Is it ok.. to Loose ? 😊

मला पडणारा नेहमीचा प्रश्न की आपल्याला जिंकायचंच का असतं? आपण न जिंकता ही आनंदी तसंच यशस्वी जीवन जगू नाही का शकत? का त्यासाठी आपल्याला आनंदी आणि यशस्वी जीवन म्हणजे काय याच्याच व्याख्या बदलाव्या लागणार आहेत ?
👇
मला कायम वाटंत आलं आहे जीवन जगणं मंग ते कशाही प्रकारे असू दे तो एक प्रकारचा mind game च चाललेला असतो. तुमच्या सोबत घडलेल्या घटना व त्याचा तुम्ही तुमच्या बुद्धी नुसार लावलेला अन्वयार्थ तसंच त्याला तुम्ही दिलेला reply.
👇
तुम्हांला असं वाटंत नाही का कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी सर्वांत प्रमुख अट ही असते की तुम्हांला प्रश्न व्यवस्थितच कळला पाहिजे? तर मंग आपण आपल्या समोर वाढून ठेवलेलं जीवन जगताना आपण ते काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की नाही ? की आला दिवस ढकलणार आहोत.
👇
का आपण कोणत्या धार्मिक पुस्तकात किंवा एखाद्या धर्मगूरूने प्रवचनात सांगितल्या नुसार जीवन जगणार आहोत. आपलं अमूकच कर्तव्य आहे.. आमूकच कर्मात जीवनाचं सार्थक आहे.. वगैरे.. वगैरे...

समजा आपण एखादा खेळ खेळणार असू आणि तिथं आपल्याला
👇
पाहायला कोणीही नसेल तर आपल्याला तो खेळ खेळायला व जिंकायला मजा येणार आहे का? आपल्याला खेळ जिंकण्याची मजा जिंकल्यावर येते की तो खेळ जिंकलेलं आपल्या आप्तेष्टांनी व वैर्यानी पाहिल्यावर येते. तसंच त्यांनी वाजवलेल्या टाळ्यांमुळं (आप्तेष्ट) व नाकं मुरडल्यावर (वैरी) येते. विचार करा.
👇
जिंकण्यात तर मजा आहेच पण खेळण्यात तसंच त्या खेळात भाग घेण्यात पण जी मजा आहे ती जिंकण्यापेक्षा कमी नाही. तसंच जीवनाचं आहे..

तुम्ही आजही श्वास घेत आहात आणि तुमच्या मनात जगण्याची उमेद आहे व येणार्या उद्यावर विश्वास आहे तर या सारख्या यशस्वी जीवनाची व्याख्याच करता येऊ शकत नाही.
👇
तसं पाहिलं तर माणसानेच माणसं क्रुतीशील राहण्यासाठी तसंच क्षमतेपेक्षा जास्त काम करण्यासाठी हारनं व जिंकनं या कल्पना जन्माला घातल्या आहेत. त्याचा जास्त लोड घ्यायचा नाही. त्याने फक्त तूलनेचा जन्म होतो आणि तुलना हातात जे आहे ते सुद्धा गोड लागू देत नाही!
👇
त्यामुळं हारलं तरी खच्ची व्ह्यायचं नाही व जिंकलं तरी हुरळून जायचं नाही. असं केलं तर निकालाचं दडपण कधीच येणार नाही.

आणि हो हारलं तरी चालतं बरं का!
#चेतन_शब्दयोगी

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with चेतन_शब्दयोगी

चेतन_शब्दयोगी Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @chetanshendge

28 Dec
चित्रपट - ' Fandry ' ( 2014 )

खरं तर चित्रपट समीक्षा लिहिण्यास सुरुवात करावी असा एकमेव चित्रपट आहे. म्हणून हा पहिला.

खदखद काय असते आणि तिला व्यक्त कशी करायची असते. अख्खं जग विरोधात समोर उभं असताना पण त्यांना पाठ न दाखवता निधड्या छतीनं सामोरं जाऊन चार वार झेलायचे कसे आणि
👇 Image
आठ वार करायचे कसे. याचं उत्तम उदाहरण म्हणजेच ' Fandry '.

