सदू तसा आमचा जुनाच मित्र, शाळेत असताना वर्गमित्रांशी स्वतःच भांडणे करून आणि मार खाऊन गुरुजींकडे तक्रार करण्यात सदू पटाईत होता
शाळा सुटली की ज्याच्याशी भांडण झाले त्याला -ये आमच्या गावात मग दाखवतो तुला असं बोलून पुन्हा भांडण अंगावर घेणार.
तो गावात गेला की ,ये आमच्या गल्लीत ,असं म्हणून पुन्हा त्याला ठसन देणार
पोरं गल्लीत गेली की, हा घरात पळून जाऊन आईवडिलांना सांगणार
तर असा हा सज्जन आत्मा ट्विटर वर आला आणि पुन्हा तेच सुरू झालं
फरक एवढाच की आभासी दुनियेतील लोक प्रत्त्यक्ष भेटत नव्हती, तरी शब्दांचा मार बसायचाच
कॉलेजात असताना दोन वर्ष आमचा रूम पार्टनर होता, वडिलांनी पाठविलेले पैसे महिन्याच्या पहिल्या दहा पंधरा दिवसात संपवून पठ्ठा पुन्हा उधारी करायला मोकळा
टूथपेस्ट , तेल, साबण आमचंच वापरायचा पण आम्ही जाऊ दे म्हणायचो, एका गावचे , एका गल्लीतले
हॉटेल मध्ये मित्रांसोबत चहा-नाश्ता करायला गेल्यावर याला हमखास उशीर लागायचा आणि कुणीतरी मित्रानं बिल दिलं की हा खिसा चापचत बोलायचा, अरे यार मी दिलं असतं की !!!
तर असा हा सदू कोलेज मध्ये असतांनाच कुठल्याशा 'ब्रँच' मध्ये जायला लागला आणि त्याचा कायापालट च झाला . सर्व मित्रांना तो उपदेश देत सुटायचा , आम्ही वैतागून रूम बदलली
ट्विटर वर तो आम्हाला सिनियर, अनेक पाठीराखे असल्याने जे जे ज्ञान होते ते सर्व वाटत सुटला आणि त्याचे पाठीराखे न वाचताच लाईक, आरट्या ठोकू लागले
एका विशिष्ट विचारसरणीचे विचार पटले नाही तरी तो ट्विटर वर ठोकून द्यायचा (आता त्याचं कारणही सांगावं लागेल?)
ट्विटर वरील काही उडाण टप्पू? लोकांना खुपायला लागले आणि सदुचा खरपूस समाचार घ्यायला त्यांनी सुरू केले
एक दिवस सकाळी सकाळी गहिवरलेला, आपल्याच विचारात पडलेला सदू आम्हाला दिसला
आम्ही जवळ जाऊन खांद्यावर हात ठेवून आपुलकीनं विचारल , काय झालं रे सदू?
सदुच्या तोंडून शब्द बाहेर पडेनात, आम्हीच ओळखले ट्विटर वर काहीतरी लोच्या झाला असणार
सदुच्या वडिलांनी घेवून दिलेल्या बाईक मध्ये पेट्रोल नसणार हे माहिती असल्याने आम्हीच त्याला बळेबळे आमच्या बाईक वर बसवून चहाच्या टपरीवर घेवून गेलो
दोघांनीही मस्का पाव आणि चहा घेतला, खावून झाल्यावर सदुचा हात खिशाकडे गेला , आम्ही म्हंटलं , असू दे आम्ही देतो.
सदू थोडा रिलॅक्स झाल्यावर आम्ही विचारले , कशाला नसते वाद घालतोस ट्विटर वर?
लांब सुस्कारा सोडत सदू बोलला
काय सांगू नाना , त्यावरच पोटपाणी सुरू आहे आजकाल
आम्ही समजायचं ते समजून घेतले, सदुला घरी सोडून निरोप घेतला.
