एक शेतकरी होता आणि त्याने पाळलेला एक कुत्रा होता. कुत्रा इमाने इतबारे शेतकऱ्याची सेवा करायचा आणि त्याबदल्यात कुत्र्यालाही शेतकरी आपल्या ताटातील जेवण द्यायचा. शेतकऱ्याच्या मुलांसोबत खेळायचा,झोपायचा.
शेतकरी शेतावर चालला की कुत्रा त्याच्या मागोमाग जायचा
शेतकरी शेतावर चालला की कुत्रा त्याच्या मागोमाग जायचा
शेतकऱ्याने बैलगाडी/ बैलबंडी बैलं जुंपून बाहेर काढली आणि शेतावर चालला की कुत्राही सोबत सोबत चालायचा
काही दिवसांनी कुत्र्याच्या डोक्यात वेगळीच हवा शिरायला लागली
बैलगाडी/बैलबंडी शेतावर चालली की, उन्ह लागतं म्हणून कुत्रा बैलगाडीच्या खालून, सावलीतून चालू लागला
बैलगाडी थांबली की कुत्रा थांबायचा
काही दिवसांनी कुत्र्याला असं वाटायला लागलं की आपण चाललो की बैलगाडी चालते आणि आपण थांबलो की बैलगाडी थांबते
आपणच बैलगाडी ओढतो असं कुत्र्याला वाटू
लागलं
कुत्र्याला असंही वाटायला लागलं की शेतकरी आणि त्याच्या कुटुंबाचं रक्षण आपणच करत आहोत
आणि कुत्रा मनात येईल तसं वागू लागला
शेतकऱ्याला या सर्व गोष्टींचा राग यायला लागला व एके दिवशी व्हायचं तेच झालं
पेकटात लाथ घालून कुत्र्याला शेतकऱ्याने घराबाहेर काढल
कुणाला दिसला तर कळवा #तिरकस #ऐकलेलं
कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही
क्रिकेट जगतातील महान क्रिकेटपटू, थोर क्रिकेट समालोचक, तज्ञ क्रिकेट प्रशिक्षक, ऑल टाईम ऑल राउंडर... आणखी बरेच काही बाही असणारे आमचे परमखिलाडी 'सेठ मनोहरदास' यांचे नाव एका छोट्याशा मैदानाला काय दिले आमच्या विरोधकांनी आकाश पाताळ एक केले
ज्याचे नुसते पोस्टर खोलीत लावून आम्ही क्रिकेट शिकलो ,आशा या प्रातः स्मरणीय, सेठ मनोहरदास यांचे योगदान माहिती नसणाऱ्या पामारांना त्यांचे योगदान आम्हास सांगावेच लागेल, म्हणून हा लेखन प्रपंच .
सेठ दासांना बोलायला यायला लागलं तर त्यांच्या तोंडातून पहिला शब्द बाहेर पडला 'क्रिकेट'
पण आईवडील शिकले नसल्याने याची नोंद इतिहासात नाही, पण सेठनीच येकदा खाजगीत आम्हाला सांगितले होते, आता त्यांनी सांगितले म्हणजे साक्षात शंकेस ही शंका घेण्याचा अधिकार नाही.
लहानपणी सेठ 'बडावनं' (शब्द थोडा अवघड आहे पण दास सोप्पं काम करतच नाहीत)
सदुभाऊ बायकोला म्हटले, आज आमची महत्त्वाची पत्रकार परिषद आहे,
थोडं लवकर नाश्तापाणी तयार करा बायको बोलली गॅस संपलाय,
कालपासून सांगतीय
संस्कारी सदू बोलला आणू आणू सिलेंडर
आणि सदून खिसा चाचपला
कार्यकर्त्याला फोन लावला आणि लवकर ये म्हणून निरोप दिला
कार्यकर्ता बोलला- गाडीत पेट्रोल नाही
सदुभाऊ बोलले टाक ना शंभर चं आणि निघ लवकर
कार्यकर्ता गाडी घेऊन हजर झाला आणि सदुभाऊ मागच्या सीट वर बसून पत्रकार परिषदेसाठी रवाना झाले.
जाता जाता हॉटेलात चहा नाश्ता झाला (उधारी लिहून ठेव असं सांगायला सदुभाऊ विसरले नाहीत)
पत्रकार परिषदेच्या ठिकाणी पोहोचायच्या आधीच शंभर मीटर वर गाडी बंद पडली
हटयोगशास्त्री, आंदोलनजीवी, उद्योगपती, अतिमहापरमपूज्य #बाबा_रंगदेव यांची मुलाखत
बाबाजींना अनेक दिवसांपासून मुलाखतीकरिता वेळ मागत होतो पण बाबाजी इतके व्यस्त की त्यांना आम्हाला मुलाखत देण्यासाठी वेळच मिळत नव्हता
अखेर तो योग आलाच
आम्ही बाबाजींच्या आश्रमात पोहोचलो तेंव्हा बाबाजी योगासने करण्यात व्यस्त होते. बाबाजींच्या शिष्याने आम्ही आल्याची खबर दिली आणि आम्हास बाजूच्या कुटीत बसविण्याची व्यवस्था केली