यह बीटा बीटा क्या है?
स्टॉक घेताना ज्या स्टॉकचा बीटा १ पेक्षा कमी आहे असे स्टॉक घ्या असे आपण बऱ्याच ठिकाणी वाचले असेल, किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराने तसे सांगितले असेल. हा बीटा म्हणजे नक्की काय? बीटाची व्हॅल्यू नक्की काय दर्शवते? हे सोप्या भाषेत जाणून घेण्याचा प्रयत्न #म#मराठी
अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर बीटा हे एखाद्या शेअरची मार्केटच्या तुलनेत असलेली व्होलाटीलिटी म्हणजेच अस्थिरता मोजण्याचे प्रमाण आहे. मार्केटचा बीटा १ धरला जातो आणि प्रत्येक स्टॉकची बीटा व्हॅल्यू ही मार्केटच्या तुलनेत ते किती वर खाली जाऊ शकतात यावरून ठरवली जाते. #म#मराठी
मार्केटच्या तुलनेत शेअरची मुव्हमेंट जास्त होत असेल तर बीटा १ पेक्षा जास्त असतो. हीच मुव्हमेंट मार्केटच्या तुलनेत कमी असेल तर बीटा १ पेक्षा कमी असतो. सर्वसाधारणपणे सगळेच सल्लागार लो बीटा कंपन्यांच्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करा असा सल्ला देतात. #म#मराठी
यामागे मार्केटमधील अस्थिरता वाढली तरी स्टॉक त्या तुलनेत कमी अस्थिर होईल असा होरा असतो.
एखाद्या कंपनीचा बीटा २ असेल म्हणजे मार्केट १०% वाढले तर त्या कंपनीचा शेअर २०% ने वाढणार. मात्र मार्केट जर ५% खाली आलं तर त्या कंपनीचा शेअर १०% ने खाली येणार. #म#मराठी
हेच जर कंपनीचा बीटा ०.५ आहे तर मार्केट १०% वर गेलं तरी कंपनीचा शेअर मात्र ५% ने च वर जाणार असं साधारण समीकरण असते.मार्केटमध्ये दररोज नवनवीन इन्व्हेस्टर्स येत असतात. गेल्यावर्षीपासून सतत वाढत चाललेला डिमॅट अकाऊंटचा आकडा हेच दर्शवतो. #म#मराठी
या सगळ्या इन्व्हेस्टर्सपैकी अनेकांना शेअर मार्केटचे पुरेसे ज्ञान नसते. काहीजण रिस्क घेण्याची तयारी असलेले असतात तर काहीजणांना आपले कॅपिटल किमान सुरक्षित रहावे अशी अपेक्षा असते. #म#मराठी
ज्यांची रिस्क घेण्याची तयारी आहे अशांनी हाय बीटा असलेल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी तर ज्यांची रिस्क टेकिंग कॅपॅसिटी कमी आहे, त्यांनी लो बीटा शेअर्समध्ये गुंतवणूक करायला प्राधान्य द्यावे असे म्हटले जाते. #म#मराठी
बीटा कसा मोजावा?
बीटा मोजण्याचा एक वेगळा फॉर्म्युला आहे ज्यामध्ये रिग्रेशन ऍनालिसिस वापरले जाते. मग हे किती वेळा करत बसायचं? नवीन गुंतवणूकदारांना हे कसे जमणार? #म#मराठी
तर हे करायची गरज नाही. इकॉनॉमिक टाइम्स, मनीकंट्रोलसारख्या आघाडीच्या वेबसाईट्स प्रत्येक स्टॉकची बीटा व्हॅल्यू देतात. त्यामुळे ती वेगळी कॅल्क्युलेट करण्याची गरज नाही.बीटा खरोखरच योग्य माहिती देतो का? #म#मराठी
बीटा व्हॅल्यू ही स्टॉकच्या व्होलाटीलिटीबद्दल माहिती देत असली तरी ती प्रत्येक वेळेस खात्रीशीरच असेल असे नाही. समजा एखाद्या कंपनीची बीटा व्हॅल्यू १ पेक्षा कमी आहे पण आता ही कंपनी बिझनेस एक्स्पान्शन करणार आहे. या नव्या वाटचालीत येऊ घातलेली रिस्क बीटा विचारात घेत नाही. #म#मराठी
म्हणजे भविष्यात घडणाऱ्या गोष्टींचा बीटा विचार करू शकत नाही. त्या घडामोडींवर आधारित बीटा व्हॅल्यू कमी जास्त होऊ शकते.
