Discover and read the best of Twitter Threads about #खऱ्या_स्वातंत्र्याचे_शिल्पकार

Most recents (10)

राजर्षी शाहू महाराज आणि लोकमान्य टिळक यांचे पराकोटीचे शत्रुत्व जगजाहीर होते मात्र दोघेही एकमेकांचे मोठेपण जाणून होते. त्यामुळे एकमेकांवर प्रखर टीका करताना दोघांनीही कधीच मर्यादा ओलांडली नाही. ना शाहू महाराज टिळकांना कधी 'समाजद्रोही' म्हणाले, 👇
ना लोकमान्य कधी शाहू महाराजांना 'स्वराज्यद्रोही' म्हणाले. परंतु ही नैतिक मर्यादा टिळकांच्या निधनानंतर त्यांच्या शिष्यांना पाळता आली नाही. केळकर, खापर्डे, भोपटकर इत्यादी टिळक अनुयायींनी शाहू महाराजांविरुद्धची विखारी चळवळ कायम धगधगती ठेवण्यासाठी अखंड प्रयत्न केले. 👇
शाहू महाराजांना लोकांच्या नजरेत बदनाम करण्याचे अनेक प्रयत्न केले, १८ मे १९२१ रोजी तासगावात झालेली 'कुलकर्णी परिषद' त्यापैकीच एक.
१७ मे रोजी 'केसरी'चे संपादक केळकर यांनी खास अंक काढून शाहू महाराज आणि ब्रिटिश अधिकारी यांच्यात संस्थानातील दहशतवादी कारवाया निपटून काढण्यासाठी 👇
Read 14 tweets
शाहू महाराज ब्राम्हणद्वेष्टे होते का?

उत्तर : अजिबात नाही. जातिभेदाविरुद्ध लढणारा व्यक्ती एखाद्या जातीचा द्वेष करू शकेल काय? नक्कीच नाही.

मग ब्राम्हण आणि ब्राह्मणेतर असा संघर्ष का उभा राहिला?

शाहू महाराजांना समाजातील विषमता संपायची होती, 👇
जातीभेद संपवून मागासलेल्या जातींना त्यांचे सामाजिक हक्क मिळवून द्यायचे होते. ब्रिटिशांच्या काळात सर्व प्रशासनयंत्रणा ब्राम्हण समाजाच्या हातात होती कारण सरकारी नोकरी शिकलेल्याला मिळे आणि शिक्षण ही फक्त ब्राह्मणांचीच मक्तेदारी होती. शाहू महाराजांकडे राजसत्ता होती आणि 👇
सत्तेच्या जोरावर त्यांनी खंबीर पावले उचलून ही शिक्षणातली आणि प्रशासनातली ब्राह्मणांची मक्तेदारी मोडून काढली. बहुजन समाजातील मुलांनी शिक्षण घ्यावे यासाठी वसतिगृह चळवळ आणि अनेक शिक्षणविषयक कायदे / आदेश काढून शाहू महाराजांनी ब्राह्मणेतर समाजासाठी शिक्षणाची गंगा वाहती केली.👇
Read 14 tweets
खरंतर १८९६ सालीच शाहू महाराजांनी कोल्हापुरात उच्चशिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राजाराम कॉलेजला जोडून एक वसतिगृह स्थापन केले होते. यात सर्व जातीधर्माच्या विद्यार्थ्यांना प्रवेश होता. या वसतिगृहाचे व्यवस्थापन ब्राम्हण मंडळींकडे होते. शिक्षण ही आपलीच मक्तेदारी आहे 👇
अशी मानसिकता या मंडळींची होती त्यामुळे ब्राह्मणेतर मुलांची संख्या हळूहळू कमी झाली, कालांतराने ते वसतिगृह फक्त ब्राह्मणांचेच बनले. शाहू महाराजांच्या डोक्यात शिक्षण क्षेत्रातील ही मक्तेदारी नाहीशी करण्याबाबत चक्रे फिरत होती. याला वेग आला तो पी.सी.पाटलांमुळे (थोर कृषीतज्ञ).👇
मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पी.सी.पाटलांनी त्यांना आलेल्या समस्या शाहू महाराजांना सांगितल्या. गावाचा राजा समजल्या जाणाऱ्या पाटलांच्या पोरांना अशा समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर मागासलेल्या जातींची काय अवस्था होत असेल या विचाराने महाराज अस्वस्थ झाले.👇
Read 19 tweets
#राजर्षी_विरुद्ध_लोकमान्य
#शत्रुत्व_आणि_ममत्व
गेल्या शतकातील पहिल्या दोन दशकात महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर छत्रपती शाहू महाराज आणि लोकमान्य टिळक या दोन महापुरुषांचा उदय झाला. शाहू महाराजांना राजकीय स्वातंत्र्यापेक्षा मानवमुक्ती करणारे स्वातंत्र्य आणि 👇
सामाजिक सुधारणा जास्त महत्वाच्या वाटत होत्या तर लोकमान्य टिळकांना राजकीय स्वातंत्र्य अधिक गरजेचे वाटत होते. ही दोन्ही स्वातंत्र्ये एकमेकांस पूरक आहेत याची जाणीव या दोन्ही महापुरुषांना होती तरीही एकमेकांच्या हातात हात घालून काम करण्याऐवजी एकमेकांशी दोन हात करण्याची परिस्थिती 👇
त्यांच्यासमोर उभी राहिली हे खरंतर महाराष्ट्राचं दुर्दैव. तसं पाहिलं तर लोकमान्यांच्या मनात कोल्हापूरच्या गादीविषयी प्रचंड आदर होता. या आदरापोटीच त्यांनी व आगरकरांनी चौथ्या शिवाजी महाराजांवर होणाऱ्या अत्याचाराला 'केसरी' मधून वाचा फोडली. यात त्यांना दिवाण बर्व्यांचा रोष 👇
Read 20 tweets
'क्षत्रीय कुलावतंस हिंदुपदपातशहा' अशी बिरुदावली असणाऱ्या छत्रपतींना एका भटजीने 'शूद्र' म्हणून हिणवले. इथेच वेदोक्ताची ठिणगी पडली आणि छत्रपती शाहू महाराज सामाजिक बंडखोरीस उद्युक्त झाले. १८९९ मध्ये कोल्हापुरात हे प्रकरण सुरु झाले, नंतर एक-दोन वर्षात याचा भडका उडाला आणि 👇
यातून तीव्र सामाजिक संघर्ष उभा राहिला. या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आणि शाहू महाराज हे बहुजन समाजाचे उद्धारक म्हणून जनतेसमोर आले.

