बुद्धिभेदाचे दिवस संपले जीं
१)शिवरायांच्या मृत्यूनंतर त्यांची समाधी छत्रपती संभाजी महाराजांनी बनवली
१७३३ नंतर रायगड पेशव्यांच्या देखरेखीत असताना शिवरायांची समाधी ही पूर्णपणे भग्नावस्थेत आणि रानटी झुडपांमध्ये का दडली होती? त्याची इतकी वाईट अवस्था का झाली याची कल्पना केली तरी 1/n
उत्तरे आपोआप मिळत जातील
२)महात्मा फुलेंच्या पोवाड्यातील मोजका "यवन" हा शब्द उचलून हळुवार मुस्लिम द्वेषाची पेरणी करताना तुम्ही फुलेंच्याच पोवाड्याचा संदर्भ देता परंतु त्याच पोवाड्यातील आपल्या बापाचे सर्व हक्क मिळविण्यासाठी स्वतःच्या "आई" ची हत्या करणाऱ्या परशुरामाने केलेल्या
2/n
अत्याचारावर आणि त्याने माजविलेल्या गुंडगिरीमुळेच (पुंडाई) "यवनांचे" फावले ही मांडणी करणारा त्याच पोवाड्यातील उतारा मात्र सोयीस्कररीत्या विसरून जाता?
ऐसा कैसे चलेगा कुलकर्णीजी?
३)भगवदगीतेतील दडलेले तत्वज्ञान लोकभाषेत मांडणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी 3/n
निरीश्वरवादी महात्मा फुलेंचा विरोधच मुळात धर्मांधतेला असल्याने धर्मातील तत्वज्ञान परत मांडणारा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ त्यांना डावपेची वाटणे हे साहजिकच म्हणावे लागेल, त्यामध्ये विशेष असे काही नाही परंतु आपण सोयीस्कररीत्या हे विसरताय किंवा तुमच्या वाचकांपुढे हे सत्य चर्चेला न येऊ
4/n
देण्याची पुरेपूर काळजी घेताय की ज्या ज्ञानोबांबद्दल आपण "तात्पुरता" पुळका दाखवताय त्या ज्ञानेश्वरांच्या आई वडिलांना देहदंडाची(जलसमाधी)शिक्षा देणाऱ्या तत्कालीन धर्मांध लोकांबद्दल आपण काय बोलाल? त्यावर मूग गिळून गप्प का?
सनातन्यांकडून "कपोलकल्पित अनैतिक संबंधातून जन्मलेली मुलं"
5/n
म्हणून आयुष्यभर हिनवले गेलेल्या आणि ज्यांना सनातनी लोकांनी आयुष्यभर त्रास दिला (इतका की त्यांना भिक्षाही मागू दिली नाही) अशा ज्ञानोबांनी जगून प्रबोधन करायचा मानस लिहून ठेवूनही अचानक का समाधी घेतील याची चर्चा कधी करणार?
6/n
४)शिवरायांचे मन तुकोबारायांबद्दल कलुषित करण्यासाठी रामदासांचे अनेक भिक्षु या कामावर नेमले जाण्याची शक्यता गृहीत धरून महात्मा फुलेंनी तसं लिहिणं समजू शकतो, त्यासाठी स्वतः रामदासांनी प्रयत्न करण्याची गरज नव्हती !
जगदगुरु तुकोबाराय १६५० ला मृत्यू पावले, "वैकुंठवासी" झाले नाहीत!
7/n
चमत्कार नसतो असं आयुष्यभर सांगणाऱ्या तुकोबारायांना अचानक कोणते "पुष्पक विमान" घेऊन गेले हे आम्हाला सांगण्याचा आणि त्यांच्या "मृत्यूला" चमत्कारामध्ये अडकवून आपले हात स्वच्छ करण्याचा तुमचा केविलवाणा प्रयत्न आम्हाला ३५० वर्षांपासून ठाऊक आहे अध्यक्ष महोदय !
8/n
5)शिवरायांना अक्षरशून्य आणि अज्ञानी समजणाऱ्या शिवाजी राजाच्या "मुख्य भटपेशव्या सेवाकानें शिवाजीचे औरस वारसास सातारचे गडावर अटकेंत ठेविले" हे दर्शवणारा "त्या" पानाचा पूर्ण स्क्रिनशॉट का नाही दाखवत?
बर हे सगळं मांडताना मग सावरकरांनी शिवरायांवर लिहून ठेवलेले उच्च तत्वज्ञान 9/n
पाजळायला कसे विसरता?
