मासिक पाळीच्या दिवसांत स्त्री खरंच अपवित्र किंवा अशुद्ध असते का?
उत्तर : अजिबात नाही. मासिक पाळीचे चक्र महिन्याच्या पहिल्या दिवसापासून महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत चालूच असते, त्यामुळे रक्तस्राव होण्याच्या ४ दिवसांपुरती स्त्री अपवित्र आणि इतर दिवशी पवित्र असं असूच शकत नाही.👇
ज्याप्रमाणे आपण अन्न खातो, ते पचवतो त्यातून ऊर्जा तयार होते आणि नको असलेल्या गोष्टी आपले शरीर बाहेर फेकते, हे जसे एक चक्र आहे तसेच मासिक पाळी हे देखील एक चक्र आहे. साधारण २८ ते ३२ दिवसांचे हे चक्र असते, ज्यामध्ये स्त्रीबीज तयार होऊन त्याची वाढ होते. 👇
परिपक्व झालेले स्त्रीबीज मासिक पाळीच्या शेवटच्या टप्प्यात रक्तस्रावाच्या स्वरूपात बाहेर फेकले जाते आणि पुन्हा नवीन स्त्रीबीज निर्माण होऊन परिपक्व होण्याची प्रक्रिया सुरु होते. ही सगळी प्रक्रिया का होते? तर गर्भधारणेसाठी होते. गर्भधारणा झाली नाही तर मग ते स्त्रीबीज शरीराबाहेर👇
फेकले जाते. जसं आपल्या शरीराला ऑक्सिजनची गरज असते म्हणून आपला श्वासोच्छवास सतत चालू असतो तसं गर्भधारणेसाठी स्त्रीबीज तयार होण्याची प्रक्रिया सतत चालू असते. श्वासोच्छवासाचे चक्र काही सेकंदाचे असते तर मासिक पाळीचे चक्र महिन्याभराचे असते.👇
थोडक्यात काय तर जशा इतर नैसर्गिक क्रिया आहेत तशीच मासिक पाळी ही एक नैसर्गिक क्रिया आहे. जसं शरीरातून नको असलेले घटक शरीर आपोआप बाहेर फेकते (उदा. मल, मूत्र, कफ इत्यादी) तसं परिपक्व झालेले स्त्रीबीज स्त्री चे शरीर रक्ताच्या स्वरूपात बाहेर फेकते आणि नवीन स्त्रीबीज बनवण्याची 👇
प्रक्रिया सुरु करते. मासिक पाळीच्या ४ दिवसांत रक्तस्राव होत असल्याने स्त्रियांना शारीरिक वेदना होतात, अशक्तपणा जाणवतो. एकंदरीतच त्यांना या काळात विश्रांतीची गरज असते. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती होती, एका महिलेला मासिक पाळी आलेली असेल तर तिला पूर्णपणे विश्रांती घेण्यास👇
सांगितले जायचे, कारण घरात इतर महिला असायच्या कामे करायला. आपला समाज मोठ्या प्रमाणात अशिक्षित होता त्यामुळे ज्यांनी कोणी प्रथा परंपरा निर्माण केल्या त्यांनी समाजाला शास्त्रीय कारण समजून सांगायचे कष्ट घेतले नसावेत. देवाचे नाव जोडले की लोक ऐकतात या ठोकताळ्याने👇
"मासिक पाळीच्या दिवसांत स्त्री अपवित्र असते, अशुद्ध असते, तिने एका बाजूला बसावे, कशाला हात लावू नये, इ." सांगितले असावे. स्त्रीला मासिक पाळीच्या दिवसांत सक्तीची विश्रांती मिळावी हा त्यांचा चांगला हेतू असावा परंतु काळानुसार तो हेतू बाजूला पडत गेला आणि ती एक अनिष्ठ प्रथा बनली👇
(अर्थातच अशिक्षित समाज आणि विकृत मानसिकता यामुळे). समाजमनावर ती एवढी खोलवर रुजली की आजही शिकल्या सवरलेल्या स्त्रिया मासिक पाळीमध्ये शुभकार्य करत नाहीत. आजही बहुतांश लोकांना मासिक पाळीबद्दल गैरसमज आहेत. खरंतर शिकलेल्या मुलींनी, महिलांनी स्वतःच्या घरापासून मासिक पाळीबद्दलचा 👇
गैरसमज दूर करायला सुरवात करायला हवी. एक साधा विचार आपण करायला हवा की मासिक पाळी हा गर्भधारणा किंवा प्रजनन या प्रक्रियेचा एक भाग आहे. तुम्ही, आम्ही, आपण सगळेच या प्रक्रियेमुळे जन्माला आलेलो आहोत. मग जर मासिक पाळी / मासिक पाळीच्या दिवसांत स्त्री अशुद्ध आणि अपवित्र असेल👇
तर मग त्या प्रक्रियेमधून जन्मलेलो आपण सगळे पवित्रच / अशुध्दच नाही का? जर मासिक पाळीमुळे स्त्री अशुद्ध / अपवित्र होणार असेल तर स्त्रीच्या पोटी जन्माला आलेलो आपण सगळे अशुद्ध आणि पवित्रच नाही का?
