कित्येकांना आधार देणारे #भैय्युजी महाराज आपलं जीवन आपल्या हातानं संपवतात.
पॉझिटिव्ह विचार देणारा चित्रपट करुनही #सुशांत सिंग राजपुतनं आत्महत्या केली नैराश्यातुन
आणि आता सहा आठ महिन्यापूर्वी नैराश्याशी लढा कसा द्यायचा हे शिकवणाऱ्या #शीतल_आमटे_करजगी आपलं जीवन संपवतात. 👇👇👇👇
ही झाली सेलिब्रिटींची उदाहरणं
यातुन काय शिकायचं आपण?
पाण्यात शांतपणे पोहोणारं बदक वरुन शांत दिसत असलं तरी पाण्याखाली त्याचे पाय वेगानं हलत असतात वर शांत पोहोतोय हे दाखवण्यासाठी फक्त. त्याचे कष्ट त्यालाच माहित असतात.
माणूस वरवर दिसतो तितका खंबीर असेलच असं नाही.👇👇👇👇
मनात वेगळी खळबळ असु शकते त्याच्या जी आपल्यापर्यंत पोहोचत नसते,त्या आनंदी,सुखी चेहऱ्याच्या आड लपवण्याचा प्रयत्न करत असतो
शेवटी काय ❔
वर सुंदर #ताजमहाल असला तरी खाली पायात #कबरच आहे हे विसरुन चालत नाही.#मुखवट्या आडचा चेहरा वाचता यायला हवा
मनाच्या गाभाऱ्याचा वेध घेणारा दोस्त हवा..
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
मला आवडलेलीअप्रतिम कविता
कोण खरे वारसदार..?
दंगलकार नितीन चंदनशिवे
रायगडावरून राजे म्हणाले
मी स्वराज्याला जन्म दिला
चवदार तळ्याच्या पाण्यातून
बाबासाहेब म्हणाले
मी संविधानाला जन्म दिला
कोल्हापूरच्या मातीतून राजश्री शाहू म्हणाले
मी माणुसकीला जन्म दिला
तिघेही सोबत ओरडले👇👇
अरे आम्ही आमचा जन्म
इथल्या मातीसाठी खर्च केला..
तिघांच्याही आवाजात
वेदना होती,माया होती,ममता होती
तिघांनी हातात हात घेतले
आणि थेट भिडेवाड्यावर गेले
महात्मा फुलेंनी तिघांना मिठी मारली
तीन भाऊ एकत्र पाहून
सावित्रीचं काळीज भरून आलं
हे महापुरुष एकत्र आल्याची
बातमी मला कळली
👇👇👇
आणि मी त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी
धावत पळत भिडेवाड्यावर गेलो
मी राजेंना जय भवानी म्हणलं
बाबासाहेबांना जय भिम केला
शाहू महाराजांना नमस्कार केला
महात्मा फुलेंना वंदन केले
मी सर्वांच्यासोबत एक हळूच
सेल्फी घेतला
सर्वांनी मला जवळ घेतलं
कुणीच जात विचारली नाही
👇👇👇👇
एक निवेदन-
गडचिरोलीत डॉ.अभय बंग यांनी दारुमुळे गरीब आदिवासी कुटुंबं उद्ध्वस्त होतील .त्यामुळे येथील दारुबंदी उठवू नये यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना सरकारला पत्रे पाठवावी असे आवाहन केले आहे.मलाही मनापासून वाटते की सरकारने सरसकट दारुबंदी केली पाहिजे कारण #दारुबंदी👇
कारण मुलींच्यावर अत्याचार दारुमुळे केले गेले आहेत.या घटना दिवसेंदिवस वाढतहेत.खून,मारामाऱ्या,चोरी,दरोडे घालणारे अट्टल दारुडेच असतात हे संशोधनाने सिद्ध झाले आहे.डॉ.अभय बंग यांनी सर्वेक्षणाद्वारे सिद्ध करुन दारुचे दुष्परिणाम दाखवून दिले आहेत.म्हणून दारुबंदी झाली पाहिजे #दारुबंदी👇
जेव्हा इंग्रज सरकारने आपल्या देशात शाळा सुरु करण्यासाठी महसूल चांगला मिळतो म्हणून दारुची दुकानं सुरु करण्याचा निर्णय घेतला गेला तेव्हा त्यावेळच्या समाजसुधारकांनी दारुच्या पैशातून मिळणारे असे शिक्षण आम्हाला नको शाळा काढू नका असे सांगितले होते म्हणूनच दारुबंदी झाली पाहिजे #दारुबंदी
ही त्या 3 फूट मुलीची कहाणी आहे जी समाजाचे टोमणे खाऊन आयएएस अधिकारी झाली.