शिवरायांनी स्थापिलेले स्वराज्य म्हणजे कावळा फांदीवर बसायला आणि फांदी तुटायला असा "काकतालीय योग" आहे मांडणारे तसेच शत्रूच्या सुनेला आपल्यापुढे पेश केल्यावर तिची तुलना आपल्या "आई" बरोबर करून तिला बाइज्जत सन्मानाने तिच्या घरी सुरक्षेसहीत पोहोचवून 10/n
संपूर्ण जगास नैतिकतेचा आदर्श मापदंड घालून देणाऱ्या शिवरायांचीही मापे काढून बलात्काराचे निर्लज्ज समर्थन करणारे सावरकरांचे तत्वज्ञान सोयीस्कररीत्या कसे विसरून जाता?
6)कोणत्या गणपती बद्दल बोलताय महाशय? अजून जरा समजून घेऊ की संत गाडगेबाबा आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या शब्दात !! 11/n
प्रबोधनकारांचे "देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे" वाचलं तर मग झोपणारच नाही तुम्ही, मग स्क्रिनशॉट टाकणे दूरच !
आता थोडक्यात महत्वाचं...
मुळात आपण आत्तापर्यंत महात्मा फुलेंना ब्राह्मणद्वेषाच्या चौकटीत अडकवून अत्यंत खोटा आणि चुकीच्या तर्काने मांडणी करत आलात
12/n
ब्राह्मण समाज आणि "सनातनी ब्राह्मणवाद" व दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत
"सनातनी ब्राह्मणवाद" किंवा "मूलतत्त्ववाद" हा प्रत्येक देशात वेगवेगळ्या स्वरूपात बघायला मिळतो
महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलेली सामाजिक क्रांती ही काय फक्त बहुजन समाजासाठी नव्हती त्यामुळेच
13/n
क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या पहिल्या मुलींच्या शाळेत "ब्राह्मण विद्यार्थिनीही" होत्या इतकेच नव्हे तर फुले दाम्पत्याने दत्तक घेतलेला "यशवंत" हा मुलगा एका विधवा ब्राह्मण स्त्रीचाच मुलगा होता !
ते लिहितात,
ख्रिस्त महंमद मांग ब्राह्मणासी ।। धरावे पोटाशी बंधुपरी।। २ ।। 14/n
महात्मा जोतिबा फुले-सावित्रीबाई नसत्या तर तुमच्या आमच्या माता भगिनी कधीच उच्चशिक्षित झाल्या नसत्या, नवऱ्याच्या मृत्यूनंतर जिवंतपणीच जळाल्या असत्या, लहानपणीच केशवपन करून आयुष्यभर नरकयातना सोसत बसल्या असत्या आणि आजची प्रगत दिसणारी स्त्री हे त्यांची तत्व आणि कार्याचं फलित आहे
15/n
हे मान्यच करावे लागेल !!
ज्योतिबा आणि सावित्रीबाईंवर वैचारिक शेणाचे शिंतोडे उडवणारे त्यावेळीही होते आणि तुमच्या सारख्या लोकांच्या रूपाने आजही आहेत हेच यानिमित्ताने सिद्ध झाले !
फरक इतकाच की तुमच्या बुद्धिभेदाला बळी पडणाऱ्यांची संख्या कमी झाल्याने आपली आगपाखड होते आहे !
16/n
तुमच्या जीवाची घालमेल आम्ही समजू शकतो.
मनुवादी सनातनी आणि मूलतत्त्ववादी लोकांना मुळात प्रबोधनच नको असते, प्रबोधनाचा प्रत्येक प्रयत्न संपवणे हेच एकमात्र उद्दिष्ट ठेऊन मग तो आवाज बंद करण्यासाठी तुम्ही कोणत्याही पायरीला उतरू शकता हेच आज तुमच्या गलिच्छ प्रयत्नांवरून सिद्ध होतंय
17/n
असो, महात्मा फुले व सावित्रीची लेकरं हे भ्याड प्रयत्न असेच हाणून पाडतील !!
18/18
चमत्कार नसतो असं आयुष्यभर सांगणारे तुकोबारायांचे काही अभंग
महात्मा फुले आणि सावित्रीबाईंवर वैचारिक शेणाचे शिंतोडे उडवणारे त्यावेळीही होते, नव्वदीच्या दशकात बाळ गांगल यांच्या रूपाने कधीकधी मधेच मान वर काढत होते आणि "यांच्यासारख्या" लोकांच्या रुपाने आजही आहेत !
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
टीव्हीवरील धार्मिक मालिका चवीनं बघणाऱ्या प्रत्येकासाठी…
झी मराठीवर एका नव्या मालिकेची जाहिरात बघितली "घेतला वसा टाकू नको" 1/n
प्रत्येक सणामागच्या आख्यायिकांवर आधारित असणाऱ्या या मालिकेतील "पाडवा" या सणावरच्या एपिसोडचे ट्रेलर चालू झाले आणि त्यामध्ये हळूच "जय श्री राम" ची राजकीय घोषणा घुसडल्याचं निदर्शनास आलं
लहानपणापासून घरोघरी साजरा होणाऱ्या पाडव्यादिवशी आयुष्यभर कधीही, कोणीही "जय श्री राम" नावाची 2/n
राजकीय आरोळी ठोकल्याचं आमच्या अजिबात ऐकिवात नाही !