हे प्रकरण समजून घेताना आपण आधी वेदोक्ताची पार्श्वभूमी समजून घेऊया.

वेदोक्त म्हणजे काय?
वेदोक्त म्हणजे वेदांत सांगितल्याप्रमाणे.👇
ब्राम्हण श्रेष्ठत्वाचा सिद्धांत समाजाच्या माथी मारण्यासाठी शेकडो वर्षांपासून धर्मशास्त्रांचे ग्रंथ, मनुस्मृती, पुराणे वगैरे निर्माण केली गेली. "ब्राम्हण व्यक्ती अविद्वान असो की विद्वान असो, ते मोठे दैवत आहे" असे मनुस्मृती मध्ये सांगितले गेले.👇
Read 20 tweets
#स्त्री_स्वातंत्र्याच्या_शिल्पकार
#खऱ्या_स्वातंत्र्याचे_शिल्पकार
#सावित्रीमाई
1818मध्ये पेशवाई संपुष्टात आली. भारतात इंग्रजी राजवट होती. इंग्रज आपल्या सोयीसाठी का होइना सुविधा निर्माण करत होते. आपल्या मुला-बाळांना शिकण्यासाठी त्यांनी मिशनरी शाळा सुरू केल्या होत्या.
तशाच सर्वासाठी काही सरकारी शाळा सूरू केल्या होत्या परंतु त्या चालल्या नाहीत कारण त्यावेळी शिक्षण घेणं ही एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी होती त्यामुळे समाजातील इतर घटकांना स्त्रिया व शूद्रांना शिक्षण बंदी होती. कारण सनातन्यांच्या मते स्त्रीया व शूद्रांनी शिक्षण घेणे म्हणजे हा
अधर्म मानला जात असे, स्त्री शिकली तर पुस्तकातील अक्षर आळ्या होऊन तिच्या पतीच्या ताटात पडतील अथवा तिच्या शिक्षणामुळे तिच्या पतीचे निधन होईल अशा प्रकारची भीती समाजात पसरवली गेली होती. एकंदरीतच अज्ञान अंधश्रद्धा रूढी परंपरा जसं बालविवाह, सतीप्रथा, केशवपण समाजात होत्या. इथल्या काही
Read 25 tweets
ज्या काळात मराठ्यांच्या राज्यातील प्रशासनात मराठ्यांनाच काही अधिकार नव्हते, क्षत्रियांची गणती सुद्धा शुद्रांमध्येच केली जात होती त्या काळात शाहू महाराजांनी मराठ्यांना आणि बहुजन समाजाला प्रशासनात जागा दिली, क्षत्रियांना वेदोक्ताचे अधिकार मिळवून दिले आणि ब्राम्हण, युरोपीय आणि 👇
पारशी लोकांच्या मक्तेदारीला सुरुंग लावला. स्वातंत्र्याचा व्यापक अर्थ घेतला तर मला इथे शाहू महाराज #खऱ्या_स्वातंत्र्याचे_शिल्पकार वाटतात.