#राजर्षी_विरुद्ध_लोकमान्य #शत्रुत्व_आणि_ममत्व
गेल्या शतकातील पहिल्या दोन दशकात महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर छत्रपती शाहू महाराज आणि लोकमान्य टिळक या दोन महापुरुषांचा उदय झाला. शाहू महाराजांना राजकीय स्वातंत्र्यापेक्षा मानवमुक्ती करणारे स्वातंत्र्य आणि 👇
सामाजिक सुधारणा जास्त महत्वाच्या वाटत होत्या तर लोकमान्य टिळकांना राजकीय स्वातंत्र्य अधिक गरजेचे वाटत होते. ही दोन्ही स्वातंत्र्ये एकमेकांस पूरक आहेत याची जाणीव या दोन्ही महापुरुषांना होती तरीही एकमेकांच्या हातात हात घालून काम करण्याऐवजी एकमेकांशी दोन हात करण्याची परिस्थिती 👇
त्यांच्यासमोर उभी राहिली हे खरंतर महाराष्ट्राचं दुर्दैव. तसं पाहिलं तर लोकमान्यांच्या मनात कोल्हापूरच्या गादीविषयी प्रचंड आदर होता. या आदरापोटीच त्यांनी व आगरकरांनी चौथ्या शिवाजी महाराजांवर होणाऱ्या अत्याचाराला 'केसरी' मधून वाचा फोडली. यात त्यांना दिवाण बर्व्यांचा रोष 👇
दहावीला जरा बरे मार्क पडले म्हणून विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. काॅलेजच्या पहिल्याच दिवशी केसांत गुलाबाचं फुल माळून तु आली होतीस. तुझ्या देखण्या रूपाला गुलाबाच्या फुलाने साज चढवला होता. साध्या पंजाबी ड्रेस मध्ये तु खूपच भारी दिसायचीस. मी तेव्हाच तुझ्या प्रेमात पडलो होतो. 👇
वर्गात मी चौथ्या बेंचवर बसायचो आणि तिथून मुलींच्या ओळीत पहिल्या बेंचवर बसलेल्या तुला सारखं सारखं बघायचो. जगताप सरांनी तर खूप वेळा मला तुझ्याकडे बघत बसलेलो असताना पकडलंय. तु नेहमी केसांत गुलाबाचं फुल माळायचीस त्यावरून मी ओळखून गेलो की तुला गुलाबाचं फुल आवडतं. 👇
राहूल्याने मला आयडिया दिली आणि तुला गुलाबाचं फुल देऊन प्रपोज करायचं असं मी ठरवलं. बारावीची परिक्षा झाली तरी माझं धाडस काय झालं नाही. खचनाळे काकूंच्या दारातील गुलाबाचं फुल मी रोज चोरून आणायचो पण ते फुलं वहितच राहायचं, तुला देण्याचं धाडस कधी झालं नाही. निकालाची मी वाट बघत होतो. 👇
'क्षत्रीय कुलावतंस हिंदुपदपातशहा' अशी बिरुदावली असणाऱ्या छत्रपतींना एका भटजीने 'शूद्र' म्हणून हिणवले. इथेच वेदोक्ताची ठिणगी पडली आणि छत्रपती शाहू महाराज सामाजिक बंडखोरीस उद्युक्त झाले. १८९९ मध्ये कोल्हापुरात हे प्रकरण सुरु झाले, नंतर एक-दोन वर्षात याचा भडका उडाला आणि 👇
यातून तीव्र सामाजिक संघर्ष उभा राहिला. या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आणि शाहू महाराज हे बहुजन समाजाचे उद्धारक म्हणून जनतेसमोर आले.
हे प्रकरण समजून घेताना आपण आधी वेदोक्ताची पार्श्वभूमी समजून घेऊया.
वेदोक्त म्हणजे काय?
