"स्वामीसमर्थ हे काय संत आहेत?

गजाननमहाराज,स्वामी,साईबाबा असल्यांच्या नादी लागून काय उपयोग? आयुष्यात यांनी कधी काही उपदेश केला नाही की साहित्यनिर्मिती नाही.
मदत,सामाजिककाम तेही नाही..

संतमंडळी जरा तरी बरी, पण हे स्वामी, महाराज, बाबा लोक? श्या!"

👆
अशी मल्लिनाथी ऐकत होतो एकाची!-
विस्मय वाटला. ते मत पटल्यासारखं वाटतंय की काय असं झालं!
अरेच्चा! आईवडलांनी केलेला श्रद्धेचा हा संस्कार चुकीचा आहे की काय? वाईट वाटलं. चिंतन सुरू झालं..
ज्ञानोबा,तुकोबा,रामदासस्वामी यांच्या साहित्यातून बोध तरी होतो, पण या अर्वाचीन संतांचं काय बरं योगदान आहे? पोथ्यांतले चमत्कार?
नाही.
विचार केल्यावर समजतं की यांचे उपकार खरं तितकेच महत्त्वाचे आहेत.
कसे?
बर्‍याचदा 'उपदेशा'पलीकडे 'सज्जनसंग्रहाची' निकड फार असते.
समाजात जिवाच्या ओढीमुळे शिवाची आठवण रहात नाही तेव्हा पर्यायानं त्याचा परिणाम सौजन्यावर होतो. मग हे सज्जनत्व टिकवून कसं ठेवावं?

उत्तर - सद्संगतीनं!
सोप्या भाषेत सांगतो,
अस्ताव्यस्त पडलेले कागद फाईल करून ठेवणं पुढची पायरी आहे पण निदान त्यावर पेपरवेट ठेऊन व्यवस्थितपणाची सुरुवात तर करता येते?
तेच काम या अर्वाचीन संतांनी केलं.
परदास्यात खंगलेल्या जिवांना अश्रू वाहायला काय होतं हो? ना त्यांची उपदेश ऐकायची पातळी होती ना इच्छा.
त्यांना फक्त रूळ हवा होता. तो जर मिळाला नसता तर धर्मपथभ्रष्टतेकडे या गाड्या गेल्या असत्या. (उदा. इतर काही राज्ये)
स्वैर, उच्छृंखल वागताना 'आपल्याकडे कुणाचंतरी लक्ष आहे' ही भावना समाजात नसेल तर दुर्जनसंख्या वाढते.
पण जर हे अधिष्ठान असेल तर साधं कर्तव्यकर्मसुद्धा यज्ञ ठरतो!
'बाहेर आजोबा आहेत हं' याचा धाक लेकराला इतका पुरतो की त्यांनी नुसतं हं केलं तरी ते रजिस्टर होतं.
मग आजोबांनी आईसारखी सतत कानउघाडणी करायची गरज नसते

हेच स्थान या अर्वाचीन संताचं आहे.

सूर्यमालिकेतून सूर्य काढला तर ग्रह फिरणार कुणाभोवती?
भरकटलेल्या लोकांकरता अशी गुरुत्वकेंद्रं नकोत?
अर्थात हवीत!
ही गुरुत्वकेंद्रं अक्कलकोट, शेगाव, शिर्डी, धनकवडी, गोंदवले इ. इथे स्थित आहेत.
भागवत,शाक्त,दत्त संप्रदाय पोचले कुणामुळे? यांच्यामुळे!
शेकडो लोक या आध्यात्मिक वाटेवर जाऊन आत्मकल्याण करू शकतायत ते केवळ मनात स्वामींप्रती श्रद्धा असल्यानेच.

सज्जन एकत्र असण्यात खरी शक्ति.
ते एकत्रीकरण तेवढं फक्त या अर्वाचीन संतांनी केलं तेच फार फार मोठं काम आहे. यापेक्षा मोठे उपकार कुठले?

