#नोकरी करण्यापेक्षा नोकरी निर्माण करणारे का होऊ नये? कोणताही व्यवसाय मनापासून, प्रामाणिकपणे आणि चिकाटीने केला तर तो नक्कीच चांगला बहरतो, अनेकांच्या हाताला काम मिळवून देतो, शेकडो मध्ये सुरु झालेला प्रवास लाखो-करोडोंच्या उलाढाली करून दाखवतो. आजच्या वाढत्या बेरोजगारीच्या काळात👇
स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय सुरु करून त्याला मेहनीतीची जोड दिल्यास नक्कीच रसाळ फळे खायला मिळतील यात शंका नाही. बारामती तालुक्यातील एका लहानश्या खेड्यातील #सचिन_घाडगे यांनी ७ रुपये रोजंदारीवर सुरु केलेला प्रवास आता वार्षिक ९ कोटीच्या उलाढालीवर आणलाय.👇
त्यांच्याकडून नक्कीच प्रेरणा घेता येईल. आई वडील दोघेही मजूर, वाट्याला फक्त १७ गुंठे शेती, सगळं कुटुंब दुसऱ्याच्या शेतात खुरपायला जायचं. सचिन सकाळी ७ ते १० मजुरी करायचे, तिथून घरी येऊन, आवरून मग शाळेला जायचे. या मजुरीचे ७ रुपये त्यांना मिळायचे. व्यवसाय करण्याची जिद्द मनात होती👇
त्यामुळे सचिन यांनी विट बनवायची मशीन, ट्रॅक्टर, कॅटल फीड्स असे व्यवसाय केले पण त्यात त्यांना म्हणावे असे यश आले नाही. प्रत्येकाला सुरवातीच्या दिवसात व्यवसायात उभे राहण्यासाठी संघर्ष हा करावाच लागतो त्याला सचिन सुद्धा अपवाद नव्हते. पुढे त्यांनी पुण्यातील मिटकॉन मध्ये 👇
२ महिन्याचे ट्रेनिंग घेतले आणि त्यांच्या लक्षात आले की आपल्याला दूध सहजरित्या आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध होऊ शकते. मग ते डेअरी व्यवसायात उतरले. दूध संकलन करायला सुरु केले, हळूहळू खावा आणि कुल्फी बनवायला सुरवात केली. ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला. मग १७ गुंठे परिसरात 👇
दुधाचे पदार्थ बनवणारे युनिट उभे केले. त्यांच्याकडे जवळपास २५०० लिटर दूध संकलन होते, त्यातले १२०० ते १३०० लिटर दूध पॅकिंग करून विकले जाते आणि राहिलेले दुधाचे पदार्थ बनवण्यासाठी वापरले जाते. जवळपास ५०० लिटर म्हैशीच्या दुधाचे श्रीखंड, आम्रखंड, दही, लस्सी असे पदार्थ बनवले जातात.👇
सचिन यांनी सुरु केलेला #माय_सह्याद्री हा ब्रँड श्रीखंड, आम्रखंड, खावा, बासुंदी, पनीर, दही, लस्सी, तूप, लोणी, कुल्फी, कॉरनॅटो एवढे पदार्थ बनवतो. सचिन सुरवातीच्या काळात ग्राहकांना आपले पदार्थ खायला देऊन प्रतिक्रिया विचारायचे. जेव्हा ग्राहक उत्तम प्रतिसाद देतील तेव्हाच मग 👇
त्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरु करायचे. ग्राहकांना काय आवडतंय हे लक्षात घेतल्यामुळे ग्राहकांचा चांगला प्रतिसाद त्यांना मिळू लागला. आज या व्यवसायातून सचिन वर्षाला ९ कोटी रुपयांची उलाढाल करतात त्याचसोबत ३० लोकांना रोजगार या माध्यमातून उपलब्ध झालेला आहे, तसेच पुणे परिसरात👇
'माय सह्याद्री' च्या १५ फ्रँचायझी आहेत.अपयशाने खचून न जाता जिद्दीने व्यवसाय करत राहिलं आणि त्याला प्रामाणिकपणा, कल्पकता यांची जोड दिली तर नक्कीच यश मिळते हेच यातून शिकता येईल.
