राजाकडे बघूनच जनता सैन्यात सामील होते. पण युद्ध दरवेळी स्वतः राजा येऊन कसा लढेल? त्यासाठी सेनापती, सुभेदार-सरदार असतात. ऐन रणांगणात सैन्य जिंकणार की हरणार हे राजा किती जबरदस्त आहे यावरून कमी - सेनापती आणि टीमने किती चांगली झुंज द्यायची ठरवलं आहे, सैन्य तश्या तयारीत

१+
बसवलं आहे का - यावरून ठरतं.

शत्रू तुम्हाला नेस्तनाबूत करतोय, जनतेचे हाल हाल करतोय वगैरे सगळं बरोबर. लिहा इतिहास. बखरी मागे बखरी होऊन जाऊ देत. पण त्याने होणार काय? वाईट लोक वाईटच वागणार. त्यांनी तोच त्यांचा धर्म ठरवलेला आहे. त्यांचं मतपरिवर्तन होणार नाहीच.

२+
जनतेने क्रूरांना शहाणपण शिकवणं, वाईट वर्तनाची तक्रार करणं वगैरे आपलं आपल्याला समजावण्यासारखं असतं.

खरा उपयोग, झालाच तर, सेनापतीच्या स्ट्रॅटेजिक आणि ठाम कृतिपूर्ण निर्धाराचा.

सेनापती आणि त्याचे सल्लागारच जर कायमस्वरूपी "शत्रूशी जुळवून घेऊ" छाप पांढरी निशाणं मिरवत असतील

३+
तर शत्रूचं सैन्य रयतेला तुडवणारच. ते त्यांनी त्यांचा ठरवलेला धर्मच पाळताहेत. अश्या परिस्थितीत सैन्यात नव्या दमाचे तरुण येणं देखील बंद होईल. आपण बरं - आपलं घर बरं हीच भावना बळावेल.

साधी गोष्ट आहे बाबा...रिलायन्स वाईट आहे, गुगल अतीच जायन्ट आहे, फेसबुक मोनोपॉलिस्टीक आहे

४+
असं म्हणत दुसऱ्या कंपनीज रडत राहिल्या तर त्यांची ग्रोथ होणार आहे काय? त्या कंपनी काय इतर स्पर्धकांना पोसण्यासाठी धंदा करताहेत काय?

टाटाने ईकॉमर्स लॉन्च केलं म्हणून ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ट स्वतःचं मार्केटिंग कमी करणार आहेत काय? की अजून त्वेषाने जोर लावतील?

५+
आता, "आम्हाला टाटा समूहाची मूल्यं आवडतात" म्हणून तुमच्याकडे जॉईन झालेला तरुण - फक्त मिडल मॅनेजमेंटच्या दळभद्री स्ट्रॅटेजीजमुळे ३ वर्ष शून्य ग्रोथवर अडकला असेल...तर त्या तरुणाने काय करावं?

"ऍमेझॉनमुळे आमची ग्रोथ होत नाही" म्हणत रडत रहावं की गुमान आपला आपण विचार करत

६+
इतर संधी शोधाव्यात?

असे तरुण सोडून गेले - आपापले स्टार्टअप्स उभारायला लागले तर टाटा ईकॉमर्सच्या मिडल मॅनेजमेंटने आपल्या सीईओ जवळ हाय अट्रिशन रेट (आपले एम्प्लॉईज सोडून जाण्याचा दर) वर रडण्यात अर्थ नाही. रिपोर्टवर रिपोर्ट द्याल, इंडट्री कॉम्पिटिशन सिनारिओ डिस्कस कराल.

७+
उपयोग काय? तुमचंच कर्म आहे बाबानो. रादर, तुमचंच क्रमशून्यत्व आहे. मरा!

सेनापतीला राजा व्हावंसं वाटतं. पण ते पांढरी निशाणं दाखवत फिरल्याने होत नसतं.

मिडल मॅनेजमेंटला सीईओ लेव्हलपर्यंत जायचं असतं. पण ते स्पर्धकांच्या झंझावाताला डोळे विस्फारत बघत बसत, "नो क्लू" मोडमध्ये राहून

८+
शक्यच नसतं.

बाहेरून कितीही चाणक्य आले आणि कितीही कन्सल्टन्ट हायर केले...तरी शेवटी परिस्थितीचा फैसला तुमच्याच कृतीवरून ठरणार असतो.

शत्रूच्या क्रौर्याची अन स्पर्धकाच्या कामाच्या धडाक्याची तक्रार करत बसणारे, अनुक्रमे, सैनिकांचं आणि कंपनीच्या बॉटम लाईन एम्प्लॉईजचं -

९+
कधीच भलं करू शकत नाहीत.

दॅट्स द कृअल फॅक्ट.

