ट्विटर वर थ्रेड अर्थात धागे टाकून ट्विटर चा पार 'जांगडबुत्ता' करून टाकणाऱ्या थ्रेडवीराची माहिती आम्हाला ट्विटर वर मिळाली,
असे अचाट थ्रेड लिहिणारास नाही भेटलो तर आपण खूप अज्ञानी राहू म्हणून त्यांचा मोबाईल नंबर मिळविला
आम्ही तडक फोन केला, फोन उचलला पण एक दोन चार-थ्रेड गुंडाळून ट्विटर टाकतो ,मग तुमच्याशी बोलतो असं बोलून थ्रेडवीर नी फोन काटला
अर्ध्या तासांनी त्यांनीच फोन केला आणि भेटीचा दिवस व वेळ ठरली
आम्ही थ्रेडवीरांच्या रूम वर पोहोचलो, थ्रेडवीरांनी हसून स्वागत केलं
रूम मध्ये बेडवर चारपाच डिक्षनऱ्या, दोन हँडबुक, टेबलवर पी. सी. दोन स्मार्टफोन असा पूर्ण लवाजमा दिसला
कोपऱ्यात जुनं 'चऱ्हाट' पण पडलं होतं
(आता ते का होतं आम्हाला समजलं नाही)
आम्ही म्हंटलं काय मस्त थ्रेड लिहिता हो तुम्ही...आम्हाला मध्येच थांबवत थ्रेडवीर बोलले, धागा म्हणा धागा शुद्ध मरातठीत
आम्ही- सॉरी , म्हणजे माफ करा खूप सुंदर, ज्ञानवर्धक, चित्तथरारक,मनोवेधक, उपहासात्मक , विज्ञानवादी (आम्हाला जेवढे मराठीतले अवजड शब्द सुचले तेवढे थ्रेडवीरावर फेकले )
धागे लिहिता तुम्ही
थ्रेडवीर मनोमन खूश होत गालातल्या गालात हसत बोलले- आम्हाला लहानपणी पतंग उडवायला आणि दुसऱ्याच्या पतंगाचे धागे कापायला खूप आवडायचे , तीच सवय आम्हाला ट्विटर वर आल्यावर उपयोगास पडली
अच्छा, आम्ही बोललो- मागे जेंव्हा तुमच्या 'दुश्मना' ने तुम्हास
ट्विटर वर छेडण्याचा प्रयत्न केला तेंव्हा आम्हाला एकदम बीआर चोप्रांच्या महाभारताची आठवण झाली, इकडून बाण तिकडून बाण,
अख्खे मराठी ट्विटर त्या दिवशी 'धागाळले' होते, पण मस्त लोळवले तुम्ही तुमच्या दुष्मनास
थ्रेडवीर- (थोड्या रागात)- काय पत्रास त्यांची आमच्यासमोर? असे हजार कौरव आले तरी हा एक 'पांडव' समर्थ आहे त्यांच्यासाठी
(आमच्या मनात आले पांडव पाच होते असे बोलावे, पण हे महाशय पांडव एकच होता हे पटवून देणारा एक धागा ट्विटर वर टाकतील आणि तो सर्व ट्विटर दुनियेला सहन करावा लागेल!)
आम्ही- व्वा, पण हे सुचतं कसं हो आपल्याला?
थ्रेडवीर हळूच कानाजवळ आले आणि बोलले- तुम्हास म्हणून सांगतो, बोलू नका कुणास, फेसबूक, विकिपीडिया, इन्स्टाग्राम, गूगल आणि जिथे मिळतील तेवढ्या इंग्लिश पोस्ट घ्यायच्या, डिक्शनरी घेऊन अनुवाद करायच्या आणि द्यायच्या ट्विटर वर सोडून,
आपली सामान्य जनता थोडीच इंग्लिश वाचते ?
छान, आम्ही बोललो तुमच्या बुद्धीची की..(बरं झालं पुढचे शब्द आमच्या तोंडातून बाहेर नाही पडले नाहीतर थ्रेडवीरांनी एक मोठा थ्रेड आमच्या मानेभोवती टाकून आमचा जीवच घेतला असता ) आम्ही चूक सावरत बोललो,हणजे कौतुक करावं तेवढं थोडंच आहे तुमचं
थ्रेडवीर- सोडतो की काय आम्ही कोणाला, नुसतं धाग्याचं जाळं विणून अडकवीन एकेकाला, कोण समजतात हे मूर्ख स्वतःला? आमच्या समोर लायकी आहे का यांची?