याबरोबरच एखादी कंपनी नव्याने बाजारात आली आहे. उदाहरणार्थ नजारा टेक्नॉलॉजी. #म#मराठी
तर ही कंपनी नुकतीच मार्केटमध्ये आल्याने या कंपनीच्या बीटा व्हॅल्यू कॅल्क्युलेशनला काही मर्यादा येतात. कारण त्यासाठी लागणारा पुरेसा डेटा मार्केटमध्ये उपलब्ध नाही. त्यामुळे या कंपनीची बीटा व्हॅल्यू १ पेक्षा बरीच जास्त असूही शकते. #म#मराठी
त्यामुळे जर शॉर्ट टर्म गुंतवणूक करणार असाल तर बीटाचा उपयोग होऊ शकतो. मात्र कंपनीच्या फंडामेंटल्सवर आधारित लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर बीटा उपयोगी ठरेलच असे नाही. याबरोबरच आत्ता हाय बीटा असलेल्या कंपनीचा #म#मराठी
शेअर लॉंग टर्ममध्ये चांगला रिटर्न देणार नाही असेही नाही. कारण कंपनीचे फंडामेंटल्सही चेंज होत राहतात.थोडक्यात डोळे झाकून अमुक कंपनीत पैसे टाक हा फंडा शेअर मार्केटमध्ये चालेलच असे नाही. एकदा पैसा टाकला की वेळोवेळी केलेल्या इव्हेस्टमेंटचा आढावा घेत राहणे तितकेच गरजेचे! #म#मराठी
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
भारत सरकारचे हे नवरत्न इन्व्हेस्टर्ससाठी रत्न ठरणार का?
NMDC म्हणजे National Mineral Development Corporation हा एक पीएसयू स्टॉक सध्या चर्चेत आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यात झालेल्या पडझडीत हा स्टॉक ६१ रुपयांपर्यंत पडला होता. #म#मराठी#NMDC
तिथून आजपर्यंत या स्टॉकने १००% हून अधिक परतावा दिला आहे.शुक्रवारी हा स्टॉक १३८ रुपयांवर बंद झाला. सध्या पीएसयू स्टॉक बरेच चर्चेत आहेत. मध्यंतरी पीएसयू बँकांनी चांगली रॅली दिली होती. त्यानंतर इतर पीएसयू स्टॉक्सनेही चांगली वाढ दिली. #म#मराठी
यातही NMDC चा उल्लेख यासाठी की या कंपनीचे प्रॉडक्ट हे आयर्न ओर म्हणजे लोखंड हे आहे.लोखंड, स्टील, साखर यांचा समावेश कमोडिटीमध्ये होतो. मार्केटमध्ये आता पुन्हा एकदा कमोडिटी सायकल सुरू झाल्याची चर्चा आहे. #म#मराठी
आयटीसी – झोपलेला कुंभकर्ण जागा होणार का?
आयटीसीच्या शेअरबद्दल चर्चा केली नाही असा इन्व्हेस्टर तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. गेले अनेक महिने अनेक विश्लेषक, अनेक टीव्ही चॅनेल्सवाल्यांनी हा शेअर सुचवला आहे. #म#मराठी#ITC
अनेक रिटेल इन्व्हेस्टर्स हा शेअर चांगला आहे म्हणून छोट्या मोठ्या संख्येने हा शेअर घेऊन बसले आहेत.शेअर मात्र वाढता वाढेना!! सोशल मीडियावर तर हा शेअर मीम मटेरियल झाला आहे. आयटीसीचा शेअर ०.५% टक्के वाढला तरी सोशल मीडियावर मिम्जचा पूर येतो. #म#मराठी
या शेअरची खिल्ली उडवणारे आहेत तसेच या शेअरचे पाठीराखेसुद्धा मोठ्या संख्येने आहेत. हा शेअर येणाऱ्या काळात ‘वेल्थ क्रिएटर’ ठरणार अशी आशा मनात ठेवून हे सगळे आयटीसी पाठीराखे आपले शेअर्स धरून बसले आहेत. पण नक्की परिस्थिती काय आहे? हे शेअर खरोखर इव्हेस्टर्ससाठी खरोखर चांगला आहे का? #म
क्रेडिट कार्डाची सुरुवात नक्की कशी आणि कुठे?
आजकाल प्रत्येकाकडे क्रेडिट कार्ड असते. एखादी बँक आपल्याला क्रेडिट कार्ड देते म्हणजे एक प्रकारचे कर्जच देते. बँकेच्या मते आपली पत किती आहे यावर या कर्जाची रक्कम म्हणजे आपलं ‘क्रेडिट लिमिट’ ठरतं. #म#मराठी
जसंजसं आपण कार्ड वापरत जाऊ तशी आपली क्रेडिट लिमिट कमी होत जाते. महिन्याच्या अखेरीस बँक या खर्चाचं बिल आपल्याला पाठवते. ते बिल भरलं की पुन्हा आपलं क्रेडिट लिमिट पूर्वी आहे तेवढं होतं. बिल नाही भरलं तर बँका जबर दराने व्याजआकारणी करतात. #म#मराठी
म्हणूनच लोकांनी क्रेडिट कार्ड घ्यावे यासाठी बँका प्रयत्नशील असतात.क्रेडिट कार्डाची सुरुवात नक्की कधी झाली? याबद्दल अनेक मतमतांतरे असली ज्याला क्रेडिट कार्ड म्हणता येईल अशा चार्ज प्लेट्स अमेरिकेत १९२८ साली अस्तित्वात आल्या. #म#मराठी