ज्या काळात मराठ्यांच्या राज्यातील प्रशासनात मराठ्यांनाच काही अधिकार नव्हते, क्षत्रियांची गणती सुद्धा शुद्रांमध्येच केली जात होती त्या काळात शाहू महाराजांनी मराठ्यांना आणि बहुजन समाजाला प्रशासनात जागा दिली, क्षत्रियांना वेदोक्ताचे अधिकार मिळवून दिले आणि ब्राम्हण, युरोपीय आणि 👇
पारशी लोकांच्या मक्तेदारीला सुरुंग लावला. स्वातंत्र्याचा व्यापक अर्थ घेतला तर मला इथे शाहू महाराज #खऱ्या_स्वातंत्र्याचे_शिल्पकार वाटतात.
छत्रपती घराण्याचे ऐतिहासिक महत्व बघता मराठा संस्थानांमध्ये कोल्हापूरचे संस्थान अव्वल दर्जाचे असायला हवे होते, 👇
मात्र अल्पवयीन छत्रपतींच्या कारकिर्दीमुळे ही प्रतिष्ठा खालच्या स्तरावर गेली होती. छत्रपती फक्त नावाचे आणि कारभार ब्रिटिश नोकरशाहीच्या / परकीयांच्या हातात अशी राज्याची परिस्थिती होती. कोल्हापूर दरबारात ७१ सरकारी अधिकाऱ्यांपैकी ६० ब्राम्हण आणि ११ इतर आणि 👇
खाजगीच्या ५२ अधिकाऱ्यांपैकी ४५ ब्राम्हण व ७ इतर होते. इतर म्हणजे ब्रिटिश, हिंदी, ख्रिश्चन, पारशी इ.. मराठ्यांच्या राज्यात मराठ्यांनाच प्रशासनात स्थान नव्हते, अधिकार नव्हता. खेड्यापाड्यातील लहानात लहान अधिकाऱ्यांपासून ते कोर्टातील न्यायाधिशापर्यंत सर्वत्र ब्राम्हणशाही होती👇
आणि त्यामुळे गोरगरीब, सर्वसामान्य जनतेला न्याय मिळत नव्हता हे शाहू महाराजांच्या लक्षात आले. कोल्हापूरची गादी जरी काटेरी असली तरी शाहू महाराजांनी अत्यंत संयमाने, विवेकाने आणि न्यायप्रियतेने अगदी विश्वासाने पावले टाकायला सुरवात केली. "कोल्हापूर राज्याचे तुम्ही मालक आहात,👇
हे प्रत्येकाच्या ध्यानी प्रथमपासून आणून द्या आणि तुमच्या चांगुलपणाचा फायदा तुमच्या नोकरशहांना उठवू देऊ नका" हा गुरु फ्रेझर यांचा मंत्र महाराजांनी तंतोतंत पळाला. हळूहळू आपल्या पदाचा प्रभाव वाढवत नोकरशहांवर वचक निर्माण केला. ३-४ वर्षांत कोल्हापूर प्रशासनातील युरोपियन व 👇
पारशी मंडळी निघून गेली. प्रशासनातील युरोपियन आणि पारशी वर्चस्व अस्तास गेले. महाराजांनी पूर्वीचे 'राज-प्रतिनिधी मंडळ' बरखास्त करून 'प्रशासन मंडळ' नेमले आणि त्यावर आपणास हव्या असणाऱ्या व्यक्तींच्या नेमणुका केल्या. BA MA परीक्षांत पहिल्या वर्गात उत्तीर्ण झालेल्या 👇
संस्थानाबाहेरच्या तरुणास प्रशासनात स्थान देऊन महाराजांनी ब्राह्मणशाहीला सुरुंग लावला. पण पिढ्यानपिढ्या शिक्षणापासून वंचित असलेला बहुजन समाज महाराजांना हव्या असणाऱ्या 'उच्चविद्याविभुषित' तरुणांचा पुरवठा करू शकत नव्हता. म्हणून मग बहुजन समाजास शिक्षणाच्या सोयी निर्माण करण्याचे 👇
काम शाहू महाराजांनी हाती घेतले. कोल्हापूर संस्थानच्या कारभारात महाराजांनी आपली मजबूत पकड निर्माण केली आणि हे करत असताना ब्रिटिश सरकार सोबत आपले संबंध अधिक सौहार्दाचे व विश्वासाचे बनवले. यातूनच महाराजांना सम्राज्ञी व्हिकटोरीयाकडून GCSI हा किताब बहाल करण्यात आला.👇
राज्यकर्त्याला असणारे 'गुन्हेगाराला जीवदान अथवा फाशी देण्याचे अधिकार' यापूर्वीच्या कालखंडात ब्रिटिशांनी आपल्या हातात घेतले होते ते कोल्हापूरच्या छत्रपतींना परत देण्यात आले (१८९५). १८९९ साली कर्नल रे ने महाराजांवर विषप्रयोगाचा आरोप केला मात्र मुंबई सरकारने निष्पक्षपातीपणे 👇
चौकशी करून महाराजांना निर्दोष ठरवले. सम्राज्ञी व्हिकटोरीयाने कोल्हापूरच्या छत्रपतींना 'महाराजा' हा 'किताब बहाल केला (१९००). अवघ्या ५-७ वर्षांत शाहू महाराजांनी कोल्हापूच्या संस्थानाला प्रतिष्ठा मिळवून दिली.