काळजी घे बाबा. #तिरकस #काल्पनिक
कुणालाही दुखावण्याचा हेतू नाही
क्रिकेट जगतातील महान क्रिकेटपटू, थोर क्रिकेट समालोचक, तज्ञ क्रिकेट प्रशिक्षक, ऑल टाईम ऑल राउंडर... आणखी बरेच काही बाही असणारे आमचे परमखिलाडी 'सेठ मनोहरदास' यांचे नाव एका छोट्याशा मैदानाला काय दिले आमच्या विरोधकांनी आकाश पाताळ एक केले
ज्याचे नुसते पोस्टर खोलीत लावून आम्ही क्रिकेट शिकलो ,आशा या प्रातः स्मरणीय, सेठ मनोहरदास यांचे योगदान माहिती नसणाऱ्या पामारांना त्यांचे योगदान आम्हास सांगावेच लागेल, म्हणून हा लेखन प्रपंच .
सेठ दासांना बोलायला यायला लागलं तर त्यांच्या तोंडातून पहिला शब्द बाहेर पडला 'क्रिकेट'
पण आईवडील शिकले नसल्याने याची नोंद इतिहासात नाही, पण सेठनीच येकदा खाजगीत आम्हाला सांगितले होते, आता त्यांनी सांगितले म्हणजे साक्षात शंकेस ही शंका घेण्याचा अधिकार नाही.
लहानपणी सेठ 'बडावनं' (शब्द थोडा अवघड आहे पण दास सोप्पं काम करतच नाहीत)
एक शेतकरी होता आणि त्याने पाळलेला एक कुत्रा होता. कुत्रा इमाने इतबारे शेतकऱ्याची सेवा करायचा आणि त्याबदल्यात कुत्र्यालाही शेतकरी आपल्या ताटातील जेवण द्यायचा. शेतकऱ्याच्या मुलांसोबत खेळायचा,झोपायचा.
शेतकरी शेतावर चालला की कुत्रा त्याच्या मागोमाग जायचा
शेतकरी शेतावर चालला की कुत्रा त्याच्या मागोमाग जायचा
शेतकऱ्याने बैलगाडी/ बैलबंडी बैलं जुंपून बाहेर काढली आणि शेतावर चालला की कुत्राही सोबत सोबत चालायचा
काही दिवसांनी कुत्र्याच्या डोक्यात वेगळीच हवा शिरायला लागली
बैलगाडी/बैलबंडी शेतावर चालली की, उन्ह लागतं म्हणून कुत्रा बैलगाडीच्या खालून, सावलीतून चालू लागला
बैलगाडी थांबली की कुत्रा थांबायचा
काही दिवसांनी कुत्र्याला असं वाटायला लागलं की आपण चाललो की बैलगाडी चालते आणि आपण थांबलो की बैलगाडी थांबते
आपणच बैलगाडी ओढतो असं कुत्र्याला वाटू
सदुभाऊ बायकोला म्हटले, आज आमची महत्त्वाची पत्रकार परिषद आहे,
थोडं लवकर नाश्तापाणी तयार करा बायको बोलली गॅस संपलाय,
कालपासून सांगतीय
संस्कारी सदू बोलला आणू आणू सिलेंडर
आणि सदून खिसा चाचपला
कार्यकर्त्याला फोन लावला आणि लवकर ये म्हणून निरोप दिला
कार्यकर्ता बोलला- गाडीत पेट्रोल नाही
सदुभाऊ बोलले टाक ना शंभर चं आणि निघ लवकर
कार्यकर्ता गाडी घेऊन हजर झाला आणि सदुभाऊ मागच्या सीट वर बसून पत्रकार परिषदेसाठी रवाना झाले.
जाता जाता हॉटेलात चहा नाश्ता झाला (उधारी लिहून ठेव असं सांगायला सदुभाऊ विसरले नाहीत)
पत्रकार परिषदेच्या ठिकाणी पोहोचायच्या आधीच शंभर मीटर वर गाडी बंद पडली
हटयोगशास्त्री, आंदोलनजीवी, उद्योगपती, अतिमहापरमपूज्य #बाबा_रंगदेव यांची मुलाखत
बाबाजींना अनेक दिवसांपासून मुलाखतीकरिता वेळ मागत होतो पण बाबाजी इतके व्यस्त की त्यांना आम्हाला मुलाखत देण्यासाठी वेळच मिळत नव्हता
अखेर तो योग आलाच
आम्ही बाबाजींच्या आश्रमात पोहोचलो तेंव्हा बाबाजी योगासने करण्यात व्यस्त होते. बाबाजींच्या शिष्याने आम्ही आल्याची खबर दिली आणि आम्हास बाजूच्या कुटीत बसविण्याची व्यवस्था केली