छत्रपती घराण्याचे ऐतिहासिक महत्व बघता मराठा संस्थानांमध्ये कोल्हापूरचे संस्थान अव्वल दर्जाचे असायला हवे होते, 👇
मात्र अल्पवयीन छत्रपतींच्या कारकिर्दीमुळे ही प्रतिष्ठा खालच्या स्तरावर गेली होती. छत्रपती फक्त नावाचे आणि कारभार ब्रिटिश नोकरशाहीच्या / परकीयांच्या हातात अशी राज्याची परिस्थिती होती. कोल्हापूर दरबारात ७१ सरकारी अधिकाऱ्यांपैकी ६० ब्राम्हण आणि ११ इतर आणि 👇
Read 12 tweets
#खऱ्या_स्वातंत्र्याचे_शिल्पकार
चंद्रपूर,रायपूर,ईस्ट गोदावरी वैगेरे जिल्हे म्हणजे आदिवासीबहुल क्षेत्र. अगदी पुरातन काळापासून या भागात राजगोंड,माडिया,बडा माडिया यांसारख्या कैक आदिवासी जमातींची वस्ती आहे. साधारण १९७१ सालापासून या भागात नक्षलवाद फोफावला आणि या भागातील
आदिवासी जमाती तशा दुर्लक्षितच राहिल्या.परंतु या आदिवासी जमातींचा सातासमुद्रापार नावाजला गेलेला एक विशेष गुणधर्म म्हणजे या आदिवासी जमातींचे शिकार करण्याचे पद्धती तंत्र. हे आदिवासी सर्वप्रथम जंगलातल्या नेमक्या कोणत्या क्षेत्रात शिकार करायची आहे ते क्षेत्र निश्चित करतात.
मग त्या ठरलेल्या क्षेत्राला अशा रीतीने वेढा देतात कि वेढा आवळल्या गेल्यावर जनावराला पुढे जायला एकच लहानसा मार्ग उरेल. चारही बाजूने घेरून त्या जनावराला खिंडीत पकडून शेवटाला बांधलेल्या दोरांच्या मजबूत जाळीत अडकवायचं आणि अखेर त्या जनावराचे सगळे मार्ग बंद करून त्याची शिकार करायची.
Read 14 tweets
#खऱ्या_स्वातंत्र्याचे_शिल्पकार
#JohnHowardGriffin
खऱ्या स्वातंत्र्याचे शिल्पकार या लेखमालेत काल आपण महात्मा बसवेश्वर यांच्या कार्याविषयी थोडक्यात माहिती घेतली.त्यातून असे लक्षात आले कि खरे स्वातंत्र्य म्हणजे केवळ परकीयांच्या जोखडातून मुक्तता असे नसून बऱ्याचदा स्वकीयांच्या👇
जोखडातून मुक्तता असाही त्याचा अर्थ होतो.आणि विशेष म्हणजे ह्या स्वातंत्र्याचा व्याप केवळ एका देशापुरता मर्यादित नसून तो विश्वव्यापी असा असतो. त्यामुळे मी आज अशाच एका खऱ्या स्वातंत्र्याच्या शिल्पकाराची गोष्ट सांगणार आहे.त्याच नाव आहे 'जॉन हॉवर्ड ग्रिफिन'.👇
मला ग्रिफिनची ओळख त्याचं 'ब्लॅक लाईक मी' हे पुस्तक वाचल्यावर झाली. आपल्या दलित साहित्यात मैलाचा दगड ठरलेलं शरण कुमार लिंबाळे यांचं अक्करमाशी जस आपल्या सर्वांगाला झिणझिण्या आणत अगदी तशाच झिणझिण्या ग्रिफिनच ब्लॅक लाईक मी वाचल्यावर येतात. मुळात जॉन ग्रिफिन हा एक अमेरिकन👇
Read 14 tweets
#खऱ्या_स्वातंत्र्याचे_शिल्पकार यामध्ये मी शाहू महाराजांवर लिहायला सुरवात करत आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जे शाहू महाराज हे शिवछत्रपतींचे वारसदार असून सुद्धा त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध आवाज उठवला नव्हता, स्वातंत्र्य चळवळीला उघड पाठिंबा दिला नव्हता, बंडखोरी केली नव्हती 👇
तरी ते #खऱ्या_स्वातंत्र्याचे_शिल्पकार कसे काय? पहिलं म्हणजे स्वातंत्र्याचा अर्थ फक्त ब्रिटिश सत्तेपासून मुक्तता एवढाच होत नाही. कोणत्याही बंधनातून मुक्तता किंवा अन्यायकारक परिस्थितीतून सुटका असा स्वातंत्र्याचा अर्थ मी घेतो. आणि शाहू महाराजांनी अनेक स्वातंत्र्ये मिळवून दिली 👇
म्हणून ते मला #खऱ्या_स्वातंत्र्याचे_शिल्पकार वाटतात.
दुसरं म्हणजे त्यांनी उघडपणे ब्रिटिशांविरुद्ध लढा का नाही उभारला? यासाठी आपल्याला तो काळ समजून घ्यावा लागेल. व्यापार, आरमार, सैन्यबळ, विज्ञान, तंत्रज्ञान अशा प्रत्येक क्षेत्रात ब्रिटिश प्रगत होते. 👇
Read 12 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!