क्रिकेट जगतातील महान क्रिकेटपटू, थोर क्रिकेट समालोचक, तज्ञ क्रिकेट प्रशिक्षक, ऑल टाईम ऑल राउंडर... आणखी बरेच काही बाही असणारे आमचे परमखिलाडी 'सेठ मनोहरदास' यांचे नाव एका छोट्याशा मैदानाला काय दिले आमच्या विरोधकांनी आकाश पाताळ एक केले
ज्याचे नुसते पोस्टर खोलीत लावून आम्ही क्रिकेट शिकलो ,आशा या प्रातः स्मरणीय, सेठ मनोहरदास यांचे योगदान माहिती नसणाऱ्या पामारांना त्यांचे योगदान आम्हास सांगावेच लागेल, म्हणून हा लेखन प्रपंच .
सेठ दासांना बोलायला यायला लागलं तर त्यांच्या तोंडातून पहिला शब्द बाहेर पडला 'क्रिकेट'
पण आईवडील शिकले नसल्याने याची नोंद इतिहासात नाही, पण सेठनीच येकदा खाजगीत आम्हाला सांगितले होते, आता त्यांनी सांगितले म्हणजे साक्षात शंकेस ही शंका घेण्याचा अधिकार नाही.
लहानपणी सेठ 'बडावनं' (शब्द थोडा अवघड आहे पण दास सोप्पं काम करतच नाहीत)
बॅट म्हणून वापरत आणि चिंध्या गुंडाळून त्याचा बॉल बनवून 'फेकत'
त्यांना क्रिकेट प्रशिक्षकाची गरजच पडली नाही कारण त्यांनीच स्वतःला प्रशिक्षित केलं (याचीही इतिहासात नोंद नाही, पण त्यांनीच येकदा आम्हाला खाजगीत सांगितलं होतं आणि त्यांनी सांगितलं म्हणजे .....)
तर पहिले शालेय , मग जिल्हा, मग राज्य, राष्ट्रीय आणि शेवटी आंतरराष्ट्रीय स्तरावर दास हा हा म्हणता पोहोचले
दासांना नेट मध्ये प्रॅक्टिस करण्याकरिता बॉलर, बॅट्समन , फिल्डर ची आवश्यकताच नसायची कारण ते स्वतःच बॉलिंग करायचे, बॉल च्या आधी स्वतःच पळत जावून बॅट हातात पकडून फटका हानायचे,
आणि स्वतःच (अर्थात मैदानाबाहेर) पळत जाऊन झेपावत कॅच पकडायचे
आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्यावर बॅन करण्याची मागणी विरोधी संघांनी काही दिवसातच केली कारण विरोधी संघाच्या बॅट्समन ना यांनी 'फेकलेले' बॉल दिसतच नसत. कसे दिसतील? प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त गतीने दास 'फेकत' (अर्थात बॉलच)
बॅटिंग अशी करत की विरोधी संघाने ५० ओव्हर्स मध्ये केलेले रन्स दास अवघ्या पाच ओव्हर्स मध्ये काढत
अर्थात त्या काळी टीव्ही नव्हते त्यामुळे याचीही नोंद इतिहासात नाही (त्यांनीच येकदा आम्हाला खाजगीत सांगितलं होतं आणि त्यांनी सांगितलं म्हणजे.....)
बरं खेळू दिलं नाही म्हणून गप्प बसणारे सेठ दास कसले?
ते लगोलग रेडिओ वर समालोचक बनले, आज क्रिकेट मध्ये जे शब्द वापरले जातात ती दासांनी क्रिकेट जगतास दिलेली अमूल्य देणगी आहे.
दास पुढे जाऊन लाखो युवकांचे थोर क्रिकेट प्रशिक्षक बनले
त्यांचं नुसतं पोस्टर बघितलं तरी क्रिकेट मधला 'क्री' माहिती नसलेला व्यक्ती फाडफाड क्रिकेट खेळायचा
आता याचीही इतिहासात नोंद नाही (त्यांनी स्वतः आम्हाला येकदा खाजगीत सांगितलं आणि त्यांनी सांगितलं म्हणजे... असो)
तर अशा या थोर व्यक्तिमत्त्वाचे नाव एका छोट्याशा मैदानाला दिलं म्हणून किती बोंबा माराल बे!
कामं करा कामं!! काय समाजलात!!! #तिरकस #काल्पनिक
कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही #नुसती_फेकफेकी
एक शेतकरी होता आणि त्याने पाळलेला एक कुत्रा होता. कुत्रा इमाने इतबारे शेतकऱ्याची सेवा करायचा आणि त्याबदल्यात कुत्र्यालाही शेतकरी आपल्या ताटातील जेवण द्यायचा. शेतकऱ्याच्या मुलांसोबत खेळायचा,झोपायचा.
शेतकरी शेतावर चालला की कुत्रा त्याच्या मागोमाग जायचा
शेतकरी शेतावर चालला की कुत्रा त्याच्या मागोमाग जायचा
शेतकऱ्याने बैलगाडी/ बैलबंडी बैलं जुंपून बाहेर काढली आणि शेतावर चालला की कुत्राही सोबत सोबत चालायचा
काही दिवसांनी कुत्र्याच्या डोक्यात वेगळीच हवा शिरायला लागली
बैलगाडी/बैलबंडी शेतावर चालली की, उन्ह लागतं म्हणून कुत्रा बैलगाडीच्या खालून, सावलीतून चालू लागला
बैलगाडी थांबली की कुत्रा थांबायचा
काही दिवसांनी कुत्र्याला असं वाटायला लागलं की आपण चाललो की बैलगाडी चालते आणि आपण थांबलो की बैलगाडी थांबते
आपणच बैलगाडी ओढतो असं कुत्र्याला वाटू
सदुभाऊ बायकोला म्हटले, आज आमची महत्त्वाची पत्रकार परिषद आहे,
थोडं लवकर नाश्तापाणी तयार करा बायको बोलली गॅस संपलाय,
कालपासून सांगतीय
संस्कारी सदू बोलला आणू आणू सिलेंडर
आणि सदून खिसा चाचपला
कार्यकर्त्याला फोन लावला आणि लवकर ये म्हणून निरोप दिला
कार्यकर्ता बोलला- गाडीत पेट्रोल नाही
सदुभाऊ बोलले टाक ना शंभर चं आणि निघ लवकर
कार्यकर्ता गाडी घेऊन हजर झाला आणि सदुभाऊ मागच्या सीट वर बसून पत्रकार परिषदेसाठी रवाना झाले.
जाता जाता हॉटेलात चहा नाश्ता झाला (उधारी लिहून ठेव असं सांगायला सदुभाऊ विसरले नाहीत)
पत्रकार परिषदेच्या ठिकाणी पोहोचायच्या आधीच शंभर मीटर वर गाडी बंद पडली
हटयोगशास्त्री, आंदोलनजीवी, उद्योगपती, अतिमहापरमपूज्य #बाबा_रंगदेव यांची मुलाखत
बाबाजींना अनेक दिवसांपासून मुलाखतीकरिता वेळ मागत होतो पण बाबाजी इतके व्यस्त की त्यांना आम्हाला मुलाखत देण्यासाठी वेळच मिळत नव्हता
अखेर तो योग आलाच
आम्ही बाबाजींच्या आश्रमात पोहोचलो तेंव्हा बाबाजी योगासने करण्यात व्यस्त होते. बाबाजींच्या शिष्याने आम्ही आल्याची खबर दिली आणि आम्हास बाजूच्या कुटीत बसविण्याची व्यवस्था केली