राम मंदिराबद्दल आस्था असणारे बिनडोक ठरवावेसे वाटताहेत
यातून तुम्ही सामान्य भारतीयांपासून किती दुरावले आहात हे कळतंच. पण तुम्ही किती अमानवी आहात, हे ही दिसतं.
१+
शतकानुशतके या भूमीवर एक वारसा जपला गेलाय. इथल्या मातीने आमच्यात काही मूल्यं रुजवली आहेत. आमच्या आजी आजोबांनी आम्हाला लहानपणापासून काही गोष्टी सांगितल्या आहेत. मोठे होत असताना आम्ही इतिहास शिकलो आहोत.
भूतकाळातील घटना वर्तमानवर आघात करत भविष्य घडवत असतात, हे माहितीये आम्हाला.
२+
राम मंदिर या सगळ्याचाच परिपाक आहे.
जिजाऊ आईंनी छत्रपती शिवरायांना घडवताना रामच शिकवला. लहानपणी चांदोबा दाखवताना आईने रामाची गोष्टच सांगितली. म्हणूनच जय राम जी की ते राम राम ते राम नाम सत्य है पर्यंत कणाकणात रुजलाय राम इकडे.
नसानसांत भिनलाय आमच्या.
३+
काही हिंस्त्र श्वापदांनी रामजन्मभूमीवरील श्री रामाचं मंदिर उध्वस्त केलं खरं. पण आमच्यात भिनलेला राम ते मिटवू शकले नाहीत. हटवू शकले नाहीत.
हृदयात वसलाय तो आयोध्यानंदन. असा बरा हटेल!
ते उभं राहणारं राम मंदिर आमच्या याच राममय हृदयाचं स्पंदन आहे.
४+
हो, राम मंदिरात नसतो फक्त. माणसामाणसात आहे. कणाकणात आहे. चराचरात आहे. माहितीये आम्हाला. तुम्ही सांगायची गरज नाही! आमचा धर्म हेच शिकवतो आम्हाला!
अहो चुकून एखाद्या निर्जीव वस्तूला पाय लागला तर चटकन नमस्कार करतो आम्ही - त्या वस्तूमधील
तत्वाला.
आम्हाला तुम्ही शिकवणार?
५+
ते राम मंदिर फक्त पूजा अर्चेसाठी नाही. त्या देणग्या फक्त मंदिरातील मूर्ती, फरश्या, विटा, खांबांसाठी नाहीत. राम मंदिरासाठी आस्था फक्त देवभोळ्या आस्तिक्यातून नाही.
फार साधी, सोपी पण तितकीच दिव्य भावना आहे या मागे.
६+
भरतभूमीच्या आसमंतात व्यापलेल्या वारस्याचा एक अव्याहत यज्ञ सतत धगधगत आहे. ती रामजन्मभूमीवरील वास्तू याच यज्ञातील एक आवाहन आहे. आणि त्या यज्ञात आपलीही एक समिधा असावी...बस्स...इतकी भावना आहे समस्त भारतीयांची.
७+
तुमच्या उद्दाम उर्मट बौद्धिक तर्कटांनी या यज्ञात खंड पडणार नाही. झालंच तर ती ज्वाला अधिक झळाळून उठेल.
आणि त्या तेजात तुमचं भेसूर अमानवी रूप अधिकच स्पष्ट दिसेल.
हे जोकर्स जगातले सर्वात मोठे लूजर्स आहेत.
"मदहोश" हा शब्द अख्खा देश जगतोय कालपासून. शेवटचा विजयी फटका घडला तेव्हा ऑफिसमध्ये लॅपटॉपस्क्रिनला चिकटून बसलेली अख्खी टीम किंचाळत नाचायला लागली.
१+
सचिन सौरव राहुल नंतर मी क्रिकेटच्या बाबतीत अगदीच अरसिक झालोय.
इतका की मला आपल्या टीममध्ये कोण प्लेयर्स आहेत हेही माहित नसतं. तरी मला कालच्या विजयाने विलक्षण ऑस्सम फिलिंग दिली.
पण काही आंबट चेहऱ्याचे लोक मात्र जरा आनंदी होऊ शकत नाहीत, हसू शकत नाहीत.
यातून काय कळतं माहितीये?
२+
तुमची मानसिकताच पराभूताची असेल तर तुम्हाला जिंकण्याचा आनंद कधीच मिळू शकणार नाही...!
तुम्हाला हिंदुत्व आवडत नाही. हा विचार भारतात इतक्या झपाट्याने का पसरलाय हा विचार करण्याची तुमची वैचारिक क्षमताच नाही. त्याची टर उडवावीशी वाटते.
प्रॉब्लम हा आहे की व्हाट्सअप फक्त अर्णबकडेच नाहीये.
===
Broadcast Audience Research Council च्या माजी CEO, पार्थो दासगुप्ता आणि रिपब्लिक चॅनलचा एडिटरइनचीफ अर्णब गोस्वामी यांच्या तथाकथित चॅट्सवरून हलकल्लोळ माजलाय. चॅट्स किती खऱ्या आहेत इथपासून सुरुवात आहे.
दासगुप्तांना त्रास दिला गेलाय या तक्रारीदेखील वाचायला मिळाल्या आहेत. पण तूर्तास या चॅट्स मुंबई पोलिसांनी उघड केल्या आहेत म्हणजे खऱ्या आहेत असं मानून चालू.
राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या गोंगाटात या चॅट्समध्ये नेमकं गंभीर काय आहे हे नीट बघितलं तर मला ४ आरोप प्रामुख्याने दिसलेत.
२+
पहिला - पुलवामा अतिरेकी हल्ला झाल्याचा आनंद होणे
दुसरा - बालाकोट एअर स्ट्राईकबद्दल आधीच माहिती असणे
तिसरा - टीआरपी कमी-जास्त करण्याबाबत BARC च्या माजी CEO आणि COO मधील संभाषण
एखाद्या राजकारण्याने विवाहबाह्य संबंध ठेवण्यावरून वादंग उठणं स्वाभाविक आहे. पण त्यातून आपल्या समाजाचे दिसणारे विविध पदर विचारात पाडतात.
"त्या"ने ठेवलेले संबंध तरण्याबांड मर्दाचे, कर्तृत्वाचे निदर्शक असतात.
"त्या"चे प्रियजन हिरीरीने समर्थनात उतरतात.
१+
आज त्याद्दल उघडपणे बोलणारी स्त्री वाईट हेतूने करतीये हे समर्थनाचं लॉजिक असतं.
हेच एखाद्या "ती" ने केलं असेल तर?
हेच एखाद्या स्त्रीबद्दल बाहेर आलं तर?
काय होईल?
विवाहबाह्य संबंध सरसकट चांगले की वाईट - हा मुद्दा नाहीये इथे. ते का होतात वगैरे मानस-समाजशास्त्रीय विवेचनही नाही.
२+
पुरुषाचं कर्तृत्व आणि स्त्रीचं बदफैलीपण - हा फरक किती खोल रुजलेल्या प्रो-मेल विचारांमधून आलाय - हा मुद्दा आहे.
एखादा कूल डूड फिल्मस्टार भरपूर लफडी करतो...ते कौतुक असतं. पण अभिनेत्रीने मॅरीड पुरुषाशी संबंध ठेवले तर ती "घर तोडणारी" असते.
मैथिली ठाकूर या गोड गळ्याच्या गुणी गायिकेने बॉलिवूडमध्ये गाण्याची संधी नाकारली म्हणून तिचं बरंच कौतुक होतंय. नाकारण्याचं कारण? बॉलिवूड हिंदू धर्मविरोधी आहे.
तिने उचललं पाऊल तिच्या करिअरसाठी योग्य की अयोग्य -
१+
बॉलिवूड खरंच हिंदू धर्मविरोधी आहे की नाही - या मुद्द्यांवर वाद घालण्यात अर्थ नाही. तिने तिला योग्य वाटलं ते केलं.
तिचं पाऊल योग्य, समर्थनीय, कौतुकास्पद वाटणाऱ्या मित्रमंडळींनी मात्र विचार करावा असं वाटतं.
२+
बॉलिवूडमध्ये हिंदू धर्मावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष टीका, हनन होत असतं हा जर आक्षेप असेल - तर त्यावर आपलं प्रत्युत्तर काय असायला हवं?
प्रेक्षक म्हणून तुम्ही-आम्ही बहिष्कार घालणं ठीकच. पण हिंदू धर्मप्रेमी, भारतीय संस्कृती प्रेमींनी बॉलिवूडवर बहिष्कार घालणं आपल्या मूळ आक्षेपाचं,
स्त्रियांना नोकरीचा अधिकार असावा काय? - नको! त्याने पुरुष बेरोजगार होतील!
देशात औद्योगिकरण करावं काय? - नको! त्याने गरिबी वाढेल!
भारतात मॅकडॉनल्ड्स यावं काय? - नको! त्याने वडापाववाले देशोधडीला लागतील!
FDI? - नको! त्याने देशी उद्योग परकीयांच्या मुठीत जातील!
१+
ईकॉमर्स? - छोट्या दुकानदारांचे शत्रू!
कम्प्युटर? - मानवी मेंदूचा शत्रू!
ओला-उबर - रिक्षा/टॅक्सीचे शत्रू!
श्रीमंत - गरिबांचे शत्रू...
शिक्षित - अशिक्षितांचे शत्रू...
शहरी - गावकऱ्यांचे शत्रू...
२+
"प्रतिगामीत्व"वर कुणा एकाच विशिष्ठ वैचारिक समूहाची मक्तेदारी नाही...हे सिद्ध करणारी वरील उदाहरणं. तरी यांत जात-धर्म-भाषा-प्रांत या फॉल्टलाईन्स गृहीत धरलेल्याच नाहीत.
मुद्दा हाच की "आम्ही" विरुद्ध "ते" अशी मांडणी करण्याची हौस सर्वांनाच असते. आणि -