दहावीला जरा बरे मार्क पडले म्हणून विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. काॅलेजच्या पहिल्याच दिवशी केसांत गुलाबाचं फुल माळून तु आली होतीस. तुझ्या देखण्या रूपाला गुलाबाच्या फुलाने साज चढवला होता. साध्या पंजाबी ड्रेस मध्ये तु खूपच भारी दिसायचीस. मी तेव्हाच तुझ्या प्रेमात पडलो होतो. 👇
वर्गात मी चौथ्या बेंचवर बसायचो आणि तिथून मुलींच्या ओळीत पहिल्या बेंचवर बसलेल्या तुला सारखं सारखं बघायचो. जगताप सरांनी तर खूप वेळा मला तुझ्याकडे बघत बसलेलो असताना पकडलंय. तु नेहमी केसांत गुलाबाचं फुल माळायचीस त्यावरून मी ओळखून गेलो की तुला गुलाबाचं फुल आवडतं. 👇
राहूल्याने मला आयडिया दिली आणि तुला गुलाबाचं फुल देऊन प्रपोज करायचं असं मी ठरवलं. बारावीची परिक्षा झाली तरी माझं धाडस काय झालं नाही. खचनाळे काकूंच्या दारातील गुलाबाचं फुल मी रोज चोरून आणायचो पण ते फुलं वहितच राहायचं, तुला देण्याचं धाडस कधी झालं नाही. निकालाची मी वाट बघत होतो. 👇
निकाल घ्यायला येशील तेव्हा धाडस करून तुला विचारणार असं पक्कं केलं होतं. त्यादिवशी पण खचनाळे काकूंच्या दारातील गुलाबाचं फुल मी चोरायला गेलो, गडबडीत हाताला गुलाबाचा काटा जोरात टोचला. "वेदनेशिवाय प्रेमाला किंमत नाय" असं म्हणून ते फुल घेऊन काॅलेज मध्ये आलो. माझा निकाल घेतला. 👇
मी नापास झालो होतो. आता बाप मला शेतात जुंपणार यात काय शंका नव्हती. तसाच काॅलेजच्या गेटवर एका हातात निकाल आणि एका हातात गुलाबाचं फुल घेऊन उभा होतो. तु येताना दिसलीस. धाडस करून तुझ्या समोर उभा राहिलो, गुलाबाचं फुल द्यायला हात पुढे केला तेवढ्यात मागच्या बाजूने सनकन कानाखाली बसली. 👇
नंतर बराच वेळ तुझ्या बापाचं तोंड हलताना दिसत होतं पण आवाज काय ऐकू येत नव्हता. तुझ्या बापाने त्या दिवशी मला तुडव तुडव तुडवला. घरी आल्यावर माझ्या बापाने अजून तुडवला. पण मनात जिद्द होती. मग ठरवलं, लग्न करीन तर तुझ्याशीच. तुझी आठवण रोज येत राहावी म्हणून गुलाबाची शेती करायची ठरवली. 👇
सुरवातीला घरासमोरच्या जागेत गुलाबाची चार झाडं लावली. मोठी होऊन त्याला फुलं लागली. त्या फुलांचा मी गुलकंद बनवला. घरातल्या सगळ्यांना माझा प्रयोग आवडला. मग आम्ही गुलाबाची शेती सुरू केली. निम्मी फुलं मार्केटला द्यायला लागलो, निम्म्या फुलांचा गुलकंद बनवायला सुरवात केली. 👇
आता आपल्या पाच एकर मध्ये नुसता गुलाब आहे. गुलकंदाचा आपला स्वतःचा ब्रँड आहे. ब्रँडला तुझंच नाव दिलंय. त्यामुळे मी स्वतः सुद्धा रोज गुलकंद खातो. त्याच गुलकंदाचं पुन्हा सोनखत करतो आणि ते गुलाबाच्या शेतीला घालतो. तुला गुलाब आवडतो म्हणून मी असं 100% रिसायकलींग करतो. 👇
काल मला कळलं की तु एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत काम करते. योगायोगाने ती कंपनी गुलकंदाचं सोनखत करून त्यावर पिकवलेल्या आपल्या शेतातील गुलाब सजावटीसाठी वापरते.
येतोय मी दोन दिवसात गुलाबाच्या फुलांची परडी घेऊन तुला पुन्हा प्रपोज करायला.
