- छत्रपती शिवाजी महाराजांची स्वा. सावरकरांनी केलेली आरती

(फर्गुसन कॉलेजमध्ये असतांना तात्यारावांनी तरुणांमध्ये राष्ट्रभक्ती उत्पन्न करण्यासाठी तयार केलेली छत्रपती शिवाजी महाराजांची आरती)

जय देव, जय देव, जय जय शिवराया |
या, या अनन्य शरणां, आर्या ताराया ||धृ||
अर्थ :- हे शिवराया तुझा जयजयकार असो. तुला शरण आलेल्या ह्या आर्यांचे (भारतीयांचे) तारण करण्याकरता, त्यांच्या संकटांचे निवारण करण्याकरता तू ये.

आर्यांच्या देशावरी म्लेंच्छाचा घाला|
आला आला सावध हो शिवभूपाला|
सद्ग्तीता भूमाता दे तुज हाकेला |
करुणारव भेदुनी तव ह्र्द्य न का गेला |१|
अर्थ :- या आर्यभूमीवर (भारतावर) म्मुस्लिम लोकांचे आक्रमण झाले आहे. हे भूमातेच्या पालनकर्ता शिवराया, तू सावध हो. सद्गतीत कंठाने हि भूमाता तुजला आळवत आहे. तिचा करुणामय आवाज तुझे हृदय भेदून टाकत नाही काय? (१)

श्री जगदंबा जीस्तव शुंभादीक भक्षी | दशमुख मर्दुनी ती रघुवर संरक्षी |
ती पुता भूमाता , म्लेंच्छा ही छळता |
तुझवीण शिवराया तिज कोण दुजा त्राता||२||
अर्थ :- शुंभ निशुंभ यांचा वध करणारी ही जगत्माता. दशानन रावणाचा वध करून या जगदंबेचे रक्षण श्रीरामांनी केले. असे सुपुत ही भारत माता प्रसवली. अशी ही भारत माता इस्लामच्या छळाने गांजून गेली असतांना
शिवराया तुझ्या शिवाय दुसरा तारणहार ह्या भूमातेला कोण आहे बरे? (२)
त्रस्त आम्ही दीन आम्ही , शरण तुला आलो |
परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो |
साधुपरित्राणाया दुष्कृती नाशाया |
भगवन भगवदगीता सार्थ कराया या ||३||
अर्थ :- अतिशय त्रस्त झालेलो आम्ही दीन लोक तुझ्या शरणास आलो आहोत .
पारतंत्र्यामुळे आम्हास मरण कळा आली आहे. संत सज्जनाच्या संरक्षणाकरता दैत्यांच्या नाशाकरता परमेश्वर जन्म घेतो असे गीता वाक्य आहे. भगवान श्री कृष्णांचे वाक्य सार्थ करण्याकरता हे शिवराय तुम्ही या. (३)

ऐकुनिया आर्यांचा धावा महिवरला |
करुणोक्ते स्वर्गी श्री शिवनृप गहिवरला |
देशास्तव शिवनेरी घेई देहाला |
देशास्तव रायगडी ठेवी देहाला |
देशस्वातंत्र्याचा दाता तो झाला |
बोला तत् श्रीमत् शिवनृप की जय बोला ||४||
अर्थ:- आर्यमंडळाचा पृथ्वीवरील धावा ऐकून स्वर्गधिष्ठीत तो शिवाजी राजा गहिवरून गेला. या देशासाठीच तो शिवनेरीगडावर जन्म घेता झाला.
अन देशासाठीच रायगडावर देह ठेवता झाला. या देशाला स्वातंत्र्य प्रदान करता झाला. अशा शिवरायांचा जयजयकार करा. बोला छत्रपती शिवाजीमहाराज की जय !! (४)

- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (१९०२-पुणे)🙏🙏🙏

साभार: शिरीष पाठकजी

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with saurya_2020

saurya_2020 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Right_vichar

16 Dec 20
सध्या मुख्यमंत्री यांचा ब्राम्हण द्वेश खुप वाढला आहे... संगतीचा परिणाम झाला असेल.. तर मा.मु. ना एक इतिहासामधील एक आठवण जरुर सांगाविशी वाटते..
शंभू राजांचे कट्टर सच्चे मित्र कवी कलश यांनी एकदा रायगडा च्या इथे सपासप तलवार चालवून मुघलांना पळवुन लावलेले..
१/. 👇
तेव्हा त्यांच्या सेनेतील मावळे बोलले कि राजे आज आपल्या अंगात काय भवानी संचारली होती का? तर त्यावर कलश बोलले
" गड्यांनो एक वेळ खवळलेला हत्ती काबूत आणता येईल, पण बिघडलेला बम्मन आवरण महाकठीण "
ही अशी बरीच उदा. देता येतील मा. मु. आपल्याला.
👇
पण सांगायचा मुद्दा हाच की आपण जातिवाद करण्या पेक्षा खरच जे प्रश्न विरोधी नेत्यांनी केले आहेत त्यान्ना उत्तर देण्याचा फक्त प्रयत्न तरी करावा. आणि बम्मन हे काय फक्त कुंडल्या करत नाहित.. तर वेळ प्रसंगी हातात तलवार घेउन देशाचे आणि आपल्या मुलखाचे रक्षण पण करु शकतात.
Read 4 tweets
28 Nov 20
आज उमाबाई यांचा २६३ वा स्मृतिदिन.. त्या बद्दल त्यांच्या विषयीची एक गौरवशाली आठवण ..

१७३२ साली अहमदाबादवर झोरावर खान नावाचा मुघल सरदार चालून आला.त्याच्या परिपत्याची जबाबदारी श्रीमंत उमाबाई साहेब यांच्यावर देण्यात आली .

1/n
सरसेनापती उमाबाई आपल्यावर चालून आलेल्या बघून झोरावर खान याने त्यांना पत्र पाठवले " तू एक विधवा आहेस. तुला लहान मुले आहेत . आम्ही तुला हरवले तर तुझ्या मुलांचा सांभाळ कोण करणार ? आमच्या वाटेल जाऊ नकोस आणि आली तशी बोऱ्या बोलाने परत जा,"

2/n
हे ऐकून उमाबाई संतापल्या .त्यांनी ठरवले कि झोरावर ला उत्तर हे त्याच्या विरुद्ध लढाई करूनच द्यायचे. अहमदाबाद च्या किल्या बाहेर युद्ध सुरु झाले . पंधरा शुभ्र पेहराव परिधान केलेल्या उमाबाई प्रचंड सैन्याच्या गदारोळात मध्यभागी हत्तीवर बसून लढत होत्या ..

3/n
Read 10 tweets
17 Oct 20
काल बंदासिंग बहादुर यांची ३५० वी जयंती होती.. त्यानिमित्त त्यांच्या विषयी थोडी माहिती ..

1. बंदासिंग बहादुर यांचे मुळ नाव लछमन देव(माधव दास) होते त्यांचा जन्म हा जम्मू मधे १६ ऑक्टोबर १६७० साली झाला.
2. एका शिकार झालेल्या हरणाला बघुन त्यांचे हृदय पिळवटून निघाले.

१/
3. त्यांनी वयाच्या 15 व्या वर्षी घर सोडले आणि वैरागी बनण्याचे ठरवले.
4. एकदा नांदेड मधे असताना त्यांची गुरु गोविंद सिंग यांच्यासोबत भेट झाली. तेव्हा गुरूंनी त्यांना तुम्ही एक शीख योद्धे आहात आणि तुमचा जन्म हा मुघल राजवटी विरुद्ध लढण्यासाठी झाला आहे याची जाणीव करून दिली .

२/
5. त्या नंतर गुरू गोविंद सिंग यांच्या आदेशानुसार त्यांना त्यांच्या फौजेचा सेनापती बनवून पंजाब ला पाचारण करण्यात आले.
6. तसेच पंजाब मधे नवाब वजीर खान याच्या नेतृत्वात जो काही छळ मुघल करत होते तो संपवण्यासाठी आणि त्यांना शिक्षा करण्यासाठी बहादूर यांना नेमले.

