#Patrick_Kilonzo_Mwalua
#Water_Man
#Real_Hero
🙏🙏🙏
आफ्रिका खंडातल्या केनिया देशामध्ये असलेल्या सावो राष्ट्रीय उद्यानापासून (Tsavo National Park) सुमारे 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका दुर्गम प्रदेशात रहाणारा एक सामान्य माणुस...
याची एक प्रेरणादायी कथा आहे.....
मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त असलेला "Patrick", ज्याच्या स्वतःच्या आयुष्याचा काही भरवसा नाही... एकदा सावो राष्ट्रीय उद्यानातून प्रवास करत असताना त्याला दुष्काळाच्या माराने पाणी न मिळाल्याने मेलेला एक हत्ती दिसला. स्वतःच्या जिवाची काळजी सोडून त्याने त्याच दिवशी निश्चय.....
केला की यापुढे पिण्यासाठी पाणी न मिळाल्याने कोणीही प्राणी मरू नये यासाठी आपण नक्कीच काहीतरी केले पाहीजे. सन 2016 मधली ही घटना आहे, त्याने स्वतःच्या पैशाने एक पाण्याचा टँकर भाड्याने घेतला आणि त्याच्या महत्वाकांक्षी योजनेला सुरवात केली.....
स्वतः रोज कित्येक तास टँकर चालवून, शेकडो किलोमीटरचा प्रवास करून तो टँकर भरून ते पाणी सावो उद्यानात नेऊन तहानलेल्या मुक्या जनावरांना देऊ लागला. दुष्काळ असल्याने आठवड्यातून अनेक वेळा त्याला हे काम करावे लागत असे, तरीही न डगमगता त्याने त्याचे कार्य चालूच ठेवले.....
त्याच्या या नित्यक्रमाची इतकी सवय त्या उद्यानातल्या प्राण्यांना झाली की लांबून येणारी त्याची गाडी पाहून ते मुके जिव आपली तहान भागवण्यासाठी त्याच्या गाडीकडे धाव घेत असत. सुरवातीस लोकांनी त्याला "हा प्रक्रुतीचा नियम आहे" असे सांगत त्याला समजावण्याचा प्रयत्न केला.....
परंतू ही "ग्लोबल वार्मिंग" ची समस्या असून मनुष्याची देण आहे हे त्याने त्या लोकांना समजावले. हळू हळू त्याचे कार्य आणि उत्साह पाहून लोकांचे त्याला सहकार्य मिळू लागले. "Patrick" आफ्रिकेचा "Water Man" म्हणुन ओळखले जाते. खऱ्या अर्थाने भूतदया म्हणजे काय याची साक्षात शिकवण.....
संपुर्ण जगाला देणाऱ्या या ध्येयवेड्याला मानाचा मुजरा🙏💐🙏

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Pritish Mane (Стойкий Мужик)

Pritish Mane (Стойкий Мужик) Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Pritish_S_Mane

21 Nov 20
#चेर्नोबील_दुर्घटना
#Chernobyl_Disaster
कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुर तालुक्यात जैतापुर (माडबन) येथे होऊ घातलेल्या प्रस्तावित 9,900 मेगावॉट क्षमतेच्या अणुऊर्जा प्रकल्पास स्थानिक नागरीकांसह पर्यावरण प्रेमींचा इतका प्रखर विरोध का??? काय असेल यामागचे कारण???.....
या प्रश्नाचे उत्तर शोधताना अणुऊर्जा प्रकल्प हा एखादी दुर्दैवी दुर्घटना घडल्यास किती धोकादायक असु शकतो याचा विचार केला गेला पाहीजे. अशाच एका दुर्दैवी अणुऊर्जा प्रकल्प दुर्घटनेचे जगातील सर्वात विनाशकारी उदाहरण म्हणजे चेर्नोबील दुर्घटना. दिनांक 26 एप्रिल 1986.....
तात्कालिन सोविएत युनियन (USSR Union of Soviet Socialist Republic) चा भाग असलेला युक्रेनच्या (Ukrainian SSR) प्रिप्यत शहराजवळ चेर्नोबील येथे असलेल्या अणुऊर्जा प्रकल्पात झालेल्या विनाशकारी दुर्घटनेनंतर अणुऊर्जा प्रकल्पाचे विध्वंसक आणि गंभीर धोके प्रकर्षाने जगासमोर आले.....
Read 8 tweets
20 Nov 20
#ऑस्कर_शिंडलर
#Oskar_Schindler
आत्ताच्या चेक प्रजासत्ताकमध्ये जन्मलेला एक ख्रिश्चन जर्मन उद्योजक, हिटलरच्या नाझी पार्टी चा सदस्य ज्याने दुसऱ्या महायुध्दाच्या काळात तब्बल 1,200 ज्यू लोकांचे प्राण वाचवले आणि जगासमोर मानवतेचा एक आदर्श निर्माण केला. दुसऱ्या महायुध्दाच्या काळात.....
हिटलर च्या नाझी पार्टी ने ज्यू लोकांचा क्रूरपणे संहार करण्यास सुरुवात केली. ज्यू लोकांना भर रस्त्यात गोळ्या घालून आणि गॅस चेंबर्स मध्ये कोंडून विषारी गॅस द्वारे मोठ्या प्रमाणात त्यांच्या क्रूरपणे हत्या करण्यात आला. जर्मन नाझी सैन्याच्या अधिपत्याखाली असलेल्या युरोप मधुन.....
ज्यू लोकांचा समूळ नायनाट करणे हाच हिटलर चा उद्देश होता. ऑस्कर शिंडलर यांनी त्या काळी नाझी जर्मनीच्या अधिपत्याखाली असलेल्या पोलंड मधे Enamelware आणि Ammunition चे कारखाने चालू केले आणि जगातल्या सर्वोत्तम, कुशल समजणाऱ्या जाणाऱ्या ज्यू लोकांना तेथे काम दिले. सुरुवातीच्या.....
Read 9 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!