जयेश कुलकर्णी, नंदुरबार येथे ११ वीत शिकणारा एक स्वयंसेवक...
आई सात वर्षापूर्वीच गेली तेव्हापासून जयेश आणि त्याची बहीण नंदुरबारला मामाकडेच राहतात तर वडील जवळच एका लहान गावात राहायचे.
काही दिवसांपूर्वी वडिलांना कोरोनाने ग्रासलं.
दुखणं बळावल्याने हॉस्पिटलला दाखल कराव लागलं, त्यातून रेमिडीसिवरचा तुटवडा..
खूप फिरला इंजेक्शनसाठी , सर्वजण प्रयत्न करत होते, एका स्थानिक नगरसेवकांच्या (श्री. कळवणकर) माध्यमातुन इंजेक्शन उपलब्ध झाले, परंतु उशीर झाला. त्याच रात्री जयेशच्या वडिलांना शासकीय रुग्णालयात हलवावं लागलं.
आणि नंतर त्यात त्यांचा दुर्दैवी अंत झाला....
दरम्यान ज्या नगरसेवकांनी इंजेक्शन उपलब्ध करून दिले होते. त्यांच्याकडे दाराशी पहाटेपासून एक जोडपं बसलं होत, त्यांच्या मुलासाठी इंजेक्शन मिळेल का या आशेवर...
नगरसेवक महोदयांनी जयेशच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर भीत भीतच विचारले तुम्ही रेमडीसिव्हर वापरले का ?
जयेशने नाही सांगीतले. कळवणकर यांनी त्याला विनंती केली की एका गरजुला तु देतोस का.....?
थोड्या वेळात घरच्या बाहेर आवाज आला "काका मी बाहेर आलो आहे." जयेश व त्याचे मामा दोघे ऊभे होते. वडिलांचे अंत्यसंस्कार करून ते घरी जात असतांना श्री. कळवणकर यांच्याकडे त्यांनी रेमडीसीव्हर दिले.
त्यांना श्री कळवणकर यांनी पैसे देऊ केले तर त्यांनी ते घेतले नाही. संबंधित जोडप्याला ते injection दिले गेले.
त्यांना जयेशने पैसे न घेता हे दिल्याचे सा़ंगितले. त्यावर जगातील सर्वांत श्रीमंत माणूस म्हणून त्या मुलाला मी म्हणेन असे गौरवोद्गार श्री. कळवणकर यांनी जयेशबद्दल काढले.
आज जिथे ह्या इंजेक्शन च्या माध्यमातून लोक स्वत:च उखळ पांढर करून घेताना दिसतात तिथे ह्या मुलाच्या अंगी असलेला दातृत्व भाव हा त्याला त्याच्या कुटुंबाकडून आणि संघाकडून मिळालेला संस्कार आहे. आणि या संस्काराच्या जोरावर हे राष्ट्र परम वैभवला जाईल यात शंका नाही.
- परेश रत्नाकर यार्दी
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
#पेमा_खांडू हे नाव खूपच कमी लोकांना माहिती होत. अर्थात चमकोगिरीच्या या काळात जमिनीवर काम करणारे नेहमीच दुर्लक्षित राहतात.
पण काल त्यांनी विजयनगरला भेट दिली आणि अनेकजणांना त्यांची ओळख झाली.
पेमा खांडू अरुणाचल प्रदेशातील विजयनगरला by road भेट देणारे पहिलेच मुख्यमंत्री...
आता तुम्ही म्हणाल, राज्याच्या मुख्यमंत्र्यांने राज्यातीलच एखाद्या गावाला भेट दिली तर त्याच एवढं काय कौतुक?
कौतुक यासाठीच की आजपर्यंत या भागाला कुठल्याच मुख्यमंत्र्यांने रस्त्याने प्रवास करत भेट दिली नव्हती, इतके खराब रस्ते आहेत. रस्ते कसले मातीचे ढिगारेच ते...
मियाओ ते विजयनगर असा १५७ किमीचा प्रवास करताना, कधी गाडी तर कधी पायी असा पूर्ण करताना त्यांना तब्बल दोन दिवस लागले.