३/
Read 11 tweets
30 Sep 20
हाथरस घटना

या घटनेवर बऱ्याच जणांनी आपली वेग वेगळ्या प्रकारे मत व्यक्त केली आहेत. माझा सुद्धा एक छोटासा प्रयत्न आहे या गोष्टीवर जरा एक वेगळ मत मांडण्याचा.
थोडा मोठा थ्रेड आहे पण कृपया पूर्ण वाचावा. कृपया थ्रेड पूर्ण वाचल्यावर आपली प्रतिक्रिया कळवावी

1/n
१९ सप्टेंबरला हाथरस मधे अत्यंत घृणास्पद समाजाला काळिमा फासणारी घटना घडली. आणि कालच त्या पीडितेचा दुर्दैवी मृत्यू झाला. नेहमीप्रमाणे लोकांनी या घटनेवर आवाज उठवले आणि तिच्यासाठी न्यायाची मागणी केली. पीडितेला न्याय जरूर मिळेल म्हणजे मिळालाच पाहिजे .

2/n
त्या साठी सरकारने हैदराबाद पॅटर्न वापरला तरी लोक त्याचे स्वागतच करतील. पण आपण जरा खोलात जाऊन याच्यावर विचार केला का ? कि ह्या घटना सारख्या का घडत आहेत.माझ्या मते तरी आपण ह्या गोष्टीला पॉर्न (पोर्नोग्राफिक कन्टेन्ट) ला कमी अधिक प्रमाणात जवाबदार धरू शकतो.

3/n
Read 12 tweets
22 Sep 20
नुकत्याच पार पडलेल्या #पितृपक्षा_निमित्त...
ताजमहाल बांधणाऱ्या शाहजांहाला त्याचा मुलगा औरंगजेब याने जवळपास ७ वर्ष ताजमहाल समोरच कारागृहात बंदी करून ठेवले. त्याला एका अर्ध फुटलेल्या माटामध्ये पाणी दिले जायचे. कारण शहजान पाण्याला सुद्धा तडपला पाहिजे. Image
असे अनेक अत्याचार स्वतःच्या मुला कडून सोसावे लागणाऱ्या शाहजहानने औरंगजेबाला एक शेवटचे पत्र लिहले, त्यात तो शेवटी लिहतो...

"ऐ पिसर तू अजब मुसलमानी,
ब पिदरे जिंदा आब तरसानी,
आफरीन बाद हिंदवान सद बार,
मैं देहदं पिदरे मुर्दारावा दायम आब
अर्थात :-
हे माझ्या मुला! तू पण विचित्र मुसलमान आहेस जो की आपल्या जिवंत पित्याला पाण्यासाठी सुद्धा तरसवतो आहेस. खरचं शंभर वेळा प्रशंसा करावी त्या हिंदूंची जे आपल्या मृत पूर्वजांना सुद्धा अन्न-पाणी देतात!
Read 4 tweets
13 Sep 20
Thread:- राजकारण आणि सिनेसृष्टी

सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातवरण वेग वेगळ्या घटनांनी ढवळून निघालय..मग ते सुशांत-रिया चे प्रकरण आसुदे नहितर कंगना रानावत चे प्रकरण आसुदे. पण तस बघता महाराष्ट्रातील राजकारण आणि हिंदी-मराठी सिने सृष्टी हे फार आधीपासून एक मेकंशी निगडित आहेत. १/६
ह्याची पहिली सुरवात ही ८०-९० च्या दशकात मराठी चित्रपट सोंगाट्या च्या प्रदर्शनावरून झाली. तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी कोहिनूर थिएटर कं. वर अंदोलन करुन सोंगड्या चित्रपट प्रदर्शित करवून घेतला. या घटनेनंतर सिने कलाकार आणि राजकीय नेते यांच्यामधे एक वेगळ्याच नात्याची सुरवात झाली. २/६
मग त्यामधे बोफोर्स घोटाळा आणि अमिताभ बच्चन यांचे प्रकरण आणि मग त्या प्रकरणातून त्यांना बाहेर काढण्यासाठी बाळासहेबांनी केलेली मदत असुदे, किंवा १९९३ चे संजय दत्त चे मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण असुदे. आणि फार फार तर आत्ताचे काही नवीन मराठी चित्रपट असुदे. ३/६
Read 6 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!