By Kapil Patil
बदनामी सोबत दंडेलशाही दडपशाहीचा वापर करून सुद्धा शेतकरी आंदोलन मोडीत निघत नाही उलट ते आणखी तीव्र होताना दिसतंय म्हणल्यावर देशातच काय जगात पण चर्चा होणारच की
दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ आंदोलन चालू आहे, पावणे दोनशेच्या आसपास बळी गेलेत, (1/11)
शंभर पेक्षा जास्त लोक बेपत्ता आहेत, सुविधा तोडल्या जातायत तरी सुद्धा शेतकरी आपली एकवाक्यता टिकवून निकराची झुंज देतायत. एवढी गंभीर परिस्थिती बघून याची का नाही चर्चा होणार? (2/11)
इथले राज्यकर्ते आणि त्यांच्या बोटावर नाचणाऱ्या कठपुतल्या असंवेदनशील असतील म्हणून काय जगात सगळीकडे तसंच असावं का...
पॉप सिंगर रिहाना मोठी कलावंत असली तरी माणूसकीच्या दृष्टीकोनातून जगभरातील बऱ्याच विषयांवर भूमिका व्यक्त करत असते. (3/11)
मुळात हे करताना त्यांना तो विषयही तितकाच जाणून घ्यावा लागतो. कारण जगभरातील फॉलोअर्सच्या माध्यमातून उलटसुलट प्रतिक्रिया येतील याची आधीच दखल घ्यावी लागते.
रिहानाने कोरोनासाठी 36 कोटी दान केलेत, (4/11)
इथल्या करचुकव्या पाणीपट्टी बुडणाऱ्या कथित सेलिब्रिटींची माणूसकीच्या बाबतीत तीच्या एवढी लायकी नाही !!
बऱ्याच जणांनी नावा वरुन गफलत झाल्याने ती मुस्लिम आहे का याचा शोध चालू केला, काल गुगलवर सर्वात जास्त तेच सर्च झालं. तर आयटी सेलने ती मुस्लिम असल्याचं घोषितही करुन टाकलं. (5/11)
असो, तो वेगळाच विषय आहे...
काल तीने भारतातील शेतकरी आंदोलनावर ट्विट केलं आणि जिथं लागायला पाहिजेत तिथं बरोबर मिरच्या लागल्या.
सरकारने भारतातले कथित सेलिब्रिटी कलावंत खेळाडू यासाठी कामाला लावले, (6/11)
जे कालपर्यंत या आंदोलना बाबत अवाक्षर बोलले नाहीत त्यांची अचानक सरकारच्या बचावासाठी स्पर्धा चालू झाली.
मुळात पैसा कमावणे हे एकच ज्यांच उदिष्ट असतं त्यांच्याकडून वेगळ्या काय अपेक्षा आहेत. पण हीच मंडळी या देशातला शेतकरी, (7/11)
मजूर किंवा अन्य सामान्य जनतेनं डोक्यावर घेऊन मोठी केली आहे याची जाणीव नाही त्यांना..!
एकीकडे अनेकांनी या आंदोलनाची दखल घेतली आहे. (8/11)
तर दुसरीकडे आमच्या शेतकऱ्यांच्या जीवावर उठून ते लोकशाही मार्गाने न्याय मागत असताना त्यांचीच देशद्रोही खलिस्तानी अशी प्रतिमा बनवण्यात आमचं सरकार व्यस्त आहे. कोणासाठी करताय बाबांनो अदानी अंबानी सारख्या मूठभर लोकांसाठी... (9/11)
कमला हॅरिस यांची भाची मीना हॅरिस हीने देखील शेतकरी आंदोलनावर मोजक्या शब्दात समर्पक ट्विट केलंय. जगभरात सरकारची लख्तर फाटली आहेत. ती सावरायला भारतातले सेलिब्रिटी यात सहभागी झालेत.
हरकत नाही पण डोक्यावर घेतलेल्या जनतेला यांची खरी ओळख तरी झाली. (10/11)
आत्ता खऱ्या अर्थाने शोषक विरुद्ध शोषनकर्ता लढाई चालू झाली आहे...
