#करू
#करायागम
#कंडोळ
#पांढरूक
#कढई
Sterculia urens
Sterculiaceae
आज आपण कढई या झाडाची सविस्तर माहिती ह्या धाग्यातुन घेउ.
हा वृक्ष पानझडी प्रकारातील मध्यम आकारचा बाढणारा कदापणी वृक्ष आहे . अनुकूल वातावरणात हा वृक्ष२०मीटर पर्यंत उंच वाढतो.खोड बुंध्याकडे फूगीर
(१)
#औषधीवनस्पती
असुन गोलाकार,सरळ वाढणारे साधारण ६मीटर पर्यंत फांदीविरहीत असते.या झाडाची साल पांढऱ्या रंगाची , गुळगुळीत व पातळ असते . प्रामुख्याने उन्हाळयात ही साल चमकत असल्याने सदरचे झाड सर्व झाडोयात उठून दिसते . ( हयामुळेच भूताचे झाड असे नाव पडलेले आहे . ) पाने या झाडाची पाने पंजाकृती
(२)
, एका आड एक असून २० ते ३० सें.मी. लांबीची असतात व प्रामुख्याने प्रत्येक फांदीच्या टोकाला जास्ती प्रमाणात असतात . हे झाड त्याच्या सालीमुळे व पानाच्या विशिष्ट रचनेमुळे ओळखण्यास सोपे जाते . ही पाने जानेवारी महिन्यात झाडावरून गळण्यास सुरवात होते . या झाडाला फुले डिसेंबर
(३)
महिन्यात येतात व त्यांचा रंग पिवळा असतो . फळे या झाडाची फळे सुरुवातीला हिरवट रंगाची असतात व ती झुबक्यांच्या स्वरुपात असून त्याचा आकार पिरॅमिडसारखा दिसतो . या फळावर बारीक लव असते . ही फलधारणा एप्रिल मे महिन्यात पूर्ण होऊन परिपक्व झाल्यावर फळाचे आवरण गर्द लाल किंवा ताबूस
(४)
रंगाचे होते . कढई या प्रजातीच्या बिया ६ मी .मी.लांब , दंडगोलाकृती व गडद तपकिरी रंगाच्या असतात . तसेच त्यास चमक असते . सर्वसाधारणपणे एका फळात बियांचे प्रमाण ३ ते ६ असते . नैसर्गिक अधिवास व हवामान दक्षिण उष्णकटीबधीय आर्द्र कदापर्णी, तसेच कोरडया कदापर्णी वनांत कढई वृक्ष
(५)
नैसर्गिकरित्या वाढलेले दिसून येतात . महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात , सातपड्यात तसेच विदर्भातील वनांत हा वृक्ष प्रामुख्याने आढळतो . तसेच हा वृक्ष उत्तरप्रदेश , मध्यप्रदेश , ओरिसा , बिहार , गुजरात , आंध्रप्रदेश व तामिळनाडू या राज्यात आढळतो. पाऊस : ७०० मी.मी. ते ८०० मी.मी.
(६)
जमीन : पाण्याचा चांगला निचरा होणारी , वाळू मिश्रीत तसेच खडकाळ , मुरमाड जमीन लागते . तथापि , लालसर ( जांभा दगडाची ) , दमट जमिनीत वाढ चांगली दिसून येत नाही . समुद्र सपाटीपासून ५०० मीटर उंची पर्यंतच्या प्रदेशात ही प्रजाती चांगली वाढते . कढई या प्रजातीचे उत्तम प्रतीचे झाड
(७)
निवडून त्याचे मे महिन्यात परिपक्व होणारे बियाणे गोळा करण्यापूर्वी जमीन साफ करुन झाडावरच परिपक्व होऊन फळातून फुटून खाली पडणारे बी वेचून गोळा करावे परिपक्व झालेली फळांवरील फळे गोळा करुन काही कालावधीपर्यंत सुकवून ती फोडून सुध्दा बी गोळा करता येते . परंतु ही पध्दत , काटेरी
(८)
आवरणामुळे त्रासदायक असते.या प्रजातीचे बी योग्य रितीने साठविल्यास एक वर्षापर्यंत वापरता येते व एका किलोमध्ये साधारण५५०० ते ६४०० बिया असतात.ह्याच्या बिया शोधून एकत्र करुन यापासुन सुमारे 600 रोपे मी तयार केलेली आहेत.ती रोपे लागवड केलेली आहेत सध्या चांगल्या प्रकारे वाढलेली आहेत
(९)
भौतिक दृष्टया उत्तम असणारे व गडद रंगाचे बियाणे हे रात्रभर थंड पाण्यात १२ तास भिजवून ठेवावे त्यानंतर सदर बियाणे लहान आकाराच्या पॉलिथीन पिशव्यामध्ये पेरण्यात यावे , या प्रजातीची रोपे बी पेरल्यानंतर १० ते १५ दिवसांत उगवण्यास सुरवात होते . त्यावेळी सूर्यप्रकाशाची आवश्यकता
(१०)
असल्याने रोपांच्या वाढीच्या कालवधीत सावली राहणार नाही याची दक्षता घ्यावी . बियाणे पेरल्यावर त्याची उगवणक्षमता ४० ते ९ ० टक्के आढळते. त्यातील २० ते ९ ० टके रोपे जिवंत राहतात रोपांची उगवण झाल्यावर त्यास दिवसातून एकवेळ पाणी द्यावे .४ ते ६ महिन्याच्या रोपांना बुरशीचा संसर्ग
(११)
होऊन जुलै - ऑगस्ट महिन्यात पाने पिवळी होतात व गळून पडतात . यावर बुरशीनाशक औषधाची फवारणी पानावर केल्यास रोग आटोक्यात आणता येतो .तयार केलेली रोपे पुढील वर्षी लागवडकामी वापरणे योग्य ठरते.उपयोग या लाकडाचा प्रामुख्याने उपयोग खांब , कडी व हत्यारे बनविण्यासाठी तसेच फळया
(१२)
गिटार वाद्य,कोरीव खेळणी तसेच हलक्या दर्जाचे पॅकींग मटेरियल ( बॉक्स व खोके ) कामी होत असतो,या लाकडाचे बहुतांशी यांत्रिक गुणधर्म सागाशी तुलना केल्यास बरोबरीचे असले तरी त्याची आकार बदलण्याची सवय व फाटण्याची क्षमता जास्त असल्याने प्रामुख्याने बांधकाम व फर्निचरसाठी उपयुक्त
(१३)
ठरत नाही,या प्रजातीचे परिपक्क बियाणे स्थानिक लोक काही प्रमाणात भाजून खाद्य म्हणून वापरतात. त्याचप्रमाणे या बियाणांचे चूर्ण करुन कॉफीसारखे उत्तेजक पेय म्हणूनही स्थानिक लोक वापर करतात.डिंक / गम या झाडाला जखम अथवा आघात झाल्यावर त्यातून जो स्त्राव निर्माण होतो.त्यास
(१४)
प्रामुख्याने(कटीला), कराया गम म्हणून संबोधले जाते.गम देणाऱ्या विविध प्रजातीपौकी,कढई या प्रजातीचा हा गम औषधी दृष्टीकोनातून बहुगुणीय असल्याने अत्यंत उपयुक्त आहे.भारतात होणाऱ्या कढई डिंकाच्या एकूण निर्यातीपैकी ५० टक्के निर्यात ही एकटया मध्यप्रदेशातून होत असते
(१५)
लाकडाचे भौतिक व यांत्रिक गुणधर्म भौतिक : या प्रजातीचे लाकूड वजनदार , मजबूत व कणखर असते.या लाकडाचा गाभा गडद तपकिरी रंगाचा असतो.लाकूड जरी मजबूत असले तरी कालांतराने बाहय परिस्थितीमुळे त्याचा आकार बदलतो.
(१६/१६)
@Unrollme @threadreaderapp