👇
पुढील भागात वेदोक्ताचे प्रकरण समजून घेण्याचा प्रयत्न करूया.
#मूल्यशिक्षण : काळाची गरज
समाजात वावरताना आपण अनेक घटना पाहतो, ऐकतो. अल्पवयीन मुलांकडून चोरी, मारामाऱ्या, खून, बलात्कार असले गंभीर गुन्हे होत आहेत. आजकालची तरुण पिढी अल्पवयातच वाईट व्यसनांच्या आहारी चालली आहे. सामाजिक स्तरावर वाढत चाललेली ही विकृती, 👇
अनैतिकता हा एक प्रकारचा मोठा सामाजिक भूकंप आहे, जो समाजाचे आणि नीतिमूल्यांची मोठ्या प्रमाणावर नुकसान करत आहे. याची भयानकता किंवा दुष्परिणाम कमी करायचे असतील तर 'शालेय स्तरावरील प्रभावी मूल्यशिक्षण' हाच मोठा उपाय असू शकतो. तंत्रज्ञानाच्या युगामुळे बऱ्याच गोष्टी 👇
सोप्या झाल्या असल्या तरी अल्पवयीन मुलांचा किंवा तरुण पिढीचा मोबाईल-इंटरनेट यांसारख्या गोष्टींनी ताबा घेतला आहे. यामाध्यमातून चुकीच्या गोष्टी यांच्यासमोर येत आहेत. आणि नैतिकतेची पातळी खालावत आहे. यासाठी इयत्ता पहिली ते बारावी 'मूल्यशिक्षण' हा विषय अनिवार्य करणे गरजेचे आहे. 👇
#महात्मा_जोतीराव_फुले
भाग १
"महाराष्ट्रात एकोणिसाव्या शतकात समाजसुधारणेच्या संदर्भात ज्या काही चळवळी झाल्या आणि ज्यांच्या पुढाकाराने झाल्या त्यामध्ये महात्मा जोतीराव फुले यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल व त्यांना मानाचा मुजरा करावा लागेल." प्रसिद्ध शिक्षणतज्ञ विठ्ठलराव घाटे👇
यांचे हे वाक्य खूप काही सांगून जाते. त्या काळात संपूर्ण समाज वर्णव्यवस्थेच्या कुलंगड्यात अडकून पडलेला होता, सनातन्यांच्या कर्मकांडाला ऊत आला होता आणि ख्रिस्ती मिशनऱ्यांनी हळूहळू पाय पसरायला सुरवात केलेली होती. त्याच काळात बहुजन समाज अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ठ चालीरीती, रूढी,👇
परंपरा यांच्या कर्दमात खितपत होता. दुःख व दारिद्रय त्यांची पाठ सोडायला तयार नव्हते; अशावेळी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे जोतीरावांनी ओळखले. राजकीय गुलामगिरीपेक्षाही सामाजिक व मानसिक गुलामगिरी ही भयानक असते; त्यामुळे शोषितांच्या वाट्याला जनावरासारखे जगणे येते, शोषकांचे हिंस्त्र👇
#बेरोजगार आहात? स्वतःचा #व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत आहात? व्यवसाय काय करावा हे सुचत नाहीये? नवीन कल्पना शोधत आहात? मग हे नक्की वाचा :
व्यवसाय म्हणजे मोठी रिस्क, व्यवसाय म्हणजे २४X७ ची नोकरी हे आपण ऐकलेच असेल.