एका ठिकाणी तर पेमा खांडू स्वतः गाडीच स्टिअरिंग हातात घेत गाडी खड्ड्यातून बाहेर काढताना दिसले.
राहुल गांधींनी नुकतीच संघ विचारांनी प्रेरित #विद्याभारती च्या शाळांची तुलना पाकिस्तानातील कट्टरपंथी मदरशांसोबत करत, बौद्धिक दिवाळखोरीच पुन्हा एकदा प्रदर्शन केलं आहे.
ज्यांना माहिती नाही #विद्याभारती काय आहे त्यांच्यासाठी -
➡️ शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठी अशासकीय शिक्षण संस्था
➡️ संपूर्ण भारतात सुमारे १८,००० प्राथमिक शाळा, विद्यालये आणि महाविद्यालये कार्यरत.
➡️ संलग्न विद्यालयाची संख्या जोडल्यास हाच आकडा २३,००० पर्यंत जातो.
➡️ शिक्षक संख्या - १,४७,६३४
➡️ विद्यार्थी संख्या (२०१९-२०) - सुमारे ३५ लाख
➡️ उद्देश - देशभक्तीने ओतप्रोत भरलेली युवा पिढी तयार करणे.
➡️ विद्याभारतीच्या शाळांमध्ये शारीरिक शिक्षा, योग शिक्षा, नैतिक व आध्यात्मिक शिक्षा, संस्कृत भाषा ई. विषयांवर विशेष लक्ष दिले जाते.
पिझ्झा म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर येत एकदम महागडे रेस्टॉरंट, त्यांचा झगमगाट आणि त्याच भरमसाठ बिल...
पण पिझ्झाचा जन्म कसा झाला? याबाबत आपल्याला फार कमी माहिती असेल...
एकवेळ गरीबांच्या पोटाची भूक भागवणारा पिझ्झा आता श्रीमंत झालाय त्यावर एक छोटासा थ्रेड -
युरोप मध्ये नेपल्स नावाचं एक बंदर होत. खलाशी, हमाल यांच्या वर्दळीने हे बंदर कायम गजबजलेलं असायचं. इथे विश्रांती घ्यायलाही कुणाला वेळ नसायचा मग निवांत बसून भरपेट जेवण करणे तर फार दूरची गोष्ट..
पण म्हणतात ना गरज ही शोधाची जननी असते, आणि याच गरजेचं भांडवल करून एक शक्कल बाजारात आली.
एका खानावळ वाल्याने एका रोटी वर कांदा टोमॅटोची फोडणी आणि मासळी घालून वरून भरपूर चीज टाकून एक चमचमीत आणि भूक भागेल अशी डिश तयार केली ती म्हणजे पिझ्झा...
अगदी उभ्याने पटकन खाता येईल असा हा प्रकार तिथल्या गरीब मजूर लोकांनी उचलून धरला.
अयोध्येत भव्य राममंदिर उभारणीसाठी निधी संकलन अभियान सुरू होत आहे. हे अभियान म्हणजे प्रभू श्रीरामांच्या आड २०२४ चा निवडणूक प्रचार आहे असा आरोप शिवसेना करत आहे.
आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल की निधी संकलना मागे नक्की काय प्रयोजन आहे? मला जे वाटतं त्याबद्दल हा छोटासा थ्रेड....
आपल्या देशात अंबानी, अदानी सारखे अनेक उद्योगपती आहे जे एकरकमी १५०० कोटी देऊन मंदिर उभारू शकतात.
मात्र अशा पद्धतीने मंदिर उभारल्यास किती हिंदूंना हे मंदिर "आपले" वाटेल? राम मंदिरावर त्यांच्या "सौजन्याची" पाटी आपल्याला चालेल?
मंदिरासाठी अगदी १० रुपयांपासून १००० रुपयांपर्यंतचे कूपन उपलब्ध आहेत आणि २१०० रुपयांच्या वरील सर्व रक्कम चेकद्वारे स्वीकारली जाणार आहे.
त्यामुळे राजकीय पक्षनिधी मध्ये जशी गडबड होते तशी यात अजिबात होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे.