कार करण्यात आला.
👇 @vishwajeetkadam
#बेरोजगार आहात? स्वतःचा #व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत आहात? व्यवसाय काय करावा हे सुचत नाहीये? नवीन कल्पना शोधत आहात? मग हे नक्की वाचा :
व्यवसाय म्हणजे मोठी रिस्क, व्यवसाय म्हणजे २४X७ ची नोकरी हे आपण ऐकलेच असेल.
👇
खूप सारे नवीन व्यवसाय, नवीन #स्टार्टअप्स चालू झालेले आपण पाहिले असतील. ७०% नवीन व्यवसाय एका वर्षात बंद पडतात हेही ऐकलं असेल. नवीन व्यवसाय उभारताना रिस्क कमी करण्यासाठी, चांगली कल्पना शोधण्यासाठी आणि व्यवसाय उभारण्यासाठी या काही टिप्स -
👇
१. व्यवसाय करायचा असेल तर पहिल्यांदा ग्राहकाची #गरज ओळखायला शिका. आपला ग्राहक कोण असावा हे ठरवा, त्यानुसार त्यांच्या गरजा त्यांचे प्रश्न काय आहेत हे समजून घ्या. एकदा का तुम्हाला ग्राहकाच्या गरजा समजल्या की त्या आपण कशा पूर्ण करू शकतो याचा विचार करा.
👇
पृथ्वीचा सूर्याभोवती परिभ्रमणाचा काळ ३६५ दिवस ५ तास ४८ मिनिटे आणि साडे ४७ सेकंद एवढा आहे. या काळात इंग्रजी कॅलेंडरचे बारा महिने पूर्ण होतात. (इंग्रजी कॅलेंडर पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यावर आधारित आहे.)
👇
भारतीय पंचांग चंद्रमास प्रमाणे चालते. चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्यावर आधारलेले १२ चांद्र मास मात्र ३५४ दिवसांत पूर्ण होतात. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील चांद्र मास हे अमावस्येला संपणारे असतात. (इतर राज्यांत पौर्णिमेला)
👇
चंद्राचा अमावस्या ते अमावस्या असा परिभ्रमण काळ २९.५३०५९ दिवस आहे. असे १२ महिने झाले की ३५४.३६ दिवस होतात. सौरवर्ष हे अर्थातच ३६५.२५ दिवसाचे असते. ह्यातून १२ चांद्रमास वजा केल्यास १०.८९ दिवसाचा फरक येतो. त्यामुळे दर ३ वर्षांनी ३२.६७ दिवसांचा फरक पडतो.
👇
फेब्रुवारी महिन्यात फक्त २८ दिवसच का? चार वर्षातून एकदा येणारा लीप डे फेब्रुवारी मध्येच का येतो? समजून घेण्यासाठी हे नक्की वाचा -
पूर्वी एक वर्ष हे ३०६ दिवसांचे आहे असे मानले जायचे. त्याप्रमाणे पूर्वी एका वर्षात फक्त १० महिने होते.
👇
वर्षाचा पहिला महिना मार्च असायचा. मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर असे १० महिने पूर्वी मोजले जायचे. नंतर लक्षात आले की एक वर्ष हे ३०६ दिवसांचे नसून ३६५ दिवसांचे आहे.
👇
राहिलेले ५९ दिवस मोजण्यासाठी, डिसेंबर नंतर जानेवारी घेतला गेला ज्यात ३१ दिवस गणले गेले. त्यानंतर फेब्रुवारी मध्ये राहिलेले २८ दिवस गणले गेले. म्हणजेच पूर्वीच्या काळी फेब्रुवारी हा महिना वर्षाचा शेवटचा महिना होता.
👇
लोकांचा नाझी पक्षाला पाठिंबा आहे, हे दर्शवण्यासाठी रोड शोज आणि मोठे इव्हेंट आयोजित केले जायचे. त्या वेळी नेत्यांची भाषणं व्हायची. देशात सर्वकाही कसं चांगलं आहे (सब चंगा सी), अशा प्रकारच्या भाषणांची उजळणी या ठिकाणी केली जायची.
👇
हिटलरच्या वाढदिवशीदेखील मोठे कार्यक्रम आयोजित केले जायचे. 1936 मध्ये ऑलिंपिकचं आयोजन करण्यात आलं होतं. जर्मन सरकार कसं यशस्वी आहे, हे दाखवण्याची आयती संधीच या कार्यक्रमातून गोबेल्सच्या हाती आली होती.
👇
त्याने तिचा पुरेपूर वापर केला आणि आर्यन वंश कसा शक्तिशाली आहे, हे देखील दाखवण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून केला गेला. कला आणि कलाकार दोन्हीवर सरकारचं नियंत्रण हवं, असं या प्रचार मंत्रालयाला वाटायचं.
👇
1934 साली हिटलर सत्तेत आल्यानंतर जोसेफ गोबेल्सला Ministry of Enlightenment and Propagandaचा कारभार देण्यात आला. प्रचार हा अदृश्य आणि सर्वत्र असावा, असं त्याला वाटायचं. त्यामुळे माध्यमं, साहित्य, कला यांच्यावर कठोर निर्बंध लादली जायची.
👇
हलके फुलके मनोरंजनाचे कार्यक्रम किंवा नाझी विचारांचा प्रचार करणारं साहित्य, चित्रपटांना परवानगी दिली जायी. आर्यन वंश हा सर्वांत शुद्ध आहे आणि ज्यू हे राष्ट्रद्रोही आहेत, या संदेशाचा मारा जर्मन लोकांवर केला जायचा. ज्यू पत्रकारांवर बंदी घालण्यात आली होती.
👇
प्रत्येक बातमीला नाझी अधिकाऱ्यांनी मान्यता दिल्यावरच ती छापली जायची. 1939 पर्यंत जर्मनीत असलेल्या वर्तमानपत्रांपैकी 69 टक्के वर्तमानपत्रं ही नाझींच्याच मालकीची होती. त्याच सुमारास जर्मनीत रेडिओ लोकप्रिय होऊ लागला.
👇
1934 मध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी जर्मनीमध्ये सर्वत्र रंगबेरंगी पोस्टर्स लावले जायचे. सर्व राजकीय पक्ष आपले पोस्टर्स रंगीत बनवून त्यावर खूप साऱ्या घोषणा आणि पक्षाचे विचार लिहीत.
👇
याच निवडणुकीत नाझी पक्षाने मात्र काळ्या पार्श्वभूमीवर हिटलरचा चेहरा आणि नाव असलेलं पोस्टर प्रसिद्ध केलं. त्या पोस्टरवर पक्षाचं नाव किंवा कोणतीही घोषणा नव्हती. हे पोस्टर आपल्या स्पष्ट आणि ठळक दिसण्यामुळे प्रचंड लोकप्रिय ठरलं.
👇
'सामान्य माणूस हा विश्लेषक किंवा विचारवंत नसतो म्हणून त्याच्यापर्यंत अगदी मोजक्या शब्दात आपला संदेश पोहोचला पाहिजे,' हा हिटलरचा विचार ध्यानात घेऊनच प्रचार विभागाने हे पोस्टर बनवलं होतं.
👇