वेदोक्त म्हणजे वेदांत सांगितल्याप्रमाणे.👇
ब्राम्हण श्रेष्ठत्वाचा सिद्धांत समाजाच्या माथी मारण्यासाठी शेकडो वर्षांपासून धर्मशास्त्रांचे ग्रंथ, मनुस्मृती, पुराणे वगैरे निर्माण केली गेली. "ब्राम्हण व्यक्ती अविद्वान असो की विद्वान असो, ते मोठे दैवत आहे" असे मनुस्मृती मध्ये सांगितले गेले.👇
#नोकरी करण्यापेक्षा नोकरी निर्माण करणारे का होऊ नये? कोणताही व्यवसाय मनापासून, प्रामाणिकपणे आणि चिकाटीने केला तर तो नक्कीच चांगला बहरतो, अनेकांच्या हाताला काम मिळवून देतो, शेकडो मध्ये सुरु झालेला प्रवास लाखो-करोडोंच्या उलाढाली करून दाखवतो. आजच्या वाढत्या बेरोजगारीच्या काळात👇
स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय सुरु करून त्याला मेहनीतीची जोड दिल्यास नक्कीच रसाळ फळे खायला मिळतील यात शंका नाही. बारामती तालुक्यातील एका लहानश्या खेड्यातील #सचिन_घाडगे यांनी ७ रुपये रोजंदारीवर सुरु केलेला प्रवास आता वार्षिक ९ कोटीच्या उलाढालीवर आणलाय.👇
त्यांच्याकडून नक्कीच प्रेरणा घेता येईल. आई वडील दोघेही मजूर, वाट्याला फक्त १७ गुंठे शेती, सगळं कुटुंब दुसऱ्याच्या शेतात खुरपायला जायचं. सचिन सकाळी ७ ते १० मजुरी करायचे, तिथून घरी येऊन, आवरून मग शाळेला जायचे. या मजुरीचे ७ रुपये त्यांना मिळायचे. व्यवसाय करण्याची जिद्द मनात होती👇
ज्या काळात मराठ्यांच्या राज्यातील प्रशासनात मराठ्यांनाच काही अधिकार नव्हते, क्षत्रियांची गणती सुद्धा शुद्रांमध्येच केली जात होती त्या काळात शाहू महाराजांनी मराठ्यांना आणि बहुजन समाजाला प्रशासनात जागा दिली, क्षत्रियांना वेदोक्ताचे अधिकार मिळवून दिले आणि ब्राम्हण, युरोपीय आणि 👇
पारशी लोकांच्या मक्तेदारीला सुरुंग लावला. स्वातंत्र्याचा व्यापक अर्थ घेतला तर मला इथे शाहू महाराज #खऱ्या_स्वातंत्र्याचे_शिल्पकार वाटतात.
छत्रपती घराण्याचे ऐतिहासिक महत्व बघता मराठा संस्थानांमध्ये कोल्हापूरचे संस्थान अव्वल दर्जाचे असायला हवे होते, 👇
मात्र अल्पवयीन छत्रपतींच्या कारकिर्दीमुळे ही प्रतिष्ठा खालच्या स्तरावर गेली होती. छत्रपती फक्त नावाचे आणि कारभार ब्रिटिश नोकरशाहीच्या / परकीयांच्या हातात अशी राज्याची परिस्थिती होती. कोल्हापूर दरबारात ७१ सरकारी अधिकाऱ्यांपैकी ६० ब्राम्हण आणि ११ इतर आणि 👇
#खऱ्या_स्वातंत्र्याचे_शिल्पकार यामध्ये मी शाहू महाराजांवर लिहायला सुरवात करत आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जे शाहू महाराज हे शिवछत्रपतींचे वारसदार असून सुद्धा त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध आवाज उठवला नव्हता, स्वातंत्र्य चळवळीला उघड पाठिंबा दिला नव्हता, बंडखोरी केली नव्हती 👇
तरी ते #खऱ्या_स्वातंत्र्याचे_शिल्पकार कसे काय? पहिलं म्हणजे स्वातंत्र्याचा अर्थ फक्त ब्रिटिश सत्तेपासून मुक्तता एवढाच होत नाही. कोणत्याही बंधनातून मुक्तता किंवा अन्यायकारक परिस्थितीतून सुटका असा स्वातंत्र्याचा अर्थ मी घेतो. आणि शाहू महाराजांनी अनेक स्वातंत्र्ये मिळवून दिली 👇
म्हणून ते मला #खऱ्या_स्वातंत्र्याचे_शिल्पकार वाटतात.
दुसरं म्हणजे त्यांनी उघडपणे ब्रिटिशांविरुद्ध लढा का नाही उभारला? यासाठी आपल्याला तो काळ समजून घ्यावा लागेल. व्यापार, आरमार, सैन्यबळ, विज्ञान, तंत्रज्ञान अशा प्रत्येक क्षेत्रात ब्रिटिश प्रगत होते. 👇