आज एका कायदेतज्ञाची जयंती आपण साजरी करीत आहोत. वेळोवेळी सामाजिक न्यायासाठी वारंवार आपली भूमिका निर्विवादपणे मांडणाऱ्या आणि समतेवर आधारित देशाचं भविष्य पाहणाऱ्या महामानवाचं स्वप्न अजून तरी पूर्ण झालेलं दिसत नाही.
1/14 #म#रिम
न्यायाची प्रकर्षाने बाजू मांडणाऱ्या भिमरावांचं कायदेतज्ञाच्या रूपाचं दर्शन आपल्याला १९२६ सालच्या दिनकरराव जवळकर खटला, १९२७ सालचा फिलीप स्प्रॅट या कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्याचा खटला आणि १९३४ सालचा रघुनाथ धोंडो कर्वेंचा खटला असो तीनही वादग्रस्त खटल्यांमधून आंबेडकर यांनी…
2/14
...न्यायाची विद्रोही भुमिका घेतलेली दिसून येते. कायदा आणि वकिली हा त्यांचा आवडीचा विषय होता. न्यायालयीन कामकाजांबद्दल पाहणी करण्याची पण त्यांना विलक्षण आवड होती. २३ जुलै १९५० रोजी त्यांनी औरंगाबाद सेशन्स कोर्टाला भेट दिली होती.
3/14
त्या न्यायालयाचं कामकाज पाहून त्यांनी समाधान देखील व्यक्त केलं होतं. त्यावेळी तिथे त्यांचा स्वागत समारंभ देखील आयोजित करण्यात आला होता; त्यावेळी बोलताना ते म्हणाले होते की, "मला वकिलीचा धंदा फार आवडतो, पण या धंद्याविषयी लोकांत आदर नाही. 4/14
भारतात वकिलावर कित्येक आरोप केले जातात. मध्यवर्ती सरकारातून मुक्तता झाल्यावर मी वकिलीलाच वाहून घेणार आहे. आज या देशात लायक असे वकिल थोडेच आहेत आणि लायक वकिल नसतील, तर या खात्याची अधोगती होईल. आज या धंद्याला अवनत कळा आली आहे.
5/14
याचे कारण म्हणजे या धंद्यात काम करणारे लोक निवृत्त होऊन तरून वकिलांना संधी देत नाहीत. अर्थात धंद्याची प्रतिष्ठा राहावी म्हणून तरूण वकिलांना संधी दिली जाणे आवश्यक आहे.
6/14
या व्यवसायात नीतिमत्ता राखून स्वातंत्र्य, हेबिअस कॉर्पस, इतर कामकाजाचे महत्व ओळखावे आणि राष्ट्राची सेवा करावी. कोर्टाच्या कामकाजात स्थानिक भाषा, राष्ट्रीय भाषा वापरावी.
7/14
आज शक्य वाटत नसले, तरी कालांतराने स्थानिक आणि राष्ट्रीय भाषा कार्यक्षम झाल्यावर या भाषांना योग्य स्थान मिळेल."
वकिलीचा उपयोग राष्ट्रसेवेकरीता व्हावा असं त्यांचं मत होतं. आज समाजातील प्रत्येक अन्यायग्रस्तासाठी शरणगृह हे न्यायालय व आधारवड वकिल असतो.
8/14
दरवर्षी आपल्या देशात अनेक केस फाईल होतात पण हे खटले प्रलंबितच राहतात. न्यायाधीशाने निष्पक्ष आणि संवेदनशील असणं गरजेचं बणलंय कारण गरीब लोकं हे न्यायाची आस ठेवून न्यायपालिकेत वारंवार येतात. 9/14
याचं कारण म्हणजे त्यांना एक गोष्ट माहीत असते की, पोलिस किंवा सरकार जर त्यांचा आवाज ऐकत नसेल तर न्यायपालिका त्यांचा आवाज नक्की ऐकेल.
