#काकूंची_मुलाखत
मराठी ट्विटर वरील 'वर्ल्ड फेमस' शेलिब्रिटी काकूंची मुलाखत घेणे हे काही येऱ्या गाबाळ्याचे काम नाही,
पण ते आम्ही शिताफीने पार पाडले.
अर्थात काकू फारच बिजी असतात,
'निलंग्यात' आहेत की 'भोसरीत' याची खातरी करून अपॉइंटमेंट घेऊनच आम्ही भोसरीला पोहोचलो
घरी (भाड्याच्या) पोहोचताच काकूंनी आपल्या परिचित इष्टाईल मध्ये स्मितहास्य करत आमचे स्वागत केले
घर भाड्याचे असले तरी खानदानी श्रीमंतीच्या खाणाखुणा घरभर दिसत होत्या
काकू एका उंची (उंच नव्हे हं!) सोफ्यावर बसल्या आणि आम्हास समोरच्या सोफ्यावर (तो ही अर्थात उंचीच!) बसण्याचा
आदेश वजा हुकूम दिला.
काका दिसत नव्हते. एकतर पहिल्या शिफ्ट ला गेले असणार किंवा नाईट करून झोपले असणार याचा अचूक अंदाज आमच्या अंतर्मनाने लावला.
चि. मंगेश टेबलावर (अर्थातच उंची) काहीतरी चित्र रेखाटत होता.(ते ही कोणाचे असेल हे न पाहताच आमच्या अंतर्मनाने अचूक हेरले)
काकू पोह्याची प्लेट व चहा आदरातिथ्याने देत बोलल्या 'पोहे व चहा तुमच्या काकांनी कामावर जायच्या आधी बनवला आहे. अप्रतिमच असणार'
(पोह्याची प्लेट त्यातला चमचा, पाण्याचा तांब्या चांदीचा असल्याचा भास ? आम्हास झाला)
आणि हो, पाण्याचा नळ आता आम्ही घरीच जोडलाय हे सांगायला
काकू विसरल्या नाहीत.
काकू(पूर्ण तयारीने)- हं आता विचारा काय विचारायचं ते
आम्ही- 'ई. स.पू. ४२०' मध्ये आपण निलंग्याहून इकडे आलात अशी ट्विटर च्या इतिहासात चर्चा आहे.
काकू- ट्विटर वरच्या काही 'लफग्यांनी' ही अफवा मुद्दाम पसरविली आहे. (आम्ही त्यातले नाही हं काकू असं उगीचच बोललो)
आम्ही काही वर्षांपूर्वीच इथे आलो आहे.
आम्ही- नाही म्हणजे ट्विटर वर खूप चर्चा आहे की आपण भाड्याच्या ...
(काकूंनी आमचं वाक्य पूर्णच होऊ दिलं नाही)
काकू(त्वेषाने) - हो हो आम्ही इथे भाड्यानेच राहतो, पण गावाकडे आमचा ४०-४५ कोटींचा वाडा आहे,
(आपला उंची फोन काढत काकू म्हणाल्या)
फार तर खात्री करून घ्या, नाही म्हणजे निर्मला ताईंनी कालच बजेट मांडलंय अजून २-३ कोटींनी महागला असेल आमचा वाडा.
(काकूंच्या मोबाईल च्या मागे सफरचंदाचे उर्फ 'apple' चे 'चिपकविलेले' चिन्ह पाहूनच आमची खात्री पटली, असेल बुवा ४०-४५ कोटींचा वाडा)
आम्ही- जाऊ द्या काकू लोक काहीही बोलतात
बरं पुढचा प्रश्न,
आपल्याला कोणती फुले आवडतात?
पण 'फुले' शब्द ऐकताच काकूंचा चेहरा रागाने फुलून गेला.
नाव नका काढू त्या स...च
आम्हालाच समजेना आमचं काय चुकलं ते
आम्ही सारवासारव करत म्हंटलं,
पण काकू आमच्या 'मानसी' (मनी)
असं काहीच नाही हो.