: ओंकार दाभाडकर
d.omkar1@gmail.com

@threadreaderapp please unroll.

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Omkar Dabhadkar

Omkar Dabhadkar Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @OmkarDabhadkar

5 Sep
श्रीमंत होण्याआधीच श्रीमंत दिसण्याचा नाद कसा नडतो हे येणाऱ्या काळात अनेकांना जाणवेल.

कोव्हीड - लॉक डाऊन - थिजलेली अर्थव्यवस्था आपल्या सर्वांना बॅक टू बेसिक्स घेऊन जाणार आहे.

भारतात नेहेमीपासून रुजलेलं "काटकसरी जीवन" गेल्या २-३ दशकातील कन्ज्युमरिज्मच्या वादळात

१+
गुडूप झाल्याची किंमत अनेकांना चुकवावी लागणार आहे.

कॉलेजातून बाहेर पडलेली, नुकतीच ८-१० हजार कमवायला लागलेली पोरं दर एक दिवसाआड कुठल्यातरी कॅफे - रेस्टोरंट - ढाब्यात मजा करतानाचे सेल्फी टाकायला लागतात. जॉब लागल्यालागल्या इएमआयवर कार, किमान वन बीएचके, त्यातही काटेकोर फर्निचर

२+
हे सगळं जणू कम्प्लसरीच झालंय. दर ६ महिन्याला मोबाईल बदलणारे अनेक लोक आयटीत ऐटीत जगतात.

लग्न "दणक्यात" होणं म्हणजे काय याच्या व्याख्या काहीच्या काही अफाट झाल्या आहेत. प्रोफेशनल प्री-वेडिंग शूट्स पासून काय काय सुरु झालं आहे. लग्नानंतर फिरायला जायचं असेल तर परदेशातच जायला हवं

३+
Read 10 tweets
31 Aug
मुंबई-पुण्याच्या #नसलेल्या टीनेजर्सना एक, अगदी मनापासून, कळकळीचा सल्ला आहे.

ग्रॅज्युएशन / पोस्ट ग्रॅज्युएशन 'कोणत्या फील्ड' मधे करणार, 'कोणत्या कॉलेज' मधून करणार - याच बरोबर - कोणत्या शहरातून करणार - याचा अतिशय गांभीर्याने विचार करा.

१+
काही गोष्टी अतिशय स्पष्ट असतात पण बोलल्या जात नाहीत. शिक्षणाच्या, करिअरच्या बाबतीत - तुम्ही कोणत्या शहरात आहात - हे अतिशय महत्वाचं असूनही ते पुरेसं अधोरेखित होत नाही. हे अधोरेखित नं झाल्यामुळे होणारं नुकसान मात्र खूपच मोठं असतं.

उत्तम प्रतीचे कॉलेजेस मोठ्या शहरांमधेच असतात

२+
असा काही नियम नाही. हा नियम लावणं अनेक उत्तमोत्तम कॉलेजेस आणि त्यांतील प्राध्यापक - मॅनेजमेंट - विद्यार्थ्यांवर अन्याय करणारं ठरेल. परंतु कितीतरी गोष्टी कॉलेजेसच्या आवाक्याबाहेरच्या असतात. कोणत्या प्रकारचे विद्यार्थी अॅडमिशन घेतील, कोणत्या प्रकारचे प्रोफेसर्स

३+
Read 15 tweets
28 Aug
"दर वर्षी M ग्रेनेड लॉन्चर्स आणि ४ लाख राउंड्स पुरवण्यासाठी आम्हाला ८ कोटी रूपये हवेत. "बसंता" ही डील करून देणार आहे."
===

"कॉम्रेड किसन आणि इतर काही कॉम्रेड्स नी मोदी राज संपवण्याचा एक प्लॅन सुचवला आहे. राजीव गांधी प्रकारच्या घटनेद्वारे."
===

#MaoistAgainstConstitution

१+
"आम्ही नेपाळच्या "सप्लायर्स" च्या संपर्कात आहोत. आपले मणिपूरचे कॉम्रेड ह्यात मदत करू शकतील. पण फक्त "VV" लाच त्यांच्याशी संपर्क करण्याची ऑथॉरिटी आहे. आपण आपलं काम जलद गतीने करायला हवं आणि सर्व सामुग्री ऑन ग्राऊंड आणायला हवी. ---

#MaoistAgainstConstitution

२+
...आपण वेगवेगळ्या राज्यांत डझन डझन कॉम्रेड्स ना एनकॉउंटर मधून गमावत आहोत. आणि हे वाढतच जाणार आहे. सुरेंद्र आणि VV, दोघांनाही असं वाटतं की शत्रूच्या फोर्सेसवर जोरदार आक्रमण करण्याची तातडीची गरज आहे. जे आपण २०१३ च्या दरभा हल्ल्यानंतर कधीच करू शकलो -

#MaoistAgainstConstitution

३+
Read 19 tweets
24 Aug
आपल्या जगात सर्वात वाईट काय आहे, सर्वात मोठी फसवणूक कोणती आहे - असं कुणी विचारलं तर मी म्हणेन - चांगलं विरुद्ध वाईटाची लढाई वास्तवात जशी लढली जाते तशी बहुतांश गोष्टी, काव्य, चित्रपटांतून कधीच दाखवली जात नाही - ही सर्वात वाईट, सर्वाधिक फसवणारी गोष्ट आहे.