त्यातही,
सतत एकेठिकाणी पूजा केल्यानं साधा बसायचा पाट देखील सिद्ध होतो म्हणतात.
आजवर कोट्यवधी सश्रद्धांनी माथा टेकलेल्या या पवित्र समाधी आतापर्यंत किती सिद्ध झाल्या असतील?
ती प्रतिमा समोर आल्यावर मन निःशंक का होतं? निर्भय का होतं?
हे मानसिक धरणं आहे म्हणताय? असेनाका!
त्यानं सुख मिळतंय हे नाकारू शकाल काय?
अजिबात नाही.
साधनेचा हेतू 'स्वान्तसुखाय'च असतो.

हिंदूधर्माच्या ठिकर्‍या भ्रम पसरवूनच होणार आहेत. Confuse & convince otherwise हेच त्यांचं धोरण..
म्हणूनच अशा गोष्टी ऐकल्यावर फक्त हात जोडणे,
आणि दासगणूमहाराज म्हणतात त्याप्रमाणे प्रार्थना करणे,

🙏अभक्ती संशयाच्या त्या लाटा शीघ्र निवारणे🙏

या लाटा फार भयंकर.
होत्याचं नव्हतं करून टाकून अध्यात्म आणि धर्म वैराण करू शकणारी ही सुनामी असते..

इथं श्रद्धेचा मजबूत बांध हवा.
सश्रद्ध अंतःकरण हवं
नामस्मरणाची जोड हवी
अध्यात्माची ओढ हवी
धर्माचा अभिमान हवा
आणि भक्तीवर विश्वास हवा

नुसत्या धर्माचं वेड हे बकाण्याचं खोड.
त्याला अध्यात्माची पालवी फुटली तरच शांतीची सावली मिळेल, मोक्षाचं फळ मिळेल..

ती श्रद्धा जिवंत ठेऊ.
त्यासाठी, श्रद्धास्थानं पुजती ठेऊ 🙏
या विभूती म्हणजे आमच्या संस्कृतीच्या शुभंकर आहेत!

या आमच्या श्रद्धास्थानांविषयी अश्रद्धांनी तारे तोडायचे नाहीत म्हणजे नाहीत. हा बाणा राबवण्यासाठी आधी आपले हात गुरुत्वाशी जोडलेले हवेत, सतत!

🙏
🌺श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!🌺

पाठीशी आहेतच ते🚩🙏

-
प्रतीक पु. देशमुख

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with प्रतीक पुष्कराज 🚩🚩

प्रतीक पुष्कराज 🚩🚩 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @PraPuDeshmukh

13 Apr
कंबरडं मोडतंय रे सामन्यातिसामान्यांचं..

पाडव्याच्या दिवशी गळ्यातली सोन्याची चेन मोडली एका मित्राने..

लग्न झालंय मागच्यावर्षी, सलूनचा धंदा बंदय आणि घरात पत्नीआईवडीलआजीआजोबा एवढे लोक आहेत.

ब्रेक द चेन म्हणजे हेच काय?
कष्टानं मिळवलेलं सोनंही मोडलं जावं इतकं गरजेचं आहे Lock-down?
त्या स्वाभिमानी मित्राला नेमकी मदत तरी काय offer करू मी?
वडीलही असायचे दुकानावर..
म्हटला गेले सहा महिने एकट्यानेच काम केलं, दाढीकटींगमुळे संसर्ग वाढेल म्हणून वयस्कर वडलांना घरी ठेवलं,

दुकानात जास्तीचा खर्च करून तापमानडिजिटलचेकर काय, ती सलूनकिट्स काय, स्प्रेज काय सगळं सगळं आणलं..
का तर, दुकान बंद नको रहायला..
मामाला जागेचं भाडं द्यावं लागतं, त्याचं घर पण भाड्यावर सुरू आहे.. तो तरी बिचारा काय करणार..

जबाबदारीनं वेढलेलं अवघ्या 28 वर्षांचं ते लेकरू पाहून जीव हळहळला.. आम्ही बसल्याजागी पगार घेऊन बेदरकार मतं ठोकतो, पण असे कित्येक तरुण अक्षरशः रस्त्यावर येतायत.
Read 6 tweets
6 Apr
तुकाराम महाराज आणि 'बामणं'.👇

"साधा वाणी असलेला हा तुक्या,
गावातले ब्राह्मण त्याच्या पाया पडतात?"

