पिझ्झा म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर येत एकदम महागडे रेस्टॉरंट, त्यांचा झगमगाट आणि त्याच भरमसाठ बिल...
पण पिझ्झाचा जन्म कसा झाला? याबाबत आपल्याला फार कमी माहिती असेल...
एकवेळ गरीबांच्या पोटाची भूक भागवणारा पिझ्झा आता श्रीमंत झालाय त्यावर एक छोटासा थ्रेड -
युरोप मध्ये नेपल्स नावाचं एक बंदर होत. खलाशी, हमाल यांच्या वर्दळीने हे बंदर कायम गजबजलेलं असायचं. इथे विश्रांती घ्यायलाही कुणाला वेळ नसायचा मग निवांत बसून भरपेट जेवण करणे तर फार दूरची गोष्ट..
पण म्हणतात ना गरज ही शोधाची जननी असते, आणि याच गरजेचं भांडवल करून एक शक्कल बाजारात आली.
एका खानावळ वाल्याने एका रोटी वर कांदा टोमॅटोची फोडणी आणि मासळी घालून वरून भरपूर चीज टाकून एक चमचमीत आणि भूक भागेल अशी डिश तयार केली ती म्हणजे पिझ्झा...
अगदी उभ्याने पटकन खाता येईल असा हा प्रकार तिथल्या गरीब मजूर लोकांनी उचलून धरला.
पुढे दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपीय देशातून अनेक लोक अमेरिकेत स्थलांतरित झाले. आणि सोबत त्यांची खाद्य संस्कृती ही अमेरिकेला घेऊन गेले.
नंतर पिझ्झा अमेरिका, मेक्सिको करत जगभर पसरला. प्रत्येक देशाच्या चवीनुसार त्यावरचे टॉपिंग्जही बदलले. युवा पिढीने तर त्याला अक्षरशः डोक्यावर घेतले.
"गरीबांचे खाद्य" असं हिनवलं जाण्यापासून "श्रीमंतांचे खाद्य" असा शिक्का बसण्याचा पिझ्झाचा प्रवास आपल्याला हेच सांगतो की "प्रत्येकाची वेळ बदलते...!!"
अयोध्येत भव्य राममंदिर उभारणीसाठी निधी संकलन अभियान सुरू होत आहे. हे अभियान म्हणजे प्रभू श्रीरामांच्या आड २०२४ चा निवडणूक प्रचार आहे असा आरोप शिवसेना करत आहे.
आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल की निधी संकलना मागे नक्की काय प्रयोजन आहे? मला जे वाटतं त्याबद्दल हा छोटासा थ्रेड....
आपल्या देशात अंबानी, अदानी सारखे अनेक उद्योगपती आहे जे एकरकमी १५०० कोटी देऊन मंदिर उभारू शकतात.
मात्र अशा पद्धतीने मंदिर उभारल्यास किती हिंदूंना हे मंदिर "आपले" वाटेल? राम मंदिरावर त्यांच्या "सौजन्याची" पाटी आपल्याला चालेल?
मंदिरासाठी अगदी १० रुपयांपासून १००० रुपयांपर्यंतचे कूपन उपलब्ध आहेत आणि २१०० रुपयांच्या वरील सर्व रक्कम चेकद्वारे स्वीकारली जाणार आहे.
त्यामुळे राजकीय पक्षनिधी मध्ये जशी गडबड होते तशी यात अजिबात होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे.
एकेकाळी नामवंत पैलवान आणि अधिकारी देणारा हा तालुका गुन्हेगारी साठी ओळखला जाऊ लागला होता आणि ही ओळख आम्हा सर्वांच्या मनाला लागत होती...
सर्वांनी मनाशी गाठ बांधली की काहीही करून आपल्या तालुक्याची "गुन्हेगारांची मुळशी" ही ओळख पुसायची.
४ वर्षांपूर्वी तुळजाभवानी ट्रस्टचे संस्थापक रामदास पवळे आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी संतोष भूमकर या बालमित्रांनी हा विडा उचलला. साथीला होते ट्रस्टचे सर्व पदाधिकारी आणि मित्र मंडळी..