#राजर्षी_विरुद्ध_लोकमान्य #शत्रुत्व_आणि_ममत्व
गेल्या शतकातील पहिल्या दोन दशकात महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर छत्रपती शाहू महाराज आणि लोकमान्य टिळक या दोन महापुरुषांचा उदय झाला. शाहू महाराजांना राजकीय स्वातंत्र्यापेक्षा मानवमुक्ती करणारे स्वातंत्र्य आणि 👇
सामाजिक सुधारणा जास्त महत्वाच्या वाटत होत्या तर लोकमान्य टिळकांना राजकीय स्वातंत्र्य अधिक गरजेचे वाटत होते. ही दोन्ही स्वातंत्र्ये एकमेकांस पूरक आहेत याची जाणीव या दोन्ही महापुरुषांना होती तरीही एकमेकांच्या हातात हात घालून काम करण्याऐवजी एकमेकांशी दोन हात करण्याची परिस्थिती 👇
त्यांच्यासमोर उभी राहिली हे खरंतर महाराष्ट्राचं दुर्दैव. तसं पाहिलं तर लोकमान्यांच्या मनात कोल्हापूरच्या गादीविषयी प्रचंड आदर होता. या आदरापोटीच त्यांनी व आगरकरांनी चौथ्या शिवाजी महाराजांवर होणाऱ्या अत्याचाराला 'केसरी' मधून वाचा फोडली. यात त्यांना दिवाण बर्व्यांचा रोष 👇
'क्षत्रीय कुलावतंस हिंदुपदपातशहा' अशी बिरुदावली असणाऱ्या छत्रपतींना एका भटजीने 'शूद्र' म्हणून हिणवले. इथेच वेदोक्ताची ठिणगी पडली आणि छत्रपती शाहू महाराज सामाजिक बंडखोरीस उद्युक्त झाले. १८९९ मध्ये कोल्हापुरात हे प्रकरण सुरु झाले, नंतर एक-दोन वर्षात याचा भडका उडाला आणि 👇
यातून तीव्र सामाजिक संघर्ष उभा राहिला. या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आणि शाहू महाराज हे बहुजन समाजाचे उद्धारक म्हणून जनतेसमोर आले.
हे प्रकरण समजून घेताना आपण आधी वेदोक्ताची पार्श्वभूमी समजून घेऊया.
वेदोक्त म्हणजे काय?
वेदोक्त म्हणजे वेदांत सांगितल्याप्रमाणे.👇
ब्राम्हण श्रेष्ठत्वाचा सिद्धांत समाजाच्या माथी मारण्यासाठी शेकडो वर्षांपासून धर्मशास्त्रांचे ग्रंथ, मनुस्मृती, पुराणे वगैरे निर्माण केली गेली. "ब्राम्हण व्यक्ती अविद्वान असो की विद्वान असो, ते मोठे दैवत आहे" असे मनुस्मृती मध्ये सांगितले गेले.👇
#नोकरी करण्यापेक्षा नोकरी निर्माण करणारे का होऊ नये? कोणताही व्यवसाय मनापासून, प्रामाणिकपणे आणि चिकाटीने केला तर तो नक्कीच चांगला बहरतो, अनेकांच्या हाताला काम मिळवून देतो, शेकडो मध्ये सुरु झालेला प्रवास लाखो-करोडोंच्या उलाढाली करून दाखवतो. आजच्या वाढत्या बेरोजगारीच्या काळात👇
स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय सुरु करून त्याला मेहनीतीची जोड दिल्यास नक्कीच रसाळ फळे खायला मिळतील यात शंका नाही. बारामती तालुक्यातील एका लहानश्या खेड्यातील #सचिन_घाडगे यांनी ७ रुपये रोजंदारीवर सुरु केलेला प्रवास आता वार्षिक ९ कोटीच्या उलाढालीवर आणलाय.👇
त्यांच्याकडून नक्कीच प्रेरणा घेता येईल. आई वडील दोघेही मजूर, वाट्याला फक्त १७ गुंठे शेती, सगळं कुटुंब दुसऱ्याच्या शेतात खुरपायला जायचं. सचिन सकाळी ७ ते १० मजुरी करायचे, तिथून घरी येऊन, आवरून मग शाळेला जायचे. या मजुरीचे ७ रुपये त्यांना मिळायचे. व्यवसाय करण्याची जिद्द मनात होती👇
ज्या काळात मराठ्यांच्या राज्यातील प्रशासनात मराठ्यांनाच काही अधिकार नव्हते, क्षत्रियांची गणती सुद्धा शुद्रांमध्येच केली जात होती त्या काळात शाहू महाराजांनी मराठ्यांना आणि बहुजन समाजाला प्रशासनात जागा दिली, क्षत्रियांना वेदोक्ताचे अधिकार मिळवून दिले आणि ब्राम्हण, युरोपीय आणि 👇
पारशी लोकांच्या मक्तेदारीला सुरुंग लावला. स्वातंत्र्याचा व्यापक अर्थ घेतला तर मला इथे शाहू महाराज #खऱ्या_स्वातंत्र्याचे_शिल्पकार वाटतात.