मंबाजी नावाच्या देहूग्रामपुरोहिताला हे सहन होईना.
लक्षात घ्या,
'ब्राह्मण' पाया पडत आहेत याला त्याचा आक्षेप आहे.
इथे, मंबाजी सोडला तर बाकी सर्व ब्राह्मण तुकोबांच्याच बाजूने आहेत.
मंबाजीनं रामेश्वरशास्त्री बहुलकरांना बोलवून तुकोबांच्या वेदज्ञानाचा पराभव करायला व गावातल्या सगळ्या ब्राह्मणांना शासन करायला सांगितलं.

👆
आता काय झालं? रामेश्वरशास्त्री स्वतःच प्रभावित होऊन तुकोबांचे शिष्य बनले!

पुढे महाराजांच्या प्रसिद्ध चार टाळकऱ्यांत पहिले चार टाळकरी कोण?
होय, ब्राह्मणच.
त्यातल्याच एका 'गंगाधरपंत मवाळ' यांच्या कडूस गावचा मी आहे.. मला अक्कल शिकवू नये.

एका मंबाजी नावाच्या पुजारी लेवलच्या ब्राह्मणाने त्रास दिला पण बाकीच्या समस्त विद्वान ब्रह्मवृंदांनी तुकोबांची कीर्तनं समोर बसून ऐकली ते नाही का दिसत?

ब्रिगेडी लपून धर्मविरोध करतात
Read 6 tweets
1 Mar
काल मी 98ने पेट्रोल भरलं..

तळतळाट, उद्वेग, हळहळ या सगळ्या भावना आल्या.
त्या स्वाभाविक आहेत. 500मधे तीन आठवडे चालणारी माझी प्लॅटिना आता आठवड्याला साधारण तितकंच पेट्रोल मागू लागलीए..

याची चीड रोजची 30km+ drive असणार्‍याला येणारच रे!

पण नक्की कुणावर रागवायचं⁉️
खरी गोम यात आहे..
कारण असंय, की आपला असा सरळसोट ग्रह झालाय की इंधनकिमती फक्त केंद्रसरकार नियमित करू शकतं..
लिट्रली हाच समज आहे प्रत्येकाचा..
माझाही होता.

लेकिन वैसा है नही!

इंधनकिमतीच्या सुमारे 30 टक्के कर हा राज्य सरकारचा असतो. (अतिरिक्त सेस आणि आता कृषी सेस धरून.)

खरं पेट्रोल महागतं ते इथे👆
कच्चं इंधन आजमितीला 23.9 लिटर मिळतंय.
रिफाइन, प्रोसेसिंग करून पंपात पोचेपर्यंत ते होतं 29rs.
रोडसेस,excice duty कर केंद्राचे असतात. त्याने ते होतं अंदाजे 61rs.

पंप डीलर किती घेतो माहित्येय?
तब्बल 4 रुपये लिटरमागे!🤑
उगाच पेट्रोलपंप उघडत नाहीत राजकारणी!

पेट्रोल झालं 65 रुपये!
Read 8 tweets
26 Feb
सावरकर आम्हाला का पूज्य आहेत?

त्यांच्याइतकं नेमकं, bull's eye vision ज्याला म्हणतात तितकं थेट समीक्षण दुसर्‍या कुणाचंही नाही.

ते,
हिंदुत्ववादी, पण सनातनी नाहीत
कविह्रदयी, पण कल्पनाविलासी नाहीत
राजनीतिज्ञ, पण राजकारणी नाहीत

त्यांची एकूणएक कृती तार्किक असण्याचं हेच खरं कारण.
हा तोल कसा सावरला?
किती अवघड आहे हे?

