आज उमाबाई यांचा २६३ वा स्मृतिदिन.. त्या बद्दल त्यांच्या विषयीची एक गौरवशाली आठवण ..
१७३२ साली अहमदाबादवर झोरावर खान नावाचा मुघल सरदार चालून आला.त्याच्या परिपत्याची जबाबदारी श्रीमंत उमाबाई साहेब यांच्यावर देण्यात आली .
1/n
सरसेनापती उमाबाई आपल्यावर चालून आलेल्या बघून झोरावर खान याने त्यांना पत्र पाठवले " तू एक विधवा आहेस. तुला लहान मुले आहेत . आम्ही तुला हरवले तर तुझ्या मुलांचा सांभाळ कोण करणार ? आमच्या वाटेल जाऊ नकोस आणि आली तशी बोऱ्या बोलाने परत जा,"
2/n
हे ऐकून उमाबाई संतापल्या .त्यांनी ठरवले कि झोरावर ला उत्तर हे त्याच्या विरुद्ध लढाई करूनच द्यायचे. अहमदाबाद च्या किल्या बाहेर युद्ध सुरु झाले . पंधरा शुभ्र पेहराव परिधान केलेल्या उमाबाई प्रचंड सैन्याच्या गदारोळात मध्यभागी हत्तीवर बसून लढत होत्या ..
3/n
झोरावरच्या अफाट सैन्याचा त्यांनी मावळ्यांच्या सहकार्याने प्रचंड धुवा उडवला. उमाबाईंचा आणि त्यांच्या मराठा सैन्याचा आवेश बघून झोरावर खान किल्याच्या आता लपून बसला. किल्याचे दरवाजे आतुन बंद केले गेले . आता उमाबाईंना आता कसे शिरायचे याचा प्रश्न पडला.
4/n
तेव्हा त्यांनी शत्रूच्या मृतदेहाचे ढीग रचून ,दरवाज्याला लावून पेटवून दिले. दरवाजा पडला आणि मराठा सैन्य आता शिरले त्यांनी झोरावर ला पकडून जेरबंद केले आणि त्याला साताऱ्याला आणले व त्या तळेगावी परतल्या.
5/n
अहमदाबादेतील उमाबाईंच्या साहसावर खुश होऊन छत्रपती शाहू महाराज हे त्यांचा गौरव करण्यासाठी तळेगाव ला गेले. छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना पंधरा शालू, पांढरी शाल , दाणेदार सोन्याच्या पाटल्या आणि खास तयार केलेले सोन्याचे तोडे सन्मानाने दिले.
6/n
लहानपणी सोन्याचे तोडे घालण्याचे उमाबाई यांचे स्वप्न पूर्ण झाले ..
त्या वेळेपासून वंशपरंपरेने तळेगाव च्या सेनापती घराण्याला पायात सोन्याचे तोडे घालण्याचा मान मिळाला .एक विधवा स्त्री हत्तीवर बसून आपल्या काही मावळ्यांसह मुघलांच्या प्रेतांचा ढीग रचून किल्याचा दरवाजा पेटवून देते
7/n
हि कल्पनाच अंगावर शहारे आणणारी आहेय..हि कहाणी नककीच एक गौरवशाली आणि आजच्या महिलांना प्रेरणा देणारी आहे . शनिवारवाड्या नजिक ओंकारेश्वरा जवळ नडगेमोडी येथे त्या राहत असताना त्यांचे २८ नोव्हेंबर १७५३ मध्ये निधन झाले.
8/n
हिंदवी स्वराज्याच्या पहिल्या महिला मराठा सरसेनापती उमाबाईसाहेब खंडेराव दाभाडे सरकार यांच्या २६७ व्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन... 🙏🙏🙏🚩🚩🚩
काल बंदासिंग बहादुर यांची ३५० वी जयंती होती.. त्यानिमित्त त्यांच्या विषयी थोडी माहिती ..
