हे जोकर्स जगातले सर्वात मोठे लूजर्स आहेत.
"मदहोश" हा शब्द अख्खा देश जगतोय कालपासून. शेवटचा विजयी फटका घडला तेव्हा ऑफिसमध्ये लॅपटॉपस्क्रिनला चिकटून बसलेली अख्खी टीम किंचाळत नाचायला लागली.
१+
सचिन सौरव राहुल नंतर मी क्रिकेटच्या बाबतीत अगदीच अरसिक झालोय.
इतका की मला आपल्या टीममध्ये कोण प्लेयर्स आहेत हेही माहित नसतं. तरी मला कालच्या विजयाने विलक्षण ऑस्सम फिलिंग दिली.
पण काही आंबट चेहऱ्याचे लोक मात्र जरा आनंदी होऊ शकत नाहीत, हसू शकत नाहीत.
यातून काय कळतं माहितीये?
२+
तुमची मानसिकताच पराभूताची असेल तर तुम्हाला जिंकण्याचा आनंद कधीच मिळू शकणार नाही...!
तुम्हाला हिंदुत्व आवडत नाही. हा विचार भारतात इतक्या झपाट्याने का पसरलाय हा विचार करण्याची तुमची वैचारिक क्षमताच नाही. त्याची टर उडवावीशी वाटते.
म्हणून मग उठसुठ -
३+
बीफ बॅनवर शेरेबाजी करावीशी वाटते. (हिंदुत्व म्हणजे बीफ बॅन नव्हे - कित्येक हिंदुत्ववादी बीफ बॅन विरोधक आहेत...हे सगळं समजणं तर अपेक्षितच नाही...! असो.)
पण त्याचा क्रिकेटशी, क्रिकेट सामना जिंकण्याशी काय संबंध?
४+
ही टीम "भारतीय" नाही असं अनेकांना वाटतं नि त्याबद्दल अनेकदा लिहिलं देखील जातं. BCCI ला सरकारी देखरेखीखाली आणायला हवं ही मागणी फार जुनी आहे. स्पॉन्सरशिप, त्यातील आथिर्क गणितं सगळं ट्रान्स्परन्ट हवंच.
पण -
५+
पण एरवी त्यावर चकार शब्द नं उच्चारणारे, त्यासाठी कसलीही कॉंक्रिट कृती नं करणारे विदूषक जेव्हा टीमने घाम गाळून, विपरीत परिस्थितीत मिळवलेल्या विजयाची खिल्ली उडवण्यासाठी "ही टीम भारतीय नाही" असं म्हणतात तेव्हा ते जगातले सर्वात मोठे लूजर्स ठरतात.
६+
इतरांनी जिंकलेली मॅच हे लोक मात्र हरतात!
जीवनात काहीही झालेलं चालेल...पण असं लूजर होऊ नये राव कुणी...!
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
राम मंदिराबद्दल आस्था असणारे बिनडोक ठरवावेसे वाटताहेत
यातून तुम्ही सामान्य भारतीयांपासून किती दुरावले आहात हे कळतंच. पण तुम्ही किती अमानवी आहात, हे ही दिसतं.
१+
शतकानुशतके या भूमीवर एक वारसा जपला गेलाय. इथल्या मातीने आमच्यात काही मूल्यं रुजवली आहेत. आमच्या आजी आजोबांनी आम्हाला लहानपणापासून काही गोष्टी सांगितल्या आहेत. मोठे होत असताना आम्ही इतिहास शिकलो आहोत.
भूतकाळातील घटना वर्तमानवर आघात करत भविष्य घडवत असतात, हे माहितीये आम्हाला.
२+
राम मंदिर या सगळ्याचाच परिपाक आहे.
जिजाऊ आईंनी छत्रपती शिवरायांना घडवताना रामच शिकवला. लहानपणी चांदोबा दाखवताना आईने रामाची गोष्टच सांगितली. म्हणूनच जय राम जी की ते राम राम ते राम नाम सत्य है पर्यंत कणाकणात रुजलाय राम इकडे.
प्रॉब्लम हा आहे की व्हाट्सअप फक्त अर्णबकडेच नाहीये.
===
Broadcast Audience Research Council च्या माजी CEO, पार्थो दासगुप्ता आणि रिपब्लिक चॅनलचा एडिटरइनचीफ अर्णब गोस्वामी यांच्या तथाकथित चॅट्सवरून हलकल्लोळ माजलाय. चॅट्स किती खऱ्या आहेत इथपासून सुरुवात आहे.
दासगुप्तांना त्रास दिला गेलाय या तक्रारीदेखील वाचायला मिळाल्या आहेत. पण तूर्तास या चॅट्स मुंबई पोलिसांनी उघड केल्या आहेत म्हणजे खऱ्या आहेत असं मानून चालू.
राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या गोंगाटात या चॅट्समध्ये नेमकं गंभीर काय आहे हे नीट बघितलं तर मला ४ आरोप प्रामुख्याने दिसलेत.
२+
पहिला - पुलवामा अतिरेकी हल्ला झाल्याचा आनंद होणे
दुसरा - बालाकोट एअर स्ट्राईकबद्दल आधीच माहिती असणे
तिसरा - टीआरपी कमी-जास्त करण्याबाबत BARC च्या माजी CEO आणि COO मधील संभाषण
एखाद्या राजकारण्याने विवाहबाह्य संबंध ठेवण्यावरून वादंग उठणं स्वाभाविक आहे. पण त्यातून आपल्या समाजाचे दिसणारे विविध पदर विचारात पाडतात.
"त्या"ने ठेवलेले संबंध तरण्याबांड मर्दाचे, कर्तृत्वाचे निदर्शक असतात.
"त्या"चे प्रियजन हिरीरीने समर्थनात उतरतात.
१+
आज त्याद्दल उघडपणे बोलणारी स्त्री वाईट हेतूने करतीये हे समर्थनाचं लॉजिक असतं.
हेच एखाद्या "ती" ने केलं असेल तर?
हेच एखाद्या स्त्रीबद्दल बाहेर आलं तर?
काय होईल?
विवाहबाह्य संबंध सरसकट चांगले की वाईट - हा मुद्दा नाहीये इथे. ते का होतात वगैरे मानस-समाजशास्त्रीय विवेचनही नाही.
२+
पुरुषाचं कर्तृत्व आणि स्त्रीचं बदफैलीपण - हा फरक किती खोल रुजलेल्या प्रो-मेल विचारांमधून आलाय - हा मुद्दा आहे.
एखादा कूल डूड फिल्मस्टार भरपूर लफडी करतो...ते कौतुक असतं. पण अभिनेत्रीने मॅरीड पुरुषाशी संबंध ठेवले तर ती "घर तोडणारी" असते.
मैथिली ठाकूर या गोड गळ्याच्या गुणी गायिकेने बॉलिवूडमध्ये गाण्याची संधी नाकारली म्हणून तिचं बरंच कौतुक होतंय. नाकारण्याचं कारण? बॉलिवूड हिंदू धर्मविरोधी आहे.
तिने उचललं पाऊल तिच्या करिअरसाठी योग्य की अयोग्य -
१+
बॉलिवूड खरंच हिंदू धर्मविरोधी आहे की नाही - या मुद्द्यांवर वाद घालण्यात अर्थ नाही. तिने तिला योग्य वाटलं ते केलं.
तिचं पाऊल योग्य, समर्थनीय, कौतुकास्पद वाटणाऱ्या मित्रमंडळींनी मात्र विचार करावा असं वाटतं.
२+
बॉलिवूडमध्ये हिंदू धर्मावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष टीका, हनन होत असतं हा जर आक्षेप असेल - तर त्यावर आपलं प्रत्युत्तर काय असायला हवं?
प्रेक्षक म्हणून तुम्ही-आम्ही बहिष्कार घालणं ठीकच. पण हिंदू धर्मप्रेमी, भारतीय संस्कृती प्रेमींनी बॉलिवूडवर बहिष्कार घालणं आपल्या मूळ आक्षेपाचं,
स्त्रियांना नोकरीचा अधिकार असावा काय? - नको! त्याने पुरुष बेरोजगार होतील!
देशात औद्योगिकरण करावं काय? - नको! त्याने गरिबी वाढेल!
भारतात मॅकडॉनल्ड्स यावं काय? - नको! त्याने वडापाववाले देशोधडीला लागतील!
FDI? - नको! त्याने देशी उद्योग परकीयांच्या मुठीत जातील!
१+
ईकॉमर्स? - छोट्या दुकानदारांचे शत्रू!
कम्प्युटर? - मानवी मेंदूचा शत्रू!
ओला-उबर - रिक्षा/टॅक्सीचे शत्रू!
श्रीमंत - गरिबांचे शत्रू...
शिक्षित - अशिक्षितांचे शत्रू...
शहरी - गावकऱ्यांचे शत्रू...
२+
"प्रतिगामीत्व"वर कुणा एकाच विशिष्ठ वैचारिक समूहाची मक्तेदारी नाही...हे सिद्ध करणारी वरील उदाहरणं. तरी यांत जात-धर्म-भाषा-प्रांत या फॉल्टलाईन्स गृहीत धरलेल्याच नाहीत.
मुद्दा हाच की "आम्ही" विरुद्ध "ते" अशी मांडणी करण्याची हौस सर्वांनाच असते. आणि -