छत्रपती घराण्याचे ऐतिहासिक महत्व बघता मराठा संस्थानांमध्ये कोल्हापूरचे संस्थान अव्वल दर्जाचे असायला हवे होते, 👇
मात्र अल्पवयीन छत्रपतींच्या कारकिर्दीमुळे ही प्रतिष्ठा खालच्या स्तरावर गेली होती. छत्रपती फक्त नावाचे आणि कारभार ब्रिटिश नोकरशाहीच्या / परकीयांच्या हातात अशी राज्याची परिस्थिती होती. कोल्हापूर दरबारात ७१ सरकारी अधिकाऱ्यांपैकी ६० ब्राम्हण आणि ११ इतर आणि 👇
#खऱ्या_स्वातंत्र्याचे_शिल्पकार यामध्ये मी शाहू महाराजांवर लिहायला सुरवात करत आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जे शाहू महाराज हे शिवछत्रपतींचे वारसदार असून सुद्धा त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध आवाज उठवला नव्हता, स्वातंत्र्य चळवळीला उघड पाठिंबा दिला नव्हता, बंडखोरी केली नव्हती 👇
तरी ते #खऱ्या_स्वातंत्र्याचे_शिल्पकार कसे काय? पहिलं म्हणजे स्वातंत्र्याचा अर्थ फक्त ब्रिटिश सत्तेपासून मुक्तता एवढाच होत नाही. कोणत्याही बंधनातून मुक्तता किंवा अन्यायकारक परिस्थितीतून सुटका असा स्वातंत्र्याचा अर्थ मी घेतो. आणि शाहू महाराजांनी अनेक स्वातंत्र्ये मिळवून दिली 👇
म्हणून ते मला #खऱ्या_स्वातंत्र्याचे_शिल्पकार वाटतात.
दुसरं म्हणजे त्यांनी उघडपणे ब्रिटिशांविरुद्ध लढा का नाही उभारला? यासाठी आपल्याला तो काळ समजून घ्यावा लागेल. व्यापार, आरमार, सैन्यबळ, विज्ञान, तंत्रज्ञान अशा प्रत्येक क्षेत्रात ब्रिटिश प्रगत होते. 👇
#मूल्यशिक्षण : काळाची गरज
समाजात वावरताना आपण अनेक घटना पाहतो, ऐकतो. अल्पवयीन मुलांकडून चोरी, मारामाऱ्या, खून, बलात्कार असले गंभीर गुन्हे होत आहेत. आजकालची तरुण पिढी अल्पवयातच वाईट व्यसनांच्या आहारी चालली आहे. सामाजिक स्तरावर वाढत चाललेली ही विकृती, 👇
अनैतिकता हा एक प्रकारचा मोठा सामाजिक भूकंप आहे, जो समाजाचे आणि नीतिमूल्यांची मोठ्या प्रमाणावर नुकसान करत आहे. याची भयानकता किंवा दुष्परिणाम कमी करायचे असतील तर 'शालेय स्तरावरील प्रभावी मूल्यशिक्षण' हाच मोठा उपाय असू शकतो. तंत्रज्ञानाच्या युगामुळे बऱ्याच गोष्टी 👇
सोप्या झाल्या असल्या तरी अल्पवयीन मुलांचा किंवा तरुण पिढीचा मोबाईल-इंटरनेट यांसारख्या गोष्टींनी ताबा घेतला आहे. यामाध्यमातून चुकीच्या गोष्टी यांच्यासमोर येत आहेत. आणि नैतिकतेची पातळी खालावत आहे. यासाठी इयत्ता पहिली ते बारावी 'मूल्यशिक्षण' हा विषय अनिवार्य करणे गरजेचे आहे. 👇