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with shivsamb ghodke

shivsamb ghodke Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @ShivsambhG

25 Dec 20
#पांढराशिरस
Albizzia procera
(leguminoseae mimosaceae)
हे एक उंच वाढणाऱ्या झाडांमधील वनस्पती आहे. साधारणपणे पंधरा वीस मीटर उंचीपर्यंत वाढते.
वृक्षाची ओळख हे झाड पर्णझाडी या सदरात मोडते . झाड उंच आणि सरळ वाढते . झाडाचा बुधा काहीसा चक्रकार असतो . झाडाची साल फिकट
#औषधीवनस्पती
(1)
पिवळ्या रंगाची किंवा हिरवट पांढरी ते फिकट तपकिरी रंगाची असते . काही ठिकाणी हे झाड जवळ जवळ ३६ मी . इतके उंच वाढलेले आढळले आहे . त्यात झाडाचा बुंधा सरळ १२ मीटर पर्यंत वाढलेला होता आणि लपेटी २ ते ३ मीटर होती . परंतु सर्वसाधारपणे हे झाड १८ ते २४ मीटर उंच वाढते . मध्य प्रदेश
(2)
सातपुडा , तामिळनाडू मधिल काही भागात या झाडाची वेढी १.२ मीटर ते १.५ मीटर वाढलेली दिसून आली आहे . झाडाची साल १ ते २ सें मी . जाडीपर्यंत वाढते व पातळ ढिलप्याचे स्वरुपात गळूनही पडते . त्यामुळे बुंध्यावर आडव्या रेषा दिसतात . पाने द्विपीच्छक असतात . या संयुक्त पानाची मधली शीर जवळ
(3)
Read 28 tweets
24 Dec 20
#मुचकुंद
#कनकचंपा
Pterospermum acerifolium
हे एक मध्यम उंचीचे मुळ भारतीय झाड आहे. ह्या वनस्पतीस कर्णिकार असेही म्हनतात.याच्या फांद्या खालच्या दिशेने लटकत्या असतात.याची पाने साधी असुन एकाआड एक पाने असतात.यास पांढऱ्या रंगाची फूले येतात व ती रात्रीच्या वेळी येतात व सुगंधीत असतात1/4
यापासून चांगल्या प्रकारचे लाकुड मिळते तसेच यापासून,खेळणी,घरातील फर्निचर,बनवतात,हे नरम असल्याने कागद बनवन्यासाठी,प्लायवुड,आगकाडी बनवन्यात वापरतात.ग्रामीण भागात याच्या पानांनवरती जेवनासाठी वापर करतात.हे एक चांगल्या प्रकारचे फुटवे देणारे झाड आहे. याच्या फांद्या जमीनीपासुनच फूटुन2/4
ते एक प्रकारचे झुडुपच तयार होते.याची पाने लंबवर्तुळी थोडीशी मोठी असुन वरच्या बाजुने हिरवी व खालच्या बाजुने पांढरट भुरकट व लहान केस असतात.याचे फळ हे कप्प्यात असते व त्यात बी असुन त्यावर कापसा सारखे मउ चलन चिकटलेले असते त्यामुळे ते वार्यावर उडतात.हे आपल्या राज्यात
3/4
Read 4 tweets
22 Dec 20
#लहानघोळ
शास्त्रीय नाव -Portulaca quadrifida (पॉरच्युलिका कॉड्रीफिडा) 
कुळ - Portulaceae (पॉरच्युलिकेसी) 
स्थानिक नावे - रानघोळ, भुईचौली, खाटेचौनाळ, चिवळी, लहान घोळ व छोटी घोळ
संस्कृत नाव - लोनी 
हिंदी नाव - छोटा नोनिया 
इंग्रजी नाव - चिकन वीड
या वनस्पतीचे बारीक तुकडे ज्वारीच्य1 ImageImageImageImage
पिठात मिसळून त्याचे कोंबडी खाद्य म्हणून लहान-लहान गोळे बनवितात. म्हणूनच या वनस्पतीला "चिकन वीड' असे इंग्रजीत म्हणतात.
चिवळ ही वनस्पती ओलसर, पाणथळ जागेत शेतात व बागेत तण म्हणून वाढते. चिवळ कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, खानदेश या ठिकाणी महाराष्ट्रासह संपूर्ण (2)
भारतात वाढते.

ही वर्षायू वनस्पती जमिनीवर पसरत वाढते. ही वनस्पती अगदी नाजूक असते. खोडांचा, फांद्यांचा व पानांचा आकार लहान असतो.

खोड - नाजूक, मांसल, पसरणारे, पेरांवर बारीक केसांचे वलय, पेरांपासून तंतूमय मुळे फुटतात.

फांद्या - अनेक, जमिनीवर सर्वत्र पसरणाऱ्या, मांसल पण नाजूक (3)
Read 10 tweets
20 Dec 20
आई खरंच काय असते?
लेकराची माय असते
वासराची गाय असते
दुधाची साय असते
लंगड्याचा पाय असते
धरणीची ठाय असते
आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही उरतही नाही!

