थ्रेड - न्यायमूर्ती भालचंद्र बळवंतराव वराळे यांनी सांगितलेली एक आठवण..
एके दिवशी, पापांनी (ब.ह.वराळे) नवीन बंगल्यात (औरंगाबादला) राहण्यास आल्यानिमित्त बाबासाहेब, माईसाहेब आणि प्राचार्य चिटणीस यांना रात्रीच्या जेवणासाठी बोलावले. मधुमेहाचा_त्रास असल्यामुळे डाॅक्टरांनी
बाबासाहेबांना गोड पदार्थ खाण्यास वर्ज्य केले होते. आईने आम्हा सर्वांना छान गोडाधोडाचा स्वयंपाक केला. परंतु बाबासाहेबांसाठी मात्र मेथीची भाजी आणि ज्वारीची भाकरी असा साधा स्वयंपाक केला होता. सर्वांची जेवणे झाली. जरा वेळ गप्पा झाल्यानंतर बाबासाहेब, माईसाहेब आणि प्राचार्य चिटणीस परत
जाण्यासाठी निघाले आणि बंगल्याच्या बाहेर आले.
"काय रे, मी तुला माझ्या हातानी खीर करुन घातली आणि तुझ्या आईने मात्र मला भाजी-भाकरी खाऊ घातली?" बाबासाहेब मला चेष्टेने म्हणाले आणि सर्वजण खळखळून हसू लागले. मी मात्र मनातून हिरमुसलो. तिघेही निघून गेले. भावंडे आणि आई घरात गेली. मी तिथेच
उभा होतो. पापांच्या आधाराने बाबासाहेब हळूहळू त्यांच्या निवासाकडे चालले होते. सोबत माईसाहेबही होत्या. मी एकटाच अंधारात उभा राहून बाबासाहेबांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे एकटक पाहत होतो. हृदय भरून आले होते आणि माझे ओठ पुटपुटत होते, "हे मार्गदात्या, तुला जर मधुमेहासारख्या दुर्धर आजाराने
ग्रासलेले नसते तर आम्ही तुला चांदीच्या ताटात रोज पंचपक्वान्नांचे मिष्टान्न भक्तिभावाने खाऊ घातले असते. तू आपल्या समाजाला जागवण्यासाठी इतका कष्टलास, इतक्या खस्ता खाल्ल्यास, की उतारवयात तुझ्या शरीराला अनेक आजारांनी जर्जर करुन टाकलंय."
क्षणभर मनात आले, धावतच बाबासाहेबांकडे जावे.
त्यांच्या चरणांवर पडून उरातला कढ निवेपर्यंत अगदी मुसमुसून मनसोक्त रडावे. मी फक्त मनाने तसे करु शकलो. प्रत्यक्षात मात्र जागेवर घळघळ आसवे गाळत उभा होतो. बाबासाहेब अगदी नजरेआड होईपर्यंत!
- आठवणीतले बाबासाहेब
काळ्या करगोट्याच्या धाग्यात
ओवलेली तुझी प्रतिमा
माझ्याही मुलाने स्वतःच्या
गळ्यात बांधून घेतलीय
गड्या आता मला कशाचीच चिंता नाहीहे
कडिकाळाची आव्हानं स्वीकारून
कित्येक शतकांचा काळोख ओलांडून
तू घेऊन आलास आम्हाला सुरक्षित स्थळापर्यंत
आज आमचं जे काही आहे
ते सर्व तुझंच आहे
हे जगणं आणि मरणं
हे शब्द आणि ही जीभ
हे सुख आणि दुःख
हे स्वप्न आणि वास्तव
ही भूक आणि तहान
सर्व पुण्याई तुझीच आहे
तू बसला आहेस अंत:करणात अंकुरून
दंभदर्पलोभमत्सराच्या
कामक्रोधाच्या सर्व हीनवृत्ती गेल्या आहेत लोपून
तरीही हे करटे असे कृतघ्न का निघाले?