10/14
याचंच कारण म्हणजे लोकांचा अजूनही न्यायपालिकेवर विश्वास आहे, परंतु न्यायाधिशाच्या खुर्चीत बसणाऱ्या प्रत्येकाचं ते कर्तव्य आहे की त्या लोकांच्या विश्वासाला तडा जाता कामा नये. आणि आज आपण पाहतोच की न्यायाव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केली जातात. 11/14
चांगले वकिल न्यायाधीश होऊ पाहत नाहीत. खटले लांबणीवर टाकले जातात. धुव्वाधार पैसा लोकांकडून उकळला जातोय. आणि सध्याचे खटले पाहताच आहात! बलात्कारांसारखे खटले वर्षोंवर्षे चालतात. आर्थिक बळ पणाला लावून आरोपी लगेच बाहेर येतात. या बर्याच प्रश्नांची उत्तरं अजूनही मिळत नाहीत.
12/14
समतेवर आधारित सामाजिक न्यायाची प्रणाली जी भिमरावांना हवी होती ती काही अजूनही आपल्याला दिसून येत नाहीय.
आज १३० वी भीम जयंती आहे, त्या निमित्तानं का होईना पण या प्रश्नांचा विचार आंबेडकरांच्या चश्म्यातून पाहण्याचा प्रयत्न तरी आपण करू शकतो.
13/14
कालपासून युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरीकेतील फ्रिडम हाऊस रिपोर्ट खूप गाजतोय. आणि कारण देखील तसंच आहे. फ्रिडम हाउस रिपोर्टर टिम ने जगातील लोकशाही राष्ट्रांचा सर्व्हे केला आहे त्यातून बऱ्याच धक्कादायक गोष्टी समोर आल्या. +👇 #Threadकर#PartlyFree
अगोदर पाहुया कि फ्रिडम हाऊस आहे काय?? तर फ्रिडम हाऊस हे अमेरीकेतील सर्वात जुन्या संघटनांपैकी एक आहे की जे लोकशाही तत्वांचा पुरस्कार करते व यांचं मत आहे की प्रत्येकाला आपल्या हक्कासाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे. +👇
संघटना १९४१ साली न्यु यॉर्क येथे स्थापन झाली. याचं मुख्य कारण होतं दुसरं महायुद्ध आणि समाजसत्ताविरोदी आक्रमक राष्ट्रवादी पंथाविरूद्ध लढा देणे.
या अहवालानुसार जर पहायला गेलं तर, मग प्रथमतः हे लक्षात घेतलं पाहिजे की "ग्लोबल इकॉनॉमीक फ्रिडम इंडेक्स २०२०" मध्ये भारताचा क्रमांक +👇
महाराष्ट्र या स्वातंत्र्यवीरांना ओळखतो का?
हे सर्वजण आहेत,
अंदमानातील काळ्यापाण्याच्या शिक्षेचे कैदी
बबन फाले, नागपूर,यांनी लिहिलेल्या "क्रांतीधाम" या पुस्तकातील माहिती!
लेखक स्वतः २९ वर्षे अंदमान निकोबार येथे शिक्षण विभागात नोकरीला होते.
👇
त्यांना तिथे जी माहिती मिळाली त्या आधारे त्यांनी "क्रांतीधाम" हे पुस्तक लिहिले आहे. वरील सर्वजण राजकीय कैदी आहेत.
काळ्या पाण्याची शिक्षा भोगलेले महाराष्ट्रातील हे स्वातंत्र्यसैनिक. यापैकी कुणीही इंग्रजांसमोर गुढघे टेकले नाही किंवा शरणागती पत्करली नाही वा माफी मागून
👇
स्वतःची सुटका देखील करून घेतली नाही. ते अंदमानात राहिले व अंदामानातच मेले.
मग यांनाहि आम्ही भारताचे "स्वातंत्र्यवीर" च म्हणणार. नाही का ?