ट्विटरवर @ReallySwara स्वरा भास्कर च्या एका ट्विटने एका नवीन वादाला जन्म दिला आहे.आंबेडकरवादी कोणाला म्हणायचे ? हाच एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे ! "आंबेडकरवाद" याची व्याख्या काय आहे ? आंबेडकरी समाजाला काय सांगायचे आहे ? त्याचा नेहमी विपर्यास केला जातो. 😑 का ?
1/17
हा सगळा घोळ आहे तो फक्त दृष्टिकोनाचा.बोलण्याच्या पद्धतीचा.सांगण्याच्या पद्धतीचा.आंबेडकरवादी, लोकांना काय सांगू इच्छितात आणि लोक त्याचा काय अर्थ काढत आहेत. एक तर आंबेडकरवादी लोक समजावीण्यात कमी पडत आहेत. एक तर लोकांना कढत नाही किंवा कळल्यावर ही न कळण्याच ढोंग करत आहेत.
2/17
किंवा आंबेडकरवादी लोकांनाच आंबेडकरवाद मुळात कळला नाही ? यापैकी काहीही होऊ शकत.आंबेडकर वाद म्हणजे काय ? तर सर्वात सोपी भाषेत म्हणजे तर "अंधश्रद्धेला दूर करून वैज्ञानिक दृष्टिकोनातून जग अथवा परिस्थिती पाहणे" याला आंबेडकर वाद आपण म्हणू शकतो. अथवा यालाच आंबेडकर वाद म्हणतात.
3/17
आंबेडकरवादी लोक फक्त इतकंच सांगू इच्छितात की जर तुम्ही आंबेडकरवादी आहात तर अंधश्रद्धेला नका मानू किंवा त्याला प्रोत्साहन नका देऊ. कारण अंधश्रद्धा आणि आंबेडकरवाद दोन्ही विपरीत गोष्टी आहेत. त्या एक होऊ शकत नाहीत. खरा आंबेडकरवादी अंधश्रद्धेला कधी पण समर्थन देणार नाही.
4/17
आणि तो देईल तर तो आंबेडकरवादी होऊ शकत नाही.हे असंच आहे जसं आपण स्त्रीमुक्तीच्या गोष्टी करायच्या आणि मनुस्मृती लोकांना वाचायला द्यायची आणि म्हणायचं "मनूने स्त्रियांसाठी उत्तम काम केलं ?" 😂
ह्या विपरीत विचार धारा आहेत. याच भान ही ठेवत नाही.
5/17
जर तुम्ही दोन विपरीत विचार धारेमध्ये जगत असाल तर तुम्ही "भ्रम" अवस्थेमध्ये जगत आहात. हे लक्षात ठेवा. राहिला प्रश्न श्रद्धेचा ! तर श्रद्धा आणि अंधविश्वास किंवा अंधश्रद्धा यांच्यामध्ये फार अस्पष्ट अशी सीमारेषा असते.
6/17
श्रद्धा कधी ती ओलांडून अंधश्रद्धा होईल ते श्रद्धाळूला कळत सुद्धा नाही. त्यासाठी व्यक्तीला सदैव जागृत राहावे लागते.
मंदिरात तास् न तास पूजा करणे, शुभ अशुभ वेळ पाहणे, हवन कर्मकांड वगैरे अंधश्रद्धा आहेत. जे संस्कृतीच्या नावाखाली खपवल्या जात आहेत .हे बंद व्हायला पाहिजे.
7/17
हेच आंबेडकरवादी लोकांचं म्हणण आहे.
तुमची श्रद्धा प्रबळ असेल तर तुम्हाला कोणत्याच कर्म कांड करण्याची गरज नाही. ती श्रद्धा मग तुमच्या कामात, बोलण्यात, तुमच्या आत्मविश्वासात, तुमच्या विचारात, तुमच्या यशात, लोकांना दिसतेच. त्यालाच आपण पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणतो.
8/17
आणि यालाच आंबेडकरवादी लोक "आंबेडकरवाद" म्हणतात.आणि हाच पाया बौद्ध धम्माचा आहे. म्हणून आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारला. पण याचा अर्थ असाही होत नाही की आंबेडकरवादी व्हायला तुम्हाला बौद्ध धर्म स्वीकारावाच लागेल. आणि असाही होऊ शकणार नाही की तुम्ही एकीकडे अंधश्रद्धा पाळा आणि
9/17
दुसरीकडे आंबेडकरवादी चळवळी लढवा.
कोणत्याही धर्माचा माणुस आंबेडकरवादी होऊ शकतो. फक्त त्याने जागृत असायला हवा. त्याच्या समाजात ज्या अंधश्रद्धा संस्कृतीच्या नावाखाली चालू आहेत त्याबद्दल त्याने आवाज उठवावा.इतकीच इच्छा आंबेडकरवादी लोकांची आहे की तुम्ही दुटप्पी पणा करू नका.
10/17
हा सर्व मुद्दा उठला तो स्वरा भास्कर यांच्या ट्विटमुळे. एकीकडे ते आंबेडकरवादी असल्याचे बोलतात आणि दुसरीकडे महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतात. शुभेच्छा द्या. पण त्या सोबत ज्या चुकीच्या गोष्टी होतात, त्याच्यावर बोट उचला. महाशिवरात्रीच्या नावावर जी लोकं व्यसनं करतात.त्या विषयी
11/17
(😂तस लोक रोजच पितात त्यात शंका नाही पण त्या दिवशी तर हक्काने पितात. )त्या विषयी बोला.जो दुधाचा दुरुपयोग होतो. त्या विषयी ही बोला.देव आहे? किंवा नाही ? हा वेगळा विषय आहे.तुम्ही श्रद्धा ठेवायला हवी ? किंवा नाही ? हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे.
12/17
पण तुमची श्रद्धा ही सीमा ओलांडून अंधश्रद्धेत प्रवेश करू नये. हाच आंबेडकरवादी लोकांचा प्रयत्न आहे.आणि राहिला प्रश्न "22 प्रतिज्ञांचा" तर बौद्ध लोकांसाठी ते तितकेच महत्त्वाचे आहेत जितका "बुद्ध आणि त्यांचा धम्म" हा धर्मग्रंथ महत्त्वाचा आहे .
13/17
कारण की त्या "22 प्रतिज्ञा" बाबासाहेबांनी यांनी अशाच नाही दिलेला आहेत.त्या पूर्ण अभ्यास करून ( धार्मिक आणि मानसिक दोन्ही ) दिलेल्या आहेत.ज्या आजच्या परिस्थिती ला ही लागू आहेत. एखाद्या व्यक्तीचा विचार त्याला त्या 22 प्रतिज्ञांचा विसंगत वाटला तर तो त्या विषयावर
14/17
आवाज उठवल्या शिवाय राहणार नाही. कारण बोलण्यापूर्वी 100 दा आणि लिहिण्या पूर्वी 1000 दा विचार करणारा व्यक्ती असाच भलत्या सलत्या प्रतिज्ञा त्यांच्या अनुयायांना देईल का ? "22 प्रतिज्ञा" वाचायला दोन मिनिटं लागतात.
15/17
परंतु त्या समजून घ्यायला आणि त्यांच्यावर अंमल करायला. संपूर्ण आयुष्य खर्ची घालावा लागत. हे लक्षात ठेवा.ज्याप्रमाणे गणितामधील सूत्र असतं. त्या सूत्रांमध्ये तुम्ही तुमची संख्या टाकली, तर तुम्हाला तुमचं योग्य उत्तर मिळतं. त्याचप्रमाणे आंबेडकर साहेबांनी हेच सूत्र बनवलं की
16/17
ज्या सूत्रावर तुम्ही आणि इतरांचेही विचार पडताळून पाहू शकतात. "22 प्रतिज्ञा" जरी संविधानाचा भाग नसला तरी आंबेडकरवादा चा अभिन्न भाग आहेत. त्या "22 प्रतिज्ञा" ला सोडून आपण आंबेडकरवाद याचा विचारही करू शकत नाही
"आरक्षण" आणि "भ्रष्टाचार" संपविण्यासाठी प्रायव्हेटाझेशन नावाचं भूत भारत सरकारने आणलेलं आहे.(यातून भ्रष्टाचार जरी नाही संपला तरी, "आरक्षण" संपावं हा महत्त्वाचा आणि मुख्य मुद्दा आहे.)
