अर्जुनाचे वर्णन करतांना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात"तुझेनि नामे अपयशीं । दिशा लंघिजे ॥
तू शूरवृत्तीचा ठावो । क्षत्रियांमाजीं रावो ।
तुझिया लाठेपणाचा आवो । तिहीं लोकीं।।"
साक्षात परमेश्वराने ज्याचे सारथ्य केले, कृष्णाचा सखा, पितामह भीष्मांचा लाडका, द्रोणाचार्यांचा शिष्योत्तम, +
वेदव्यास ज्याला नारोत्तम म्हणतात अशा अर्जुना बद्दल थोडक्यात जाणून घेऊ.
कुंतीपुत्रांमध्ये सगळ्यात लहान, कर्तृत्वात श्रेष्ठ , इंद्राचा अंश. अर्जुन अतिशय कोमल हृदयाचा, संयमी आणि शांत स्वभावाचा होता. बालपण अरण्यात त्यानंतर अनोळखी आणि कपटी कौरवांच्या सोबत काढल्यानंतर गुरूगृही +
शिष्योत्तम म्हणून अर्जुनाने स्थान मिळवले. त्यात त्याची जिद्द, मेहनत, शिकण्याचा ध्यास, स्थिरचित्त हे गुण दिसतात. अर्जुनाच्या संयमी आणि विवेक बुद्धी मुळे, तो गैरवापर करणार नाही ह्याची खात्री पटल्यावर द्रोणाचार्यांनी त्याला दिव्यास्त्रे शिकवली. +
द्रुपदाने दुर्योधन, कर्ण ह्यांचा प्रभाव केला होता.
द्रोणाचार्यांना हवी असलेली गुरुदक्षिणा भीम आणि अर्जुनाच्या पराक्रमामुळे पांडव त्यांना देऊ शकले. अनुभवी आणि युद्धनिपुण द्रुपदला आणि त्याच्या विशाल सैन्याला त्यांनी सहज पराभूत केले.
द्रौपदी स्वयंवर प्रसंगी हे लक्षात घेतलं +
पाहिजे की पांडव तेव्हा संन्यासी म्हणून अनेक वर्षे वेषांतर करून राहत. अर्थातच अर्जुनला धनुष्याचा नित्य सराव अशक्य होता. तरीही तो अवघड पण त्याने जिंकला, ह्यात त्याचे कौशल्य दिसते.
देवांनाही अजिंक्य असलेले निवातकवच आणि कालकंज दानव अर्जुनाने एकट्यानेच युद्धात ठार केले होते. +
घोषयात्रा प्रसंगी चित्ररथ गंधर्वाने दुर्योधन, कर्ण, आणि त्यांच्या सेनेचा पूर्ण पराभव केला. तेव्हा भीमअर्जुन त्यांच्या मदतीला धावून गेले आणि दुर्योधनाला गंधर्वांच्या तावडीतून सोडवले.
गंधर्वाने अर्जुनाच्या पराक्रमावर प्रसन्न होऊन त्याला दिव्य रथ, अश्व, चाक्षुषी विद्या दिली होती +
उर्वशी अप्सरेने अर्जुनाला मागणी घातली ती त्याने विनम्रपणे नाकारली. उर्वशी ही मातेसमान असून आपल्याला वंदनीय आहे हेच त्याने इंद्राला सांगितले. उर्वशीने त्याला शाप देऊनही अर्जुन त्याच्या निर्णयावरून ढळला नाही.
तोडीसतोड युद्ध करून त्यांना प्रसन्न करून घेत, महादेवाकडून पशुपतास्त्र प्राप्त करून घेतले.
विराट राजाने उत्तरेचा विवाह अर्जुनाशी व्हावा म्हणून पांडवांना गळ घातली. पण उत्तरा ही अर्जुनाची शिष्य होती, त्या मुळे त्याने हे म्हणणे अमान्य केले, आणि तिचा अभिमन्यूशी विवाह करून दिला. +
विराट युद्ध प्रसंगी भीष्म, द्रोणाचार्य, दुर्योधन, कर्ण, अश्वत्थामा आणि त्यांचे सैन्य ह्या सगळ्यांचा पराभव अर्जुनाने केला
भीष्म शरपंजिरी असता, त्यांनी अर्जुनाला बोलवून जमिनीत बाण मारून पाणी काढून त्यांची तहान भागविण्यास सांगितले. हे केवळ अर्जुनच करू शकतो हे त्यांना माहीत होते. +
प्रत्यक्ष भगवंत ज्याचा सखा, त्याला प्रेयस मागणे काय अवघड होते? पण अर्जुनाने श्रीकृष्णाकडे श्रेयस दान मागितले.
इंद्रियजित, विनम्र, विवेकशील, पराक्रमी पण कोमल हृदयी असा अर्जुन श्रीकृष्णाचा सखा होण्यास पूर्ण पात्र होता. +
म्हणूनच गीतेत श्रीकृष्ण म्हणतात, "वृष्णीनां वासुदेवोऽस्मि पाण्डवानां धनंजयः"
.. आणि गीतेचा शेवटचा श्लोक ह्या सगळ्यांचे सार आहे, ।यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः। तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम।।
+
जिथे योगेश्वर श्रीकृष्ण आहे, जिथे धनुर्धारी पार्थ आहे (अर्जुनासारखा महापराक्रमी, विनयशील, विवेकशील, संयमी, आज्ञाधारक वृत्ती असलेला) तिथे श्री, विजय, विभूती, अचलनीती असते.
Remembering women from our glorious past this Navratri ...
Savarkars
The freedom struggle of the Savarkar brothers — Ganesh Savarkar, Vinayak Savarkar & Narayan Savarkar is often spoken about. But the sacrifices & struggles of their wives — Yashodabai, +
Yamunabai & Shantabai Savarkar respectively, on personal, social & freedom fronts, are not known much.
These three ladies, in spite of having to suffer the anguish of separation from their husbands, starvation & hunger, carried on their husbands’ struggles for freedom. +
They knew that their husbands had taken up the oath to serve the country. They handled the family, supported each other and played their part in the battle for freedom.
Wasn't it easy for these 3 women to just leave everything & live a comfortable life by shifting to their +
प्रदीप दळवी यांच्या एका प्रसिद्ध नाटकात सावरकरांचं वर्णन करतांना ते म्हणतात, ‘सूर्याची उबदार प्रखरता, वाऱ्याचा वेग, खडकानंही हेवा करावा अशी कठोरता आणि साक्षात बृहस्पतीनंही शिष्यत्व पत्करावं इतकी विचारांची प्रगल्भता या साऱ्यांनी धारण केलेले मानवी अवतार म्हणजेच तात्याराव सावरकर!’
सावरकर बंधूंच्या मागे त्यांच्या गृहलक्ष्मी किती खंबीरपणे उभ्या होत्या, त्यांचे देशप्रेम, कष्ट आणि बलिदानाची थोडक्यात माहिती घेऊ.
सरस्वती बाबाराव सावरकर (येसुवहिनी):
तात्यारावांच्या बालपणीच त्यांची आई वारली. त्यांच्या आईची जागा येसूवहिनींनी घेतली. खरंतर त्या तेव्हा केवळ 13
वर्षांच्या होत्या. येसुवहिनींना बाबारावांनी शिक्षणाची दारे उघडून दिली. आपल्या दोघ धाकट्या दिरांच्या शिक्षणासाठी पैसे उभे करायला म्हणून लहानग्या येसुवहिनींनी आपले दागिने गहाण ठेवले. आईची उणीव त्यांनी दोघं दिरांना आणि नणंदेला कधीही होऊ दिली नाही. त्यांचा घरात क्रांतिकारकांच्या
पर्वा महालक्ष्मीचे आगमन होणार.. त्या निमित्ताने घरातल्या लक्ष्मी बद्दल थोडेसे..