पुन्हा काकूंनी दुप्पट रागाने आमच्याकडे बघितलं
आम्ही सोफ्यावर जरा मागे सरकून विषय बदलत म्हंटलं,
बरं काकू फुलांचं जाऊ द्या , तुम्हाला संत्रे आवडतात ? नाही म्हणजे एक डझन घेऊन आलोय तुमच्यासाठी.
काकू (चौपट रागात) - अच्छा संत्री, फुले, म्हणजे त्या 'नागपूरवाली' कडून आमची सुपारी
घेऊन आलात तर?
आम्ही (केविलवाण्या अवस्थेत)- नाही हो , बरं जाऊ द्या काकू ते 'टिकली ' प्रकरणावर आपलं काय म्हणणं आहे ?
आता काकू थोड्या शांत झाल्या, (चांदीच्या ग्लासातून पाणी पीत) काकू बोलल्या,
काही नाही हो ट्विटर वरच्या एका 'भगिणीला' सल्ला दिला, जीन्स टॉप घालतेस ते ठीक आहे,
पण त्यावर टिकली लावत जा.
तर म्हणते कशी, जीन्स वर टिकली शोभत नाही.
मग मी ही म्हंटलं 'अगं भ.... टिकली जीन्स वर नाही कपाळावर लावायची असते' आता सांगा माझं काही चुकलं का? म्हणत काकूंनी घड्याळाकडे (अर्थातच उंची) पहात वेळ संपल्याचं खुनावलं.
आम्हालाही माहिती आहे की काकूंना
ट्विटर वर खूप काम असतं , म्हणून आम्हीही आवरत घेत उठून धन्यवाद काकू म्हंटलं
जाता जाता काकूंनी विचारलं, मुलाखत कोणत्या पेप्रात येणार? म्हणजे शेजारच्या वाचनालयात जाऊन वाचायला आवडेल बरं.
आम्ही- पेपरात नाही, ट्विटर वरच येणार
दिनांक-०४/०२/२०२१
वेळ- दुपारी ३.००
राजकारणाच्या चौकात #भाजी'पाल' (भाजी विक्रेता) भाज्या घेऊन बसला होता
त्यात एक 'फळांचा राजा', एक 'फळांचा उपराजा', मोजकी मोठी रसाळ 'संत्री' अनेक छोटी 'सामान्य संत्री'
आणि वेगवेगळ्या कलर च्या भरपूर 'भेंड्या' मांडल्या होत्या
भाजी'पाल' ओरडत होता भेंड्याच्या बदल्यात आंबा, संत्री घ्या sss 📢
एक स्थूल गृहस्थ आणि त्यांचे चारपाच सोबती जवळ जवळ धावत तिथे पोहोचले
स्थूल पणामुळे दम लागला होता
तरीही भाजी'पाल' यांना सांगण्याचा प्रयत्न करत होते
आमच्याकडे एकशे ....(पण मध्येच दम लागला)
भाजी'पाल' नी भाज्यांवर पाणी मारत, ग्लासभर पाणी त्या स्थूल गृहस्थास दिले
आणि चहा घेणार का ? विचारले
सद्गगृहस्थाना खूपच घाई होती, पाणी पीत पीतच बोलले
आमच्याकडे एकशे चार भेंड्या आहेत,
या घ्या आणि आम्हाला फळांचा राजा, उपराजा, आणि संत्री द्या
#पुस्तकांचे_पुतळे
टीप १- खालील धागा मनातल्या मनात वाचावा, जाहीरपणे मोठ्याने वाचल्यास होणाऱ्या दुष्परिणामांना आम्ही जबाबदार राहणार नाही
तर वाचनाची आवड आम्हाला लहानपणापासूनच आहे,
काहीही वाक्य नजरेस पडले की, आम्ही ते जाहीरपणे मोठ्याने, चार चौघास ऐकू गेले पाहीजे अशा पद्धतीने वाचतो