आपण कोणाच्या बाजूने आहोत ठरवा मित्रांनो #FarmersProtest #IStandWithFarmers (11/11)
लेखकाची पूर्वपरवानगी घेतलेली आहे 🙏
इथ शोषक / शोषणकर्ता असं वाचावे *
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
महात्मा गांधी यांच्या हत्त्येनंतर पेढे वाटणाऱ्या हिंदू बद्दल वाचले होते. कांही वर्षापुर्वी ज्ञानपीठ यु.आर.अनंतमूर्ती यांच्या निधनानंतर फटाके वाजवणारे प्रत्यक्ष पाहिले व अनुभवले आहेत ! दाभोळकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्या झाल्यावर अत्यानंदी झालेले लोक पाहीले आहेत. (1/10)
आज तामीळ जनतेचा आवाज असणा-या एम. करूणानिधी यांच्या निधनानंतर त्यांच्या बद्दल गलिच्छ लिहीणारेही पाहीले! हे सर्व समाजकंटक लोक एकाच पक्षाचे समर्थक असावे आणि हल्ली एकाच व्यक्तीचे भक्त असावे हा निव्वळ योगायोग नाही! (2/10)
ज्ञानाचा आणि या भक्तांचा संबंध नाही हे तर सर्वश्रुत आहेच पण यांना हिंदु धर्मही माहित नाही!
मृत्युनंतर वैर संपते ही खरी हिंदू धर्माची ओळख ! रावणाच्या वधा नंतर प्रभू रामचंद्र यांनी देखील रावणाचा सन्मानपूर्वक अंत्यविधी केला होता. (3/10)
'दिल्लीत पाणी कापल्यावर राकेश टिकैत म्हणाले गावावरून लोकं पाणी घेऊन येत नाहीत, तोपर्यंत पाणी पण पिणार नाही.'..... आपल्या नेत्याचं रडं कोणत्या समूहाला आवडणारै? रात्रीत वातावरण फिरलं. म्हातारे लोकं पण , 'हमारे राकेस को पानी लेकर चलो, (1/5)
' म्हणत गावोगांव फिरले अन् जत्थेच्या जत्थे खांद्यावर पानी घेऊन निघाले. एक म्हातारा म्हणतो, 'राकेस के लिए पानी और दही लाये गावसे|'
सरकारशी संगनमत करून शेतकर्यांना झोडपून काढायला भाजपाचे पालतू गुंड आलेले. पाणी कापलं, वीज कापली, आता आंदोलनाचं कसं होणार? (2/5)
म्हणून तिथंच थांबून राहण्याचा रडत रडत निर्धार टिकैत यांनी केला. आंदोलन कमजोर झालं, विखुरलं म्हणून टिकैत हे रडले. पण निश्चयी रडले. या रडण्याच्या वेदना गावभर गेल्या.
आणि लोकं वेदनेवर, आतल्या कालवाकालवीवर फुंकर मारायला आले. पानी आणि दही घेऊन आले. (3/5)
न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल कुणाल काम्रावर खटला भरला गेला. त्या संदर्भात कुणाल काम्राने शपथपत्र दिले आहे.
