केंद्रात "मजबूत" सत्ता असूनही राष्ट्रप्रेमींच्या हाती फक्त कॉन्स्पिरसी थियरी फेकत रहाण्याशिवाय पर्याय नाहीये काय?
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी देशाच्या राजधानीत धिंगाणा सुरु होतो, लाल किल्ल्यावर देशविघातक शक्तींचा झेंडा फडकतो आणि समस्त देश हताशपणे बघत रहातो.
हे आजचं नाही.
१+
हे सतत घडत राहिलं आहे.
हे कितीदा रिपीट होणार आहे? कितीदा सगळं माहित असूनही शासन यंत्रणा अनप्रिपेअर्ड असणार आहेत?
कितीदा फक्त "ते वाईट आहेत" असं छात्या बडवत रहाणार आहोत आम्ही?
किती दिवस पाकिस्तान, चीनकडे बोट दाखवत आमचं बोटचेपेपण खपवत रहाणार आहोत आम्ही?
२+
किती दिवस व्हिक्टिम रहाणार आहोत आम्ही?
शेती सुधारणा कायदे मांडण्याची कितीतरी महिने तयारी सुरु होती. संभाव्य बॅकलॅशचा अभ्यास झाला नव्हता का?
तेवढी इंटेलिजन्स जमा होत नाही का? तेव्हा नाही झाली तर गेल्या ३ महिन्यांत कळालं नाही का? २६ जानेवारीला काही घडू शकतं -
३+
हे कळायला कोणतं सुपरकम्युटर लागतं?
का थांबवलं जात नाहीये हे सगळं?
हे सतत का घडत रहातंय?
जम्मू काश्मीरमधलं ३७० हटवल्यानंतर देशात भडका उडणार हे सर्वांना माहिती होतं. मग दिल्ली दंगल का घडली? कशी काय घडू दिली गेली? त्यांना पाकिस्तानी अन चायनीज फंडिंग आहे हे -
४+
शपथेवर सांगणारे शेकडो लोक आहेत आजूबाजूला. हे सगळं रॉ, आयबीला कळत, दिसत नाही का? हे गृहमंत्रालयाला कळवलं जात नाही का?
सोनिया गांधींना व्हॅटिकन पैसे पुरवते पासून आमचे पत्रकार, लिबरल्स पाकिस्तान-चीनचे "लाभधारी" आहेत अश्या रद्दीभर थियरीज पिकतात रोज. कधी बाहेर येणार हे सगळं?
५+
किती वर्षांनी?
सुपरमॅन वाटावेत असे नेते आहेत म्हणतात केंद्रात. इतके कसे कमी पडतात हे दरवेळी?
दरवेळी "पण मग विरोधक त्याचं भांडवल करतील" हीच रड रडत रहायचीये का
ही विरोधकांची भीती होती तर मग खंडीभर वचनं दिली कशाला?
६+
अख्ख्या देशातून शेतकरी आले असते तर समजू शकलो असतो. एका राज्यातून काही तथाकथित गरीब शेतकरी उतरलेत तिथे, तेवढे मॅनेज होऊ शकत नाहीत का? नक्कीच होऊ शकतात. त्यांचे अनधिकृत आर्थिक स्रोत बंद करता येऊ शकत नाहीत का? नक्कीच करता येऊ शकतात.
देशभर "आम्ही या कायद्यांच्या समर्थनात आहोत" -
७+
असं म्हणणारे हजारो खरे शेतकरी मोर्चे निघू शकत नाहीत का? नक्कीच निघू शकतात.
पण हे सगळं का होत नाहीये?
राष्ट्रप्रेमी मंडळींनी फक्त छात्या बडवत "आम्ही नाडलो जातोय हो" म्हणत कधी पर्यंत रडत रहायचंय?
असं रडतच राहायचं असेल तर राजकारण आणि सत्ता कशाला हवीये?