मला 100% खात्री आहे, कि या जगात कोणीच, या चित्रपटाला शब्दांत व्यक्त करून न्याय देऊ शकत नाही. त्याला वेगळं सांगायची गरजच नाही. तो स्वयंपूर्ण आहे.
👇
' जे वर्षानुवर्ष, पिढ्यान पिढ्या दलदलीत ते दलित.' ज्यांना माणसाचं समसमान असण्याचं तत्वच नाकारलं गेलं आहे. ज्यांना तुम्ही स्पर्धा सुरू होण्याआधीच नालायक म्हंटलं गेलं आहे. ज्यांना तुम्ही स्पर्धेत उतरवन्याच्या आधीच ( कर्ण ) तुम्ही शूद्र किंवा कमी दर्जाचे आहात हे शतकोनी शतक
👇
Read 14 tweets
28 Dec
Alone ( एकटं )

मला जवळ जवळ कायमच एकटं (Alone) राहायला आवडतं. मला माझी सोबत जगात इतर कोणाही पेक्षा जास्त आवडते. मीच अशी ती व्यक्ती आहे जिच्यावर मी सगळ्यात जास्त प्रेम करतो, जिच्यावर सगळ्यात जास्त विश्वास ठेवतो तसंच जिची सर्वात जास्त काळजी घेतो.
@Archanagsanap2
@Rupachi_Rani
👇
मी बर्याचदा अनेकांना एकटं राहायला जगायला घाबरलेलं पाहिलं आहे. मी याच्या शिवाय जगू शकत नाही त्याच्याशिवाय जगू शकत नाही असं आपण म्हणतो पण तसं खरंच नसतं त्याचा एवढाच साधा अर्थ असतो की मी आमूक आमूक व्यक्ती सोबत थोडा जास्त आनंदी जगेल. बस्स. यापेक्षा आधिक त्यात काहीही अर्थ नसतो.
👇
जी व्यक्ती स्वताहा सोबत comfortable आहे ती जगात कोठेही कुणाही सोबत राहू शकते. कसल्याही परिस्थितीत जगू शकते कारण ती स्वताहाबरोबर आनंदी आहे well tuned आहे.
@lankesh009696
@Adiitiii_05
@jorkar_vikas
@NehaV_Jain
@niyati_nimit
@kapse_pranita
@rautsavi9 @Nilesh_P_Z
@paddy_064
👇
Read 7 tweets
28 Dec
नुकतीच मी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या झुंजार लेखणीतून रक्त ओकल्यासारखे शब्द लिहिलेली ' आघात ' नावाची कादंबरी वाचून संपवली..

अण्णाभाऊंच्या लेखनी म्हणजे तळपती तलवार जणू.. अशी कोणतीही भावना, विचार किंवा गोष्ट नाही जी ते तीला आपल्या लेखणीने योग्य न्याय नाही देऊ शकत..
👇
झोपडित राहणाऱ्या पण परिस्थितीशी झगडनाऱ्या लोकांचे जीवन चित्रित करणारी " आघात " ही कादंबरी, अण्णाभाऊंना कशी सुचली असेल हा प्रश्न पडत नाही.. कारण स्वताहा अण्णाभाऊ अशाच झोपडिवजा भागात लहानाचे मोठे झाले.. गरीबी, कष्ट, दारू, रोगराई, भांडण, संघर्ष, शिव्यागाळ्या हे
👇
सर्वच त्यांच्या पाचवीला पुजलेलं..

माणूसच वाईट नसतो, वाईट परिस्थिती देखील माणसाला वाईट वागण्यासाठी प्रव्रूत्त करते..आणि असं वाईट वागणं आहे ती परिस्थिती आणखी वाईट बनवते.. ह्या चक्रात माणूस कसा भरडला जातो.. तसंच माणसाच्या आयुष्यात किती संघर्ष असावा याची देखील परसीमा असावी
👇
Read 9 tweets
28 Dec
Holding..is BAD

Any kind of 'Holding Is BAD' whether it is Love, Hate, Grudge, Anger, Happiness, Sadness or Kindness!

