दोन दिवसांपूर्वी काही फेक हँडलस् वरून कोकणात धार्मिक द्वेष कसा पसरवता येईल व कशा प्रकारे हिंदू मुसलमान करून भावना भडकवण्याचा प्रयत्न केला गेला. पण आमच्यातीलच काहींनी हा प्रयत्न उधळून लावला.
कोकणात, तळकोकणापासून, राजापूर-रत्नागिरी भागात अनेक धर्मियांची धार्मिक स्थळं आहेत पण केव्हाच लोकांनी अंतर ठेवलं नाही एवढंच काय स्वातंत्र्य काळापासून कोकणातील शांतता कधीच भंग पावली नाही. काही तुटपुंज्या फेक हँडलस् ने द्वेष पसरवून काही घंटा फरक पडणार नाही,
खेडपासून सिंधुदुर्गातील सावंतवाडी पर्यंत हिंदू आणि मुस्लिम धर्मियांची प्रार्थना स्थळं आहेत पण पण तिथं पण लोक हौशीने सण साजरे करतात. एवढच काय सुफी संतांचे दर्गे आहेत लोकं तिथे देखील लोक श्रद्धेने भेट देतात.
कणकवलीमध्ये श्री भालचंद्र महाराजांचा प्रसिद्ध मठ आहे तिथे हिंदू असो वा मुसलमान, बौद्ध, शिख, ख्रिश्चन, जैनांपासून सर्व लोक मोठ्या प्रमाणात श्रद्धेने येत असतात, कधीच तिथं अशा जातीय वैमनस्य पसरवणाऱ्या गोष्टींना लोकांनी तसूभरही थारा दिला नाही.
एवढंच काय सावंतवाडीत सद्गुरू मियाँसाहेब दर्गा आहे तिथे देखील लोक मोठ्या संख्येने जातात; भिमजयंती असो की दत्तजयंती सर्व सण साजरे होतात. कोकणात लोकं कधीच एकमेकांपासून तुटली नाही किंवा तुटणार देखील नाही याचं उदाहरण ट्विटरवर पाहीलंच असाल. ज्या ज्या वेळी कोकणात जातीय राजकारण किंवा
जातीय द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा कोकणच्या लोकांनी त्यांच्या कंबरड्यात लाथ घालून हाकलवलं आहे.
मूर्खलोकांनो, जरा तळकोकणात येऊन बघा ख्रिश्चन बांधवांच्या सणासुदीला कसली धुम असते,
कोकणातात फक्त दोनच गोष्टी चालतात पर्यटन आणि इतर विकासकामं!! त्यामुळे तुमची डाळ शिजण्याचा प्रश्नच येत नाही...
माझ्या सर्व ट्विटरकरांना सांगणं आहे, सोशल मीडिया, एसएमएस, व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटर, टेलिग्राम, अन्य डिजिटल माध्यमांतून जर काही हँडलस् नी धार्मिक द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला तर सरळ तक्रार करावी, भारतीय दंड संहिता कलम १८८ नुसार त्यावर कारवाई करू शकता!! hellomaharashtra-in.cdn.ampproject.org/v/s/hellomahar…
दादर म्हटलं की खरेदी ही आलीच. तिथे पदपथावर बरेच विक्रेते असतात. पण त्यातला कोणता #विक्रेता#मराठी आहे कोणता परप्रांतीय कसं कळणार?
आजच आलेला #अनुभव
स्थळ: स्टार मॉलच्या समोरील पदपथ
➡️ एका विक्रेत्याकडे खरेदी करत असताना नेहमीप्रमाणे मराठीत बोलायला सुरुवात केली. 👇🏻
तो विक्रेताही माझ्याशी मराठीत बोलत होता. बाजूचा दुसरा विक्रेता आला आणि ते दोघेही गुजरातीत संवाद करू लागले. त्या दोघांना गुजरातीत संवाद करताना पाहून तिसर्या विक्रेता त्यांना म्हणाला, "तुम्ही दोघे काय बोलताय? आम्हाला समजेल असे हिंदीत बोला." (हे तो त्यांच्याशी हिंदीत बोलला)👇🏻
दुसर्या विक्रेता त्याला हिंदीत म्हणाला "काही नाही आम्ही आमच्या गावच्या वार्ता करतोय." पुन्हा तो ३रा विक्रेता त्यांना म्हणाला "हिंदीत बोला म्हणजे आम्हाला पण समजेल तुमच्या गावच्या वार्ता." गुजराती विक्रेता त्याला म्हणाला "आम्ही दोघे गुजराती मग आम्ही हिंदीत का बोलू? मला नाही येत"👇🏻