फ.मुं. शिंदे
नगर,बीड,सोलापूर सिमाभागात चर्चेत असलेल्या बीबट्या व वाघाटी याच्यात काही सारखेपणा असेल का?
मुक्याजीवांनाही भावना
(1)
असतातच ते हे खालील धाग्यातुन समजुन घेउ

Rusty spotted cat
वाघाटी

संघर्ष......

जगातील सगळ्यात सुंदर नात कोणतं असेल तर ते आई आणि तिच्या बाळाचं जगातील सूंदर चित्र कोणतं असेल तर एखादं बाळ आईच्या कुशीत विसावलेलं पण हे नातं किंवा हे चित्र ज्यावेळी दुरावत नात्यावेळी पाहणाऱ्याला
(2)
सुद्धा वाईट वाटतं कारण एक आई ज्यावेळी आपल्या पिल्लांच्या पासून दुरावते त्यावेळी ती इतकी कासावीस होते की तिला ना तहान लागते ना भूक फक्त तिला आपल्या पिल्लांची आस लागते आणि ती पिल्लं ज्यांचं जग म्हणजे फक्त आई असते त्यांची भिरभिरती नजर फक्त आईला शोधत असते आणि ज्यावेळी त्या आईला
(3)
Read 15 tweets
18 Dec 20
कोण होता 'चेन्दरू मडावी'...?

(विदेशी फिल्म ला ऑस्कर मिळवून देणारा जगातला एकमेव भारतीय आदिवासी मोगली चेन्दरू मडावी...)

एक आदिवासी मुलगा वाघासोबत खेळत असल्याचे फोटो अनेकवेळा सोशल मिडीयावर
माहिती स्त्रोत:- वाटसपवरील संदेशातील आलेली माहिती व फोटो आवडला म्हनुन आपल्या माहितीस
(1)
असलेल्या आदिवासी मित्रांच्या वॉल वर पहायला मिळायचे. फोटो पाहिला की असं वाटायचं - असेल एखाद्या चित्रपटातला' म्हणून तो फोटो पाहून झालं कि दुर्लक्ष व्हायचं.

आज भेळ खाता खाता रद्दी झालेल्या एका हिंदी वृत्तपत्रातली बातमी पाहिली. फोटो तोच होता आणि बातमीचे शीर्षक होते -दुनिया का
(2)
असली मोगली. चेन्दरू अब नही रहा.'* त्याच क्षणात मनावर मोठा घाव झाल्याचा भास झाला.

प्रवासात असूनही नेमका हा चेन्दरू कोण. याची उत्सुकता मनाला लागून गेली. गुगल मास्तरांच्या वाचनालयात याच चेन्दरू विषयी थोडी शोधाशोध केली तेंव्हा समजले अरे हा चेन्दरू तर जगातला एकमेव मोगली आहे.
(3)
Read 21 tweets
16 Dec 20
उंबराला फूल येत का?
या प्रश्नाचे उत्तर शोधतांना व ते उत्तर रिप्लाय मध्ये देताना परिपूर्ण माहिती एकत्र देता येण शक्य नसल्याने मी मला मिळालेला सामाना या पेपरमध्ये एका लेखकाचा लेख आपल्या माहितीसाठी सादर...
(1)
टिप:- रिप्लाय मध्ये शब्द मर्यादा मुळे लेख सादर
@Rmjs444 ImageImageImageImage
मुळात उंबराला फूल येतं का ? फळ येतं म्हणजे फूल असेलच असं सर्वसामान्य मत असतं . मग फूल असत तर दिसत का नाही . यामुळे ते फूल दुर्मिळ झाले आहे . निसर्ग किती विस्मयकारी आहे हे पाहायचं असेल तर उंबर फूल . त्याचं फळ आणि त्याची दुसरीकडे रुजवण हे अत्यंत उत्तम उदाहरण आहे
(2)
पेरूच्या झाडाला फूल येतं , त्याला फळ येतं . त्या फळालाच फुलाचे अवशेष चिकटलेले दिसून येतात . हे म्हणजे फुलाच्या बाहेर फळ येते , पण समजा असं झालं की या फुलाच्या पाकळया उलट दिशेने वाढल्या तर फळ आत तयार होईल ना . अगदी असाच प्रकार उंबराच्या बाबतीत असतो . उंबराच्या खोडाला जे
(3)
Read 9 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!