संकल्पना होती - "आदिशक्ती युवा प्रेरणा केंद्र"
एक असे केंद्र जे तरुणाईला अधिकारी आणि त्याहून अधिक एक उत्तम व्यक्ती होण्याची प्रेरणा देईल.
मुळशी तालुक्यात अनेक होतकरू तरुण तरुणी गुणवत्ता असूनही आर्थिक अडचणी किंवा योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने स्पर्धा परीक्षांमध्ये अपयशी ठरत होते.
आपला भारत देश अगदी रामायण काळापासून ते महाभारतापर्यंत आणि चंद्रगुप्त मौर्य पासून इंग्रज काळापर्यंत सांस्कृतिकदृष्ट्या अखंड आणि एकात्म राहिला आहे...
परंतु इंग्रज आणि डाव्या विचारसरणीच्या लोकांनी हे कधीच मान्य केलं नाही आणि हीच गोष्ट ते सतत आपल्या मनावर बिंबवत राहिले, त्याचा प्रभाव इतका पडला की काही भारतीय म्हणायला लागले की, "इंग्रज आल्यामुळे आपल्या देशाला शैक्षणिक सुबत्ता मिळाली आणि तुकड्या तुकड्यात विभागलेला देश एकसंध झाला."
इंग्रजांना भारतातून हाकलून दिल्यावरही परिस्थिती फारशी बदलली नाही.
काही राजकारणी लोकांनी वैयक्तिक स्वार्थापायी भाषिक आणि प्रांतिक अस्मितेचे राजकारण करत देशाच्या एकात्मतेला सुरुंग लावण्याचे काम केलं.
भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या काही दिवस आधी २२ जुलै १९४७ रोजी भारतीय संविधान सभेच्या बैठकीत पिंगली वैंकय्या यांनी बनवलेला झेंड्यावर आधारित #तिरंगा "राष्ट्रीय ध्वज" म्हणून स्वीकारला गेला.
२००२ पूर्वी सामान्य भारतीयाला फक्त स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणाची परवानगी देण्यात आली होती. २६ जानेवारी २००२ पासून यात बदल करण्यात आले. त्यानुसार कोणताही नागरिक कोणत्याही दिवशी ध्वज फडकवू शकतो.
१. तिरंगा ध्वज हा लोकर, सूत, सिल्क किंवा खादीपासून तयार केलेला असावा. झेंडा आयताकार असायला हवा. लांबी आणि रुंदीचे प्रमाण ३:२ असे असावे. केशरी रंग खालील बाजूस ठेवून झेंडा फडकवू नये.
संघाचे तृतीय वर्ष शिबीर सुरु होते..
दरम्यान २ स्वयंसेवकांमध्ये भांडण सुरु झालं. खरंतर स्वयंसेवकांमध्ये "भांडण" हा प्रकार तसा संघाला नवीन..
सुरुवातीला हे भांडण किरकोळ असेल म्हणून दुर्लक्ष केल गेलं. पण नंतर हे भांडण जरा जास्तच वाढलं, तेंव्हा एका ज्येष्ठ स्वयंसेवकाला पाठवण्यात आलं.
ते दोघे स्वयंसेवक केरळ मधील कोणूर मधले होते. त्यांच्यात वाद चालला होता कि, "ह्या शिबिरानंतर त्यांच्या शाखेचा कोण मुख्यशिक्षक होणार?" म्हणून..
दोघांनाही त्यात प्रचंड रस होता आणि त्याच पदामध्ये, दुसऱ्या कोणत्याही पदामध्ये नाही. तडजोड कोणालाच मान्य नव्हती..
दोघांचा एकमेकांना प्रचंड विरोध होता. प्रसंगी, मारामारीसुद्धा झाली. दोघांची बाजू ऐकून सोक्षमोक्ष लावायचा ठरलं..
एकाला घरचे लग्नासाठी मुलगी बघत होते. दुसऱ्याचे म्हणणे होते,"एक तर पहिला एकुलता एक आणि कमवता. घरची पूर्ण जबाबदारी त्याच्यावर. ही जास्तीची जबाबदारी त्याला पेलवणार नाही."