तू जाऊन चार दशकं झाली नाहीत तोच
त्यांनी बैंक टू पॅव्हेलियन केलं
पुन्हा जाणाई पुन्हा जोखाई
पुन्हा येताळावा पुन्हा मरिआई
पुन्हा तीच गदळ गू-घाण
पुन्हा तेच निकृष्ट कर्मकांड
विसाव्या शतकाचा अंत करून
एकविसाव्या शतकाकडे निघालो आहे मी
केवढी पडझड
प्रिय बाबासाहेब,
आपले अनंत उपकार व्यक्त करायला शब्द फुटत नाहीत कारण जे शब्द ओठावर येतील त्या शब्दांवर पण आपले उपकार आहेत.कारण हजारो वर्षांपासून मूके झालेली ,सर्व अधिकारापासून वंचित राहिलेली माणूस असून जनावरापेक्षा कठीण जीवन जगत असलेल्या तमाम शोषित पीडित गरीब असलेल्या समाजाला आपण
गुलामगिरीच्या गटारांमधून बाहेर काढून आपल्या मौलिक विचारांनी आणि कृतीने स्वच्छ करून धनसंपन्न केलं. आपण आपलं अख्ख आयुष्य कष्टपद जगलात स्वतःच्या जीवाची आरोग्याची पर्वा न करता आपल्या महापरिनिर्वाण पर्यंत अखंड संपूर्ण देशासाठी समाजासाठी झटत होतात. प्रतिकुल परिस्थितीमध्ये आपण अतिउच्च
दर्जाच्या पदव्या घेऊन संपूर्ण जीवन भारतीय समाजासाठी त्याचा उपयोग करून देशाला जगातील सर्वात मोठं संविधान दिल त्याबद्दल आपले उपकार कशानेही फेडले जाणार नाहीत. बाबासाहेब आपण अर्थशास्त्राचे गाढे व्यासंगी होते. कोलंबिया विद्यापीठात एम्.ए. साठी ’प्राचीन भारतीय व्यापार’ व पीएच.डी. साठी
मी (ब.ह.वराळे) ४ डिसेंबरला औरंगाबादला पोहचलो. ५ तारखेला मध्यंतरी एक दिवस गेला. ६ तारखेचा दिवसही उजाडला होता. नेहमीसारखाच तो दिवस वाटत होता. सकाळचे साडे-अकरा बारा वाजले होते. मी जेवायला बसलो होतो. इतक्यात काॅलेजहून निरोप आला. दिल्लीहून फोनने बातमी कळविण्यात आली होती. ५ तारखेच्या
रात्रीच बाबासाहेबांची ज्योत मालवली होती. मृत्यूची ही कल्पनाच करता येत नव्हती. त्यांचा मृत्यू अगदी आकस्मिक होता. या वेळेला माझ्या मनाची काय स्थिती झाली हे शब्दात सांगता येणार नाही. आजपर्यंत ज्या सूर्याच्या प्रकाशात मी माझा जीवनक्रम आक्रमित होतो. ज्या सूर्याच्या प्रभावाने मला
प्रकाशाचा_मार्ग मिळाला होता. तो सूर्यच आता कायमचा मावळला होता आणि अगदी निराधार पोरक्याप्रमाणे माझी अवस्था झाली. पण केवळ माझीच मन:स्थिती अशी झाली नव्हती तर सर्व दलित लोकांच्या दुःखाला सीमा नव्हत्या. बाबासाहेबांचे छत्र नाहीसे झाल्यामुळे दुःखाने सर्व जनता भारावली होती. आता ती पोरकी
थ्रेड,
डॉ .बाबासाहेब आंबेडकरांचे शव दर्शनाकरीता ठेवल्यानंतर आदरांजलीपर प्र.के. अत्रे यांनी भाषण केले ."अत्रे जेव्हा भाषणास उभे राहिले त्यावेळी लाखो लोकांच्या हृदयाचा बांध फुटला व ते मोठमोठ्याने हुंदके देऊ लागले. तिथे उपस्थित असलेले पोलिस अधिकारीही आपला शोकावेग.. #महापरिनिर्वाण
आवरू शकले नाहीत . आचार्य अत्रे म्हणाले."मराठी पत्रकार व लेखक यांच्या वतीने भारतातील एका महान विभूतीला मी आदरांजली अर्पण करण्यास उभा आहे .या महान नेत्याच्या मृत्यूने मृत्यूला मृत्यूचीच कीव वाटू लागली आहे .मरणानेच आज आपले हसू करून घेतले आहे .मृत्यूला काय दुसरी माणसे दिसली नाहीत ?
मग त्याने इतिहास निर्माण करणाऱ्या इतिहासाच्या या पर्वावरच का झडप घातली ?
महापुरुषांचे जीवन पाहू नये असे म्हणतात. पण त्यांचे मरण आपण पाहत आहोत. भारतात असा युगपुरुष शतकाशतकांत तरी होणार नाही.