1. बंदासिंग बहादुर यांचे मुळ नाव लछमन देव(माधव दास) होते त्यांचा जन्म हा जम्मू मधे १६ ऑक्टोबर १६७० साली झाला. 2. एका शिकार झालेल्या हरणाला बघुन त्यांचे हृदय पिळवटून निघाले.
१/
3. त्यांनी वयाच्या 15 व्या वर्षी घर सोडले आणि वैरागी बनण्याचे ठरवले. 4. एकदा नांदेड मधे असताना त्यांची गुरु गोविंद सिंग यांच्यासोबत भेट झाली. तेव्हा गुरूंनी त्यांना तुम्ही एक शीख योद्धे आहात आणि तुमचा जन्म हा मुघल राजवटी विरुद्ध लढण्यासाठी झाला आहे याची जाणीव करून दिली .
२/
5. त्या नंतर गुरू गोविंद सिंग यांच्या आदेशानुसार त्यांना त्यांच्या फौजेचा सेनापती बनवून पंजाब ला पाचारण करण्यात आले. 6. तसेच पंजाब मधे नवाब वजीर खान याच्या नेतृत्वात जो काही छळ मुघल करत होते तो संपवण्यासाठी आणि त्यांना शिक्षा करण्यासाठी बहादूर यांना नेमले.
या घटनेवर बऱ्याच जणांनी आपली वेग वेगळ्या प्रकारे मत व्यक्त केली आहेत. माझा सुद्धा एक छोटासा प्रयत्न आहे या गोष्टीवर जरा एक वेगळ मत मांडण्याचा.
थोडा मोठा थ्रेड आहे पण कृपया पूर्ण वाचावा. कृपया थ्रेड पूर्ण वाचल्यावर आपली प्रतिक्रिया कळवावी
1/n
१९ सप्टेंबरला हाथरस मधे अत्यंत घृणास्पद समाजाला काळिमा फासणारी घटना घडली. आणि कालच त्या पीडितेचा दुर्दैवी मृत्यू झाला. नेहमीप्रमाणे लोकांनी या घटनेवर आवाज उठवले आणि तिच्यासाठी न्यायाची मागणी केली. पीडितेला न्याय जरूर मिळेल म्हणजे मिळालाच पाहिजे .
2/n
त्या साठी सरकारने हैदराबाद पॅटर्न वापरला तरी लोक त्याचे स्वागतच करतील. पण आपण जरा खोलात जाऊन याच्यावर विचार केला का ? कि ह्या घटना सारख्या का घडत आहेत.माझ्या मते तरी आपण ह्या गोष्टीला पॉर्न (पोर्नोग्राफिक कन्टेन्ट) ला कमी अधिक प्रमाणात जवाबदार धरू शकतो.
3/n
नुकत्याच पार पडलेल्या #पितृपक्षा_निमित्त...
ताजमहाल बांधणाऱ्या शाहजांहाला त्याचा मुलगा औरंगजेब याने जवळपास ७ वर्ष ताजमहाल समोरच कारागृहात बंदी करून ठेवले. त्याला एका अर्ध फुटलेल्या माटामध्ये पाणी दिले जायचे. कारण शहजान पाण्याला सुद्धा तडपला पाहिजे.
असे अनेक अत्याचार स्वतःच्या मुला कडून सोसावे लागणाऱ्या शाहजहानने औरंगजेबाला एक शेवटचे पत्र लिहले, त्यात तो शेवटी लिहतो...
"ऐ पिसर तू अजब मुसलमानी,
ब पिदरे जिंदा आब तरसानी,
आफरीन बाद हिंदवान सद बार,
मैं देहदं पिदरे मुर्दारावा दायम आब
अर्थात :-
हे माझ्या मुला! तू पण विचित्र मुसलमान आहेस जो की आपल्या जिवंत पित्याला पाण्यासाठी सुद्धा तरसवतो आहेस. खरचं शंभर वेळा प्रशंसा करावी त्या हिंदूंची जे आपल्या मृत पूर्वजांना सुद्धा अन्न-पाणी देतात!
सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातवरण वेग वेगळ्या घटनांनी ढवळून निघालय..मग ते सुशांत-रिया चे प्रकरण आसुदे नहितर कंगना रानावत चे प्रकरण आसुदे. पण तस बघता महाराष्ट्रातील राजकारण आणि हिंदी-मराठी सिने सृष्टी हे फार आधीपासून एक मेकंशी निगडित आहेत. १/६
ह्याची पहिली सुरवात ही ८०-९० च्या दशकात मराठी चित्रपट सोंगाट्या च्या प्रदर्शनावरून झाली. तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी कोहिनूर थिएटर कं. वर अंदोलन करुन सोंगड्या चित्रपट प्रदर्शित करवून घेतला. या घटनेनंतर सिने कलाकार आणि राजकीय नेते यांच्यामधे एक वेगळ्याच नात्याची सुरवात झाली. २/६
मग त्यामधे बोफोर्स घोटाळा आणि अमिताभ बच्चन यांचे प्रकरण आणि मग त्या प्रकरणातून त्यांना बाहेर काढण्यासाठी बाळासहेबांनी केलेली मदत असुदे, किंवा १९९३ चे संजय दत्त चे मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण असुदे. आणि फार फार तर आत्ताचे काही नवीन मराठी चित्रपट असुदे. ३/६
ही ३४७ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्याच नव्हे, तर सबंध हिंदुस्थानच्या इतिहासातील ही एक रोमहर्षक आणि तितकीच महत्त्वाची घटना आहे. अशी घटना की जिने हिंदुस्थानच्या इतिहासालाच वळण लावले.
मोगल पातशहाच्या राजधानीतून, त्याच्या कैदेतून आजवर कोणी सहीसलामत निसटले नव्हते.पण शिवाजी महाराजांनी ते करून दाखविले.
आणि असे केले, की पुढे आयुष्यभर औरंगजेब बादशहा त्या एका घटनेबद्दल स्वतःला कोसत राहिला. पश्चात्ताप करीत राहिला.
ती तारीख होती – १७ ऑगस्ट १६६६.
शके १५८८ पराभव संवत्सरे, ज्येष्ठ शुद्ध द्वितीया राजश्री शिवाजी राजे आगरिया जाऊन औरंगजेबाची भेट घेतली. बिघाड होऊन राजश्रीस चौकिया दिल्या. श्रावण वद्य द्वादशी आगरियातून पेटारियात बैसोन पळाले. यावरी राजश्री संभाजी राजेसह वर्तमान मार्गशीर्ष शुद्ध पंचमीस रायगडास आले.
- जेधे शकावली.
आज १५ ऑगस्ट. भारताचा ७४ व्वा स्वातंत्र्य दिवस. पण आपण खर्या अर्थाने स्वतंत्र आहोत का? दुर्दैवाने भारताची फाळणी झाली आणि या फाळणीचे दुष्परिणाम आज आपण आजुन पण भोगत आहोत. काश्मीर आणि आकसाई चीन च्या संदर्भात.भारत भूमीची अखंडता जोपर्यंत पूर्ण होत नाही तो पर्यंत हे स्वातंत्र्य ..1/n
अपुर्ण मानले जाईल. योगी श्री अरविंद यांचे एक विधान यानिमित्ताने सांगावेसे वाटते ते अस म्हणतात की भारत हे एक अखंड राष्ट्र आहे आणि ते कधी खंडित करता येणार नाही. पण आपण खरच या मार्गाने मार्गक्रमण करून खंडित भारत अखंडित करू शकतो का? तर हो नक्कीच .
(2/n).
करण ज्या मार्गाने सध्याचा आधुनिक भारताची घौडदौड चालु आहे ते पाहता आपण लवकरच पाकव्याप्त काश्मीर स्वतंत्र भारताच्या अधिपत्याखाली आणु. आणि तसेच बलुचिस्तान आज फुटतो आहे का उद्या अस चित्रं सध्या पाकिस्तान मध्ये निर्माण झालय . ह्यामुळेच आपण योग्य मार्गावर आहोत हे यातून दिसते. (3/n)