८+
७ वर्षांची सत्ता, किमान २५ वर्षांचा राजकीय डॉमिनन्स असूनही भ्रष्ट पत्रकार आणि स्युडो लिबरल्स थेट चीन अन पाकिस्तानशी हातमिळवणी करून देश विघातक प्लॅन्स इतके काटेकोरपणे राबवू शकत असतील तर या सर्व लढाईचा काय अर्थ आहे? की तुमच्या सगळ्या आरोपांना "निराधार कॉन्स्पिरसी थियरीज" पलीकडे
९+
काहीच अर्थ नाहीये?
एकीकडे देशात स्टार्टअप इकोसिस्टिम कशी रुजवता येईल यावर खल घडत असताना दुसरीकडे मात्र साध्या अंतर्गत सुरक्षेच्या बाबतीत इतका सावळागोंधळ असेल तर सिलिकॉन व्हॅली आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि फ्यूचरिस्टिक आंत्रप्रेन्युअरशिप वगैरे गोष्टी -
१०+
गळ्यातच अडकवून गप गिळून टाकलेल्या बऱ्या.
तसं होऊ द्यायचं नसेल तर राष्ट्रप्रेमी मंडळींनी कठोर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.
राम मंदिराबद्दल आस्था असणारे बिनडोक ठरवावेसे वाटताहेत
यातून तुम्ही सामान्य भारतीयांपासून किती दुरावले आहात हे कळतंच. पण तुम्ही किती अमानवी आहात, हे ही दिसतं.
१+
शतकानुशतके या भूमीवर एक वारसा जपला गेलाय. इथल्या मातीने आमच्यात काही मूल्यं रुजवली आहेत. आमच्या आजी आजोबांनी आम्हाला लहानपणापासून काही गोष्टी सांगितल्या आहेत. मोठे होत असताना आम्ही इतिहास शिकलो आहोत.
भूतकाळातील घटना वर्तमानवर आघात करत भविष्य घडवत असतात, हे माहितीये आम्हाला.
२+
राम मंदिर या सगळ्याचाच परिपाक आहे.
जिजाऊ आईंनी छत्रपती शिवरायांना घडवताना रामच शिकवला. लहानपणी चांदोबा दाखवताना आईने रामाची गोष्टच सांगितली. म्हणूनच जय राम जी की ते राम राम ते राम नाम सत्य है पर्यंत कणाकणात रुजलाय राम इकडे.
हे जोकर्स जगातले सर्वात मोठे लूजर्स आहेत.
"मदहोश" हा शब्द अख्खा देश जगतोय कालपासून. शेवटचा विजयी फटका घडला तेव्हा ऑफिसमध्ये लॅपटॉपस्क्रिनला चिकटून बसलेली अख्खी टीम किंचाळत नाचायला लागली.
१+
सचिन सौरव राहुल नंतर मी क्रिकेटच्या बाबतीत अगदीच अरसिक झालोय.
इतका की मला आपल्या टीममध्ये कोण प्लेयर्स आहेत हेही माहित नसतं. तरी मला कालच्या विजयाने विलक्षण ऑस्सम फिलिंग दिली.
पण काही आंबट चेहऱ्याचे लोक मात्र जरा आनंदी होऊ शकत नाहीत, हसू शकत नाहीत.
यातून काय कळतं माहितीये?
२+
तुमची मानसिकताच पराभूताची असेल तर तुम्हाला जिंकण्याचा आनंद कधीच मिळू शकणार नाही...!
तुम्हाला हिंदुत्व आवडत नाही. हा विचार भारतात इतक्या झपाट्याने का पसरलाय हा विचार करण्याची तुमची वैचारिक क्षमताच नाही. त्याची टर उडवावीशी वाटते.
प्रॉब्लम हा आहे की व्हाट्सअप फक्त अर्णबकडेच नाहीये.
