मामा गावचे ग्रामपंचायत सदस्य (माजी सरपंच) आणि मामी तालुक्याच्या ठिकाणी बँकेत चेअरमन. तसे यावेळी पण मामाच सरपंच होणार होते , प्रचारावेळी सारखे म्हणायचे 'मीच हुनार' 'परत मीच हुनार' पण काय होणार हे सांगायला ते विसरले
पॅनल थोडक्यात गेलं, तरीपण मामांनी वरच्या आळीच्या 'दादा बारापटे' ना फोडून आपल्या पॅनल मध्ये सामील केलं पण दादांनी ऐनवेळी दगा दिला आणि मामा 'माजीच'राहिले.
तर असं हे सगळं सुरळीतच चाललं होतं.
मामी चेअरमन आहेतच पण मामींना आणखी एक जबरदस्त शौक-"गाण्याचा".
गावातल्या इतर बायांच्या अंगात देव्या येतात मामींच्या अंगात मात्र वर्षातून कमीतकमी चार-पाचदा 'गाणं येतं'
आणि अंगात गाणं कधी येणार हे मामा आणि मामींना बरोब्बर माहिती असतं
या वेळचाही मुहूर्त निश्चित झाला होता. मामांनी गावातल्या एकूण एक चौकात पोस्टर लावली आणि मामींच्या अंगात अमक्या दिवशी गाणं येणार म्हणून जाहीर करून टाकलं
पोस्टर वर मामा-मामी दोघांचेच फोटो झळकले, कारण दोघांचे फोटो टाकल्यावर बाकी कुणाला जागाच उरत नाही !!
तर गाण्याचा कार्यक्रम मामांच्या वाड्यावरच होणार होता
मामांनी तालुक्याच्या ठिकाणाहून मोठ्या बँड ला आणि मागे साथ देणाऱ्या सात आठ गायिकांना सुपारी दिली
आमच्याप्रमाणेच अख्खा गाव त्या दिवसाची कानात तेल ओतून वाट पहात होता
गाणं सुद्धा त्या दिवसाची वाट पहात होतं
शेवटी तो दिवस आलाच , संध्याकाळी बरोब्बर पाच वाजता तो नामचीन बँड, व्हिडीओ शूटींग चे सातआठ कॅमेरे असा सारा लवाजमा गावात हजर झाला
मामींच्या बँकेच्या 'ब्रँच' मधले झाडून सगळे अधिकारी-कर्मचारी न चुकता उपस्थित होते .
सगळी तयारी करून मामी संध्याकाळी साडेसहा च्या ठोक्याला हातात माईक घेवून हजर झाल्या.
आम्हीपण कोपऱ्यात विजार आणि टोपी संभाळत वाट बघत होतो.
घरावलीनं (आमच्या) बजावून सांगितलं होतं जाताय तर जावा , पण मागच्यावेळी सारखं कान धरून येवू नका
ग्रामपंचायत ची झाडून सगळी मेम्बरं, मामींचे 'ब्रॅंचवाले' , गावातली चिल्ली पिल्ली लेकरं हजर होती
माईक हातात आल्या आल्या मामींच्या अंगात गाणं यायला लागलं (तसे मामा पण कमी नव्हते, भाषणाच्या वेळी 'माझा माईक अन माझंच ऐक ' अशी त्यांची जुनीच खोड होती)
पण मामीचं गाणं म्हंटल्यावर एकदम पुढच्या रांगेत मामा स्थिरावले होते
तर अखेर मामींनी मोठा श्वास घेऊन तान घेतली
आहाहा काय तो आवाज, गाणं जसजसं पुढं जायला लागलं तशी 'ब्रँच' मधून आलेली मंडळी ,मामांनी चाळीस रुपयाचे तीर्थ पाजलेले कार्यकर्ते (४० पैशाचा जमाना गेला) बेधुंद होऊन नाचू लागले
मामांनी सगळ्या गावाला मामीचं गाणं ऐकण्याची व्यवस्था केली होती.
आत मामी आणि बाहेर लाऊडस्पीकर आणि मोठाले डीजे किंचाळत होते
पाळण्यात झोपलेली लहान लेकरं दचकून जागी झाली मोठ्यानं रडायला लागली, कुत्री जोरजोरानं ओरडायला लागली, दावणीची म्हशी, गाई,बैल, वासरं अचानक उड्या मारून दावी तोडून पाळायला लागली, मामाच्या वाड्याभोवती कावळ्यांनी गर्दी केली. अचानक एकच कल्ला सुरू झाला
आम्ही कानात बोळे घालून हातानं छाती दाबत मागे सरकलो.
रात्री आठ पर्यंत मामींच्या गाण्याचा कार्यक्रम चालला.
घरी आलो आणि अचानक थंडी वाजून ताप आला, दातावर दात आपटायला लागले घरवाली मठमोठ्यांन काहीतरी विचारत होती पण आमच्या कानात फक्त मामींच्या गाण्याचा आवाज घुमत होता.
वाकळ घेतली आणि कान हातात आणि जीव मुठीत धरून झोपलो ते थेट चार दिवसांनीच शुद्धीवर आलो
घरवालीनं देवाचे आभार मानले 🙏 #तिरकस
कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही
कथा #स्टूल_खरेदीची
तालुक्याच्या ठिकाणी एका कार्यालयात निकाली काढलेल्या , जुन्या झालेल्या फाईल्स चे गठ्ठे उंचावरील छपडी वर ठेवण्यासाठी स्टूल खरेदी करावयाचा होता
अर्थातच वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घेणं आवश्यक होतं.
सायबाच्या सहीनं स्टूल खरीदेची परवानगी मागणारं पत्र गेलं
काही दिवसांनी वरिष्ठ कार्यालयाकडून पत्र आलं
'आपले पत्र मिळाले परंतु स्टुलाची उंची किती हे पत्रात नमूद नाही'
स्टुलाची उंची नमूद करून वरिष्ठ कार्यालयाला पत्र गेलं
काही दिवसांनी पुन्हा पत्र आलं
'स्टुलाची उंची तर नमूद आहे, परंतु स्टूल लाकडी, प्लास्टिक अथवा फायबर चा ? याचा
उल्लेख नाही '
पुन्हा स्टुलाची , लाकडी स्टूल खरेदी करावयाच पत्र गेलं
वरिष्ठ कार्यालयाकडून काही दिवसांनी पुन्हा पत्र आलं
'स्टूल चार पायाचा खरेदी करणार की तीन पायाचा ? हे पत्रात नमूद नाही'
पुन्हा वरिष्ठ कार्यालयास पत्र गेलं , चार पायाच्या स्टूल खरेदीस परवानगी