किती गोड पोरगी ही.. पाहताक्षणी उचलून घ्यावं आणि पोट भरून पापे घ्यावेत अशीच नाही का?
कोणाला खरं वाटेल की ही सध्या "स्पायनल मस्क्युलर ऍट्रॉफी" सारख्या जीवघेण्या आजाराशी लढतीये? ह्यावर भारतात औषध नाही. परदेशात ह्यावर जालीम इंजेक्शन आहे, ज्याची किंमत आहे १८ कोटी रुपये.
घरची परिस्थिती एवढी नाहीये कि ते स्वतः हा खर्च करू शकतील. आत्ताच ही बातमी न्यूज १८ लोकमतवर पहिली.
ह्या आजारात एक एक अवयव निकामी होत जातो. अवयव निकामी झाल्यावर इंजेक्शन देऊन गेलेला अवयव परत आणता येत नाही.
त्यामुळे जेवढं लवकर ह्या गोडुलीला हे इंजेक्शन मिळेल तेवढं हिच्यासाठी हे चांगलं आहे. हा आजार भयंकर दुर्मिळ आहे. नाहीतर दोन वर्षापेक्षा जास्त जगत नाही बाळ..
मी माझ्यापरीने मदत केलीये..
मन द्रवलं तर आपणसुद्धा हे कराल अशी आशा व्यक्त करतो. ह्या गोड बाळाचा प्रसन्न असा विडिओ अजून डोळ्यासमोरून जात नाहीये. काय सहन करत असेल ही
त्या वेदनेची कल्पना करू शकत नाही आपल्यापैकी कोणी पण यथाशक्ती मदत तरी नक्कीच करू शकतो..
जमल्यास करा अथवा आपल्या ओळखीच्यांना सांगा..
पेमेंटची लिंक पहिल्या कमेंटमध्ये...
जमल्यास शेअर करा हा संदेश.. कॉपी पेस्ट करून आपापल्या वॉलवर डकवा.. व्हॉट्सप आहेच..
हल्ली एक नवीन फॅड आलंय, एक फोटो दाखवायचा आणि म्हणायचं, "इतरांची सही सगळेच घेतात, पण हि माझ्या राजाची सही", आणि मग मोडीत लिहिलेला एक शब्द दिलेला असतो.
याने होतं काय, कि वाचणाऱ्या व्यक्तीला मोडी येत नाही त्यामुळे काय लिहिलंय ते नेमकं समजत नाही.
पाठवणाऱ्या व्यक्तीला मुळात मोडी येत नसल्याने, केवळ मोडी हि शिवकालीन लिपी, त्यामुळे प्रत्यक्ष महाराजांची म्हणून तो समोरच्याला काहीही माहित नसताना चिकटवून देतो ! अशाने काय होतं ? जी गोष्ट मुळात नाही ती पसरण्यास आपण कारणीभूत होतो.
असेच हे दोन फोटो पुढे देत आहे.
यापैकी-
पहिल्या फोटोत केवळ "राजेश्री सिवाजीराजे" एवढंच लिहिलं असून हि स्वाक्षरी तर सोडाच, पण हे महाराजांचं स्वतःचं हस्ताक्षर सुद्धा नाही. हे एका फडकरी कारकुनाचे हस्ताक्षर आहे. हे शब्द १६६९-७० च्या डोहर देशमुखांच्या महाजरातील आहेत.
#पोलिसांमधला_माणूस
काल माटुंगा (दादर) येथे बंदोबस्त करत असताना एक १४ वर्षाचा मुलगा आला आणि विचारलं ,"साहेब चहा घेणार का ?" कारोना सारख्या महामारीचा विचार करून आधी वाटल हा कोण ? कसा आहे चहा ? कसा बनवला असेल ? म्हणून त्याला नाही सांगितले.
पण नंतर समजले नाही मनात काय विचार आला..
त्याला बोलवून घेतले सहज विचारलं, "बाळा नाव काय तुझं?" "सागर माने" असं नाव सांगून त्याने नकळत अंगावर असलेल्या वर्दी कडे बघितले. त्याला विचारले, "बाळा चहा का विकतोस?" तर त्याने सांगितले "२९ मार्च ला वडील वारले, त्यांचं चहा च कॅन्टीन होतं, आता पर्यंत जितकं कमवल होत तितकं सगळ संपलं
घरात आई आणि मी, आई आजारी असते त्या मुळे मीच चहा बनवून विकतो आणि रोज २०० रुपये मिळवतो, कारण आता शाळा चालू झाल्या तर वह्या पुस्तक घ्यायला पैसे नाहीत, घर भाड द्याच आहे. "अस बोलून तो गप्प बसला.त्याला विचारलं, "तुला पुढे शिकायचं आहे का?" तर पटकन बोलला, "तुमच्या सारखं पोलीस होयच आहे."
छत्रपती श्रीशिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारे अनेक गडकिल्ले शेकडो वर्षांनीसुद्धा ताठ मानेने अभेद्यपणे उभे आहेत.