===
Broadcast Audience Research Council च्या माजी CEO, पार्थो दासगुप्ता आणि रिपब्लिक चॅनलचा एडिटरइनचीफ अर्णब गोस्वामी यांच्या तथाकथित चॅट्सवरून हलकल्लोळ माजलाय. चॅट्स किती खऱ्या आहेत इथपासून सुरुवात आहे.
दासगुप्तांना त्रास दिला गेलाय या तक्रारीदेखील वाचायला मिळाल्या आहेत. पण तूर्तास या चॅट्स मुंबई पोलिसांनी उघड केल्या आहेत म्हणजे खऱ्या आहेत असं मानून चालू.
राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या गोंगाटात या चॅट्समध्ये नेमकं गंभीर काय आहे हे नीट बघितलं तर मला ४ आरोप प्रामुख्याने दिसलेत.
२+
पहिला - पुलवामा अतिरेकी हल्ला झाल्याचा आनंद होणे
दुसरा - बालाकोट एअर स्ट्राईकबद्दल आधीच माहिती असणे
तिसरा - टीआरपी कमी-जास्त करण्याबाबत BARC च्या माजी CEO आणि COO मधील संभाषण
एखाद्या राजकारण्याने विवाहबाह्य संबंध ठेवण्यावरून वादंग उठणं स्वाभाविक आहे. पण त्यातून आपल्या समाजाचे दिसणारे विविध पदर विचारात पाडतात.
"त्या"ने ठेवलेले संबंध तरण्याबांड मर्दाचे, कर्तृत्वाचे निदर्शक असतात.
"त्या"चे प्रियजन हिरीरीने समर्थनात उतरतात.
१+
आज त्याद्दल उघडपणे बोलणारी स्त्री वाईट हेतूने करतीये हे समर्थनाचं लॉजिक असतं.
हेच एखाद्या "ती" ने केलं असेल तर?
हेच एखाद्या स्त्रीबद्दल बाहेर आलं तर?
काय होईल?
विवाहबाह्य संबंध सरसकट चांगले की वाईट - हा मुद्दा नाहीये इथे. ते का होतात वगैरे मानस-समाजशास्त्रीय विवेचनही नाही.
२+
पुरुषाचं कर्तृत्व आणि स्त्रीचं बदफैलीपण - हा फरक किती खोल रुजलेल्या प्रो-मेल विचारांमधून आलाय - हा मुद्दा आहे.
एखादा कूल डूड फिल्मस्टार भरपूर लफडी करतो...ते कौतुक असतं. पण अभिनेत्रीने मॅरीड पुरुषाशी संबंध ठेवले तर ती "घर तोडणारी" असते.
मैथिली ठाकूर या गोड गळ्याच्या गुणी गायिकेने बॉलिवूडमध्ये गाण्याची संधी नाकारली म्हणून तिचं बरंच कौतुक होतंय. नाकारण्याचं कारण? बॉलिवूड हिंदू धर्मविरोधी आहे.
तिने उचललं पाऊल तिच्या करिअरसाठी योग्य की अयोग्य -
१+
बॉलिवूड खरंच हिंदू धर्मविरोधी आहे की नाही - या मुद्द्यांवर वाद घालण्यात अर्थ नाही. तिने तिला योग्य वाटलं ते केलं.
तिचं पाऊल योग्य, समर्थनीय, कौतुकास्पद वाटणाऱ्या मित्रमंडळींनी मात्र विचार करावा असं वाटतं.
२+
बॉलिवूडमध्ये हिंदू धर्मावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष टीका, हनन होत असतं हा जर आक्षेप असेल - तर त्यावर आपलं प्रत्युत्तर काय असायला हवं?
प्रेक्षक म्हणून तुम्ही-आम्ही बहिष्कार घालणं ठीकच. पण हिंदू धर्मप्रेमी, भारतीय संस्कृती प्रेमींनी बॉलिवूडवर बहिष्कार घालणं आपल्या मूळ आक्षेपाचं,