आम्ही दचकून मागे सरकलो
आणि हळूच विचारले
आता पुढे काय प्लॅन म्हणजे योजना आहे तुमची?
थ्रेडवीर- गिनीज ग्रंथ (book) आणि लिम्का ग्रंथ (book) मध्ये नाव आले पाहीजे असा लांबलचक धागा ट्विटर वर टाकून आम्ही ट्विटर सोडणार आहोत
आम्ही आश्चर्यचकित होत बोललो- तुम्ही ट्विटर सोडलं तर कसं होईल हो ट्विटर चं?
त्या ट्विटर मालकाला ट्विटर बंदच करावं लागेल. आणि आमच्या सारख्यांच कसं होईल??? 🤔
थ्रेडवीर बोलले-'कू' वर या, आता वेळ भरली या ट्विटर ची
आणि हो , कालच फोन आला होता त्या कू वाल्यांचा आम्ही त्यांना निक्षून
सांगितले हे ट्विटर सारख 'धागा' वगैरे नाजूक प्रकरण नका ठेवू आम्हाला 'चऱ्हाट' (दोरखंड) लावता आला पाहिजे कू वर
अर्थात मान्य करावेच लागले त्यांना
आम्ही - मग भेटू 'कू' म्हणून राम राम बोलून निघालो
थ्रेडवीर जाता जाता बोलले- नुसतं राम राम नाही , जय श्री राम बोला
बोलले आणि त्यांनी कोणत्या वर्तमान पत्रात येणार आहे ही आपली चर्चा असे विचारले
आम्ही जय श्रीराम बोलून त्यांना सांगितले ट्विटर वरच धाग्याच्या स्वरूपात येईल आपली ही चर्चा
दिवस - प्रेमाचा अर्थात १४ फेब्रुवारी
वेळ - सायंकाळी ०६.१५ अदमासे
🙏 #तिरकस
कथा #स्टूल_खरेदीची
तालुक्याच्या ठिकाणी एका कार्यालयात निकाली काढलेल्या , जुन्या झालेल्या फाईल्स चे गठ्ठे उंचावरील छपडी वर ठेवण्यासाठी स्टूल खरेदी करावयाचा होता
अर्थातच वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घेणं आवश्यक होतं.
सायबाच्या सहीनं स्टूल खरीदेची परवानगी मागणारं पत्र गेलं
काही दिवसांनी वरिष्ठ कार्यालयाकडून पत्र आलं
'आपले पत्र मिळाले परंतु स्टुलाची उंची किती हे पत्रात नमूद नाही'
स्टुलाची उंची नमूद करून वरिष्ठ कार्यालयाला पत्र गेलं
काही दिवसांनी पुन्हा पत्र आलं
'स्टुलाची उंची तर नमूद आहे, परंतु स्टूल लाकडी, प्लास्टिक अथवा फायबर चा ? याचा
उल्लेख नाही '
पुन्हा स्टुलाची , लाकडी स्टूल खरेदी करावयाच पत्र गेलं
वरिष्ठ कार्यालयाकडून काही दिवसांनी पुन्हा पत्र आलं
'स्टूल चार पायाचा खरेदी करणार की तीन पायाचा ? हे पत्रात नमूद नाही'
पुन्हा वरिष्ठ कार्यालयास पत्र गेलं , चार पायाच्या स्टूल खरेदीस परवानगी
मामा गावचे ग्रामपंचायत सदस्य (माजी सरपंच) आणि मामी तालुक्याच्या ठिकाणी बँकेत चेअरमन. तसे यावेळी पण मामाच सरपंच होणार होते , प्रचारावेळी सारखे म्हणायचे 'मीच हुनार' 'परत मीच हुनार' पण काय होणार हे सांगायला ते विसरले
पॅनल थोडक्यात गेलं, तरीपण मामांनी वरच्या आळीच्या 'दादा बारापटे' ना फोडून आपल्या पॅनल मध्ये सामील केलं पण दादांनी ऐनवेळी दगा दिला आणि मामा 'माजीच'राहिले.
तर असं हे सगळं सुरळीतच चाललं होतं.
मामी चेअरमन आहेतच पण मामींना आणखी एक जबरदस्त शौक-"गाण्याचा".
गावातल्या इतर बायांच्या अंगात देव्या येतात मामींच्या अंगात मात्र वर्षातून कमीतकमी चार-पाचदा 'गाणं येतं'
आणि अंगात गाणं कधी येणार हे मामा आणि मामींना बरोब्बर माहिती असतं