'क्षत्रीय कुलावतंस हिंदुपदपातशहा' अशी बिरुदावली असणाऱ्या छत्रपतींना एका भटजीने 'शूद्र' म्हणून हिणवले. इथेच वेदोक्ताची ठिणगी पडली आणि छत्रपती शाहू महाराज सामाजिक बंडखोरीस उद्युक्त झाले. १८९९ मध्ये कोल्हापुरात हे प्रकरण सुरु झाले, नंतर एक-दोन वर्षात याचा भडका उडाला आणि 👇
यातून तीव्र सामाजिक संघर्ष उभा राहिला. या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आणि शाहू महाराज हे बहुजन समाजाचे उद्धारक म्हणून जनतेसमोर आले.
हे प्रकरण समजून घेताना आपण आधी वेदोक्ताची पार्श्वभूमी समजून घेऊया.
वेदोक्त म्हणजे काय?
वेदोक्त म्हणजे वेदांत सांगितल्याप्रमाणे.👇
ब्राम्हण श्रेष्ठत्वाचा सिद्धांत समाजाच्या माथी मारण्यासाठी शेकडो वर्षांपासून धर्मशास्त्रांचे ग्रंथ, मनुस्मृती, पुराणे वगैरे निर्माण केली गेली. "ब्राम्हण व्यक्ती अविद्वान असो की विद्वान असो, ते मोठे दैवत आहे" असे मनुस्मृती मध्ये सांगितले गेले.👇
ज्या काळात मराठ्यांच्या राज्यातील प्रशासनात मराठ्यांनाच काही अधिकार नव्हते, क्षत्रियांची गणती सुद्धा शुद्रांमध्येच केली जात होती त्या काळात शाहू महाराजांनी मराठ्यांना आणि बहुजन समाजाला प्रशासनात जागा दिली, क्षत्रियांना वेदोक्ताचे अधिकार मिळवून दिले आणि ब्राम्हण, युरोपीय आणि 👇
पारशी लोकांच्या मक्तेदारीला सुरुंग लावला. स्वातंत्र्याचा व्यापक अर्थ घेतला तर मला इथे शाहू महाराज #खऱ्या_स्वातंत्र्याचे_शिल्पकार वाटतात.
छत्रपती घराण्याचे ऐतिहासिक महत्व बघता मराठा संस्थानांमध्ये कोल्हापूरचे संस्थान अव्वल दर्जाचे असायला हवे होते, 👇
मात्र अल्पवयीन छत्रपतींच्या कारकिर्दीमुळे ही प्रतिष्ठा खालच्या स्तरावर गेली होती. छत्रपती फक्त नावाचे आणि कारभार ब्रिटिश नोकरशाहीच्या / परकीयांच्या हातात अशी राज्याची परिस्थिती होती. कोल्हापूर दरबारात ७१ सरकारी अधिकाऱ्यांपैकी ६० ब्राम्हण आणि ११ इतर आणि 👇
#मूल्यशिक्षण : काळाची गरज
समाजात वावरताना आपण अनेक घटना पाहतो, ऐकतो. अल्पवयीन मुलांकडून चोरी, मारामाऱ्या, खून, बलात्कार असले गंभीर गुन्हे होत आहेत. आजकालची तरुण पिढी अल्पवयातच वाईट व्यसनांच्या आहारी चालली आहे. सामाजिक स्तरावर वाढत चाललेली ही विकृती, 👇
अनैतिकता हा एक प्रकारचा मोठा सामाजिक भूकंप आहे, जो समाजाचे आणि नीतिमूल्यांची मोठ्या प्रमाणावर नुकसान करत आहे. याची भयानकता किंवा दुष्परिणाम कमी करायचे असतील तर 'शालेय स्तरावरील प्रभावी मूल्यशिक्षण' हाच मोठा उपाय असू शकतो. तंत्रज्ञानाच्या युगामुळे बऱ्याच गोष्टी 👇
सोप्या झाल्या असल्या तरी अल्पवयीन मुलांचा किंवा तरुण पिढीचा मोबाईल-इंटरनेट यांसारख्या गोष्टींनी ताबा घेतला आहे. यामाध्यमातून चुकीच्या गोष्टी यांच्यासमोर येत आहेत. आणि नैतिकतेची पातळी खालावत आहे. यासाठी इयत्ता पहिली ते बारावी 'मूल्यशिक्षण' हा विषय अनिवार्य करणे गरजेचे आहे. 👇
#महात्मा_जोतीराव_फुले