👇
खूप सारे नवीन व्यवसाय, नवीन #स्टार्टअप्स चालू झालेले आपण पाहिले असतील. ७०% नवीन व्यवसाय एका वर्षात बंद पडतात हेही ऐकलं असेल. नवीन व्यवसाय उभारताना रिस्क कमी करण्यासाठी, चांगली कल्पना शोधण्यासाठी आणि व्यवसाय उभारण्यासाठी या काही टिप्स -
👇
१. व्यवसाय करायचा असेल तर पहिल्यांदा ग्राहकाची #गरज ओळखायला शिका. आपला ग्राहक कोण असावा हे ठरवा, त्यानुसार त्यांच्या गरजा त्यांचे प्रश्न काय आहेत हे समजून घ्या. एकदा का तुम्हाला ग्राहकाच्या गरजा समजल्या की त्या आपण कशा पूर्ण करू शकतो याचा विचार करा.
👇
पृथ्वीचा सूर्याभोवती परिभ्रमणाचा काळ ३६५ दिवस ५ तास ४८ मिनिटे आणि साडे ४७ सेकंद एवढा आहे. या काळात इंग्रजी कॅलेंडरचे बारा महिने पूर्ण होतात. (इंग्रजी कॅलेंडर पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यावर आधारित आहे.)
👇
भारतीय पंचांग चंद्रमास प्रमाणे चालते. चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्यावर आधारलेले १२ चांद्र मास मात्र ३५४ दिवसांत पूर्ण होतात. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील चांद्र मास हे अमावस्येला संपणारे असतात. (इतर राज्यांत पौर्णिमेला)
👇
चंद्राचा अमावस्या ते अमावस्या असा परिभ्रमण काळ २९.५३०५९ दिवस आहे. असे १२ महिने झाले की ३५४.३६ दिवस होतात. सौरवर्ष हे अर्थातच ३६५.२५ दिवसाचे असते. ह्यातून १२ चांद्रमास वजा केल्यास १०.८९ दिवसाचा फरक येतो. त्यामुळे दर ३ वर्षांनी ३२.६७ दिवसांचा फरक पडतो.
👇
फेब्रुवारी महिन्यात फक्त २८ दिवसच का? चार वर्षातून एकदा येणारा लीप डे फेब्रुवारी मध्येच का येतो? समजून घेण्यासाठी हे नक्की वाचा -
पूर्वी एक वर्ष हे ३०६ दिवसांचे आहे असे मानले जायचे. त्याप्रमाणे पूर्वी एका वर्षात फक्त १० महिने होते.
👇
वर्षाचा पहिला महिना मार्च असायचा. मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर असे १० महिने पूर्वी मोजले जायचे. नंतर लक्षात आले की एक वर्ष हे ३०६ दिवसांचे नसून ३६५ दिवसांचे आहे.
👇
राहिलेले ५९ दिवस मोजण्यासाठी, डिसेंबर नंतर जानेवारी घेतला गेला ज्यात ३१ दिवस गणले गेले. त्यानंतर फेब्रुवारी मध्ये राहिलेले २८ दिवस गणले गेले. म्हणजेच पूर्वीच्या काळी फेब्रुवारी हा महिना वर्षाचा शेवटचा महिना होता.
👇
लोकांचा नाझी पक्षाला पाठिंबा आहे, हे दर्शवण्यासाठी रोड शोज आणि मोठे इव्हेंट आयोजित केले जायचे. त्या वेळी नेत्यांची भाषणं व्हायची. देशात सर्वकाही कसं चांगलं आहे (सब चंगा सी), अशा प्रकारच्या भाषणांची उजळणी या ठिकाणी केली जायची.
👇
हिटलरच्या वाढदिवशीदेखील मोठे कार्यक्रम आयोजित केले जायचे. 1936 मध्ये ऑलिंपिकचं आयोजन करण्यात आलं होतं. जर्मन सरकार कसं यशस्वी आहे, हे दाखवण्याची आयती संधीच या कार्यक्रमातून गोबेल्सच्या हाती आली होती.
👇
त्याने तिचा पुरेपूर वापर केला आणि आर्यन वंश कसा शक्तिशाली आहे, हे देखील दाखवण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून केला गेला. कला आणि कलाकार दोन्हीवर सरकारचं नियंत्रण हवं, असं या प्रचार मंत्रालयाला वाटायचं.
👇