शिवरायांनी गडकिल्ले तुम्हाला सिगरेट ओढायला जिंकले का?गड-किल्ल्यांच्या बाबतीत नेहमी एक गोष्ट समोर येते,ती म्हणजे गड- किल्ल्यांवर होणारा व्यसनी लोकांचा धिंगाणा
वाढती व्यसनाधीनता आणि सामाजिक बेजबाबदारपणा यामुळे अनेक गडकिल्ले असुरक्षिततेच्या जाळ्यात अडकले आहेत. कधी दारूचे अड्डे तर कधी गर्दुल्यांचे अड्डे तर कधी सिगरेट, हुक्का पिणे.गड-किल्ले हा केवळ सामाजिक किंवा सांस्कृतिक विषय नाहीये.
तर शिवरायांच्या, शंभूराजेंच्या,मावळ्यांच्या, आणि हिंदवी स्वराज्यासाठी रक्त सांडलेल्यांचे प्रतिक आहे.राज्याच्या सुवर्ण इतिहासाचे साक्षीदार आहेत.नरवीर तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी,शिवा काशीद अश्या असंख्य मावळ्यांच्या साथीने शिवरायांनी ३५० हुन अधिक गडकिल्ले जिंकले
ट्रेकिंग करणे जितकं वाटत तितकं सोपं नाही.येण्या जाण्याची सोय बघणं.सगळ्यात अवघड म्हणजे पहाटेच्या साखर झोपेतून जागे होऊन सह्याद्रीची वाट धरण.आडवे उभे डोंगर चढण येड्या गबळ्यांच काम नाही.चालताना लागणार दम ,येणारा घाम हे सगळं सहन करावं लागतं.इथं सगळ्याची तयारी ठेवावी लागते.
उन्हासाठी सनब्लॉक, टोपी, गॉगल असेल , पावसासाठी वाऱ्यासाठी जॅकेट आणि थंडी साठी कानटोपी, थर्मल्स, स्वेटर...याच्यासाठी हे आणि त्याच्यासाठी ते..तरीही जोरात पाऊस यायच्या आत त्यात उबदार गोष्टींचा बंदोबस्त असून.थंडी वाजणार नाहीच तळपत्या उन्हानं सनबर्न होणार नाहीच याची काही खात्री नाही.
आपल्याला काय पाहिजे ते आपण करायचं निसर्गाला काय पाहिजे ते तो करून घेतो.ऊन, वारा, पाऊस, थंडी सह्याद्री प्रत्येक वेळी तुमची परीक्षा पाहत असतो.तिथे गेल्यावर कोण गरीब अन कोण श्रीमंत हा भेदभाव राहत नाही. छोट्याश्या सॅक मध्ये सगळं माववावं लागतं.
गडावर हनुमानाची मूर्ती का असते?
वायूप्रमाणेच हनुमानाची गती, तेज व त्वरा आहेत. तो पर्वतप्राय प्रचंड रूप धारण करू शकतो; यथेष्ट रूप धारण करण्याचा त्याचा हा गुण तर खास यक्षवंशीय गुण आहे. नंतरच्या काळात हा पूर्वीचा यक्ष- हनुमान रामकथेशी जोडल्यामुळे आदर्श रामभक्त म्हणून जनमानसात रूढ
झाला. हनुमान शेंदूरलिप्त, रक्तवर्ण, भुतांचा स्वामी, रोगांपासून वाचविणारा, संततिदायक असल्याने गावात याचे स्थान पाण्याजवळ, पिंपळाखाली पारावर किंवा वेशीजवळ आढळते.छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेल्या प्रत्येक किल्ल्यावर कमीत कमी ५० तर जास्तीत जास्त २००० चे सैन्य असे.
हे सैन्य ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता अष्टौप्रहर डोळ्यात तेल घालून पहारा देत असे. रात्री-अपरात्री गडावर वावरणाऱ्या या मावळ्यांना तथाकथित भुताखेतांपासून संरक्षणासाठी हनुमंताचा मोठा आधार वाटायचा. गावोगावच्या वेशींचे रक्षण करणारा हा देव आपले गडावरही रक्षण करेल
"गोंदया आला रे "
२२ जून १८९७ साली पुण्याच्या गणेशखिंडीत आरोळी घुमली! गोंदया आला रे...
आणि पुण्यावर अत्याचार करणाऱ्या रँडचा वध !!!
प्रसंग १ : रात्रीच्या वेळी एक बग्गी जातेय. फक्त घोड्यांच्या टापंचा आवाज, मागे एक तरुण धावतोय. योग्य ठिकाणी तो आवाज देतो.
"अण्णा गोंद्या" शेजारच्या झाडीतून एक तरुण बाहेर येतो व बग्गीवर चढून गोळीबार करतो.
प्रसंग २ : धावत एक तरुण घरात घुसतो. लोकमान्यांना कार्यक्रमातून बाहेर बोलावतो आणि सांगतो की " खिंडीतला गणपती नवसाला पावला"
प्रसंग ३ : एका तरुणाला फाशी द्यायला नेत आहेत. चालता चालता तो एका कोठडीपाशी थांबतो व म्हणतो "येतो मी" आतून आवाज येतो "4 दिवसांनी भेटूच" कारण ४ दिवसांनी त्याला फाशी होणार असते. चापेकर बंधू हे आद्यक्रांतिकारी होते. १९व्या शतका अखेरीस पुण्यात प्लेगने थैमान घातले.