१+
कहाण्यांमध्ये चांगल्याचे योद्धे १००% चांगले, संतवृत्तीचे, सोज्वळ, सात्विक असतात. देवमाणसं. वास्तवात तसं शक्य आहे का? कधीच नाही.

अनेकांना सुपरहिरो चित्रपटांबद्दल "लहान मुलांचे चित्रपट काय पहायचे?" असं वाटतं - कारण त्यांना हे माहित नसतं की सुपरहिरो मूव्हीजमध्ये हे गहिरे ग्रे

२+
शेड्स फार चांगल्याप्रकारे दाखवल्या जातात.

"भक्ती" हा शब्द फिका पडावा अश्या लेव्हलचे इन्सेन चाहते बॅटमॅन या पात्राने कमावलेत जगभरात - ते फक्त याच क्रूर वास्तवाची भेदक जाणीव बॅटमॅन करून देतो म्हणून.

मी खून करणार नाही - या एका एथिकल मोरालिटी वर उभं असलेलं हे पात्र -

३+
Read 12 tweets
23 Aug
The Social Network नावाचा चित्रपट बघितला नाहीये असे फार कमी लोक असावेत. फेसबुकच्या जन्माची कथा आहे ही. मार्क ला ही कल्पना हार्वर्डचे ३ कूल डुड सांगतात. आपला गडी त्यांना गंडवतो आणि स्वतःच फेसबुक बनवून टाकतो. मार्कचा श्रीमंत मित्र एडवार्डो ह्या उचपतीत पैसे पुरवतो, अशी स्टोरी.

१+
ह्या चित्रपटात अनेक इन्साईटफूल प्रसंग पेरले आहेत. एकाहून एक सरस. आंत्रप्रेन्युअरला शिकायला मिळेल, संभाव्य चुका टाळता येतील असं बरंच काही आहे त्यात. सर्वात महत्वाचं म्हणजे, तुम्हाला स्वतःचा बिझनेस करायचा असो नसो - बिझनेस सुरु करायचा म्हणजे काय - हे छोट्या छोट्या गोष्टींमधून

२+
शिकण्यासारखं आहे यात.

मला सर्वात जास्त आवडणारा प्रसंग आहे - शॉन पार्कर आणि मार्क + एडवार्डो भेटीचा.

नॅप्स्टर नावाची अमेझिंग म्युजिक फाईल शेअरिंग वेबसाईट बनवणारा शॉन आता दिवाळखोर झालाय, पण स्टार्ट अप वर्तुळातील रॉकस्टार आहे. तो फेसबुकच्या प्रेमात पडतो आणि मार्क + एडवार्डो

३+
Read 13 tweets
21 Aug
दाभोलकरांच्या स्मृतिदिनी अविवेकाची काजळी पसरवणारा कालचा दिवस आणि बुद्धीच्या दैवताच्या आवाहनाचा उद्याचा दिवस...या दोन्हीत अडकलेला आजचा दिवस...

स्युडोसेक्युलर लबाड आणि टोकाचे हिंदुत्ववादी यात अडकलेल्या सामान्य हिंदू माणसाची अवस्था अगदी अशीच आहे.

१+
नरेंद्र दाभोलकरांचे विचार, त्यांचं कार्य आणि स्मशानात मटणाची पार्टी करणारी अंनिस यांचा काहीही संबंध उरलेला नाही. पण हे माहित असूनही दाभोलकरांवर शिंतोडे उडवणारे लोक बघून वाईट वाटलं.

दाभोलकरांचे विचार आणि त्यांच्या कृतीची दिशा काय होती यावर व्यवस्थित प्रकाश टाकणारं

२+
त्यांचं स्वतःचं लेखन भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. त्यांनी कधीही हिंदू धर्माची निंदा नालत्सी केली नाही. त्यांचा संपूर्ण रोख फक्त समाजात धर्माच्या नावाखाली रुजलेल्या अनिष्ट प्रथा संपवण्याकडे होता.

दाभोलकर "फक्त हिंदू धर्मावरच घसरतात" ही टीका चुकीच्या गृहितकावर आधारित आहे.

३+
Read 20 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!