आपल्याकडे समाजात असे बरेच वर्ग आहेत जे मुलींना कमकुवत मानतात आणि शारीरिकरित्या अपंग राहिल्यास त्यांना तिरस्काराने पाहण्यास सुरुवात करतात.मी तुम्हाला अशाच एका मुलीची कहाणी👇
सांगणार आहे, जिने शारीरिक आव्हान असताना समाजातील टोमणे खाल्ले, पचवले आणि एक दिवस इतकी मोठी झाली की तिने सर्वांचे तोंड बंद केले. आज त्यांची राजस्थानात अजमेरचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.
समाजाचं टोमणे खाऊन आयएएस अधिकारी बनलेल्या आरती डोगरा आज राजस्थान केडरची आयएएस अधिकारी आहे.आरती जरी शरीराने लहान असू शकते परंतु आज ती देशभरातील महिला आयएएसच्या प्रशासकीय वर्गामध्ये एक उदाहरण म्हणून उदयासआली आहे
आरती मूळची उत्तराखंडची त्यांचा जन्म उत्तराखंडच्या देहराडून येथे झाला
'शिवाजी कोण होता?' या पुस्तकातून ज्या प्रकारची शिवाजी महाराजांची ओळख समोर येते ती अनेकांच्या हितसंबंधांना बाधा आणणारी ठरते. शिवाय या पुस्तकात पुराव्यासाठी 👇🚩
वेगवेगळे संदर्भ दिले असल्याने प्रतिवाद करता येत नाही. त्यामुळे या पुस्तकाच्या नावावर आक्षेप घेत शिवाजी महाराजांसाठी एकेरी संबोधन का वापरले असा युक्तिवाद केला जातो.
मराठी भाषेचा विचार करता एकेरी संबोधन अतिशय जवळच्या व्यक्तीसाठी जसे प्रेमाने वापरले जाते तसेच शत्रू 👇🚩
व्यक्तीसाठी उद्धटपणे ही वापरले जाते. बोलण्याच्या आघातावरून त्यामागे प्रेमभावना आहे की उद्धटपणा आहे हे समजते.मात्र भाषण-संभाषणाची भाषा आणि लेखनाची भाषा यात फरक असतो. तसेच लेखनाच्या वेगवेगळ्या प्रकारांसाठी भाषेचे वेगवेगळे व्याकरणाचे नियम असतात. निबंध लेखन, पत्र लेखन, संवाद लेखन👇🚩
■कुठल्याही कोंबड्या बकऱ्याचा बळी न देता स्वतःची करंगळी कापून शंकराच्या मंदीरात रक्ताचा अभिषेक घालणारा एकमेव राजा
■शिवाजी महाराजांच्या गडाला कुठल्याही देवाचे नाव नाही गणपतीचे सुद्धा नाही
■शिवराय कुठेही लिंबूमिरच्या बांधत देव देवरशी करत बसले नाहीत👇👇
■ज्या मनुस्मृतीने समुद्र ओलांडू नये असे बंधन घातले होते त्यांच्याविरूद्ध शिवाजी महाराजांनी जाऊन समुद्रात आरमार उभारले
■गड जिंकल्यावर तिथे सत्यनारायण कधी घातला नाही
■अमावस्या अशूभ मानली जाते काही नकली लोकांच्या सांगण्यावरून आपण कुठलेही काम अमावस्याला सुरू करत नाही. 👇👇👇
पण महाराजांच्या लढाया या अमावस्येच्या रात्री व्हायच्या.कारण अंधाराचा फायदा घेऊन ते बहूतेक मोहिमा अमावस्येला घेत.गनिमी कावा पद्धतीने लढाया करायचे व जिंकायचे
■माँसाहेब जिजाऊ शहाजीराजेंच्या मृत्युनंतर सती गेल्या नाहीत.तर शहाजीराजेच्या जाण्याने जी मार्गदर्शनाची ऊणीव शिवरायांना 👇👇
विनायक दामोदर सावरकर यांना ‘वीर’ हे विशेषण १९२० मध्ये प्रथम लावण्यात आले. ‘भाला’कार भोपटकरांनी ते पहिल्यांदा वापरले. आणि ते रूढ झाले. अगदी आजसुद्धा त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणूनच ओळखले जाते.👇👇👇
परंतु सावरकरांच्या अस्सल कागदपत्रांच्या आधारे सावरकर हे ‘स्वातंत्र्यवीर’ नव्हे, तर ‘माफीवीर’ असल्याची मांडणी अभ्यासक करतात. 'द वीक' या देशातील जबाबदार नियतकालिकाने जानेवारी २०१६ मध्ये यासंदर्भातील माहिती पुढे आणली आहे. ती ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे मांडली आहे.आणि ती आजवर👇👇.
कुणीही खोडलेले नाही. केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार असताना २००३मध्ये संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सावरकरांचे तैलचित्र लावण्यात आले. महात्मा गांधींच्या तैलचित्राच्या अगदी समोर. भारतीय संसदेच्या इतिहासात काँग्रेस आणि इतर विरोधकांनी बहिष्कार घातलेला हा👇