कोणत्याही प्रकारची भावना प्रमाणापेक्षा जास्त काळ धरून ठेवणं आपल्या मानसिक आरोग्यासाठी नक्कीच चांगलं नसते.
👇
कारण त्या भावनेसोबत जगण्याची आपल्याला सवय होते. ती भावना ज्या व्यक्ती, जागे किंवा कामा बाबतीत आहे तिचीही सवय होते. जर future मध्ये ती दूर झाली तर त्याचा आपल्याला त्रास होवून नैराश्य येण्याची शक्यता वाढते.
👇
बदलापूर movie मध्ये शेवटी जेव्हा हूमा कुरेशी येऊन वरून ला सांगते की गेल्या 15 वर्षापासून ज्याचा ( नवाजुद्दीन ) तू सगळ्यात जास्त राग मनात धरलेला तूझा दुश्मन तर आता मेला मंग तू आता काय करणार? तेंव्हा वरून स्तब्ध होउन जातो! तसं.
👇
Read 4 tweets
26 Dec
त्रास म्हणजेच दुःख का ?

आपल्या जीवनात अनेक चांगल्या वाईट गोष्ठी घडत असतात. चांगल्या, मनासारख्या घडल्या की आपल्याला आनंद होतो, मस्त - छान वाटतं.
पण काही न आवडणार्या घडल्या तर ? तर मंग आपल्याला शारीरिक तसंच मानसिक त्रास होतो वा त्याचं दुःख होतं! 👇
आपण आजारी पडलो तर त्याचा आपल्याला शारीरिक त्रास होतो पण आपणच का पडलो असा जर विचार केला तर दुःख होतं. आपल्या हातात काय आहे त्रास टाळनं का दुःख टाळनं, विचार करा!

त्रास होणं आणि दुःख होणं याची गल्लत करू नका कारण दोघेही वेगवेगळे आहेत! सख्खी भावंडं म्हणा ना ती पण जुळी! 👇
आपण आयुष्यभर त्रास कवटाळून नाही बसू शकत, आपण त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधून काढतोच किंवा तो खूप काळ टिकला असह्य झाला तर जीव सोडतो पण त्याच्या उलट आपण दुःख मनाशी कवटाळून बसतो!

एखाद्या घटनेतील त्रासाचं मोठं भूत तेव्हाच तयार होतं जेव्हा आपण त्याचं दुःख मनाला लावून घेतो. 👇
Read 7 tweets
26 Dec
जगात काही लोकं शापित म्हणून जन्माला येतात अन शापित म्हणूनच मारतात.त्या यादीतलं अग्रगण्य नावं असेल तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे.

अफाट अन अचाट शब्द प्रतिभा लाभलेला लेखक. त्यांनी जेवढा लेखन प्रपंच केला.जेवढी साहित्य निर्मिती केली, तेवढी इतर कोणीही केली असती तर 👇
त्याला डोक्यावर घेऊन मराठी वाचक अक्षरशः नाचला असता. त्यांना दलित साहित्यिक म्हणून एका कोपऱ्यात ठेवून दिलं गेलं आहे. त्यांच्या लेखनाची कोणीही मुक्त मनाने, बुध्दीने चिकित्सा करत नाही. सोनं तुम्ही पारखलच नाही तर ते सोनं आहे तुम्हाला कळणारच नाही.👇
इंग्रजी साहित्य वाचून त्याला भारतीय भाषात आणून नसती उठाठेव करणारे आज मोठे साहित्यिक म्हणून गणले गेलेत.

अण्णाभाऊ ज्या समाजातून आले, ज्या परिस्थिती राहून त्यांनी हा जो साहित्य डोंगर उभा केलाय तसा करणारा दुसरा कोणीही त्यांच्या आसपास दिसत नाही. 👇
Read 6 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!