#पुस्तकांचे_पुतळे
टीप १- खालील धागा मनातल्या मनात वाचावा, जाहीरपणे मोठ्याने वाचल्यास होणाऱ्या दुष्परिणामांना आम्ही जबाबदार राहणार नाही
तर वाचनाची आवड आम्हाला लहानपणापासूनच आहे,
काहीही वाक्य नजरेस पडले की, आम्ही ते जाहीरपणे मोठ्याने, चार चौघास ऐकू गेले पाहीजे अशा पद्धतीने वाचतो
एसटी त तिकीट काढायच्या आधी
"वाहकास नेमके व सुट्टे पैसे द्यावेत" असे मोठ्याने वाचत कंडक्टरास ५०० रुपयांची कडक नोट देत एक पुस्तकनगरी द्या, असे बोललो होतो,
आता त्याने आमच्याकडे रागाने का बघितले ,हे मात्र आम्हाला समजले नाही
बस स्टँड वरील (अ)स्वच्छतागृहातील सुविचार ही
आम्ही कित्येकदा मोठ्याने वाचले आहेत, पण ते इथे सांगण्यासारखे नाहीत (वाचकांनी आम्हाला माफ करावे)
एकदा आम्ही सार्वजनिक ठिकाणी लिहिलेले
" *** वापरा, एड्स टाळा " हे वाक्य जाहीरपणे मोठ्याने वाचले , तर उपस्थित लोक आमच्याकडे वेड्यासारखे पहात हसत होते, एका काकू ने तर पायातील चपलेकडे
हात वळविला आणि आम्ही गर्दीत अदृश्य झालो
कॉलेजात असताना हॉस्टेल च्या रूम वर ,
रूम मेट्स, आजूबाजूच्या चार पाच रूम वरील चाहते बोलावून कसल्या कसल्या पुस्तकांचा जाहीर वाचनाचा कार्यक्रम करून अक्षरशः "धिंगाणा" घातला होता.
अर्थात रेक्टर ने आम्हाला नोटीस देऊन धक्के देत हॉस्टेल च्या
बाहेर काढले होते, ती नोटीस जाहीरपणे मोठ्याने वाचत आम्ही हॉस्टेल सोडले होते.
आम्ही हे सर्व का सांगत आहोत, असं तुम्हाला वाटत असेल ना?
वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी काय करायला पाहिजे ? असं
पुस्तकप्रेमी हँडल ने विचारणा केली आहे तर आमच्या डोक्यात एक भन्नाट आयडिया आहे,
प्रत्येक चौकात 'पुस्तकांचे भव्य पुतळे' उभारायचे बघा लोक कसे वाचत सुटतात
एका चौकातून गाडीवरूनच 'ज्ञानेश्वरी' चे वाचन, लगेच पुढच्या चौकात 'संत तुकारामांच्या अभंगाच्या गाथेचे ' वाचन , पुढच्या चौकात
'दासबोध' एका दिवसात किती पुस्तके वाचून होतील, ती ही सहजरित्या !!!
आहे की नाही भन्नाट आयडिया
टीप २- @LetsReadIndia यांच्या उपक्रमाची प्रसिद्धी व्हावी व निखळ मनोरंजन हाच वरील धाग्याचा उद्देश आहे, गैरसमज नसावा #तिरकस
कुणाच्याही भावना दुखाविण्याचा हेतू नाही
राजकारणाच्या चौकात #भाजी'पाल' (भाजी विक्रेता) भाज्या घेऊन बसला होता
त्यात एक 'फळांचा राजा', एक 'फळांचा उपराजा', मोजकी मोठी रसाळ 'संत्री' अनेक छोटी 'सामान्य संत्री'
आणि वेगवेगळ्या कलर च्या भरपूर 'भेंड्या' मांडल्या होत्या
भाजी'पाल' ओरडत होता भेंड्याच्या बदल्यात आंबा, संत्री घ्या sss 📢
एक स्थूल गृहस्थ आणि त्यांचे चारपाच सोबती जवळ जवळ धावत तिथे पोहोचले
स्थूल पणामुळे दम लागला होता
तरीही भाजी'पाल' यांना सांगण्याचा प्रयत्न करत होते
आमच्याकडे एकशे ....(पण मध्येच दम लागला)
भाजी'पाल' नी भाज्यांवर पाणी मारत, ग्लासभर पाणी त्या स्थूल गृहस्थास दिले
आणि चहा घेणार का ? विचारले
सद्गगृहस्थाना खूपच घाई होती, पाणी पीत पीतच बोलले
आमच्याकडे एकशे चार भेंड्या आहेत,
या घ्या आणि आम्हाला फळांचा राजा, उपराजा, आणि संत्री द्या
क्रिकेट जगतातील महान क्रिकेटपटू, थोर क्रिकेट समालोचक, तज्ञ क्रिकेट प्रशिक्षक, ऑल टाईम ऑल राउंडर... आणखी बरेच काही बाही असणारे आमचे परमखिलाडी 'सेठ मनोहरदास' यांचे नाव एका छोट्याशा मैदानाला काय दिले आमच्या विरोधकांनी आकाश पाताळ एक केले
ज्याचे नुसते पोस्टर खोलीत लावून आम्ही क्रिकेट शिकलो ,आशा या प्रातः स्मरणीय, सेठ मनोहरदास यांचे योगदान माहिती नसणाऱ्या पामारांना त्यांचे योगदान आम्हास सांगावेच लागेल, म्हणून हा लेखन प्रपंच .
सेठ दासांना बोलायला यायला लागलं तर त्यांच्या तोंडातून पहिला शब्द बाहेर पडला 'क्रिकेट'
पण आईवडील शिकले नसल्याने याची नोंद इतिहासात नाही, पण सेठनीच येकदा खाजगीत आम्हाला सांगितले होते, आता त्यांनी सांगितले म्हणजे साक्षात शंकेस ही शंका घेण्याचा अधिकार नाही.
लहानपणी सेठ 'बडावनं' (शब्द थोडा अवघड आहे पण दास सोप्पं काम करतच नाहीत)
एक शेतकरी होता आणि त्याने पाळलेला एक कुत्रा होता. कुत्रा इमाने इतबारे शेतकऱ्याची सेवा करायचा आणि त्याबदल्यात कुत्र्यालाही शेतकरी आपल्या ताटातील जेवण द्यायचा. शेतकऱ्याच्या मुलांसोबत खेळायचा,झोपायचा.
शेतकरी शेतावर चालला की कुत्रा त्याच्या मागोमाग जायचा
शेतकरी शेतावर चालला की कुत्रा त्याच्या मागोमाग जायचा
शेतकऱ्याने बैलगाडी/ बैलबंडी बैलं जुंपून बाहेर काढली आणि शेतावर चालला की कुत्राही सोबत सोबत चालायचा
काही दिवसांनी कुत्र्याच्या डोक्यात वेगळीच हवा शिरायला लागली
बैलगाडी/बैलबंडी शेतावर चालली की, उन्ह लागतं म्हणून कुत्रा बैलगाडीच्या खालून, सावलीतून चालू लागला
बैलगाडी थांबली की कुत्रा थांबायचा
काही दिवसांनी कुत्र्याला असं वाटायला लागलं की आपण चाललो की बैलगाडी चालते आणि आपण थांबलो की बैलगाडी थांबते
आपणच बैलगाडी ओढतो असं कुत्र्याला वाटू