मग अचानक ही टूम कोणी आणि का उठवली?
प्रत्येक सणाची आख्यायिका आणि त्याचा धागा पकडून, "घेतला वसा टाकू नको" सारखं इमोशनल वाक्य फेकून लोकांना मनोरंजनाच्या माध्यमांतून सत्यापासून कोसो दूर घेऊन जाणारी यंत्रणा ‘१९२५ ते आजतागायत’ 3/n
If you are thinking (like me in the past) that Mr. @ShekharGupta is a very knowledgeable and a neutral personality then this thread is just for you…
So, get ready to be surprised 1/n
This guy works so hard to contextualize the hegemony of this government (working so hard cherry picking favourable data points, which is not an easy job!)
I seriously believe (with evidence) that Shekhar Gupta is a more precious asset than even the likes of Arnab or
2/n
even Suresh Chavanke (loose canons, who don't have any sane audiences' trust anymore)
What makes Shekhar Gupta so distinctly lethal is the fact that he cherry picks objective data to contextualize, justify & normalize every Modi-Made Disaster.
3/n
कॉ गोविंद पानसरेंच्या "शिवाजी कोण होता" या पुस्तकाचा उल्लेख केला की पोरांना इमोशनल करायला काही दांभिक माणसं शिवरायांचा एकेरी उल्लेख, आदर वगैरेसारख्या पाणचट गप्पा मारतात !
ही तीच लोकं असतात जी पानसरेंचा खून "त्या" एकेरी उल्लेखातून झाला अशी अफवा उठवून 1/n
मूळ कारस्थानी "सनातन संस्थेला" वाचवायचा केविलवाणा प्रयत्न करतात
अशाच काही दांभिक लोकांनी एकदा शिवाजी विद्यापीठाचं नावही बदलायची टूम उठवली
या भामटेपणाचा समाचार घ्यायला आम्ही "शिवाजी विद्यापीठ - एक दर्जेदार नाव" हा ब्लॉग लिहिला होता (लिंक miyodha.blogspot.com/2019/12/blog-p… ) 2/n
त्यातला काही भाग आणि आणखी काही उदाहरणे आज आपल्यापुढं मांडतोय...
आपल्या भगिनी हादग्यामध्ये गाणी म्हणतात - "शिवाजी अमुचा राजा, त्याचा तो तोरण किल्ला..."
अनेक वर्षांपासून आपण घोषणा देतोय - "...जय शिवाजी"
3/n
"शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव व वजन-मापं यावर नियंत्रण ठेवणारी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींची शासन निर्मित संस्था"!
शेतकरी, शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, व्यापारी,खरीददार व राज्य शासन या सर्वांचा मेळ घालून मार्केट कमिट्या चालतात 2/n
यामध्ये मुख्यत्वे २ प्रकारचे व्यापारी असतात : आडते आणि खरीददार
बाजार समित्यांचे लायसन्स असणारे अनेक आडते असतात ज्यांच्याकडे प्रतिनिधी म्हणून शेतकरी आपला शेतमाल लावतो. कोणत्या अडत्याकडे आपला माल द्यायचा हे सर्वस्वी शेतकऱ्यावर अवलंबून असते. 3/n
31st special
👇 हे "विषारी पांडे"नं वाचलं नाही तरी चळवळीशी आत्मीयता असणाऱ्यांनी जरूर वाचावे !
हे आहेत "रज्जाक बादशाह मुल्ला", वय वर्षे ५२, रा कासेगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली.
३६ वर्षांपूर्वी (१९८४ साली) कर्मसंयोगानं त्यांनी व्यवसाय निवडला फोटो फ्रेम बनवायचा, 1/n
थोड्याच दिवसात त्यांच्या लक्षात आलं की अत्यंत भक्तिभावाने अनेक हिंदू बांधव त्यांच्याकडून देव-देवतांच्या फोटो फ्रेम बनवून घेऊ लागलेत
रज्जाक यांनी त्याक्षणी तीथूनपुढे आयुष्यभर शाकाहारी राहण्याचा निर्णय घेतला, 2/n
तेंव्हापासून तब्बल ३६ वर्षे कसल्याही मांसाहारी पदार्थाला त्यांनी चक्क साधा स्पर्शही केलेला नाही !
"माझ्या ग्राहकाच्या निगडित भावनांचा आदर एक व्यावसायिक म्हणून मी करायलाच हवा".. केवढा मोठा विचार ! केवढा मोठा त्याग !
3/n