पर्वा कॅलेंडर बघताना लक्षात आलं, ह्या वर्षीअधिक मास आहे. त्या अनुषंगाने जावयाला दिलं जाणारं वाण आठवलं, आणि आजीची लगबग आठवली. 33 अनारसे, वाण, शाही पंगत, असा सगळा थाट. जसं जसं वय वाढत गेलं, ह्या
गोष्टीतला फोल पणा खटकायला लागला. जावईच का? सुनेला का नाही? म्हणजे जावयाला वाण, साग्रसंगीत जेवण, ह्या बद्दल काहीच म्हणणं नाही, खुशाल करा. पण त्यातलं 1% तरी कोडकौतुक आपल्या घरातल्या सुनेचं करायला काय हरकत आहे?
म्हणजे असं बघा, तुमची सून तुमच्या घरासाठी, तिथल्या लोकांसाठी, आपलं घर,
आपलं नाव, आई वडील, तिथल्या चालीरीती, ती ज्या वातावरणात वाढलीये ते सगळं सोडून आलीये न? ती नवऱ्याच्या घराला 'घर' बनवते, सासू-सासर्यांच्या चालीरीती, तिथलं वातावरण, तिथल्या पद्धती, नातलग, त्यांची ये-जा, त्यांचे मानपान सांभाळणे, सासू-सासर्यांची आजारपणं, सगळं मनापासून करते. इतकंच नाही,
#tweet4bharat #लैंगिकसमानता
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः।
यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रिया:।।
मनुस्मृती (3-56)
जेथे स्त्रियांची पूजा होते/मान दिला जातो,तेथे देवता आनंदाने राहतात. जेथे त्यांचा मान राखला जात नाही तेथे सर्व कार्ये निष्फळ होतात.
पुत्रेणदुहितासमा
पुत्र, पुत्री हे समान आहेत
प्राचीन काळी स्त्री/पुरूष ह्यांचे सामाजिक स्थान समानतेचे होते. शिक्षण, राजकारण, युद्धशास्त्र, स्वतःचा वर स्वतः निवडणे, पौरोहित्य, संन्यास, अश्या अनेक बाबतीत स्त्रियांना समान अधिकार होते.
आपण सरस्वतीला विद्येची देवता, पार्वतीला शक्तीची
आणि लक्ष्मीला धनसंपदेची देवता मानतो.
मैत्रेयी, गार्गी, कात्यायनी ह्या प्राचीन काळातील विदुषी. कैकयी ने राजनीती, युद्धनीतीचे शिक्षण घेतले होते. आद्य शंकराचार्य - मंडन मिश्रा वादविवादात परीक्षक विदुषी भारती होत्या. संत मुक्ताबाई, जनाबाई या अध्यात्मिक उन्नतीसाठी प्रसिद्ध आहेत.
प्रभू श्रीराम हे आपल्या सगळ्यांचे आराध्य. त्यांच्या आयुष्याची भव्यता दाखवावी, एवढी आपली पात्रता नाही.
पण हिंदूंच्या अनेक वर्षांच्या संघर्ष, बलिदान आणि प्रतिक्षेचे फळ आपल्या सगळ्यांना येत्या 5 तारखेला बघायला मिळणार आहे..श्रीराम जन्मभूमी येथे श्रीराममंदिर निर्माण...
Bharat has suffered 800+ yrs of Khilji, Ghori, Lodhi, Gazhani, Mughal invasions one after other. Next British, Portuguese & others ruled us for around 200 yrs. Each time we had invasions, our monuments, scriptures, valuables & most importantly our culture were destroyed.
Vedas, Ramayan & Mahabharat were worst hit by distortion of facts.
But, we can still link geographical mentions found in Ramayan into modern times
No other nation & no other religion in the world, has such an ancient history, supported by evidences of architecture,
natural structures & literature.
let us see some of those very briefly ..
1. 73 ancestors of Lord Ram has been mentioned along with details of their life story, in Ramayan. Had it been only a poem it would not had these details.