एसटी त तिकीट काढायच्या आधी
"वाहकास नेमके व सुट्टे पैसे द्यावेत" असे मोठ्याने वाचत कंडक्टरास ५०० रुपयांची कडक नोट देत एक पुस्तकनगरी द्या, असे बोललो होतो,
आता त्याने आमच्याकडे रागाने का बघितले ,हे मात्र आम्हाला समजले नाही
बस स्टँड वरील (अ)स्वच्छतागृहातील सुविचार ही
आम्ही कित्येकदा मोठ्याने वाचले आहेत, पण ते इथे सांगण्यासारखे नाहीत (वाचकांनी आम्हाला माफ करावे)
एकदा आम्ही सार्वजनिक ठिकाणी लिहिलेले
" *** वापरा, एड्स टाळा " हे वाक्य जाहीरपणे मोठ्याने वाचले , तर उपस्थित लोक आमच्याकडे वेड्यासारखे पहात हसत होते, एका काकू ने तर पायातील चपलेकडे
क्रिकेट जगतातील महान क्रिकेटपटू, थोर क्रिकेट समालोचक, तज्ञ क्रिकेट प्रशिक्षक, ऑल टाईम ऑल राउंडर... आणखी बरेच काही बाही असणारे आमचे परमखिलाडी 'सेठ मनोहरदास' यांचे नाव एका छोट्याशा मैदानाला काय दिले आमच्या विरोधकांनी आकाश पाताळ एक केले
ज्याचे नुसते पोस्टर खोलीत लावून आम्ही क्रिकेट शिकलो ,आशा या प्रातः स्मरणीय, सेठ मनोहरदास यांचे योगदान माहिती नसणाऱ्या पामारांना त्यांचे योगदान आम्हास सांगावेच लागेल, म्हणून हा लेखन प्रपंच .
सेठ दासांना बोलायला यायला लागलं तर त्यांच्या तोंडातून पहिला शब्द बाहेर पडला 'क्रिकेट'
पण आईवडील शिकले नसल्याने याची नोंद इतिहासात नाही, पण सेठनीच येकदा खाजगीत आम्हाला सांगितले होते, आता त्यांनी सांगितले म्हणजे साक्षात शंकेस ही शंका घेण्याचा अधिकार नाही.
लहानपणी सेठ 'बडावनं' (शब्द थोडा अवघड आहे पण दास सोप्पं काम करतच नाहीत)
एक शेतकरी होता आणि त्याने पाळलेला एक कुत्रा होता. कुत्रा इमाने इतबारे शेतकऱ्याची सेवा करायचा आणि त्याबदल्यात कुत्र्यालाही शेतकरी आपल्या ताटातील जेवण द्यायचा. शेतकऱ्याच्या मुलांसोबत खेळायचा,झोपायचा.
शेतकरी शेतावर चालला की कुत्रा त्याच्या मागोमाग जायचा
शेतकरी शेतावर चालला की कुत्रा त्याच्या मागोमाग जायचा
शेतकऱ्याने बैलगाडी/ बैलबंडी बैलं जुंपून बाहेर काढली आणि शेतावर चालला की कुत्राही सोबत सोबत चालायचा
काही दिवसांनी कुत्र्याच्या डोक्यात वेगळीच हवा शिरायला लागली
बैलगाडी/बैलबंडी शेतावर चालली की, उन्ह लागतं म्हणून कुत्रा बैलगाडीच्या खालून, सावलीतून चालू लागला
बैलगाडी थांबली की कुत्रा थांबायचा
काही दिवसांनी कुत्र्याला असं वाटायला लागलं की आपण चाललो की बैलगाडी चालते आणि आपण थांबलो की बैलगाडी थांबते
आपणच बैलगाडी ओढतो असं कुत्र्याला वाटू