भाग १
"महाराष्ट्रात एकोणिसाव्या शतकात समाजसुधारणेच्या संदर्भात ज्या काही चळवळी झाल्या आणि ज्यांच्या पुढाकाराने झाल्या त्यामध्ये महात्मा जोतीराव फुले यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल व त्यांना मानाचा मुजरा करावा लागेल." प्रसिद्ध शिक्षणतज्ञ विठ्ठलराव घाटे👇
यांचे हे वाक्य खूप काही सांगून जाते. त्या काळात संपूर्ण समाज वर्णव्यवस्थेच्या कुलंगड्यात अडकून पडलेला होता, सनातन्यांच्या कर्मकांडाला ऊत आला होता आणि ख्रिस्ती मिशनऱ्यांनी हळूहळू पाय पसरायला सुरवात केलेली होती. त्याच काळात बहुजन समाज अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ठ चालीरीती, रूढी,👇
परंपरा यांच्या कर्दमात खितपत होता. दुःख व दारिद्रय त्यांची पाठ सोडायला तयार नव्हते; अशावेळी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे जोतीरावांनी ओळखले. राजकीय गुलामगिरीपेक्षाही सामाजिक व मानसिक गुलामगिरी ही भयानक असते; त्यामुळे शोषितांच्या वाट्याला जनावरासारखे जगणे येते, शोषकांचे हिंस्त्र👇
#बेरोजगार आहात? स्वतःचा #व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत आहात? व्यवसाय काय करावा हे सुचत नाहीये? नवीन कल्पना शोधत आहात? मग हे नक्की वाचा :
व्यवसाय म्हणजे मोठी रिस्क, व्यवसाय म्हणजे २४X७ ची नोकरी हे आपण ऐकलेच असेल.
👇
खूप सारे नवीन व्यवसाय, नवीन #स्टार्टअप्स चालू झालेले आपण पाहिले असतील. ७०% नवीन व्यवसाय एका वर्षात बंद पडतात हेही ऐकलं असेल. नवीन व्यवसाय उभारताना रिस्क कमी करण्यासाठी, चांगली कल्पना शोधण्यासाठी आणि व्यवसाय उभारण्यासाठी या काही टिप्स -
👇
१. व्यवसाय करायचा असेल तर पहिल्यांदा ग्राहकाची #गरज ओळखायला शिका. आपला ग्राहक कोण असावा हे ठरवा, त्यानुसार त्यांच्या गरजा त्यांचे प्रश्न काय आहेत हे समजून घ्या. एकदा का तुम्हाला ग्राहकाच्या गरजा समजल्या की त्या आपण कशा पूर्ण करू शकतो याचा विचार करा.
👇
पृथ्वीचा सूर्याभोवती परिभ्रमणाचा काळ ३६५ दिवस ५ तास ४८ मिनिटे आणि साडे ४७ सेकंद एवढा आहे. या काळात इंग्रजी कॅलेंडरचे बारा महिने पूर्ण होतात. (इंग्रजी कॅलेंडर पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यावर आधारित आहे.)
👇
भारतीय पंचांग चंद्रमास प्रमाणे चालते. चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्यावर आधारलेले १२ चांद्र मास मात्र ३५४ दिवसांत पूर्ण होतात. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील चांद्र मास हे अमावस्येला संपणारे असतात. (इतर राज्यांत पौर्णिमेला)
👇
चंद्राचा अमावस्या ते अमावस्या असा परिभ्रमण काळ २९.५३०५९ दिवस आहे. असे १२ महिने झाले की ३५४.३६ दिवस होतात. सौरवर्ष हे अर्थातच ३६५.२५ दिवसाचे असते. ह्यातून १२ चांद्रमास वजा केल्यास १०.८९ दिवसाचा फरक येतो. त्यामुळे दर ३ वर्षांनी ३२.६७ दिवसांचा फरक पडतो.
👇