पूर्ण हिंदुत्वाकडे जायचं, मात्र एका कलाकडे झुकत बाजू घ्यायची नाही.
आणि पूर्णतः धर्म नाकारून एककल्ली शुष्कही व्हायचं नाही.
फार अवघड सुवर्णमध्य.

जो धर्मावर कठोर भूमिका घेईल आणि
हिंदुस्थान हिंदूंचाच आहे हेही छातीठोकपणे सांगेल.. एकाचवेळी..!
पण याचा दुहेरी फटका त्यांना बसला!

सर्वधर्मसमभावाच्याखालून स्वार्थ साधणारे तथाकथित secular पक्ष त्यांच्यापासून दूर गेले. कारण सावरकरांनी हिंदुत्व पुरस्कृत केलं.

आणि हिंदुत्ववादी म्हणवणारी सनातनी मंडळी त्यांच्यापासून दूर गेली.. कारण त्यांनी हिंदुत्वाला पारखून घ्यायला सांगितलं..
Read 10 tweets
25 Feb
पेशवाई!
उदाहरण म्हणून.
फक्त राजांच्या गादीशी निष्ठा ठेवणारं पद. स्वराज्य फक्त वाचवलंच नाही तर वाढवलं..

स्वराज्यातला 'स्व' स्वतःचा मानून रक्त सांडणारे पेशवे टीकेचे धनी का आणि कसे झाले?
त्यांच्या श्रीमंती मुकुटाच्याआतले काटे लोकांना दिसले का नाहीत? पराक्रमाचं श्रेय का मिळालं नाही?
हे दिसतं तसं नाही. ही परिस्थिती आजची आहे.
पन्नास वर्षांपूर्वीपर्यंत इतका द्वेष नव्हता.. श्रीमंतबाजीरावांचं नाव आदराने घेतलं जायचं सर्वत्र.

जातीपातीच्या राजकारणाने महाराष्ट्रसत्ताघट ढवळता येतो हे इथल्या राजकारण्यांना कळलं आणि इतिहासाचं विद्रूपीकरण सुरू झालं..
सरसकट जाती वर आल्या.
एखाद्या थोर माणसावर अगदी कुणीही उठून शिंतोडे उडवायला लागला.. धरबंध राहिला नाही..

इतर राज्यांहून बराच बरा असलेला महाराष्ट्र पुन्हा जातीपातीच्या राजकारणात अडकला तो कायमचाच!!

पुन्हा वर कधी येणार?
प्रयत्न आपणच करायला हवेत!
इतिहास आपणच उपसायला हवा, समोर आणायला हवा, अभ्यास करायला हवा
Read 6 tweets
24 Feb
ब्राह्मण मराठा वाद लावणे म्हणजे, केसरकांती हिंदूंअवकाशातील 'ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज' या दोन सूर्यांमधे राहूकेतूंची सावली आणण्याचा प्रयत्न करणे!
अशी ग्रहणं लावणारे कित्येक आले आणि गेले.!
पण या तेजाने ही भूमी अशीच उजळत राहिली!

कुणाची भीती घालता रे? कुणात भांडण लावता?
आमच्यात?
दादा, आपल्याच समाजातील शिर्के, खोपडे, मोरे असे चांगले कुलवंत मराठा गडी छत्रपतीशिवाजीमहाराजांच्या मुळावर उठले होते हे लक्षात ठेवा..
फितुरी करण्यात, भांडणतंटे करण्यात, बादशहाला जाऊन मिळण्यात कोण पुढे होते त्याचा अभ्यास करा.. भवानीमूर्ती फोडायला खानाला गाभारा दाखवणारा मंबाजी भोसले-
हा अफझल्याचा निष्ठावान सरदार असेल किंवा राजांवर विषप्रयोग करणारा जावळीचा चंद्रू मोरे असेल..
पण तुम्ही उल्लेख कुणाचा करता? अनाजी आणि भास्कर?
महाराजांच्या गादिशी गद्दारी करणारे किती कुलवंत मराठा दाखवू? पवार, गायकवाड, शिर्के घराणी स्वायत्त झाली पण नानासाहेब पेशवा म्हटला आम्ही मात्र-
Read 7 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!