सेठ आणि मोटाभाई यांच्यात अतीगुप्त ठिकाणी ,अतीगुप्त बैठक पार पडली त्या बैठकीत चाय देणारा नौकर आमच्या खास ओळखीचा.
त्याने दिलेल्या माहितीनुसार गुजराती भाषेत पार पडलेल्या त्या बैठकीचा मराठी अनुवाद
मोटाभाई आधीच पोहोचले होते सेठ गाडीतून उतरून बैठकीच्या हॉल मध्ये नेहमीच्या सवयीने इकडे तिकडे हात दाखवत आत आले
मोटाभाई-पण सेठ इथे कॅमेरे , चॅनलवाले कुणीच नाहीत
सेठ- (बोट दाखवत) सी सी टीव्ही कॅमेरा तर आहे !!
दोघेही स्थानापन्न झाले
मोटाभाई - (सरळ मुद्द्याला हात घालत)
तर आपल्या योजनेनुसार जवळ जवळ अखंड हिंदुस्थान तर आपल्या ताब्यात आलाच आहे आता बाहेर लक्ष द्यायला काय हरकत आहे ?
सेठ- म्हणजे? आम्हाला समजलं नाही
मोटाभाई - बाहेरच्या देशात ही आपलं ऐकणारं सरकार स्थापन केलं पाहिजे आपण
सेठ- (दाढीतल्या दाढीत हसत) याची सुरुवात झाली आहे मोटाभाई !!
मोटाभाई-(आश्चर्यचकित होत )कधी आणि आम्हाला कसं समजलं नाही ?
सेठ- बायडन भाऊ ला आम्हीच बसवलाय व्हाइट हाऊस मध्ये, रशियाचे दिवस संपले
मोटाभाई खुश होत- मी काय म्हणतो, आता श्रीलंका आणि नेपाळ पण घेऊ ताब्यात
सेठ विचार करत- कल्पना चांगली आहे, आपल्या देसी जेम्स बॉण्ड ला आणि
काही सेवकांना पाठवू तिकडे दांडकी घेऊन , त्यांना रोखायची कुणाची बिशाद आहे ?
मोटाभाई- मी तात्काळ बोलून घेतो जेम्स बॉण्ड शी.
आणि पुढच्या टप्प्यात पाकिस्तान, बांगलादेश घेऊ
सेठ दाढी कुरवाळत- त्याची गरज नाही, ते तर माझ्या दाढीलाच घाबरतात
मोटाभाई - श्रीलंका , नेपाळ आटोपून आफ्रिका, दक्षिण अमेरिका जपान, कोरिया, ऑस्ट्रेलिया, आखाती सर्व ठिकाणी ताबा मिळवू
सेठ- चांगली योजना आहे, मग करू सुरुवात
मोटाभाई- आणि आखरी चीन ला....
सेठ मोटाभाई ला थांबवत- मला एक अर्जंट मीटिंग आहे मी निघू का?
आणि सेठ लगबगीने न घाबरता निघून गेले
कथा #स्टूल_खरेदीची
तालुक्याच्या ठिकाणी एका कार्यालयात निकाली काढलेल्या , जुन्या झालेल्या फाईल्स चे गठ्ठे उंचावरील छपडी वर ठेवण्यासाठी स्टूल खरेदी करावयाचा होता
अर्थातच वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घेणं आवश्यक होतं.
सायबाच्या सहीनं स्टूल खरीदेची परवानगी मागणारं पत्र गेलं
काही दिवसांनी वरिष्ठ कार्यालयाकडून पत्र आलं
'आपले पत्र मिळाले परंतु स्टुलाची उंची किती हे पत्रात नमूद नाही'
स्टुलाची उंची नमूद करून वरिष्ठ कार्यालयाला पत्र गेलं
काही दिवसांनी पुन्हा पत्र आलं
'स्टुलाची उंची तर नमूद आहे, परंतु स्टूल लाकडी, प्लास्टिक अथवा फायबर चा ? याचा
उल्लेख नाही '
पुन्हा स्टुलाची , लाकडी स्टूल खरेदी करावयाच पत्र गेलं
वरिष्ठ कार्यालयाकडून काही दिवसांनी पुन्हा पत्र आलं
'स्टूल चार पायाचा खरेदी करणार की तीन पायाचा ? हे पत्रात नमूद नाही'
पुन्हा वरिष्ठ कार्यालयास पत्र गेलं , चार पायाच्या स्टूल खरेदीस परवानगी
मामा गावचे ग्रामपंचायत सदस्य (माजी सरपंच) आणि मामी तालुक्याच्या ठिकाणी बँकेत चेअरमन. तसे यावेळी पण मामाच सरपंच होणार होते , प्रचारावेळी सारखे म्हणायचे 'मीच हुनार' 'परत मीच हुनार' पण काय होणार हे सांगायला ते विसरले
पॅनल थोडक्यात गेलं, तरीपण मामांनी वरच्या आळीच्या 'दादा बारापटे' ना फोडून आपल्या पॅनल मध्ये सामील केलं पण दादांनी ऐनवेळी दगा दिला आणि मामा 'माजीच'राहिले.
तर असं हे सगळं सुरळीतच चाललं होतं.
मामी चेअरमन आहेतच पण मामींना आणखी एक जबरदस्त शौक-"गाण्याचा".
गावातल्या इतर बायांच्या अंगात देव्या येतात मामींच्या अंगात मात्र वर्षातून कमीतकमी चार-पाचदा 'गाणं येतं'
आणि अंगात गाणं कधी येणार हे मामा आणि मामींना बरोब्बर माहिती असतं