अनुवाद ~मुग्धा कर्णिक 👇
ते मराठीत देतेय. शेअर करा. (1/7)
---------------
"माझ्या ट्वीट्समुळे जगातील सर्वात बलाढ्य अशा न्यायालयाचा पाया खिळखिळा होऊ शकतो असे म्हणणे माझ्या क्षमतेला अती महत्त्व देण्यासारखेच आहे. जसे सर्वोच्च न्यायालयाला लोकांच्या विश्वासाचे मोल वाटते, तसेच त्यांनी असाही दृढ विश्वास बाळगायला हवा, (2/7)
की लोकमत ट्वीटरवरच्या काही फुटकळ विनोदांवर आधारित असत नाही. न्यायपालिकेवरचा लोकांचा विश्वास हा न्यायालयांच्या स्वतःच्या कर्तृत्वावर आधारित असतो- कुणाच्यातरी मतांवर किंवा टीकेवर नाही. (3/7)
Lockdown असतांना आलेला अनुभव 👇
आज साईट वरून येत असताना एक मजूर खांद्याला भलीमोठी पिशवी अडकवून, डोक्यावर राहुटीच सामान, दोन पाण्याचा बॉटल, पायात स्लिपर घालून टोल नाक्याजवळ चकचकीत चार पदरी महामार्गावर पायपीट करताना दिसला. थोडं समोर गेल्यावर काय वाटलं माहिती नाही !1/4
खरतर त्याचा केविलवाणा चेहरा पाहून दया आली मी माघारी आलो, विचारपूस केल्यावर कळलं की तो छिंदवाडा ते नागपूर 130km चा प्रवास (40+ तापमान ) लिफ्ट घेत, कधी पायी असा करीत होता, त्याच्या प्रवासात 25km चा हातभार लागला, निरोप घेतांना तो केविलवाणा असह्य चेहराच लक्षात राहिला, 2/4
अस्वस्थ वाटत राहिलं,विचारांनी झोप आली नाही! एकच प्रश्न सतावू लागला ! मी जर पूर्ण दुर्लक्ष करीत निघून गेलो असतो तरी त्याला काहीच फरक पडला नसता, त्याचा प्रवास आधीही चालु होता पुढेही तसाच सुरु असता, 3/4
आज 2021 ला भारता सारख्या विकसनशील देशात ,जागतिकीकरणाच्या स्पर्धेत तरुणाईला सार् जग आपल्या कवेत घ्यायचे आहे, जिथे विविध प्रकारच्या भाषा, पंथ,परंपरा ,वेशभुषा व प्रचंड भौगोलिक तफावत असलेले भुभाग आहे तिथे खरच राम मंदिर, हिंदू मुस्लिम, सावरकर, (1/25)
नेहरू ह्या चर्चा किती गैरलागू आहेत? एखादा विषय ५००० वर्षे मागे जाऊन चर्चा करणे,प्रत्येक गोष्टींना संस्कृती आणि आस्थेला जोडत त्यावर वातावरण तापवून निवडणूकांकरीता मैदान करत जिंकणे बस हेच एकमेव उद्दिष्ट. (2/25)
लक्षात ठेवा आपण वर्तमानाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असून भविष्यातील अडचणीत भर घातल आहोत.
भावनीक मुद्दे उपस्थित करून सरसकट सर्वच बाबतीत जनतेला मूर्खात काढण्याचा प्रकार सुरू आहे. (3/25)
देशातल्या शेतकऱ्यांचा जीव नवीन कृषिकायद्यांमुळे धसकला आहे. आंदोलने चालली आहेत. लोक थंडीवाऱ्याची, संसर्गाची पर्वा न करता गेला दीड महिना रस्त्यावर तळ ठोकून आहेत.
आज राजधानी दिल्लीत भारतीय प्रजासत्ताकातील सार्वभौम लोकांना प्रवेश बंद करण्यासाठी भली मोठी यंत्रणा कामी लागली आहे. (1/10)
रस्ते बंद करण्यात आले आहेत. देशाच्या बलशाली असण्याचे प्रदर्शन दिल्लीत या दिवशी होते. पण आज दिल्लीत लोकांच्या बळाचे प्रदर्शन होणार आहे.
हे या माज चढलेल्या सत्तांधाना अर्थातच चालणारे नाही. आज दिवसभरात काय होईल ते साशंक मनाने पाहात रहायचे आहे. (2/10)
आणि अशा या कसोटीच्या वेळी फोलपटी फोकनाड देशभक्तीचे ढोल पिटणारे रास्वसंघाचे लोक काय करीत आहेत माहीत आहे का?
संघाचे अनेक दुष्कार्यकर्ते लोक घरोघर जाऊन राममंदिरासाठी किमान शंभर रुपये तरी द्या. (3/10)