How to get URL link on X (Twitter) App
या खेळात पैसा नक्की येतो कुठून? बक्षीस रक्कम किती असते? कोणत्या टीमला किती पैसे मिळतात? याचा आढावा घेणारा हा थ्रेड. डेव्हिड स्किलिंग यांच्या मूळ लेखातून ही माहिती घेतली आहे.
मंगळवारी १८ जूनला मुंबईत काही मीटिंग्ज करून संध्याकाळी चेन्नईला जाणारे फ्लाईट पकडणार होतो. बरोबर कंपनीचा डिलरही होता. संध्याकाळी ५:४० च्या फ्लाईटसाठी आम्ही बरेच लवकर म्हणजे ३ वाजता मुंबईच्या टर्मिनल २ ला पोहोचलो. चेक इन करून सिक्युरिटीकडे गेलो. #म #मराठी
या स्पर्धेत खेळत असतानाच राफा त्याचा ३८ वा वाढदिवस साजरा करेल. गेल्या जवळपास एक वर्षाहून अधिक काळ तो फारसे टेनिस खेळलेला नाही. या स्पर्धेआधी राफा बार्सिलोना ओपन, माद्रिद ओपन आणि इटालियन ओपनमध्ये सहभागी झाला होता. #म #मराठी #RolandGarros
ही रेस १९२९ पासून मोनॅकोमध्ये होत आली आहे. युद्ध, फॉर्म्युला कारच्या रेग्युलेशन बाबत असलेली संदीग्धता असा कारणांमुळे काही वर्षे ही रेस होऊ शकली नाही. मात्र १९५५ पासून ते आजतागायत प्रत्येक वर्षी ही रेस फॉर्म्युला वन चॅम्पियनशिपचा भाग आहे. #म #मराठी #MonacoGP
मात्र अनेकदा विमानाच्या वेळेआधी एअरपोर्टला पोहोचूनही एअरलाईन प्रवाशांना बोर्डिंग नाकारतात. असे घडल्यास काय करावे? एअरलाईनकडून किती मोबदला मिळू शकतो? तो कसा मिळवावा? याबाबत अनभिज्ञ असल्याने अनेकांचे आर्थिक नुकसान होते. शिवाय होणारा मानसिक त्रास वेगळाच.#म #मराठी
त्याचा एक भाग म्हणून टूथपेस्ट मार्केटमध्ये प्रवेश करायचे ठरवले. जिथे आधीपासून कोलगेटसारखा ब्रँड वर्षानुवर्षे मार्केट लीडर आहे, 'टूथपेस्ट म्हणजे कोलगेट' असं समीकरण आहे, तिथे दंतमंजन बनवणाऱ्या कंपनीने प्रवेश करणे हेच मोठे आव्हान होते.
रिलायन्ससारख्या प्रचंड समूहाचे आर्थिक पाठबळ असले तरी जिओ सुरु झाली ती एक स्टार्टअप म्हणूनच. सप्टेंबर २०१६ मध्ये ते सुरुवात, सुरुवातीचे काही क्वार्टर्स लॉस आणि २०१७ च्या तिसऱ्या क्वार्टरमध्ये थेट प्रॉफिटेबल असा जीओचा प्रवास झाला.
मग त्यांनी बंगालमधल्या वेगवेगळ्या गावांमध्ये आपले औषध विकायला सुरुवात केली. त्यावेळी लोक त्यांना 'डाक्टर बर्मन' म्हणत. या डाक्टर शब्दातला 'डा' आणि बर्मन मधला 'बर' एकत्र येऊन 'डाबर' असे कंपनीचे नाव झाले.
याआधी तामिळनाडूमध्ये असलेल्या आपल्या फ्युचर फॅक्टरीच्या पायाभरणीपासून ते पहिली गाडी असेम्बली लाईनवरून बाहेर पडण्यापर्यंत प्रत्येक अपडेट आपल्या भविष्यातील ग्राहकांपर्यंत पोहोचेल अशी काळजी ओलाने घेतली.
या अहवालातील काही महत्वाच्या गोष्टी मांडण्याचा हा प्रयत्न.
अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर बीटा हे एखाद्या शेअरची मार्केटच्या तुलनेत असलेली व्होलाटीलिटी म्हणजेच अस्थिरता मोजण्याचे प्रमाण आहे. मार्केटचा बीटा १ धरला जातो आणि प्रत्येक स्टॉकची बीटा व्हॅल्यू ही मार्केटच्या तुलनेत ते किती वर खाली जाऊ शकतात यावरून ठरवली जाते.
तिथून आजपर्यंत या स्टॉकने १००% हून अधिक परतावा दिला आहे.शुक्रवारी हा स्टॉक १३८ रुपयांवर बंद झाला. सध्या पीएसयू स्टॉक बरेच चर्चेत आहेत. मध्यंतरी पीएसयू बँकांनी चांगली रॅली दिली होती. त्यानंतर इतर पीएसयू स्टॉक्सनेही चांगली वाढ दिली.
अनेक रिटेल इन्व्हेस्टर्स हा शेअर चांगला आहे म्हणून छोट्या मोठ्या संख्येने हा शेअर घेऊन बसले आहेत.शेअर मात्र वाढता वाढेना!! सोशल मीडियावर तर हा शेअर मीम मटेरियल झाला आहे. आयटीसीचा शेअर ०.५% टक्के वाढला तरी सोशल मीडियावर मिम्जचा पूर येतो.
जसंजसं आपण कार्ड वापरत जाऊ तशी आपली क्रेडिट लिमिट कमी होत जाते. महिन्याच्या अखेरीस बँक या खर्चाचं बिल आपल्याला पाठवते. ते बिल भरलं की पुन्हा आपलं क्रेडिट लिमिट पूर्वी आहे तेवढं होतं. बिल नाही भरलं तर बँका जबर दराने व्याजआकारणी करतात.