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सरकारने ज्या सरकारी कंपन्या निर्माण केल्या.
1/16
त्या लोकांच्या गरजपूर्ततेसाठी त्यांच्या सुविधापूर्ततेसाठी "सेवाभाव" हा उद्देश ठेवून निर्माण केल्या. आणि दुसरीकडे शासन आणि प्रशासन सुव्यवस्थित चालावी यासाठी सरकारी कार्यालये निर्माण केली. त्या सरकारी कार्यालयाच्या मुख्य उद्देश आहे "गोपनीयता ".
2/16
आणि प्रायव्हेट सेक्टर मुळे "सेवाभाव" आणि "गोपनीयता" या दोन्ही गोष्टींचा भंग होणारचं आहे. "सेवाभाव" ची जागा "नफा" घेणार आणि "गोपनीयतेची" जागा "असुरक्षितता" घेणार.
प्रायव्हेट सेक्टर चे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करेल आणि जे आपल्याला सुख सुविधा देईल
3/16
सगळ्यात पहिले तर माणसाला एकटं जगता यायला पाहिजे. जर तुम्ही सुखासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहत असाल, तर तुम्हाला फक्त निराशाच मिळेल. सुख म्हणजे काय ? सुख फक्त एक दृष्टिकोन आहे.जगण्याकडे पाहण्याचा. जगामध्ये प्रत्येक व्यक्ति वेगवेगळा आहे. 1/9
त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीची सुखाची व्याख्या ही वेगवेगळी असते.आणि प्रत्येक व्यक्तीला त्या व्याख्या च्या तंतोतंत तसचं सुख हव असत.😊 जे शक्य नाही. प्रत्येक मनुष्य हा फिल्मी दुनियेत जगत असते.जे त्याच्यात दाखवतात तेच आपल्या जीवनात उतरविण्याचा प्रयत्न करतो.
2/9
आपल्या सगळ्या आवडी निवडी,फॅशन, स्टाईल, ह्या या फिल्मी दुनियेच्या आणि जाहिरातींच्या परिणाम आहेत.तुमच्या मैत्रिणी ची समस्या फार लहान आहे. आणि त्याचा एकच उपाय आहे आणि तो म्हणजे सगळ्यात प्रथम तिने तिच्या नवऱ्याला माफ कराव.आणि या गोष्टीचा स्विकार कराव की त्याचा एक भूतकाळ होता.
3/9
फक्त आणि फक्त बाबासाहेबांचा विरोध करण्यासाठी सोशल मीडियावर, सामाजिक- राजकीय व्यासपीठावर, काही #भिकमांगे#पिठमांगे#हाफ_चड्डी_धारक#मुगलांचे_वंशज संविधानाबद्दल कुप्रचार करत असतात, की संविधान दुसऱ्या देशातील संविधानाचे "कॉपी-पेस्ट" आहे !
1/22
या कुप्रचार मधे यांची पिढ्यान पिढ्या गेली आणि जात आहेत. हा या लोकांचा माघिल 70 वर्षांपासून चा धंदा आहे. जो आजही त्यांच्याच पिढीतली काही सडक्या डोक्याची नवीन पिढी जोमाने करत आहे. 😂 करत राह. संविधानाला विरोध तेव्हा ही झाला जेव्हा संविधान पूर्ण होऊन जगासमोर आले.
2 /22
तेव्हा देशातील नालायकांची तर सोडाच पण विदेशातील हलकटांनीही हास उडवलं. टिंगल टवाळी केली. भविष्यवाण्या केल्या कि, या संविधानावर भारत "एक वर्षही" टिकणार नाही. आणि त्यांना साथ दिली आपल्याच देशातील काही महामुर्खांनी.जे आजही तोच प्रकार रोज करतांना दिसतात.यात काही आश्चर्य नाही.
3 /22